नमस्कार मित्रांनो,
आज आपण इंग्रजीतील अतिशय महत्त्वाचे तीन प्रकारचे शब्द पाहणार आहोत . हे असे शब्द आहेत जे इतके सोपे आहेत की वाचल्यानंतर आपल्याला खूप सोपे वाटतात आणि इतके खतरनाक आहेत की वाचन झाल्यानंतर दोन दिवसांनी जर यांची माहिती विचारली तर डोके खाजवायची वेळ येते . आला का काही अंदाज मी कोणत्या तीन प्रकारच्या शब्दांबद्दल बोलत आहे ?
होय, तुम्ही बरोबर ओळखले . मी Homonyms, Homographs आणि Homophones बद्दल बोलत आहे .
या तीन प्रकारच्या शब्दांचा गोंधळ उडण्याचे एकमेव कारण म्हणजे या तीन प्रकारच्या शब्दांच्या नावात असलेला सारखेपणा होय.
चला तर मग आता एकेक प्रकारच्या शब्दांचा अर्थ समजावून घेऊया म्हणजे दोन दिवसांनी तुम्हाला सहजपणे यांचा अर्थ सांगता येईल ...जर तुम्ही वाचल्यानंतर दोन दिवसांनी हे शब्द अचूक ओळखले तर तुम्ही जिंकले....!
############################
1) HOMONYMS :
Homonyms म्हणजे असे शब्द आहेत ज्यांचे स्पेलिंग आणि उच्चार एकसारखे आहेत पण यांचे अर्थ मात्र वेगळे आहेत . अशा शब्दांना Homonyms असे म्हणतात .
चला तर आपण आता Homonyms ची उपयोगी उदाहरणे पाहूया आणि त्यांचा उपयोग करून वाक्ये तयार करूया म्हणजे आपल्याला हा घटक लक्षात रहायला मदत होईल ...
1) Bank (बँक) नदीचा किनारा
2) Bank (बँक) पैसे ठेवायची बँक
1) मुले नदीच्या किनारी खेळत आहेत .
Boys are playing on bank of the river.
2) मी बँकेत पैसे जमा केले .
I deposited money in the bank.
==================================
1) Book (बूक) पुस्तक
2) Book (बूक) तिकीट वैगेरे आगाऊ मिळवून ठेवणे (बुकिंग करणे)
1) मी पुस्तक वाचत आहे.
I am reading a book.
2) मी पाच तिकटे काढून ठेवली .
I booked five tickets.
=================================
1) Well (वेल) विहीर
2) Well (वेल) निरोगी
1) या उन्हाळयात आमची विहीर कोरडी पडू शकते .
Our well can run dry this summer.
2)मी पूर्ण निरोगी आहे .
I am really very well .
================================
1)Tire (टाइअर) कंटाळा येणे
2) Tire ( टाइअर) गाड्यांचे रबरी चाक
1) मला खूप कंटाळा आलाय .
I'm quite tired.
2) मला गाडीचे चाक बदलायचे आहे .
I have to replace my bike's tire.
==================================
1) right (राइट) बरोबर
2) right (राइट) उजवा
1) तुझे उत्तर अगदी बरोबर आहे .
Your answer is absolutely right.
2) मी भीषण अपघातात उजवा हात गमावला .
I lost my right hand in a dreadful accident.
==================================
1) ring (रिंग) अंगठी
2) ring (रिंग) वर्तुळ
1)काल बाजारात माझी अंगठी हरवली.
I lost my ring in the market yesterday.
2) एक वर्तुळ काढ आणि रंग भर.
Draw a ring and colour it.
==================================
1) kind (काइण्ड) दयाळू
2) kind (काइण्ड) प्रकार
1) माझे सर्व कुटुंब दयाळू आहे .
My entire family is too kind.
2) काळाचे तीन प्रकार आहेत .
There are three kinds of tenses.
================================
1) fair (फेअर) गोरा
2) fair (फेअर) प्रामाणिक
1) सविता खूप गोरी आहे .
Savita is fair by complexion.
2) लोकांनी प्रामाणिकपणे वागले पाहिजे .
People ought to be fair.
=================================
1) bat (बँट) क्रिकेट खेळायची बँट
2) bat (बँट) वटवाघुळ
1) मला सचिनची बँट पाहिजे म्हणजे पाहिजे.
I want Sachin's bat at any cost.
2) मला वटवाघुळ आवडत नाही .
I dislike bats.
=================================
1) address ( अड्रेस) पत्ता
2) address (अड्रेस) भाषण देणे
1) तुमचा पत्ता सांगा, मित्रांनो .
Tell your address, friends.
2) नेत्याने लोकांना भाषण दिले .
Leader addressed the crowd.
######################:#######
##############################
2) HOMOPHONES :
Homophones म्हणजे असे शब्द आहेत ज्यांची स्पेलिंग वेगळी वेगळी आहे आणि ज्यांचा अर्थ सुद्धा वेगळा वेगळा आहे पण या दोन्ही शब्दांचे उच्चार मात्र सारखे आहेत अशा शब्दांच्या जोडयांना Homophones असे म्हणतात . आठवतात का तुम्हाला अशा काही जोड्या...? आठवत नसतील तर चला पाहूया खालील काही उदाहरणे .....
1) I (आइ) मी, मला
2) Eye (आइ) डोळा
1) मी खूप आंबे खालेले आहेत .
I have eaten a lot of mangoes.
2) माझा डावा डोळा लहान आहे .
My left eye is a little smaller.
==================================
1) bare (बेअर) उघडा
2) bear (बेअर) अस्वल
1) तू उघडा का आहेस ?
Why are you bare? Where are your clothes?
मी घनदाट जंगलात एक अस्वल पाहिले .
I saw a bear in the thick grove.
==================================
1) sell (सेल) विकणे
2) cell (सेल) पेशी
1) त्याने जुनी कार विकली.
He sold his old car.
2) आपल्या शरीरात किती प्रकारच्या पेशी आहेत?
How many types of cells are in human body?
==================================
1) break (ब्रेइक) मोडणे
2) brake (ब्रेइक) अडथळा , गतिनिरोधक
कोरोनाची साखळी तोडा.
Break the chain of corona.
मी रोडवर वाघ पाहिला आणि ब्रेक लावला .
As soon as I saw a tiger on the road, I applied brakes.
==================================
1) whether (वीदर) हो किंवा नाही
2) weather ( वीदर) हवामान
1) तो येइल का नाही ते मी सांगू शकत नाही .
I can't tell you surely whether he will come or not.
2) हवामान छान आहे आज .
The weather is so nice today.
===================≠==============
1) four (फाँर) चार
2) for (फाँर) च्या साठी
1) मी चार रोपे लावली .
I planted four saplings.
2) मी तुझ्यासाठी काहीही करू शकलो नाही .
I couldn't do anything for you.
=================================
1) hear (हिअर) ऐकणे
2) here (हिअर) येथे
1) तुला माझा आवाज ऐकू येतो का ?
Can you hear me?
2) मी सकाळपासून येथे आहे.
I have been here since morning.
=================================
1)hour (अवर) तास
2) our (अवर) आमचा, आपला
1) डोंगरावर पोचायला एक तास लागला.
It took an hour to reach tophill.
2) आमची योजना काम करत आहे .
Our plan is working accordingly.
==================================
1)poor (पुअर) गरीब
2) pour (पुअर) ओतणे
1) भारत एक गरीब देश नाही .
India is not a poor country.
2) पाणी ओत आणि चालता हो.
Pour water and get lost.
=================================
1) tail (टेइल) शेपूट
2) tale (टेइल) कथा, गोष्ट
1) वाघाला लांब शेपूट असते का ?
Does a tiger have a long tail?
2) चहाड्या करू नका .
Don't tell tales.
==================================
1) son (सन) पुत्र
2) sun (सन) सूर्य
1) माझ्या भावाला दोन पुत्र आहेत.
My brother has two sons.
2) सूर्य आकाशात चमकत आहे .
The sun is shining in the sky.
==================================
1) heal ( हील) जखम भरणे
2) heel (हील) टाच
1) माझी जखम वेगाने भरत आहे .
My wound is healing quickly.
2) तुझी टाच अस्वच्छ आहे .
Your heel is unclean or dusty.
##############################
##############################
3) HOMOGRAPHS :
Homographs म्हणजे अशा शब्दांच्या जोडया आहेत ज्यांचे स्पेलिंग एकसारखे आहे, उच्चार काही वेळा सारखे व काही वेळा थोडा फार फरक आहे आणि अर्थ मात्र वेगवेगळे आहेत .
चला पाहूया Homographs ची उपयोगी उदाहरणे ...
1) second (सेकंड) सेकंद
2) second (सेकंड) दुसरा
1) दहा सेकंदात इमारत नष्ट केली गेली .
The building was destroyed in ten seconds.
2) माझा वर्गात दुसरा क्रमांक आला .
I have secured the second place in my class.
==================================
1) bow (बाउ) वाकणे,झुकणे
2) bow (बउ) फुलांची मारलेली गाठ
1) तिने वाकून, झुकून, अभिवादन करून आपले आभार व्यक्त केले .
She bowed her thanks.
2) तू बऊ वापरते का ?
Do you use a bow?
=================================
1) live (लीव) राहणे
2) live (लाइव) चालू असलेले
1) माझे कुटुंब भारतात राहते.
My family lives in India.
2) तो चालू असलेला सामना पाहत आहे .
He is watching a live match.
=================================
1) content (काँण्टेंट) विषय
2) content (कण्टेंस्ट) संतुष्ट, समाधानी
1) विषय काहीसा अनाकलनीय होता.
The content was somewhat unsearchable.
2) मी माझ्या जीवनाबद्दल पूर्ण समाधानी आहे .
I'm totally content with my life.
================================
1) tear (टेअर) फाडणे, चिरणे
2) tear (टिअर) अश्रू
1) तू माझे नवीन शर्ट फाडण्याचा प्रयत्न का केला ?
Why did you try to tear my new shirt?
2) तो अश्रू रोखू शकला नाही .
He couldn't hold his tears back.
=================================
1) minute (माइन्यूट) सूक्ष्म
2) minute (मिनिट) मिनिट
1) सूक्ष्म कण सहजपणे दिसत नाहीत.
We can't see minute particles very easily.
2) मी पाच मिनिटांच्या आत परत येऊ शकत नाही .
I can't return within five minutes.
=================================
1) desert (डेझर्ट) ओसाड प्रदेश, वाळवंट
2) desert (डिझर्ट) दुष्टपणाने सोडून जाणे
1) मी खूप वेळा वाळवंट पाहिले .
I visited a desert a great many times.
2) ती मला कठीण काळात सोडून गेली .
She deserted me during my very tough time .
==================================
No comments:
Post a Comment