मित्रांनो नमस्कार,
आज आपण इंग्रजीतील सहाय्यकारी क्रियापदांची महत्त्वपूर्ण माहिती शिकणार आहोत . आपल्याला इंग्रजी भाषेतील वेगवेगळी क्रियापदे माहिती आहेतच. जसे की ...
1) eat (इट) खाणे
2) go (गो) जाणे
3) play (प्ले) खेळणे
4) drink (ड्रिंक) पिणे
5) tell (टेल) सांगणे
6) jump (जंप) उडी मारणे
पण मित्रांनो, या क्रियापदांसोबत वेगवेगळ्या काळातील वाक्ये बोलण्यासाठी काही इतर शब्द वापरतात . त्या शब्दांना सहाय्यकारी क्रियापदे असे म्हणतात बरं...
मग इंग्रजी भाषेत किती सहाय्यकारी क्रियापदे आहेत बरं ?
त्यांचे किती प्रकार आहेत ?
ते नेमके कोणते शब्द आहेत ?
या सर्व प्रश्नांची परिपूर्ण उत्तरे आपल्याला पुढच्या फक्त पाच मिनिटांत मिळतील आणि नंतर आपल्याला सहाय्यकारी शब्दांची छानपैकी कायमची ओळखही होऊन जाईल ...
चला तर मग सुरू करूया ....
इंग्रजी भाषेत एकूण 24 सहाय्यकारी क्रियापदे आहेत.
त्यांचे दोन प्रकार पडलेले आहेत.
आपण पहिल्यांदा सर्व 24 सहाय्यकारी क्रियापदांची नावे वाचूया...
am, is, are, was, were, do, does, did, have, has, had, shall, should, will, would, can, could, may, might, must, ought , dare , need आणि used !
एकदा मोजून बघा बरं किती भरतात वरील शब्द ते! पूर्ण 24 जर असतील तर आपले काम झाले म्हणून समजा ..
आता यांचे दोन प्रकार कोणते आहेत आणि कोणत्या गटात कोणते शब्द आहेत ते एका झटक्यात शिकूया...
पहिल्या प्रकारची सहाय्यकारी क्रियापदे :
1) Primary Auxiliary Verbs :यांना इंग्रजी भाषेत वरीलप्रमाणे Primary auxiliary verbs असे म्हणतात . ही एकूण 11 आहेत. खालील यादी वाचा ..यांचा उपयोग वेगवेगळ्या काळाची वाक्ये तयार करण्यासाठी होतो ....
am
is
are
was
were
do
does
did
have
has
had
आता या 11 शब्दांचा उपयोग निरनिराळ्या काळातील वाक्ये तयार करताना केला जातो हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेले आहे . कसे ते पाहूया चला....
1) Am (अँम) आहे.
I am playing cricket.
मी क्रिकेट खेळत आहे . (चालू वर्तमानकाळ)
2) Is (इज) आहे
Savita is reading a story book.
सविता गोष्टीचे पुस्तक वाचत आहे.(चालू वर्तमानकाळ)
3) Are (आर) आहेत, आहात, आहेस
Boys are watching a show.
मुले कार्यक्रम पाहत आहेत .(चालू वर्तमानकाळ)
4) Was (वाज) होता
She was waiting for me.
ती माझी वाट पाहत होती. (चालू भूतकाळ)
5) Were (वर) होते
Girls were swimming in the river.
मुली नदीत पोहत होत्या . (चालू भूतकाळ)
6) Do
Do you like ice-creams?
तुला आईस्क्रीम्स आवडतात का ? (साधा वर्तमानकाळ)
7) Does
Does he hate you?
तो तुझा तिरस्कार करतो का ? (साधा वर्तमानकाळ)
8) Did
When did it rain ?
पाऊस केव्हा पडला ? (साधा भूतकाळ)
9) Have
I have left my village.
मी माझे गाव सोडलेले आहे . (पूर्ण वर्तमानकाळ)
10) Has
Aditya has come here.
आदित्य येथे आलेला आहे . (पूर्ण वर्तमानकाळ)
11) Had
He had plundered me.
त्याने मला लुबाडलेले होते. (पूर्ण भूतकाळ)
आपण जर शांतपणे निरीक्षण केले तर आपल्या सहज लक्षात येईल की, कोणत्या काळाची वाक्ये तयार करण्यासाठी कोणते primary auxiliary verbs शब्द कामाला येतात.
दुसऱ्या प्रकारची सहाय्यकारी क्रियापदे :
2) Modal Auxiliary Verbs :
यांना Modal auxiliary verbs किंवा Modals असेही म्हणतात . यांची संख्या एकूण 13 आहे आणि हे बोलणाऱ्या माणसाची वेगवेगळ्या प्रकारची मनस्थिती किंवा mood दाखवण्यासाठी उपयोगी पडतात ....खालील यादीतील तेरा शब्द बघा..
Shall,
Will,
Can,
Could,
Should
Would
May
Might
Must
Ought
Dare
Need
Used
चला आता आपण वरील 13 modal auxiliary verbs पैकी एका एका शब्दाचा उपयोग पाहूया ....
1) Should (शूड): सल्ला देण्यासाठी उपयोग करतात.
You should take left.
तू रस्त्यावर डाव्या बाजूने चालले पाहिजे .
2) Would (वुड) भूतकाळातील सवयी सांगण्यासाठी उपयोगी पडतो .
I would study for hours during childhood.
मी लहानपणी तासनतास अभ्यास करत असे.
3) Used ( to ) : या शब्दांचा सुद्धा उपयोग भूतकाळातील सवयी सांगण्यासाठी होतो.
I used to swim in our well.
मी आमच्या विहिरीत पोहत असे .
4) Must : बंधन किंवा कर्तव्य सांगण्यासाठी हा शब्द वापरतात . हा शब्द वापरला की, ते काम केलेच पाहिजे असा अर्थ होतो .
You must go to school today.
तू आज शाळेत गेलेच पाहिजे .
5) May : शक्यता व्यक्त करण्यासाठी हा शब्द वापरतात .
He may come here today.
तो आज येथे येण्याची शक्यता आहे .
6)Might : खूप कमी शक्यता आहे हे सांगण्यासाठी हा शब्द वापरतात .
He might help me.
तो मला मदत करण्याची कमी शक्यता आहे .
7) Can : क्षमता किंवा योग्यता सांगण्यासाठी हा शब्द वापरतात . म्हणजे कसं बघा ..माझेच उदाहरण घ्या . मला कोणकोणती कामे जमतात किंवा मी काय करू शकतो हे सांगायचे झाले की मी can शब्द वापरतो ...
I can run very fast.
मी खूप जोरात पळू शकतो.
I can drive a car.
मी कार चालवू शकतो.
8) Could : आपण भूतकाळत काय करू शकलो हे सांगण्यासाठी हा शब्द वापरतात .
I could build a house.
मी घर बांधू शकलो.
I could earn five crore rupees.
मी पाच कोटी रुपयांची कमाई करू शकलो.
9) Shall
10) Will : I आणि We सोबत हा शब्द वापरून खात्री किंवा निश्चितता सांगतात .
I will help you.
मी तुला मदत करीन .
We will buy this house.
आपण हे घर विकत घेऊ.
11) ought to : या शब्दांचा उपयोग आपले कर्तव्य सांगण्यासाठी करतात . काही वेळा सामाजिक आणि नैतिक जबाबदारी सांगण्यासाठी हा शब्द वापरतात .
We ought to wear masks.
आपण मास्क वापरला पाहिजे .
12) Dare : धैर्य दाखवण्यासाठी हा शब्द प्रश्नार्थक आणि नकारात्मक वाक्यात सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरता येतो.
I dare not tell him the fact.
माझी त्याला सत्य सांगायची हिंमत नाही .
13) Need
No comments:
Post a Comment