Wednesday, April 7, 2021

पूर्ण वर्तमानकाळ वाक्यरचना शिका, learn to speak present perfect tense.

 

पूर्ण वर्तमानकाळ हा इंग्रजी भाषेतील अतिशय महत्त्वाचा काळ आहे . बर्‍याच विद्यार्थ्यांना आणि मोठ्या माणसांना पण या काळातील वाक्यरचना थोडी कठीण वाटते . मी कठीण वाटते असे यासाठी म्हणालो की मी भरपूर वेळा लोकांना या काळातील वाक्ये चुकीच्या पद्धतीने बोलताना आणि लिहिताना पाहिलेले आहे . याचे कारण म्हणजे या काळात have आणि has हे दोन शब्द वापरावे लागतात आणि लोकांची येथे बर्‍याच वेळा चूक घडते.विद्यार्थ्यांना पण have कधी वापरावे आणि has कधी वापरावे हे समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे या काळात क्रियापदाचे तिसरे रूप वापरावे लागते, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक क्रियापदाचे तिसरे रूप माहिती असणे आवश्यक आहे . पण खरं सांगू का......हा अतिशय सोपा काळ आहे . सर्वप्रथम क्रियापदाची तीन रूपे बघा .....

उदाहरणार्थ ....
1) play (खेळणे)  played  (खेळले)   played   (खेळलेले)
2) sit (बसणे)      sat  (बसले)           sat        (बसलेले) 
3) cut (कापणे)    cut (कापले)          cut       (कापलेले) 
4) drink (पिणे)    drank (पिले)        drunk    (पिलेले) 
5) write (लिहिणे) wrote (लिहिले)   written ( लिहिलेले)

आता आपण पाहूया की पूर्ण वर्तमानकाळाची वाक्ये  कधी वापरावीत .... 
  जे काम  पूर्ण झालेले  आहे ते सांगण्यासाठी पूर्ण वर्तमानकाळ वापरला जातो हे आपल्याला या काळाच्या नावावरूनच तर समजते .....पण लक्षात फक्त एवढेच ठेवायचे की ते काम अगदी थोड्या वेळापूर्वी पूर्ण झालेले असले पाहिजे .....एखादे काम पूर्ण होऊन भरपूर वेळ झाला असेल तर अशावेळी ते भूतकाळात झाले असे आपण समजले पाहिजे .(म्हणजे काल किंवा त्यापेक्षा अगोदर ) पूर्ण झालेली कामे .....
अजून एकदा बघा,  पूर्ण वर्तमानकाळ म्हणजे आपले काम पूर्ण होऊन फक्त थोडा वेळ झालेला आहे .....थोडक्यात सांगायचे म्हणजे आपले काम आजच पूर्ण झालेले आहे .
परत एकदा सांगतो... पूर्ण वर्तमानकाळ अतिशय सोपा काळ आहे ....होय खरंच हा खूप खूप सोपा काळ आहे . कसा ते पहा खालील वाक्ये .....अगोदर मराठीत !
1) मी घरी पोचलेलो आहे .
2) त्याने गायीला पाणी पाजलेले आहे.
3) आईने स्वयंपाक तयार केलेला आहे .
4) बाबांनी म्हशीचे दूध काढलेले आहे .
5)  दुकानदाराने दुकान बंद केलेले आहे .
वरील सर्व कामे आजची आहेत म्हणजे थोड्या वेळापूर्वी पूर्ण झालेली आहेत . 

-----------------------------------------------------------------------------

चला आता इंग्रजी भाषेत शिकूया ......त्यासाठी एक क्रियापद वापरूया.


🍎 See (पाहणे)   saw (पाहिले)     seen (पाहिलेले) 


1) मी पाहिलेले आहे ............I have seen........ ..
2) आम्ही पाहिलेले आहे .......We have seen..... 
3) तू पाहिलेले आहे .............You have seen..... 
4) तुम्ही पाहिलेले आहे .........You have seen....... 
5) त्याने पाहिलेले आहे .........He has seen...... 
6) तिने पाहिलेले आहे ..........She has seen........ 
7) ते ने पाहिलेले आहे ..........It has seen............ 
8) त्यांनी पाहिलेले आहे .........They have seen....... 

 आता एक गोष्ट बिनधास्त लक्षात ठेवा .......I, We, You, You, They यांच्या सोबत have वापरावे .

आणि He, She, It, सोबत has वापरावे.

=======================================

खालील वाक्ये शांतपणे वाचा ......


1) मी अस्वल पाहिलेले आहे .
👉 I have seen a bear. 

2) आम्ही अस्वल पाहिलेले आहे .
👉 We have seen a bear. 

3) तू अस्वल पाहिलेले आहे .
👉You have seen a bear. 

4) तुम्ही अस्वल पाहिलेले आहे .
👉 You have seen a bear. 

5) त्याने अस्वल पाहिलेले आहे .
👉 He has seen a bear. 

6) तिने अस्वल पाहिलेले आहे .
👉She has seen a bear. 

7) ते ने अस्वल पाहिलेले आहे .
👉It has seen a bear. 

8)  त्यांनी अस्वल पाहिलेले आहे .
👉They have seen a bear. 


-----------------------------------------------------------------------------


आपण He ऐवजी मुलांची नावे वापरू शकतो.....


1) आदित्य ने अस्वल पाहिलेले आहे .
👉Aditya has seen a bear. 

2) दीपकने अस्वल पाहिलेले आहे .
👉 Deepak has seen a bear. 

3) अनिलने अस्वल पाहिलेले आहे .
👉Anil has seen a bear. 


येथे एक गोष्ट लक्षात ठेवा की, वरील मुलांची नावे He च्या ऐवजी वापरलेली आहेत . He सोबत has येते म्हणून मुलाच्या नावासोबतही has  च येते.

-----------------------------------------------------------------------------

आपण She ऐवजी मुलींची नावे वापरू शकतो.......


1) सीमाने अस्वल पाहिलेले आहे .
👉 Seema has seen a bear. 

2) गायत्रीने अस्वल पाहिलेले आहे .
👉Gayatri has seen a bear. 

3) कविताने अस्वल पाहिलेले आहे .
👉Kavita has seen a bear. 


येथे एक गोष्ट लक्षात ठेवा की, वरील मुलींची नावे She ऐवजी वापरलेली आहेत . She सोबत has येते म्हणून मुलीच्या नावासोबतही has च वापरावे.


----------------------------------------------------------------------------

आपण It ऐवजी प्राण्यांची नावे वापरू शकतो .....



1) माझ्या  मांजरीने उंदीर पाहिलेला आहे .
👉 My cat has seen a mouse. 

2) माझ्या हत्तीने वाघ पाहिलेला आहे .
👉My elephant has seen a tiger. 

3) माझ्या म्हशीने कोल्हा पाहिलेला आहे .
👉 My buffalo has seen a fox. 



येथे एक गोष्ट लक्षात ठेवा, वरील सर्व प्राण्यांची नावे It च्या जागी वापरतात त्यामुळे त्यांच्या सोबत It प्रमाणेच has वापरावे.

-----------------------------------------------------------------------------

आपण They ऐवजी अनेकवचनी नावे वापरू शकतो आणि They सोबत have येते म्हणून लक्षात ठेवा अनेकवचनी नामांसोबत have वापरावे लागते........



1) मुलांनी अस्वल पाहिलेला आहे .
👉 Boys have seen a bear. 

2) मुलींनी अस्वल पाहिलेला आहे .
👉Girls have seen a bear. 

3) लोकांनी अस्वल पाहिलेला आहे .
👉People have seen a bear. 


-----------------------------------------------------------------------------

चला आता आपण वेगवेगळी क्रियापदे वापरून बनवलेली वाक्ये वाचूया.........


1) त्याने एक पुस्तक विकत घेतलेले आहे .
👉 He has bought a book. 

2) एका शेतकर्‍याने पिकाला पाणी दिलेले आहे .
👉 A farmer has watered his crops. 

3)शेतकर्‍यांनी पिकांना पाणी दिलेले आहे .
👉 Farmers have watered their crops. 

4) अमोलने एक छान चित्र काढलेले आहे .
👉Amol has drawn a nice picture. 

5) शीतलने खूप छान निबंध लिहिलेला आहे .
👉Shital has written a very good essay. 

6) विद्यार्थ्यांनी क्रिकेट खेळलेले आहे .
👉Students have played cricket. 

7) चोराने सोने चोरलेले आहे .
👉A thief has stolen gold. 

8) गावकर्‍यांनी आम्हाला मदत केलेली आहे .
👉 Villagers have helped us. 

9) तुम्ही आता इंग्रजी भाषा शिकलेली आहे .
👉 You have learnt the English language now. 

10) प्रत्येकजण आनंदी झालेला आहे .
👉 Everyone has become very glad. 


🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸

🍎प्रश्नार्थक वाक्ये


1) मी पाहिलेले आहे का .........? Have I seen.........? 
2) आम्ही पाहिलेले आहे का ....? Have we seen......? 
3) तू पाहिलेले आहे का ..........? Have you seen.....? 
4) तुम्ही पाहिलेले आहे का ......? Have you seen.....? 
5) त्याने पाहिलेले आहे का ......? Has he seen........? 
6) तिने पाहिलेले आहे का ........? Has she seen.......? 
7) ते ने पाहिलेले आहे का ........? Has it seen..........? 
8) त्यांनी पाहिलेले आहे का ......? Have they seen.....? 

आता काही प्रश्न विचारून पाहूया चला.......

1) मी तुला काहीतरी विचारलेले आहे का ?
👉Have I asked you something? 

2) आम्ही भारत सोडलेला आहे का ?
👉Have we left India? 

3) तू मला तुझा पेन दिलेला आहे का ?
👉 Have you given me your pen? 

4) तुम्ही खूप पैसे खर्च केलेले आहेत का ?
👉 Have you spent a lot of money? 

5) खूप पाऊस पडलेला आहे का ?
👉Has it rained heavily? 

6) तिने घर स्वच्छ केलेले आहे का ?
👉 Has she cleaned the house? 

7) त्याने तुला धमकावलेले आहे का ?
👉Has he threatened you? 

8) त्यांनी सामना हरलेला आहे का ?
👉 Have they lost the match? 



🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸

🍎नकारात्मक वाक्ये 


1) मी पाहिलेले नाही .............I have not seen...... ...
2) आम्ही पाहिलेले नाही ........We have not seen...... 
3) तू पाहिलेले नाही ..............You have not seen..... 
4) तुम्ही पाहिलेले नाही ..........You have not seen...... 
5) त्याने पाहिलेले नाही ..........He has not seen....... 
6) तिने पाहिलेले नाही ............She has not seen..... 
7) ते ने पाहिलेले नाही ............It has not seen... ....
8) त्यांनी पाहिलेले नाही .........They have not seen..... 


सरावासाठी आपण खालील वाक्ये वाचलीच पाहिजेत ........

1) मी त्याला ठार केलेले नाही .
👉I have not killed him. 

2) आम्ही इंग्रजी पूर्णपणे शिकलेलो नाही.
👉 We have not learnt English wholly. 

3) तू माझे आव्हान स्वीकारलेले नाही .
👉 You have not accepted my challenge. 

4) तुम्ही अजून सुरूवात केलेली नाही .
👉 You have not started yet. 

5) माझ्या वडिलांनी मला वाढदिवसाच्या निमित्ताने  काहीही भेट दिलेले नाही .
👉My father has not gifted me anything on my birthday. 

6) मी पैसे कमावलेले नाहीत. 
👉I have not earned money. 

7) अजून कोणीही दुकान अघडलेले नाही .
👉No one has opened shop yet. 

8) तिने मला उत्तर दिलेले नाही .
👉She has not answered my question. 



🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸

🍎प्रश्नार्थक नकारात्मक वाक्ये 


1) मी पाहिलेले नाही का ..........? Have I not seen......? 
2) आम्ही पाहिलेले नाही का .....? Have we not seen...? 
3) तू पाहिलेले नाही का ...........? Have you not seen..?
4) तुम्ही पाहिलेले नाही का .......? Have you not seen...?
5) त्याने पाहिलेले नाही का .......? Has he not seen......? 
6) तिने पाहिलेले नाही का ........? Has she not seen....? 
7) ते ने पाहिलेले नाही का.........? Has it not seen........? 
8) त्यांनी पाहिलेले नाही का ......? Have they not seen.? 


खालील नकारात्मक प्रश्न विचारायची वेळ येते कधी कधी ...

1) मी तुला मदत केलेली नाही का ?
👉 Have I not helped you ?

2) त्याने हे पुस्तक वाचलेले नाही का ?
👉 Has he not read this book? 

3) ती  घरी पोहोचलेली नाही का ?
👉Has she not reached home? 

4) विलास ती दुर्घटना विसरलेला नाही का ?
👉Has Vilas not forgotten that bad chapter? 

5) तू माझ्या मुलाला कहीही बोललेला नाही का ?
👉Have you not exchanged words with my son? 





🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸

🍎आता पुन्हा काही प्रश्न विचारा.......


1) तो कोठे गेलेला आहे ?
👉Where has he gone? 

2) ती केव्हा आलेली आहे ?
👉When has she come? 

3) रमेश येथे का आलेला आहे ?
👉Why has Ramesh come here? 

4) तुम्ही काय विकलेले आहे ?
👉What have you sold? 

5) सरने कोणता धडा शिकवलेला आहे ?
👉Which lesson has teacher taught? 

6) तू किती आंबे खालेले आहेत ?
👉 How many mangoes have you eaten? 

7) माझे पैसे कोणी चोरलेले आहेत ?
👉Who has stolen my money? 

8) तिने किती दूध सांडलेले आहे ?
👉How much milk has she spilled? 

9) तिने कोणाचे पुस्तक आणलेले आहे ?
👉Whose book has she brought? 

10) आदित्यने आज किती वेळ अभ्यास केलेला आहे ?
👉 How long has Aditya studied today? 



🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸

                 Thanks!






No comments:

Post a Comment

Learn to Speak English

Let me play. मला खेळू दे Let me go मला जाऊ दे. Let me eat. मला खाऊ दे. Let me study. मला अभ्यास करू दे. Let me drink milk. मला दूध पिऊ दे. L...