Tuesday, April 6, 2021

My आणि Myself मधील फरक, Difference between my and myself.

 

 विद्यार्थी मित्रांनो, 
आपण  कधी कधी एखाद्या कार्यक्रमात सहभागी होतो. तेथे काही वेळा आपल्याला स्वत: ची ओळख करून द्यायची गरज पडते. खासकरून शाळेत वैगेरे अशी वेळ आपल्यावर येतेच येते किंवा यापूर्वीही आलेली असेलच हे सांगायची गरज नाही .
थोडे आठवून बघा. तुमचा वर्ग चालू आहे आणि अशावेळी बाहेरचे कोणीतरी साहेब येतात आणि आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत प्रश्न वगैरे विचारायला सुरुवात करतात . वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यांला उभे करण्यात येते आणि साधारणपणे पहिलाच प्रश्न असतो ......What is your name? 
बहुतेक मुलांचे उत्तर सुरू होते .....सर , My name is Aditya.  किंवा सर, My name is Sunil.  किंवा My name is .......सर .असेच काहीतरी होय ना ?
त्यातही एखादा  हुशार विद्यार्थी उठून उभा राहतो आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगतो .....सर,  I am Vishal. एखादा  त्याच्यापेक्षाही  जास्त हुशार मुलगा म्हणतो, sir.... This is Deepak. 
म्हणजे आपण स्वतःची ओळख करून देताना,
1) My name is....... 
2) I am ......
3) This is .......अशा शब्दांत  सुरूवात करून आपले नाव सांगतो.  खरे आहे ना ?
वरील सर्व चर्चा करायचे कारण की, मी काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी भाषेतील प्रशिक्षणाला उपस्थित राहण्यासाठी गेलो होतो. तेथे काही लोकांनी स्वत: ची ओळख करून देताना खालील प्रमाणे सुरुवात केली ....
Myself Rajesh... 
Myself Ganesh.... 
Myself Aditya...... 
तुम्हाला काय वाटते ? What is your name? ...या प्रश्नाचे उत्तर Myself Rajesh हे बरोबर आहे का ?
🤔🤔🤔🤔😫😫😓😓😰😰😨😨😭😭😭😭😭😭
मित्रांनो हे पूर्णपणे चुकीचे आहे . त्यामुळे कधीही Myself .....ने वाक्याची सुरूवात करताच येत नाही . त्यामुळे Myself ...अशी सुरुवात करून नाव सांगू नका . का ? ते पाहूया .
😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈
MY आणि MYSELF मधील फरक  .........खरे सांगायचे म्हणजे या दोघांतील फरक आभाळाएवढा स्पष्ट आहे . चला जाणून घेऊया . त्यासाठी दोन सोपे आणि वेगवेगळे घटक वाचून लक्षात ठेवूया.
-----------------------------------------------------------------------------
आपणाला माहिती आहे की सर्वनामांचे जवळपास  नऊ प्रकार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे Reflexive pronouns.....
 REFLEXIVE PRONOUNS : आत्मवाचक सर्वनामे
खालील आठ शब्दांचे अर्थ बघा .....
1) myself - मी स्वतः ला
2) ourselves - आम्ही स्वतःला
3) yourself - तू स्वतःला
4) yourselves - तुम्ही स्वतःला
5) himself - त्याने स्वतः ला
6) herself - तिने स्वतः ला
7) itself - ते स्वतः ला
8) themselves त्यांनी स्वतः ला
                -----------+++++++--------------
दोन उपयोगी गोष्टी बघा बरं आता ....
1) 🤓 self म्हणजे स्वतः एकटा  आणि  selves म्हणजे त्याचे अनेकवचन (जास्त जण स्वत:)
2) घटकाचे नाव पुन्हा वाचा.. ..Reflexive pronouns. 'Reflex' म्हणजे  प्रतिमा . आपण आरशात पाहिले की स्वत: आपणच दिसतो. Reflexive pronouns म्हणजे वाक्यांतील कर्त्याने स्वत:वरच केलेली क्रिया सांगणारे शब्द आहेत .
आता खालील मराठी आणि इंग्रजी वाक्ये वाचा.
1) I will kill myself. 
👉मी मला स्वतःला ठार मारील.
2) We saved ourselves. 
👉 आम्हीच आम्हाला स्वत:ला वाचवले.
3) Shital burnt herself. 
👉 शीतलने तिला स्वत: ला जाळले.
4) He protected himself from enemies. 
👉 त्याने त्याला स्वतःला शत्रू पासून सुरक्षित ठेवले.
5) You hit yourself. 
👉 तू तुला स्वत:ला मारले.
6) You should keep yourselves away from illness. 
👉 तुम्ही तुम्हाला स्वत:ला आजारापासून दूर ठेवले पाहिजे .
7) They hurt themselves. 
👉 त्यांनी त्यांना स्वतःला दुखापत केली.
8) It laughed itself. 
👉 ते (बाळ वैगेरे)  स्वत:च हसले.
वरील वाक्यांचे शांतपणे  निरीक्षण केल्यावर आपल्या सहज लक्षात येते की, वरील प्रत्येक वाक्यामध्ये कर्त्याने स्वत:वरच क्रिया केली आहे . ज्यावेळी वाक्यात कर्त्याने स्वत:बद्दलच क्रिया केलेली असते त्यावेळी reflexive pronouns वापरावे लागतात.
'मी स्वतः ला ठार करीन.'   या अर्थाची खालील दोन वाक्ये पहा ........
1) I will kill me. ( चूक) 
2) I will kill myself. (बरोबर) 
😈😈😈😈👉 Reflexive pronoun आहे म्हणजे क्रिया स्वत : कर्त्यावरच घडलेली आहे .
खालील वाक्यांचा अर्थ कसा बदलतो ते बघा ....
1) Ramesh helped him.
👉 रमेशने त्याला मदत केली . या वाक्यात रमेशने दुसर्‍या कोणत्यातरी  मुलाला मदत केली .
2) Ramesh helped himself. 
👉 रमेशने त्याला स्वतःलाच मदत केली .
अजून दोन वाक्ये पहा ...........
1) Savita blamed her. 
👉 सविताने तिला दोष दिला . या वाक्यात सविताने इतर मुलीला दोष दिला आहे .
2) Savita blamed herself. 
👉 सविताने तिला स्वत:ला दोष दिला.
-----------------------------------------------------------------------------
वरील शब्द myself, ourselves, yourself, yourselves, himself, herself, itself आणि themselves हे वाक्यातील क्रियापदांनंतर लिहावे लागतात . वाक्यांतील कर्त्याने केलेली क्रिया त्याच्या स्वतःवरच घडली हे दाखवण्यासाठी वरील आठ शब्दांचा उपयोग होतो . म्हणूनच यांना  reflexive pronouns म्हणजे स्वतःची प्रतिमा किंवा स्वत:चा आरसा दाखवणारे शब्द म्हणतात . लक्षात ठेवा .....यांचा वापर करून वाक्य सुरू करू नका .
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Important note : 
काही वेळा myself, ourselves, yourself, yourselves, himself, herself, itself आणि themselves या शब्दांना वाक्यामध्ये कर्त्यानंतर लगेच लिहिता येते . ( कर्ता आणि क्रियापद यांच्या मध्ये)  अशावेळी यांना Emphatic Pronouns म्हणतात .
खालील मराठी आणि इंग्रजी वाक्यांवरून तुमच्या लक्षात येईल हे..........
1)  मी स्वतः तुला पैसे पुरवीन.
👉 I myself will provide you money. 
2) आम्ही स्वतः हे घर बांधलेले आहे .
👉 We ourselves have built this house.
3) तू स्वतः तुझे जीवन बदलून टाकू शकतो.
👉 You yourself can transform your life. 
4) तुम्ही स्वतः हा अभ्यास पूर्ण करायला हवा .
👉 You yourselves should complete this assignment. 
5) त्याने स्वत :  हे पुस्तक प्रकाशित केले होते .
👉 He himself had published this book. 
6) तिने स्वत : मला सर्व माहिती दिली .
👉 She herself informed me everything. 
7) त्यांनी स्वतः ही योजना तयार केली आहे .
👉 They themselves have made this plan. 
-----------------------------------------------------------------------------
विशेषणांचेही काही महत्त्वाचे प्रकार आहेत. यापैकी खालील प्रकार बघा.....
🤓🤗2) POSSESSIVE ADJECTIVES  : मालकी दाखवणारी विशेषणे
खालील आठ शब्दांचे अर्थ वाचा ....
1) My ( माय)  माझा, माझी,  माझे
2) Our (अवर)   आमचा, आमची, आमचे,  आपले
3) Your (योर)   तुझा, तुझी,  तुझे
4) Your (योर)  तुमचा, तुमची,  तुमचे
5) His (हिज)  त्याचा, त्याची,  त्याचे
6) Her (हर)  तिचा,  तिची,  तिचे
7) Its ( इट्स)  तेचा ,  तेची,  तेचे
8)Their ( देअर)  त्यांचा,  त्यांची,  त्यांचे 
वरील my, our, your, his, her, its आणि their या शब्दांना possessive adjectives म्हणतात . यांचा उपयोग एखादी वस्तू कोणाची आहे हे सांगण्यासाठी करतात. वाक्यात यांना नामाच्या अगोदर लिहावे लागते . या शब्दांचा उपयोग a, an आणि the यांच्या ऐवजी पण करतात.
आता खालील एक एक वाक्य काळजीपूर्वक वाचा म्हणजे सर्व प्रकार लक्षात येईल .
1) ते  माझे घर आहे .
👉 It is my house. 
2) ही आमची  कार आहे .
👉 This is our car. 
3) ती तुझी बहीण आहे .
👉 She is your sister. 
4) आदित्य तुमचा मित्र आहे .
👉 Aditya is your friend. 
5) ही त्याची पुस्तके आहेत  .
👉 These are his books. 
6) मोहन तिचा नातेवाईक आहे .
👉 Mohan is her relative.
7) हा त्यांचा प्रकल्प आहे .
👉 This is their project. 
-----------------------------------------------------------------------------
आपण वर काय शिकलो ....
1) My, our, your, his, her, its आणि  their  हे शब्द नामाची मालकी दाखवतात. 
 उदाहरण....☝my house,  our car,  your friend,  your sister,  his books, her relative,  their project.... वैगेरे बघा.
2) My, our, your, his, her, its आणि  their हे शब्द a, an व  the च्या जागी वापरतात .
3) My, our, your, his, her, its आणि  their लिहिल्यावर a, an  किंवा  the लिहिता येत नाही .
बघा....1) It is a my house. ( चूक) 
           2) It is my house. ( बरोबर) 
4) My, our,  your,  his,  her,  its आणि  their  ही  possessive adjectives लिहिल्यानंतर पुढे नाम लिहावेच लागते.
उदाहरण ....
You are my father. 
He is your teacher. 
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
मला खात्री आहे तुम्हाला my आणि myself मध्ये काय फरक आहे ते नक्की आणि कायमचा समजलेला आहे . My हा शब्द possessive adjective म्हणून वापरला जातो तर myself हे एक reflexive pronoun आहे. दोन्ही शब्द दिसायला सारखे असले तरी उपयोग भिन्न आहेत.
------++++-+-------------++++++++++++---------++++++
                          Thank you! 


No comments:

Post a Comment

Learn to Speak English

Let me play. मला खेळू दे Let me go मला जाऊ दे. Let me eat. मला खाऊ दे. Let me study. मला अभ्यास करू दे. Let me drink milk. मला दूध पिऊ दे. L...