नमस्कार मित्रांनो,
आज आपण इंग्रजी भाषेतील prepositions या महत्त्वपूर्ण शब्दांची माहिती शिकूया . हे असे शब्द आहेत जे आपण नेहमीच वापरतो . वाक्यांतील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांसोबत असणारा संबंध दाखविण्यासाठी हे शब्द वापरले जातात. थोडक्यात सांगायचे म्हणजे हे शब्द मिठासारखे काम करतात . भाजीत जर मीठ टाकले नाही तर भाजी जशी आळणी आणि बेचव होते तसेच वाक्यात जर योग्य ठिकाणी preposition वापरले नाहीत तर वाक्य अर्थहीन होऊन जाते . बरं मग तुम्हाला prepositions बद्दल खालील माहिती आहे का ...?
1)Preposition चे किती प्रकार आहेत ?
2)त्यांचा वाक्यात किती ठिकाणी उपयोग होतो ?
3) इंग्रजी भाषेत किती preposition शब्द आहेत?
4) यांना preposition असे का म्हणतात ?
वरील सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया म्हणजे आपल्याला उदया चालून याविषयीची कोणीही काहीही माहिती विचारली तर बिनधास्तपणे सांगता आली पाहिजे .
======================================
प्रश्न क्रमांक 01) इंग्रजी भाषेत किती प्रकारचे prepositions आहेत?
उत्तर : इंग्रजी भाषेत दोन प्रकारचे prepositions आहेत.
01 ) Simple Prepositions :
In, of, for, by, above, across, up, down, around, to, out, on, in, over, under, from, off.....
आणि
02) Compound Prepositions :
Into, upon, without, within, outside, inside, beside, before, beyond, below, between....
=====================================
प्रश्न क्रमांक 02) Prepositions वाक्यात कोठे वापरले जातात ?
उत्तर : Prepositions वाक्यात खालील तीन ठिकाणी वापरले जातात.
01) वाक्याच्या सुरूवातीला :
With whom has he come?
02) वाक्याच्या मध्यभागात :
There is a book on the table.
03) वाक्याच्या शेवटी :
What are you talking about?
======================================
No comments:
Post a Comment