Thursday, April 8, 2021

पूर्ण अपूर्ण वर्तमानकाळ वाक्यरचना, Present perfect continuous tense

  इंग्रजी शिकण्याची इच्छा असणार्‍या आणि माझ्या इंग्रजीच्या पोस्ट्स मन लावून वाचणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक अभिनंदन !

विद्यार्थी मित्रांनो,  आतापर्यंत आपण वर्तमानकाळाचे तीन प्रकार पाहिलेले आहेत.  कोणते तीन प्रकार आहेत बरं हे आपण शिकलेले.... ? ते आहेत ,

 1) साधा वर्तमानकाळ 

 2) चालू वर्तमानकाळ 

  3)पूर्ण वर्तमानकाळ 

आज आपण शिकणार आहोत वर्तमानकाळाचा चौथा आणि शेवटचा प्रकार,  तो म्हणजे 'पूर्ण अपूर्ण वर्तमानकाळ'.

काय असतो बरं हा पूर्ण अपूर्ण वर्तमानकाळ ? कशा प्रकारची वाक्ये असतात बरं या काळात ? 

पूर्ण अपूर्ण वर्तमानकाळ हा वर्तमानकाळाचा शेवटचा पण महत्वाचा आणि   तितकाच मनोरंजन करणारा आणि आपल्या ज्ञानात भरपूर वाढ करणारा  असा  शिकण्यासारखा प्रकार आहे बरं का!

 मला या काळातील  इंग्रजी  वाक्ये बोलताना खूप आनंद होतो. या काळातील वाक्ये अतिशय सोपी असतात . या काळात since आणि for हे दोन शब्द वारंवार वापरावे लागतात .

पण नक्की कशासाठी आणि केंव्हा वापरावे लागते या काळातील वाक्ये ?

चला तर मग सुरू करूया ....

पूर्ण अपूर्ण वर्तमानकाळ हा आपल्या पूर्वीपासून चालू असलेल्या सवयी सांगण्यासाठी उपयोगी पडतो. म्हणजे कसं ?

समजा खूप पहिल्यापासून सुरू झालेले  आपले एखादे काम करणे आपण आजही  नियमीतपणे चालू ठेवलेले आहे हे सांगण्यासाठी हा काळ वापरतात.

खालील वाक्य वाचा .....

'मी लहानपणापासून क्रिकेट खेळत आलेलो आहे .' या वाक्याचा अर्थ असा आहे की,  मी लहानपणी दररोज क्रिकेट खेळत असे  आणि आजही मी नियमीतपणे दररोज क्रिकेट खेळतो. आपण पूर्वी केलेले काम आजही सुरूच आहे हे सांगण्यासाठी हा काळ वापरतात. खालील पाच वाक्ये वाचली की आपले नव्वद टक्के काम झालेच म्हणून समजा.....!


1) मी गेल्या दोन वर्षांपासून दररोज पोहत आलेलो आहे .

2) ती मागच्या सहा वर्षापासून कपडे शिवत आलेली आहे .

3) मी हा कार्यक्रम गेल्या दोन महिन्यांपासून पाहत आलेलो आहे .

4) शेतकरी गेल्या शेकडो वर्षांपासून शेतात कष्ट करत आलेला आहे .

5) आम्ही गेल्या आठ महिन्यांपासून या बसने प्रवास करत आलेलो आहे .

एक इंग्रजी क्रियापद वापरून तयार केलेली वाक्ये आपले राहिलेले दहा टक्के काम पूर्ण करून टाकतील ......!


===================!=================

 1)  साधी वाक्ये

1) मी वाचत आलेलो आहे.......... I have been reading...... 

2)आम्ही वाचत आलेलो आहे ......We have been reading...

3) तू वाचत आलेला आहे............You have been reading...... 

4)तुम्ही वाचत आलेले आहे.........You have been reading......

5) तो वाचत आलेलो आहे...........He has been reading...... 

6) ती वाचत आलेली आहे ..........She has been reading...... 

7) ते वाचत आलेले आहे ............ It has been reading.......

8) ते (एकापेक्षा जास्त जण)  वाचत आलेले आहेत....They have been reading...... ..


===================================


आता खालील उदाहरणे वाचा .....


1) मी गोष्टींची पुस्तके वाचत आलेलो आहे .

👉 I have been reading story books. 

2) आम्ही संपत्ती वाढवत आलेलो आहे .

👉 We have been increasing our property. 

3) तू फक्त शाकाहारी जेवण घेत आलेला आहे .

👉 You have been taking only vegetarian food .

4) तुम्ही लोकांना मदत करत आलेले आहे .

👉 You have been helping people. 

5) ती नातेवाईक मंडळीना फसवत आलेली आहे .

👉 She has been cheating her relatives.

6) तो मला नेहमीच योग्य सल्ला देत आलेला आहे .

👉He has  been advising me properly every time.  

7) ते मला खूप सतावत आलेले आहे .

👉It has been irritating me  severely. 

8) ते (एकापेक्षा जास्त जण)  माझ्यासोबत असेच वागत आलेले आहेत.

👉 They have been treating me this way. 

9) मी सातत्याने जिंकत आलेलो आहे .

👉 I have been winning constantly. 

10) आदित्य जीवनाचा आनंद लुटत आलेला आहे .

👉Aditya has been enjoying his life. 


🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃


🍎  आपण He ऐवजी मुलांची नावे वापरू शकतो ....

1) आदित्य लहानपणापासून क्रिकेट खेळत आलेला आहे .
👉Aditya has been playing cricket since childhood. 

2) गोपाल वृद्ध आईची काळजी घेत आलेला आहे .
👉 Gopal has been taking care of his aged mother. 

3) माधव गेल्या  दोन महिन्यांपासून अति मद्यपान करत आलेला आहे .
👉Madhav has been over drinking since last two months. 


🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃


🍎 आपण She ऐवजी मुलींची नावे वापरू शकतो .....


1) स्वाती एक सारखी खूप कष्ट करत आलेली आहे.
👉 Swati has been taking pain constantly.  

2) विद्या नियमीत शाळेत उपस्थित राहत आलेली आहे .
👉 Vidya has been attending school regularly. 


3) आरती पैसे कमावत आलेली आहे .
👉 Arati has been making money. 

🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃

🍎 आपण They ऐवजी अनेकवचनी नामे वापरून वाक्ये बोलू शकतो.....


1) लोक एकमेकांना मदत करत  आलेले आहेत .
👉 People have been helping  one another. 


2) डॉक्टर रूग्णांना जीवदान देत आलेले आहेत .
👉 Doctors have been saving lives of patients. 


3) सैनिक देशासाठी लढत आलेले आहेत.
👉Soldiers have been fighting for the sake of motherland. 


🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸

🍎2) प्रश्नार्थक वाक्ये 


1) मी वाचत आलेलो आहे का..........? Have I been reading...... ?

2)आम्ही वाचत आलेलो आहे का  ......? Have we been reading......?

3) तू वाचत आलेला आहे का ...........? Have you  been reading...... ?

4)तुम्ही वाचत आलेले आहे का.........? Have you  been reading......?

5) तो वाचत आलेलो आहे का ...........? Has he  been reading...... ?

6) ती वाचत आलेली आहे का  ..........? Has she  been reading...... ?

7) ते वाचत आलेले आहे का  ............? Has it  been reading.......?

8) ते (एकापेक्षा जास्त जण)  वाचत आलेले आहेत का ....? Have they  been reading...... .?


चला प्रश्न विचारायला.........

1) तू वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आलेला आहे का ?
👉Have you been trying to reduce your weight? 


2) ती फक्त फळे खात आलेली आहे का ?
👉 Has she been eating fruits only? 


3) तुम्ही टी शर्ट्स वापरत आलेले आहे का ?
👉 Have you been using t- shirts ?


4) आदित्य मित्रांना मदत करत आलेला आहे का ?
👉 Has Aditya been helping his friends? 


5) तो विद्यार्थी वेळ वाया घालवत आलेला आहे का ?
👉 Has that student been wasting his time? 


6) रमेश दररोज दोन कथा लिहित आलेला आहे का ?
👉 Has Ramesh been writing two stories everyday? 


7) तू पैशाविषयी विचार करत आलेला आहे का ?
👉 Have you been thinking about money? 


8) ते नियमीत व्यायाम करत आलेले आहेत का ?
👉 Have they been doing exercise regularly? 



🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸

🍎 3) नकारात्मक वाक्ये 


1) मी वाचत आलेलो नाही आहे.......... I have not been reading...... 

2)आम्ही वाचत आलेलो नाही  आहे ......We have not  been reading...

3) तू वाचत आलेला नाही  आहे............You have not  been reading...... 

4) तुम्ही वाचत आलेले नाही  आहे.........You have not been reading......

5) तो वाचत आलेलो नाही  आहे...........He has not  been reading...... 

6) ती वाचत आलेली नाही  आहे ..........She has not  been reading...... 

7) ते वाचत आलेले नाही आहे ............ It has not  been reading.......

8) ते (एकापेक्षा जास्त जण)  वाचत आलेले नाही  आहेत...........They have not been reading.........


खालील वाक्ये शांतपणे वाचा आणि वाक्यरचना  लक्षात ठेवायचा प्रयत्न सुरू ठेवा......


1) मी तब्येतीसाठी वेळ देत आलेलो नाही आहे  .
I have not been giving time for my health. 


2) ती सभ्यतेने वागत आलेली नाही आहे .
She has not been practising decency. 


3) माझा मुलगा अध्यात्मात रूची दाखवत आलेला नाही .
My son has not been showing interest in metaphysics. 


4) तू माझ्या अटी मान्य करत आलेला नाही आहे .
You have not been accepting my conditions.


5) रूग्ण उपचाराला प्रतिसाद देत आलेला नाही आहे .
 The patient has not been responding to treatment. 


6) मी तुझ्यासोबत माझ्या इच्छेने राहत आलेलो नाही आहे .
 I have not been living with you willingly. 


7) तो चुकांपासून शिकत आलेला नाही आहे .
 He has not been learning from his blunders.


8) मी झपाट्याने प्रगती करत आलेलो नाही आहे .
I have not been progressing by leaps and bounds. 


🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸

🍎 4) प्रश्नार्थक नकारात्मक वाक्ये


1) मी वाचत आलेलो नाही आहे का..........? Have I  not been reading........ ?
2) आम्ही वाचत आलेलो नाही  आहे का ......? Have we not  been reading.....?
3) तू वाचत आलेला नाही  आहे का...........? Have you  not  been reading......? 
4) तुम्ही वाचत आलेले नाही  आहे का .........? Have you  not been reading.....?
5) तो वाचत आलेलो नाही  आहे का...........? Has he not  been reading......? 
6) ती वाचत आलेली नाही  आहे का ..........? Has she not  been reading...... ?
7) ते वाचत आलेले नाही आहे का ............ ? Has it  not  been reading.......?
8) ते (एकापेक्षा जास्त जण)  वाचत आलेले नाही  आहेत का...........? Have they  not been reading.........?

1)  तू वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करत आलेला नाही आहे का ?
 Have you not been trying to control your weight? 

2) ती तुझ्यासोबतचा वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करत आलेली नाही का ?
Has she not been trying to burry arguments with you?  

3) तुम्ही मला धमकी देत आलेले नाही का ?
 Have you not been blackmailing me? 

4) अनिल लोकांना त्याच्या  भल्यासाठी वापरत आलेला नाही का ?
 Has Anil not been using people for his personal benefits? 

5) आदित्य  फुगीरपणाने वागत आलेला नाही का ?
 Has Aditya not been flaunting ?

6) तो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आलेला नाही का ?
 Has he not been firing his employees? 

7) सविता माझ्याशी दयेने  वागत आलेली नाही का ?
Has Savita not been showing kindness for me? 

8) मी तुला वेळोवेळी सल्ला देत आलेलो नाही का ?
 Have I not been advising you time to time? 

खालील प्रकारची वाक्ये सरावासाठी गरजेची आहेत.....


🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸



No comments:

Post a Comment

Learn to Speak English

Let me play. मला खेळू दे Let me go मला जाऊ दे. Let me eat. मला खाऊ दे. Let me study. मला अभ्यास करू दे. Let me drink milk. मला दूध पिऊ दे. L...