नमस्कार मित्रांनो,
आपण इंग्रजी भाषा शिकत असताना नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांचा उपयोग करत राहतो . त्यापैकी एक प्रकारचे शब्द म्हणजे 'सर्वनाम' होय. सर्वनाम म्हणजे काय ? असा प्रश्न जर वर्गात येऊन कोणी आपल्याला आपले ज्ञान मुद्दाम तपासण्यासाठी विचारला तर लगेच एका क्षणाच्या आत आपण आपले पाठ केलेले उत्तर सांगून देतो आणि मोकळे होतो.......
'नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.'
उत्तर बरोबर आहे . नामाचा वापर पुन्हा पुन्हा होऊन कंटाळा येऊ नये म्हणून आपण त्यांच्याऐवजी सर्वनामांचा वापर करतो.
पण सर्वनाम हे काही एकाच प्रकारची आणि एका दिवसात पाठ करून मोकळे व्हायची गोष्ट नाही बरं का मुलांनो ....
सर्वनामे ही वेगवेगळ्या प्रकारची असतात. कधी वेळ मिळाला तर मराठी व्याकरणाचे पुस्तक काढून वाचायचा प्रयत्न करा म्हणजे त्यांचे प्रकार किती आणि कोणते आहेत हे तुम्हाला लगेच समजून जाईल ....
आज आपण येथे इंग्रजीतील सर्वनामांचे मुख्य प्रकार कोणते आहेत ते सर्वप्रथम पाहूया आणि वर म्टहंल्याप्रमाणे Indefinite pronouns म्हणजे अनिश्चित सर्वनामे कोणती आहेत ते पाहूया आणि त्यांचा उपयोग करून तयार केलेली वाक्ये वाचूया........ आणि जर तुम्हाला ही माहिती सोपी वाटली आणि आवडली तर आपण पुन्हा पुढच्या वेळी सर्वच प्रकारच्या सर्वनामांची माहिती घेऊया ....
चला पाहूया सर्वनामांचे मुख्य प्रकार कोणते आहेत ते ....
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
TYPES OF PRONOUNS (सर्वनामांचे प्रकार)
आज आपण येथे Indefinite pronouns म्हणजे अनिश्चित सर्वनामे म्हणजे काय आणि ते किती आहेत ते शिकून घेऊया आणि त्यांचे मराठीत अर्थ लक्षात ठेवायचा प्रयत्न करूया ....
खरे सांगायचे म्हणजे सर्वनाम हे नामाच्या ठिकाणी वापरले जाते आणि ते कोणत्या नामाची माहिती सांगते आहे ते आपण सहजपणे सांगू शकतो ....
खालील वाक्ये वाचा बरं......
Aditya is a very humble kid. He likes to help people.
👆 वरील दोन वाक्ये वाचली की आपल्या लक्षात येते की, पहिल्या वाक्यातील आदित्य या नामाऐवजी दुसर्या वाक्यात He हे सर्वनाम आपण वापरलेले आहे . म्हणजे आपल्याला कळाले की, He या सर्वनामाने Aditya या नामाबद्दल माहिती सांगितलेली आहे .....
No comments:
Post a Comment