Sunday, April 4, 2021

साधा भूतकाळ वाक्यरचना शिका, Let's learn tense :Simple Past Tense

  विद्यार्थी मित्रांनो, 

आज आपण साधा भूतकाळ शिकणार आहोत . पण मित्रांनो त्याअगोदर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगितली तर चालेल  का ? कालचीच घटना आहे . काय झालं बघा....

मी शाळेत गेलो . छानपैकी मुलांना भेटलो. त्यांना सँनिटायजरचे वाटप केले. मास्क भेट दिले. नंतर अभ्यास तपासला . मग  माझ्या गाडीवर बसलो . गाडी झाडाखाली थांबवली . गार सावलीत जेवन घेतले. आणि मग सावकाश घरी पोहोचलो .

कशी वाटली बरं वरील गोष्ट ? पण गोष्ट वाचताना एक बाब तुमच्या लक्षात आली का ? वरील गोष्टीतील प्रत्येक वाक्य हे  'साधा भूतकाळ' प्रकारचे आहे.

म्हणजे गोष्ट आपल्या फायद्याचीच निघाली की ... भूतकाळ म्हणजे मागे होऊन गेलेला काळ. तसे भूतकाळाचे चार प्रकार आहेत . साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण अपूर्ण भूतकाळ......भूतकाळाच्या चारही प्रकारची वाक्ये वेगवेगळी असतात. साध्या भूतकाळाची वाक्ये वेगळी . चालू भूतकाळाची वाक्ये वेगळी. पूर्ण भूतकाळाची त्यापेक्षा वेगळी . आणि पूर्ण अपूर्ण भूतकाळाची त्यापेक्षाही वेगळीच !

आज मात्र आपण शिकतोय साधा भूतकाळ . साधा भूतकाळ नावाप्रमाणेच  खूप साधा आणि सोपा आहे बरं का मुलांनो ....

या काळात क्रियापदाच्या शेवटी ( ला, ली, ले  ) ही अक्षरे येतात 

वरची गोष्ट पुन्हा वाचली की तुमच्या लगेच लक्षात येईल हे...

खालील सर्व क्रियापदे साध्या भूतकाळातील आहेत.....

आला, गेला, बसला, उठला, हसला, रडला,  खेळला.....
आली, गेली, बसली, उठली, हसली, रडली, खेळली......
आले, गेले, बसले, उठले, हसले, रडले, खेळले.....

आता काही वाक्ये वाचूया ........

1) आदित्य शाळेतून घरी आला .
2) आईने स्वयंपाक केला.
3) कडक उन्हामुळे भाजीपाला सुकला.
4) ताई अभ्यास करायला गेली.
5) बाळ भूक लागल्यावर रडू लागले .

साधा भूतकाळ इंग्रजी भाषेत शिकताना क्रियापदाचे भूतकाळातील रूप वापरले जाते . आता हे काय नवीन संकट आले  असे वाटले का .....मग खालील यादीत बघा ...दोन नंबरला लिहिलेली क्रियापदाची भूतकाळातील रूपे आहेत......

🍎  drive           drove         driven    (चालवणे) 
🍎 mow            mowed      mown    (कापणे) 
🍎 speak          spoke       spoken    (बोलणे) 
🍎 fly            flew     flown               (उडणे)
🍎 give          gave        given          ( देणे) 
🍎 get           got        gotten         (मिळणे) 
🍎 grow        grew       grown      (वाढ होणे) 
🍎 break         broke     broken     (फोडणे) 
🍎hide          hid           hidden     (लपून बसणे) 
🍎 wear         wore       worn        (अंगात घालणे) 
🍎 bite          bit           bitten         (चावणे) 

🍎 throw         threw     thrown      (फेकणे) 

📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋

चला आता आपण एक क्रियापद घेऊया आणि पाहुया साधा भूतकाळ ....

🐒 1) साधी वाक्ये  ( Affirmative Sentences) 


1) मी खेळलो.............I played.......... 
2) आम्ही खेळलो........We played..... 
3) तू खेळला..............You played.... 
4) तुम्ही खेळले..........You played.....
5) तो खेळला............He played........ 
6) ती खेळली.............She played..... 
7) ते खेळले...............It played........ 
8) ते (एकापेक्षा जास्त जण)  खेळले.......They played.......... 


चला आता आपण वाक्ये तयार करून बघूया .....

आपण फक्त क्रियापदाच्या नंतर एक शब्द भरायचा आणि वाक्य तयार .....

1) मी क्रिकेट खेळलो.
👉I played cricket. 

2) आम्ही खो खो खेळलो.
👉 We played kho kho. 

3) तू फुटबॉल खेळला.
👉 You played football. 

4) तुम्ही टेनिस खेळले.
👉You played tennis. 

5) त्याने बॅडमिंटन खेळले.
👉 He played badminton. 

6) तिने बास्केटबाँल खेळले.
👉 She played basketball. 

7) त्यांनी टेबल टेनीस खेळले.
👉 They played table tennis. 

🕸🕸📋📋🕸🕸📋📋🕸🕸📋📋🕸🕸📋📋🕸

आपण क्रियापदे बदलून खूप खूप  वाक्ये तयार करून बोलू शकतो ....

1) मी एक वाघ पाहिला .
👉 I saw a tiger. 

2) आम्ही एका मंदिराला भेट दिली .
👉We visited a temple.

3) तू मला मदत केली .
👉You helped me. 

4) तुम्ही पाच कोटी रुपये कमावले .
👉You earned five crore rupees. 

5) त्याने खूप पैसे दान केले .
👉 He donated a lot of money. 

6) तिने गृहपाठ पूर्ण केला.
👉 She completed her home work. 

7) ते मला भेटायला आले .
👉They came to meet me. 

📋📋📋📋🕸🕸🕸🕸📋📋📋📋🕸🕸🕸🕸🕸

आपण He ऐवजी मुलांची नावे वापरू शकतो .....



1) तो शाळेत गेला . 👉 He went to school. 
1) विजय शाळेत गेला . Vijay went to school. 


2) त्याने सापाला ठार केले .👉 He killed a snake. 
2) अनिलने सापाला ठार केले .👉 Anil killed a snake. 



3) त्याने मला एक गोष्ट सांगितली . 👉 He told me a story. 
3) माधवने मला एक गोष्ट सांगितली .👉 Madhav told me a story. 



📋📋🕸🕸🕸📋📋🕸n🕸🕸📋📋🕸🕸🕸📋📋


 आपण She ऐवजी मुलींची नावे वापरू शकतो .....



1) तिने एक छान चित्र काढले.👉 She drew a nice picture. 
1) संगिताने एक छान चित्र काढले.👉 Sangeeta drew a nice picture. 



2) तिने मला काल फोन केला .👉 She phoned me yesterday. 
2) ताईने मला काल फोन केला .👉 My sister phoned me yesterday. 



3) तिने दरवाजा उघडला .👉 She opened the door. 
3) मनिषाने दरवाजा उघडला .👉 Manisha opened the door. 


🕸🕸📋📋📋🕸🕸📋📋📋🕸🕸📋📋📋🕸🕸

आपण They ऐवजी अनेकवचनी नामे वापरू शकतो ......


1) ते येऊन गेले .👉They came and went. 
1) पोलिस येऊन गेले .👉 Police came and went. 


2) त्यांनी धैर्य दाखवले.👉 They showed courage. 
2) गावकर्‍यांनी धैर्य दाखवले.👉 Villagers showed courage. 



3) त्यांनी रात्रीचे जेवण घेतले . 👉 They took supper. 
3) पाहुण्यांनी रात्रीचे जेवण घेतले .👉 Guests took supper. 



📋📋📋🕸🕸🕸🕸📋📋📋🕸🕸🕸🕸📋📋📋


येथे फक्त एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की साध्या भूतकाळातील साधी वाक्ये बोलताना  क्रियापदाचे फक्त भूतकाळी रूपच वापरले पाहिजे .......




📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋

🐒 2) प्रश्नार्थक वाक्ये : (Interrogative Sentences )

) मी खेळलो का..............? Did I play..........?
2) आम्ही खेळलो का.......? Did we play......?
3) तू खेळला का.............? Did you play.....? 
4) तुम्ही खेळले का..........? Did you play..........?
5) तो खेळला का............? Did he play.......? 
6) ती खेळली का............? Did she play.....?
7) ते खेळले का..............? Did it play.........?
8) ते (एकापेक्षा जास्त जण)  खेळले का.......? Did they play..........? 


अति महत्वाचे......👇👇👇



प्रश्नार्थक वाक्ये बोलताना किंवा लिहिताना एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की,  या वाक्यांमध्ये Did हा शब्द आलेला आहे त्यामुळे आपणाला क्रियापदांचे भूतकाळी रूप वापरण्याची गरज नाही .....तर त्याऐवजी आपण क्रियापदाचे मूळ रूप वापरले पाहिजे . नाहीतर वाक्य चुकलेच म्हणून समजा....


माहितीसाठी खालील एक वाक्य बघा......

1)🎈 मी  खिडकी  बंद  केली का?
👉 Did I close the window? ✔️✔️✔️✔️✔️
👉 Did I closed the window? ❌❌❌❌

वरील वाक्यात अगोदरच do ऐवजी did हे भूतकाळी रूप आलेले आहे त्यामुळे पुन्हा close चे भूतकाळी रूप closed घेऊ नये ....


चला आता खालील उदाहरणे वाचा ......


1) मी एक वाघ पाहिला का ?
👉 Did I see a tiger ?

2) आम्ही एका मंदिराला भेट दिली का ?
👉 Did we visit a temple ?

3) तू मला मदत केली का ?
👉 Did you help me ?

4) तुम्ही पाच कोटी रुपये कमावले का ?
👉 Did you  earn five crore rupees ?

5) त्याने खूप पैसे दान केले का ?
👉 Did he  donate a lot of money ? 

6) तिने गृहपाठ पूर्ण केला का ?
👉 Did she complete her home work ?

7) ते मला भेटायला आले का ?
👉Did they come to meet me ? 




📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋

🐒 3) नकारात्मक वाक्ये : (Negative Sentences )


1) मी खेळलो नाही .............I did not play.......... 
2) आम्ही खेळलो नाही ........We did not play..... 
3) तू खेळला नाही ..............You did not play.... 
4) तुम्ही खेळले नाही ..........You did not play.....
5) तो खेळला नाही ............He did not play........ 
6) ती खेळली नाही .............She did not  play..... 
7) ते खेळले नाही ...............It did not play........ 
8) ते (एकापेक्षा जास्त जण)  खेळले नाहीत.......They did not play.......... 


खालील वाक्यांमध्ये सुद्धा did not हे भूतकाळी शब्द आलेले आहेत त्यामुळे त्यानंतर येणारे क्रियापद हे मूळ रूपातले असते हे पक्के लक्षात ठेवा .......


चला नकारात्मक वाक्ये वाचा आणि सांगा कसा वाटला हा काळ ......


1) मी एक वाघ पाहिला नाही .
👉 I did not see  a tiger. 

2) आम्ही एका मंदिराला भेट दिली नाही  .
👉We did not visit a temple.

3) तू मला मदत केली नाही .
👉You did not help me. 

4) तुम्ही पाच कोटी रुपये कमावले नाही .
👉You did not earn five crore rupees. 

5) त्याने खूप पैसे दान केले नाही .
👉 He did not donate a lot of money. 

6) तिने गृहपाठ पूर्ण केला नाही .
👉 She did not complete her home work. 

7) ते मला भेटायला आले नाही  .
👉They did not come to meet me. 



📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋

🐒 4) नकारात्मक प्रश्नार्थक वाक्ये 


1) मी खेळलो नाही का ...........? Did I not play.......... ?
2) आम्ही खेळलो नाही का ......? Did we not play..... ?
3) तू खेळला नाही का ............? Did you not play....? 
4) तुम्ही खेळले नाही का ........? Did you not play.....?
5) तो खेळला नाही का ............? Did he not play......?
6) ती खेळली नाही का ............? Did she not  play....?
7) ते खेळले नाही का .............? Did it not play.........? 
8) ते (एकापेक्षा जास्त जण)  खेळले नाहीत का.......? Did they not play..........? 


खालील वाक्ये शांतपणे वाचा आणि वाक्यरचना अगदी पक्की लक्षात ठेवा कारण या प्रकारच्या  वाक्यात सुद्धा क्रियापदाचे मूळ रूपच येते...



1) मी एक वाघ पाहिला नाही  का ?
👉 Did I not see a tiger ?

2) आम्ही एका मंदिराला भेट दिली नाही  का ?
👉 Did we not visit a temple ?

3) तू मला मदत केली नाही  का ?
👉 Did you not  help me ?

4) तुम्ही पाच कोटी रुपये कमावले नाही  का ?
👉 Did you not  earn five crore rupees ?

5) त्याने खूप पैसे दान केले नाही का ?
👉 Did he not   donate a lot of money ? 

6) तिने गृहपाठ पूर्ण केला नाही  का ?
👉 Did she not  complete her home work ?

7) ते मला भेटायला आले नाही  का ?
👉Did they not come to meet me ? 


 आता आपल्या लक्षात एक गोष्ट आलीच असेल की,  साधा भूतकाळ शिकत असताना फक्त साध्या वाक्यामध्येच क्रियापदाचे भूतकाळी रूप येते आणि बाकी तीनही प्रकारच्या वाक्यामध्ये did आणि did not हे शब्द आल्यामुळे क्रियापदाचे मूळ रूपच येते.........



📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋


चला फटाफट प्रश्न विचारूया .......

What -व्हाँट -काय ?     Where -व्हेअर -कोठे ?
When -व्हेन -केव्हा ?    Why -व्हाय -का?
Whom -हूम -कोणाला ? Which -विच -कोणते ?
Whose -हूज -कोणाचे ?  How -हाऊ -कसा ?


1) तो केव्हा आला ?
👉When did he come? 

2) ती कोठे गेली ?
👉Where did she go? 

3) तू कोणते पुस्तक वाचले ?
👉Which book did you read ?

4) अनिलने काय खाल्ले ?
👉 What did Anil eat? 

5) सुनिल का रडला ?
👉Why did Sunil cry? 

6) आदित्य किती वेळ खेळला?
👉How long did Aditya play ?

7) माझ्या गाईने किती पाणी पिले?
👉How much water did my cow drink ?

8) आम्ही कसे वागलो ?
👉How did we behave ?

9) भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले?
👉When did India get liberty? 

10) तिने कोणाचा फोन चोरला ?
👉Whose phone did she steal?

11) तू काल किती पुस्तके वाचली ?
👉How many books did you read yesterday?

12) तू ही म्हैस कोठे विकत घेतली ?
👉 Where did you buy this buffalo? 

13) माझ्या वडिलांनी कोणती कार विकली ?
👉Which car did my father sell? 


14) तू त्याला मदत का केली नाही ?
👉Why did you not help him ?


15) तिने माझा फोन का उचलला नाही ?
👉Why did she not receive my call? 


साधा भूतकाळ शिकताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा ....ज्या वाक्यामध्ये did आले तेथे क्रियापदाचे मूळ रूपच वापरावे लागते......


खालील वाक्ये वाचाआणि चुका बघा...... ....

1) तो केव्हा आला ?
👉When did he come? ✔️
👉When did he came? ❌


2)  सीमा कोठे गेली ?
👉Where did Seema go? ✔️
👉Where did Seema went? ❌


3) माझ्या भावाने काय पकडले ?
👉What did my brother catch?✔️
👉What did my brother caught? ❌


4) सर्व विद्यार्थी का रडले ?
👉Why did all students cry? ✔️
👉Why did all students cried? ❌


5) तुम्ही कोणती गोष्ट सांगितली ?
👉 Which story did you tell? ✔️
👉 Which story did you told? ❌





📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋

क्रियापदांची तीन रूपे पाहण्यासाठी माझ्या खालील blog ला भेट दया .......👇

https://englishforenrichment.blogspot.com
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋

                        
                        🎈Thanks! 🎈

No comments:

Post a Comment

Learn to Speak English

Let me play. मला खेळू दे Let me go मला जाऊ दे. Let me eat. मला खाऊ दे. Let me study. मला अभ्यास करू दे. Let me drink milk. मला दूध पिऊ दे. L...