Thursday, April 15, 2021

इंग्रजी भाषेतील वाक्यांचे प्रकार, types of sentences.

 नमस्कार मित्रांनो, 
आज आपण इंग्रजीतील अतिशय महत्त्वाची आणि खूप खूप सोपी माहिती शिकूया . आपण इंग्रजी भाषा शिकत असताना नेहमी वेगवेगळ्या प्रकारची वाक्ये वापरतो . मग आपणाला इंग्रजी भाषेतील वाक्यांचे प्रकार माहिती असायलाच पाहिजे ना ...इंग्रजी भाषेत वाक्यांचे प्रकार किती आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला जास्त वेळ आणि कष्ट घ्यायची अजिबात गरज नाही बरं का मित्रांनो ....कारण तुम्ही इंग्रजीतील सर्व प्रकारची वाक्ये या अगोदरच कित्येक वेळा वापरलेली आहेत आता फक्त त्यांची नावे वाचून काढली की काम खल्लास ...मला तर वाटते तुम्ही एक किंवा दोन वेळा जर ही पोस्ट वाचली तर पुन्हा तुम्हीच इतर लोकांना इंग्रजीतील वाक्यांचे प्रकार शिकवायला सुरुवात कराल....चला तर मग सुरू करूया ...
इंग्रजी भाषेत वाक्यांचे खालील मुख्य    प्रकार पडतात....
1) Imperative sentences : आज्ञार्थी वाक्ये 
2)Exclamatory Sentences : उदगारवाचक वाक्ये 
3) Interrogative Sentences : प्रश्नार्थक वाक्ये 
4) Assertive Sentences : विधानार्थी वाक्ये 


===================================


चला आपण पहिला प्रकार शिकूया ....


1) Imperative Sentences : आज्ञार्थी वाक्ये 


आज्ञार्थी वाक्ये आज्ञा, विनंती, इच्छा, हुकूम, आदेश व्यक्त करण्यासाठी वापरतात.
आज्ञार्थी वाक्ये दोन प्रकारची असतात . कधी  'हे काम कर ....' असे म्हणणारी तर कधी  'हे काम करू नकोस ....' असा आदेश देणारी ..
'हे काम कर ...' असा आदेश देणारी वाक्ये क्रियापदाने सुरू होतात या वाक्यांत तू  (You)  हे लपलेले असते. आणि  'हे काम करू नकोस....'  म्हणणारी वाक्ये Don't.... ' ने सुरू होतात .
 दोन्ही प्रकारची वाक्ये वाचली की लगेच झाले काम ! आपल्याला आज्ञार्थी वाक्ये सहज लक्षात राहतात . आज्ञार्थी वाक्यांची उदाहरणे बघा .....
'हे काम कर.....' म्हणणारी वाक्ये .
1) इकडे ये.
Come here. 
2) खाली बस. 
Sit down. 
3) दरवाजा उघड.
Open the door. 
4) खिडकी बंद कर.
Close the window. 
5) शांत बस .
Keep quiet. 
6) चालता हो.
Get lost. 
7) रस्त्याच्या डाव्या बाजूने चाल.
Keep left. 
8) हात धुवून घ्या .
Wash your hands. 
9) पुस्तके उघडा .
Open your books. 
10) मला एक पेला पाणी दे.
Please, get me a glass of water. 

=====================================


'हे काम करू नकोस.....' असे म्हणणारी वाक्ये ही Don't या शब्दाने सुरू होतात.
1) ओरडू नको.
Don't shout. 
2) काळजी करू नकोस .
Don't worry. 
3) हालचाल करू नका.
Don't move. 
4) मला एकटे सोडून जाऊ नको.
Don't leave me alone. 
5) मुर्खासारखे वागू नको.
Don't be so silly. 
6) भाव खाऊ नको.
Don't act pricely. 
7) चेंडूला स्पर्श करू नका .
Don't touch the ball. 
8) लोकांसमोर फजिती करू नकोस .
Don't create a scene in front of people. 
9) जोरात चालू नको.
Don't walk fast. 
10) तेथे जाऊ नको.
Don't go there. 


==================================

2) Exclamatory Sentences : उद्गारवाचक वाक्ये 

आपल्याला उद्गारवाचक वाक्ये माहिती आहेतच . या वाक्यांच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येते.(!) उद्गारवाचक वाक्ये नेहमी दोन शब्दांनीच सुरू होतात. हे दोन शब्द म्हणजे What आणि How आहेत. 
1) What ने सुरू होणारी वाक्यें :

येथे एक गोष्ट लक्षात ठेवा की, what ने सुरू होणारी जी उद्गारवाचक  वाक्यें असतात अशा सर्व  वाक्यांत नाम असतेच.


1) What a beautiful car it is! 
2) What a tall tree it was! 
3) What a great player you are! 
4) What a rich person he is! 
5) What a kind man you are! 
6) What a nice temple it is! 
7) What a deep well this is! 
8) What a dangerous trip it was! 
9) What a poor country! 
10) What a brave girl you are! 

===========================================


2) How ने सुरू होणारी काही वाक्यें : 

येथे एक गोष्ट लक्षात ठेवा की, How ने सुरू होणारी जी उद्गारवाचक  वाक्यें असतात अशा सर्व वाक्यांत विशेषण किंवा क्रियाविशेषण असतेच.


1) How lucky you are! 
2) How strange life is! 
3) How lovely the child is! 
4) How tall you have grown! 
5) How stupid she is! 
6) How beautiful Savita is! 
7) How kind my teacher was! 
8) How lazy of you to get up at eight! 
9)How quickly the days have passed! 
10) How foolish your thoughts are! 

11) How beautifully she played! 
12) How bravely our soldiers fought! 

===================================


3) Interrogative Sentences : प्रश्नार्थक वाक्ये 


प्रश्नार्थक वाक्ये माहिती नसलेला माणूस जगात शोधून सापडणार नाही कारण आपण हजारो प्रश्न विचारतच लहानाचे मोठे होतो ....बरोबर आहे ना माझं! 
तरीपण बघा प्रश्नार्थक वाक्य कसे ओळखावे ....? तर अशा  वाक्यांच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते . (?)
मित्रांनो प्रश्नार्थक वाक्ये खालील  दोन प्रकारे सुरू होतात ...
1)  Wh- words :
2) Helping verbs :

आता वरील दोन प्रकार काय आहेत ते खाली पहा ..सहज लक्षात येईल ....

====================================

चला आपण wh-words आणि त्यांचे मराठीतील अर्थ आणि त्यांच्या मदतीने सुरू होणारे प्रश्न पाहूया.
1) what ( व्हाँट) काय 
2) when (व्हेन)  केव्हा 
3) where (व्हेर) कोठे
4)why (व्हाइ)  का
5) who (हू)  कोण
6) whom (हुम) कोणाला
7) which (विच) कोणता
8) whose (हूज) कोणाचा
9) How (हाउ) कसा
10) How far (हाउ फार)  किती दूर 
11) How long (हाउ लाँग) किती काळ 
12) How often (हाउ आँफ्टन) किती वेळा 

13) How many (हाउ मेनी)  किती 
14) How much (हाउ मच)  किती 
आता काही प्रश्न विचारा ...
1) तू काय खात आहेस?
What are you eating? 
2)तू केव्हा गेला ?
When did you go? 
3) स्वाती कोठे आहे ?
Where is Swati? 
4) तू नाराज का आहेस?
Why are you nervous? 
5) तुझ्या सोबत कोण आहे ?
Who is with you? 
6) तू कोणाला मदत केली ?
Whom did you help? 
7) तू कोणती पेन घेतली ?
Which pen did you purchase? 
8) हा कोणाचा मफलर आहे ?
Whose muffler is this? 
9) तू कशी आहेस ?
How are you? 
10)  तुझी शाळा किती लांब आहे ?
How far is your school? 
11) आदित्य किती वेळ खेळला ?
How long did Aditya play ?
12) तू किती वेळा चहा घेतो ?
How often do you take tea? 
13) तुला किती भावंडे आहेत?
How many siblings do you have? 
14) तू किती पाणी पिले ?
How much water did you drink? 

======================================


2) Helping Verbs :  
आपण helping verbs पाहूया आणि त्यांचे अर्थ शिकूया आणि काही प्रश्न तयार करूया.....

1) Am                  12) Shall
2) Is                     13) Will
3) Are                  14) Should 
4) Was.               15) Would 
5) Were               16) Can
6) Do                    17) Could 
7) Does                18) May
8) Did                   19) Might 
9) Have                20) Must
10) Has                21) Ought to
11) Had                22) Dare to
                               23) Need 


1) मी हुशार आहे का ?
Am I clever? 
2) ती तुझ्यासोबत आहे का ?
Is she with you? 
3) तू घरी आहेस का ?

Are you at home? 

4) तो गाडी चालवत होता का?

Was he driving his vehicle? 

5) मुले शाळेत होती का?

Were boys at school? 

6) तू शाळेत जातो का ?

Do you go to school? 

7) त्याला बिस्कीटे आवडतात का ?

Does he like biscuits? 

8) तू चहा घेतला का ?

Did you have your tea? 

9) तू विलासला पाहिलेले आहे का ?

Have you seen Vilas? 

10) अनिल येथे आलेला आहे का?

 Has Anil come here? 

11) तू कोणाचा तरी विश्वासघात केलेला होता का ?

Had you betrayed someone? 

12) तू मला मदत करशील का ?

Could you help me, please? 

13) ती जर्मन बोलू शकते का ?

Can she speak German? 

14) मी आत येऊ का  ?

May I come in, please ?

15) मी हे काम आज पूर्ण केलेच पाहिजे का ?

Must I complete this task today? 





=====================================


4) Assertive Sentences : विधानार्थी वाक्ये 


एखादी घटना घडलेली आहे हे सांगण्यासाठी विधानार्थी वाक्ये वापरतात. मग ही घटना सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते . अशा वाक्यांत सामान्य विधान केलेले असते . वरील अवघड वर्णन ऐकून कृपया मनात वाईट वाटू देऊ नका कारण हा सर्वात सोपा वाक्यांचा प्रकार आहे आणि आपण दररोज सर्वात जास्त विधानार्थी वाक्ये वापरतो  .दोन चार उदाहरणे वाचली की सगळ्या गोष्टी समजून जातील .

 पण एक गोष्ट लक्षात राहू द्या की विधानार्थी वाक्ये दोन प्रकारची असतात .


1) होय म्हणणारी (होकारार्थी वाक्ये):  Affirmative Sentences 


2) नाही म्हणणारी (नकारदर्शक) वाक्ये : Negative Sentences 

=======================================


1) होकारार्थी वाक्ये : Affirmative sentences 


1) आदित्य खूप प्रेमळ आणि विनम्र मुलगा आहे .
Aditya is a kind and humble boy. 


2) कार खूप वेगाने गेली .
A car ran very fast. 


3) मला माझी शाळा खूप आवडते.
I like my school very much. 

4) आंबे खूप गोड आहेत.
Mangoes are very sweet. 


5) कैलासने पाच गायी खरेदी केलेल्या आहेत .
Kailas has bought five cows. 

6) झाडाखाली एक वानर आहे .
There is a monkey under the tree. 


7) मी खरंच खूप घाबरलेला होतो.
I was really scared and startled. 


8) ही माझी नवीन शाळा आहे .
This is my new school. 


9) तू माझा जीवलग मित्र आहे .
You are my dear friend. 


10) आपण भांबावलेले आहोत.
We are in utter shock. 



==================================


2) नकारात्मक वाक्ये : Negative sentences 

1) हे योग्य नाही .
This is not fair. 


2) माझ्या जवळ पैसे नव्हते .
I didn't have money. 


3) मी तुला समजू शकलो नाही .
I couldn't understand you. 

4) आज पाऊस पडला नाही .
It didn't rain today. 


5) अजय शाळेत येऊ शकत नाही .
Ajay can not come to school. 


6) मी गावी जाण्याची शक्यता नाही .
I may not go to my village .


7) आम्ही कोठेही जाणार नाही .
We will not go anywhere. 


8) ते झाड हिरवे नाही .
That tree is not green in colour. 


9)  त्या  गावात वीज नव्हती.
There was no electricity in that village .


10) मला जास्त भूक नाही .
I am not that hungry. 


=================================


No comments:

Post a Comment

Learn to Speak English

Let me play. मला खेळू दे Let me go मला जाऊ दे. Let me eat. मला खाऊ दे. Let me study. मला अभ्यास करू दे. Let me drink milk. मला दूध पिऊ दे. L...