100 Important English proverbs with Marathi meanings.

 

 विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजीतील काही महत्त्वाच्या म्हणी पाहूया .त्यांचे मराठीतील अर्थ वाचूया . आणि त्या लक्षात  ठेवायचा प्रयत्न करूया. मी माझ्या परीने योग्य आणि सोप्या भाषेत अर्थ सांगायचा प्रयत्न केला आहे .  यात जर तुम्हाला कोठे बदल सुचवायचा असेल तर comment करून सांगा . 
1) Might is right. 
👉 बळी तो कान पिळी. कमजोर लोकांना मोठया लोकांचे ऐकावे लागते आणि त्यांच्यासमोर झुकते घ्यावे लागते.
2) Like father, like son. 
👉 जसे आईवडील असतात तशी त्यांची मुले बनतात.
3) A day after the fair. 
👉 वरातीमागून घोडे. वेळ निघून गेल्यावर तयारी करणे.
4) Money makes the man and  mare go.
👉 पैसा खूप महत्त्वाचा आहे . पैशामुळे आपण भरपूर गोष्टी करू शकतो .
5) Money begets money. 
👉 पैशामुळे पैसा वाढवता येतो.
6) First come first served. 
👉 हाजीर तो वजीर. कोणत्याही ठिकाणी आपण वेळेवर उपस्थित  रहायला हवे,  मग यश आपलेच होते.
7) Actions speak louder than words. 
👉 उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ . आपण मेहनत केली पाहिजे . गप्पा मारून यश मिळत नाही .
8) Blood is thicker than water. 
👉 आपणाला सर्वात जास्त प्रिय रक्ताचे नातेवाईकच आसतात. 
9) The child is father of the man. 
👉 मुलाचे पाय पाळण्यात दिसतात . मूल मोठे झाल्यावर कसे बनणार हे त्याच्या लहानपणीच्या वागण्यावरच समजते.
10) An apple a day keeps the doctor away. 
👉 दररोज एक सफरचंद जर खाल्ले तर आपले योग्य पोषण व्हायला मदत होते. मग आपण आजारी पडून दवाखान्यात जायची गरज नाही .
11) Barking dogs seldom bite. 
👉 गर्जेल तो वर्षेल काय? म्हणजे काही माणसे उगी मोठमोठ्या गोष्टी करतात पण काहीच करून दाखवत नाहीत.
12) As the King, so are the subjects. 
👉 यथा राजा, तथा प्रजा. मोठया व्यक्तीकडे पाहूनच लोक त्यांचे अनुकरण करतात व तसे वागतात.
13) Union is strength. 
👉 एकी हेच बळ. आपण एकजुटीने राहिलो तर आपणाला कोणीही त्रास देऊ शकत नाही .
14) Too many cooks spoil the broth. 
👉 पाच पन्नास आचारी, वरणामध्ये मीठ भारी. एखाद्या कामात जास्त लोकांनी भाग घेतला किंवा सल्ला दिला की काम असफल होते.

15) Every house has its skeleton. 
👉 घरोघरी मातीच्या चुली . गरीब असो की श्रीमंत, सर्वांनाच टेंशन आहे .
16) One man's loss is another man's gain. 
👉 एकाची लागली वाट, त्यातून दुसऱ्याची भरभराट .
17) Fortune favours the brave. 
👉शूर व धाडसी माणसाला खात्रीने यश मिळतेच.
 
18) Don't count your chickens before they are hatched. 
👉 अति आशा धरून बसणे काही कामाचे नाही.
19) Look before you leap. 
👉 कोणताही निर्णय योग्य -अयोग्य याचा पूर्ण विचार करून घ्यावा.
20) Still waters run deep. 
👉 हुशार आणि ज्ञानी माणसे शांतपणे व साधेपणाने वागतात.
21) Walls have ears. 
👉 भिंतीला कान असतात.  कोणतीही योजना काळजीपूर्वक आखावी.
22) There is no rose without a thorn. 
👉 काटयावाचून गुलाब नाही . कष्ट केल्यानंतरच यश मिळते.
23) A bird in hand is worth two in the bush. 
👉 हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागू नये .
24) Well begun is half done. 
👉 कोणत्याही कामाची चांगली सुरुवात केली की आपला आत्मविश्वास वाढतो आणि काम पूर्ण करायला हिंमत मिळते.
25) Cowards die many a time before their death. 
👉 भित्रेपणाचा जीवनात खूप त्रास होतो .
26) A bad workman blames his tools. 
👉  नाचता येईना, अंगण वाकडे. आपण काही वेळा स्वत:च्या कमजोरी किंवा चुकीबद्दल दुसर्‍यांना बिनकामी दोष देतो.
27) Where there's a will, there's a way. 
👉 इच्छा तेथे मार्ग . आपली तळमळ असली की यश मिळतेच मित्रांनो.
28) Every dog has his day. 
👉 चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे. प्रत्येकाच्या जीवनात चांगले दिवस येतात.
29) All that glitters is not gold. 
👉  चकाकणारी प्रत्येक वस्तू सोने नसते. एखाद्याला खात्री न करता ताबडतोब चांगले समजू नका .
30) Beggers can not be choosers. 
👉 अडचणीत असताना काहीही पर्याय नसतो.
31) Birds of a feather flock together. 
👉 सारख्या आवडी निवडी असलेली माणसे एकमेकांचे सोबती होतात.
32) Beauty is only skin deep. 
👉 सौंदर्या पेक्षा चारित्र्य खूप महत्त्वाचे आहे .
33) All is well that ends well. 
👉 कोणत्याही गोष्टीचा शेवट चांगला झाला की अगोदरचे सर्व अपयश झाकले जाते.
34) Two of a trade seldom agree. 
👉 कुत्र्याचा कुत्रा दुश्मन असतो.
35) The wearer knows where the shoe pinches. 
👉ज्याचे जळते त्यालाच कळते.
36) Familiarity breeds contempt. 
👉 अति तिथे माती. कोणतीही गोष्ट अति केली की परिणाम वाईट होतो.
37) Make hay while the sun shines. 
👉आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या .
38) Better late than never. 
👉 उशीर  झाला असे समजून गप्प बसण्यापेक्षा ध्येय गाठण्यासाठी मैदानात उतरा....
39) All is fair in love and war
👉 प्रेमात आणि युद्धात सर्व माफ असते.
40) No pains, no gains. 
👉 कष्ट केले तर फळ मिळते . रिकामा वेळ वाया घालवू नये .
41) You can not have a cake and eat it. 
👉तुम्हाला जिंकायचे आहे ना ? मग आयते कसे यश मिळेल ?
दोन्हीतून एकच ....
42) A stitch in time saves nine. 
👉 चुका वेळीच सुधारा....
43) Cut your coat according to your cloth. 
👉 जेवढा झेपेल तेवढाच खर्च करा .....
44) Let sleeping dogs lie. 
👉 शांत असलेले मोहोळ उठवू नका.
45) As you make the bed, so you must lie in it. 
👉 आपल्या कृतीचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो.आपण चांगले वागलो तर भले होते वाईट वागलो तर वाईट.
46) A word is enough for the wise. 
👉 शहाण्याला शब्दांचा मार. शहाणा माणूस केवळ इशारा लक्षात ठेवून  सुधारणा करतो.
47) It never rains but it pours.
👉 संकटे आली की एकापाठोपाठ भरपूर येतात.
48) Contentment is happiness. 
👉 मनाचे समाधान हेच खरे सुख आहे.
49) All work and no play makes Jack a dull boy. 
👉 फक्त काम आणि कामच केले तर काही उपयोग नाही . मनाला ताजे ठेवा. खेळा, फिरा, मित्रांसोबत वेळ घाला.
50) One good turn deserves another. 
👉 आपल्याला कोणी मदत केली तर आपणही योग्य वेळी त्यांना मदत करावी .
51) It takes two to make a quarrel. 
👉 एका हाताने टाळी वाजत नाही . भांडण वैगेरे लागले तर समजा दोघेही दोषी आहेत.
52) A closed mouth catches no flies. 
👉 रडल्याशिवाय आई देखील दूध पाजत नाही . आपण सांगितल्याशिवाय आपली अडचण लोकांना समजत नाही ..
53) Absence makes the heart grow fonder. 
👉 एकमेकांना सोडून दूर गेले की प्रेम वाढते व आठवण येते...
54) A leopard can't change its spots. 
👉 कुत्र्याचे शेपूट वाकडे . माणसाच्या मूळ स्वभावात बदल होत नाही .
55) You can not make an omelette without breaking eggs. 
👉 त्यागाशिवाय भोग नाही . कष्ट केले तरच सुख प्राप्त होते आणि प्रगती होते.
56) It takes a thief to catch a thief. 
👉चोराच्या वाटा चोरालाच माहीत. एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील माहिती त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना जास्त असते .

57) Shallow water makes much noise. 
👉उथळ पाण्याला खळखळाट फार . म्हणजे कमी माहिती असणारेच बडबड करतात.

58) You scratch my back, and I will scratch yours. 
👉 एकमेकांना मदत करून प्रगती करणे .
59) Money doesn't grow on trees. 
👉 पैसे मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते. ते झाडाला लागत नाहीत.
60) A drowning man catches at a straw. 
👉बुडत्याला काडीचा आधार . अडचणीत सापडलेला माणूस काहीही करून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करत असतो..

61) Truth will be out. 
👉 सत्य कधीच लपून राहत नाही .ते एक ना एक दिवस उघडे पडतेच.
62) Let bygones be bygones. 
👉 झाले गेले विसरून जावे. मागच्या दु:खदायक गोष्टी विसरून नवीन उमेदीने कामाला लागा....

63) Give someone an inch and they will take a mile. 
👉 भटाला दिली ओसरी आणि भट हळूहळू हातपाय पसरी.

64) Strike while the iron is hot. 
👉 मिळालेल्या संधीचा योग्य फायदा करून घ्यावा.
65) A good appetite needs no sauce. 
👉 भूकेले भूत थालीपिठाला राजी. भूक लागली की आपण भेटले तेच आनंदाने खातो.
66) Cross the stream where it is the shallowest.
👉 काम जेवढे सहजपणे करता येईल तेवढे करा.
67) Distance lends enchantment to the view. 
👉 दुरून डोंगर साजरे . आपणाला पूर्ण माहिती घेतल्या शिवाय खरी परिस्थिती कळत नाही .
68) It is no use crying over spilled milk. 
👉 होऊन गेलेल्या गोष्टीवर पश्चात्ताप आणि शोक करत बसू नका . पुढे अशी चूक होणार नाही हे पहा.
69) It is never too late to mend. 
👉 आपण कधीही नव्याने सुरुवात करू शकतो .
70) When good cheer is lacking, friends are packing. 
👉 असतील शिते तर जमतील भूते.  अडचणीत लोक दूर राहतात.
71) Marry in haste, repent at leisure. 
👉 अति घाई, संकटात नेई .
72) One man's meat is another man's poison. 
👉वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी आवडतात. सर्वांना एकाच गोष्टीत आवड नसते.
73) Example is better than precept. 
👉 केल्याविना बोलू नये .
74) Forbidden fruit is the sweetest. 
👉 करू नका म्हटले ते करण्यात जास्त कुतूहल वाटते.
75) Listen to people but obey your conscience. 
👉 ऐकावे जनाचे करावे मनाचे.
76) Once bitten twice shy. 
👉माणूस अद्दल घडली की सावधपणे वागतो.
77) Necessity is the mother of invention. 
👉 गरज ही शोधाची जननी आहे . आपण काम पडले तेथे योग्य माहिती काढतो.

78) Experience is the best teacher. 
👉 आपण अनुभवातून खूप शिकत जातो.
79) Fine feathers make fine birds. 
👉  वरवरच्या रूपाला भूलून जाऊ नये .
80) Little things please little minds. 
👉 कोल्हा काकडीला राजी. साधारण माणसे सहज संतुष्ट होतात.

81) He whom God steers sails safely. 
👉 देव तारी त्याला कोण मारी ?
82) There is no smoke without fire. 
👉 काहीतरी घडल्याशिवाय उगीच चर्चा होत नाही .
83) When poverty comes in at the door, love flies out of the window. 
👉  घर फिरले की  घराचे वासे  ही फिरतात.बिकट परिस्थितीत लोक सोडून जातात.
84) The hand that rocks the cradle rules the world. 
👉 जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धार. आई सर्वश्रेष्ठ असते.
85) Penny wise, pound foolish.
👉 छोटया छोट्या गोष्टीत काळजीपूर्वक वागणे आणि अचानक फार मोठे नुकसान करून घेणे .
86) Rome was not built in a day. 
👉 एका दिवसात यश मिळत नाही, त्यासाठी नियमित प्रयत्न सुरू ठेवावे लागतात .
87) It is folly to live in Rome and fight with the Pope.
👉 पाण्यात राहून मगरीबरोबर वैर करू नये .
88) You can not make a silk purse out of a sow's ear. 
👉 कोळसा उगळावा तितका काळाच. माणसाचा खरा स्वभाव कायम असतो.
89) Take care of the pennies and the pounds will take care of themselves. 
👉 थेंबे थेंबे तळे साचे .
90) Many a little makes a mickle. 
👉 थेंबे थेंबे तळे साचे . एका रात्रीत आपण मोठे होत नाही . आपण टप्याटप्याने प्रगती करत जातो.
91) An empty vessel makes much noise. 
👉उथळ पाण्याला खळखळाट फार . बढाई मारणे.

92) Don't cross a bridge, until you come to it. 
👉 संकटांची चिंता करत बसू नये .
93)  The early bird catches the worm. 
👉 कामे तत्परतेने केली की आपण जिंकतो.
94) Bones for latecomers. 
👉 आळस केला की अपयश आले म्हणून समजा.
95) An army marches on its stomach. 
👉सैनिकांना शस्त्रे तर हवीच पण जेवणही योग्य वेळी दिले गेले पाहिजे .
96) As you sow, so shall you reap. 
👉 पेराल ते उगवते. आपण जसे वागतो तसे फळ भेटते.
97) Cloths do not make the man. 
👉 एखाद्याचे कपडे पाहून त्याच्या बद्दल मत बनवू नका .
98) Coming events cast their shadows before. 
👉  संकटाची चाहूल अगोदरच लागते.
99) A Rolling Stone gathers no mass. 
👉 स्थिर झाले तर यश मिळते. उगीच हे करू का ते करू असे वागल्याने प्रगती होत नाही .
100) Every cloud has a silver lining. 
👉 कोणत्याही संकटाच्या प्रसंगात खचून जाऊ नका . तिथून पुढे नक्की काहीतरी चांगले  घडते.
=======================================

Comments

Popular posts from this blog

यमक जुळणारे शब्द: मराठी आणि इंग्रजी

Two And Three Letters Words: 200+ Examples