Tuesday, April 6, 2021

बुचकळ्यात पाडणारी वाक्ये, Could have, should have, may have, might have, must have.

 

 आज मी तुम्हाला इंग्रजी भाषेतील अतिशय महत्त्वाची पाच प्रकारची वाक्ये सांगणार आहे . ही वाक्ये तुम्हाला इंग्रजी मध्ये परिपूर्ण बनवतील याची मला खात्री आहे . आपणाला इंग्रजी बोलताना बर्‍याच वेळा असे होते की, आपणाला एखादे वाक्य बोलायचे असते पण इंग्रजीत ते नक्की कसे म्हणावे हे आपल्याला ठाऊक नसते कारण तशा प्रकारची वाक्ये आपण काहीवेळा ऐकलेलीच नसतात. मित्रांनो एका रात्रीत कोणीही इंग्रजी बोलायला शिकू शकत नाही . कोणतीही नवीन गोष्ट शिकत असताना वेळ लागतोच . आपण सराव करत रहायचा, आपली प्रगती आपोआप होत राहते.एक दिवस आपल्यालाच नवल वाटते की, बापरे आपण तर expert  होऊ लागलो इंग्रजी भाषेत ....
आणि आपण जर शिकायचा प्रयत्न केला नाही तर मग आपणाला काय  म्हणायची वेळ येते खाली बघा......
1) मी इंग्रजीत हुशार होऊ शकलो असतो ......
2) मी इंग्रजी चा अभ्यास करायला पाहिजे होता ....
3) मी वेळ वाया घातलेला असू शकतो ......
4) मी इंग्रजी बोलायला शिकण्याची कमी शक्यता आहे .....
5)  मी चूक केलेली असलीच पाहिजे ......
आता सांगा बरं वरील पाच वाक्ये इंग्रजी भाषेत कशी बोलावीत.... जमलं नाही का! अरे म्हणून तर आपण आता हीच वाक्ये बोलायला शिकणार आहोत ... चला तर मग सुरू करूया ......
=======================================
🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃
1) COULD HAVE  👉   शकलो असतो .


भरपूर वेळा आपण एखादे काम प्रयत्न न करता सोडून देतो आणि नंतर पश्चाताप होऊ लागला किंवा आपली चूक समजली की,  आपण म्हणू लागतो.....
👉 मी अधिकारी बनू शकलो असतो .
👉 मी छान भाषण करू शकलो असतो .
👉 मी  तिचा जीव वाचवू शकलो असतो .
👉  भारत सामना जिंकू शकला असता .
👉 आम्ही शेत विकत घेऊ शकलो असतो.
-----------------------------------------------------------------------------
चला आता इंग्रजी भाषेत ............ 
1) मी शकलो असतो ..... .... ..   I could have...... 
2) आम्ही शकलो असतो .... ....We could have ......
3) तू  शकला असता ....... ... . You could have .....
4) तुम्ही शकला असता ........   You could have ......
5) तो शकला असता ..............He could have .......
6) ती शकली असती ..............She could have........ 
7) ते शकले असते ...................It could have ........
8) ते ( एकापेक्षा जास्त जण)  शकले असते ......They could have........ 
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
आता फक्त एवढे करा have च्या पुढे क्रियापदाचे तिसरे रूप लिहा आणि सांगा तुम्ही काय काय करू शकले असते ते...


1) मी पाच चपात्या खाऊ शकलो असतो .
👉 I could have eaten five chapatis. 
2) आम्ही इंग्रजी शिकू शकलो असतो.
👉 We could have learnt English. 
3) तू जिल्हाधिकारी बनू शकला असता .
👉 You could have become a collector. 
4) तुम्ही  कार विकत घेऊ शकले असते .
👉 You could have bought a car. 
5) तो सर्व पाणी पिऊ शकला असता .
👉 He could have drunk all water. 
6) ती सर्व पैसे खर्च करू शकली असती .
👉 She could have spent all money. 
7) ते (एकापेक्षा जास्त जण)  नदी पार करू शकले असते .
👉 They could have crossed the river. 
8) आदित्य तुला विरोध करू शकला असता .
👉 Aditya could have resisted you. 
9) माझी आई मला शिकवू शकली असती .
👉 My mother could have taught me. 
10) भारत एक विकसित देश बनू शकला असता .
👉 India could have become a developed country. 
😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈
2) SHOULD HAVE : करणे आवश्यक होते.
आपल्यावर काही जबाबदारी असते. आपली काही कर्तव्ये असतात. आपण काही कामे वेळच्या वेळी करणे गरजेचे असते. पण आपण ती वेळेवर पूर्ण केली नाही तर आपले नुकसान होते.
मग आपण योग्य वेळी  काम न केल्यामुळे आपणाला असे म्हणावे लागते ......
1)  मी सकाळी लवकर निघायला पाहिजे होते.
2) मी आईची काळजी घ्यायला पाहिजे होती.
3) त्याने मला थोडी कल्पना दयायला पाहिजे होती.
4) भारताने इंग्लंडला हरवायला पाहिजे होते.
5)  मी गहू पेरायला पाहिजे होता.
-----------------------------------------------------------------------------
चला आपण एक क्रियापद वापरून इंग्रजी भाषेत पाहू .........
1) मी  जायला पाहिजे होते.........I should have gone..... ....
2) आम्ही जायला पाहिजे होते ....We should have gone.... 
3) तू जायला पाहिजे होते ..........You should have gone... 
4) तुम्ही जायला पाहिजे  होते ........You should have gone..... 
5) त्याने जायला पाहिजे होते.........He should have gone..... 
6) तिने जायला पाहिजे होते..........She should have gone..... 
7) ते ने जायला पाहिजे होते..........It should have gone......... 
8) त्यांनी जायला पाहिजे होते........They should have gone..... 
-----------------------------------------------------------------------------
आता आपण काय काय करायला पाहिजे होते ते इंग्रजी वाक्ये पाहू....
1) मी पुण्याला जायला पाहिजे होते.
👉 I should have gone to Pune. 
2) आम्ही नवीन घर बांधायला पाहिजे होते.
👉 We should have built a new house. 
3) तू जास्त अभ्यास करायला पाहिजे होता .
👉 You should have studied very hard. 
4) तुम्ही लग्नासाठी पैसे गोळा करायला पाहिजे होते.
👉 You should have collected money for marriage. 
5) त्याने माझे पैसे परत करायला पाहिजे होते .
👉 He should have returned my money. 
6) तिने घर स्वच्छ करायला पाहिजे होते .
👉 She should have cleaned the house. 
7) त्यांनी मला कार्यक्रमासाठी आमंत्रित करायला पाहिजे होते .
👉 They should have invited me for the program. 
8) आदित्य ने सैन्यात भरती व्हायला पाहिजे होते.
👉 Aditya should have joined army. 
9) मी माझ्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे  होती.
👉 I should have taken care of my health. 
10)  जोरदार पाऊस पडायला पाहिजे होता.
👉 It should have rained heavily. 
😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈
3) MAY HAVE : असू शकते 
आपणाला भरपूर वेळा अंदाज लावावा लागतो . म्हणजे बघा तुम्ही एखाद्या व्यक्तीला एक काम सांगितले होते . बराच वेळ झाला आहे आणि ते काम पूर्ण झाले आहे असे तुम्हाला वाटते .अशा वेळी काम पूर्ण झाले आहे याची जास्त शक्यता वाटली की,  May Have चा वापर करतात. 
आपण अजून एक उदाहरण बघुया . तुमच्या घरचा आरसा सकाळी चांगला होता . आता तुम्ही कामावरून घरी आल्यावर पाहिला तर तो फुटलेला आहे . तुम्हाला वाटते हे काम तुमच्या मुलांनी केलेले आहे . जास्त शक्यता दिसली की,  May Have घ्यावे.
1) आदित्य ने आरसा फोडलेला असू शकतो .
2) तो घरी पोहोचलैला असू शकतो .
3) मंदीर आता बंद झालेले असू शकते .
4) हा अपघात मध्यरात्री झालेला असू शकतो .
5) तिने तुला माझ्याबद्दल चुकीचे सांगितलेले असू शकते .
-----------------------------------------------------------------------------
चला आपण एक क्रियापद घेऊया आणि पाहुया .....
1) मी पाहिलेले असू शकते ........I may  have seen......
2) आम्ही पाहिलेले असू शकते ..We may have seen .....
3) तू पाहिलेले असू शकते .......You may have seen..... 
4) तुम्ही पाहिलेले असू शकते .....You may have seen...
5) त्याने पाहिलेले असू शकते ....He may have seen ...
6) तिने पाहिलेले असू शकते .....She may have seen....
7)   ते ने पाहिलेले असू शकते ...It may have seen.......
8) त्यांनी पाहिलेले असू शकते ...They may have seen....
-----------------------------------------------------------------------------
चला आता सरावासाठी काही वाक्ये पाहुया .....
1) तो सहा वाजता पोचलेला असू शकतो .
👉 He may have reached by six. 
2) या गाईला वाघाने मारलेले असू शकते .
👉 A tiger may have killed this cow. 
3) त्याने हे पुस्तक वाचलेले असू शकते .
👉 He may have read this book. 
4) तिथे पाऊस पडलेला असू शकतो .
👉 It may have rained there. 
5) विमान भारतात पोचलेले असू शकते .
👉 The aeroplane may have landed at Indian airport.
6) माझ्या भावाने तिकीटे काढलेले असू शकते .
👉 My brother may have booked tickets. 
7) तू वाघ पाहिलेला असू शकतो .
👉 You may have seen a tiger. 
8) त्याने गृहपाठ पूर्ण केलेला असू शकतो .
👉 He may have completed his homework. 
9) पंतप्रधान इंग्रजीत बोललेले असू शकतात .
👉 The Prime Minister may have talked in English. 
10) पेट्रोलचा भाव आज कमी झालेला असू शकतो .
👉 Petrol prices may have fallen today. 
😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈
4) MIGHT HAVE :  कमी शक्यता आहे .
आपण एखाद्याला काही काम सांगतो आणि आपला जर त्या व्यक्तीवर भरोसा नसेल तर त्याने ते काम पूर्ण केले असेल याची आपल्याला कमी शक्यता वाटते ....अशावेळी आपल्याला नाराजीने आणि निराश होऊन might have ची वाक्ये बोलावी लागतात.
अशावेळी थोडी नाराजी वाटते पण टेंशन घेऊ नका . फक्त एवढेच करा पुन्हा त्याला काम सांगू नका . बाकी आपल्याला might have कुठे वापरावे हे समजलेच की....
आता खालील वाक्ये वाचा पण खुशीने.....
1) आदित्यने गृहपाठ पूर्ण केलेला असण्याची कमी शक्यता आहे .
2) माझा पगार जमा झालेला असण्याची कमी शक्यता आहे .
3) पेट्रोलचा भाव कमी झालेला असण्याची कमी शक्यता आहे .
4) बायको माहेरी गेलेली असण्याची कमी शक्यता आहे .
5) भारतीय क्रिकेट संघाने सामना जिंकला असण्याची कमी शक्यता आहे .
-----------------------------------------------------------------------------
चला आता सरावासाठी आपण एक क्रियापद घेऊया आणि वाक्यरचना पाहूया ......
1) मी खालेले असण्याची कमी शक्यता आहे ........I might have eaten..... 
2) आम्ही खालेले असण्याची कमी शक्यता आहे .......We might have eaten..... 
3) तू खालेले असण्याची कमी शक्यता आहे .............You might have eaten........ 
4) तुम्ही खालेले असण्याची कमी शक्यता आहे ........You might have eaten....... 
5) त्याने खालेले असण्याची कमी शक्यता आहे ........He might have eaten..... 
6) तिने खालेले असण्याची कमी शक्यता आहे .........She might have eaten....... 
7) ते ने खालेले असण्याची कमी शक्यता आहे ........It might have eaten..... 
8) त्यांनी खालेले असण्याची कमी शक्यता आहे ........They 
might have eaten....... 
-----------------------------------------------------------------------------
खालील वाक्ये आपला चांगला सराव घडवून आणतील......
1) त्याने डाँक्टरचा सल्ला पाळला असण्याची कमी शक्यता आहे .
👉 He might have followed doctor's advice. 
2) भारताने सामना जिंकला असण्याची कमी शक्यता आहे .
👉India might have won the match. 
3) आज शिक्षक शाळेत आलेले असण्याची कमी शक्यता आहे 
👉Teachers might have come to school today. 
4) सुनीलने परीक्षा दिलेली असण्याची कमी शक्यता आहे .
👉 Sunil might have taken the exam. 
5) पप्पांनी आज माझ्या साठी लाडू आणलेले असण्याची कमी शक्यता आहे .
👉 My father might have bought ladoos for me today. 
6) मुख्यमंत्र्यांनी कार्यालय  सोडलेले असण्याची कमी शक्यता आहे .
👉 The Chief Minister might have left his office. 
7) माझ्या आळशी मुलाने आमचे दुकान उघडलेले असण्याची कमी शक्यता आहे .
👉 My indolent son might have opened our shop. 
8) तू ते स्पष्टपणे ऐकलेले असण्याची कमी शक्यता आहे .
👉 You might have heard it clearly. 
9) विलासने माझा पेन चोरलेला असण्याची कमी शक्यता आहे 
👉 Vilas might have stolen my pen. 
10) गावात वाघ आढळलेला असण्याची कमी शक्यता आहे .
👉 The tiger might have appeared in village. 
😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈
5) MUST HAVE : पूर्ण खात्री आहे 
एखाद्या व्यक्तीने एखादे काम पूर्ण केलेले आहे याची आपल्याला पूर्ण म्हणजे 100 टक्के खात्री झाली की मग आपल्याला must have ची वाक्ये बोलायची वेळ येते . येथे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा......
1) क्रिया अगोदरच पूर्ण झालेली आहे आणि
  2) ती क्रिया कोणी केलेली आहे याची आपल्याला पूर्ण  खात्री आहे .
खालील वाक्ये वाचा  म्हणजे तुम्हाला समजून जाईल....
आपण 'केले असले पाहिजे किंवा  केले असणार ' या दोन्ही पद्धतीने मराठीत बोलतो  याला इंग्रजी भाषेत ' must have ' म्हणतात. खात्री महत्त्वाची आहे .
1) तो गाडीवरूनच पडलेला असला पाहिजे .
2) मला हे आजारपण प्रवासामुळेच आले असले पाहिजे .
3) त्याने गाडी विकलीच असली पाहिजे .
4) तिने तुला खरी गोष्ट सांगितलीच असली पाहिजे .
5) तू माझे पैसे चोरले असलेच पाहिजे .
-----------------------------------------------------------------------------
चला आता एक क्रियापद वापरून सराव करूया....
1) मी शिकलेलोच असले पाहिजे ..........I must have learnt.... 
2) आम्ही शिकलेलोच असले पाहिजे .....We must have learnt..... 
3) तू शिकलेलाच असला पाहिजे ..........You must have learnt....... 
4) तुम्ही शिकलेलेच असले पाहिजे .......You must have learnt..... 
5) तो शिकलेलाच असला पाहिजे .........He must have learnt...... 
6) ती शिकलेलीच असली पाहिजे ........She must have learnt........ 
7) ते शिकलेलेच असले पाहिजे .......... It must have learnt........ 
8) ते (एकापेक्षा जास्त जण)  शिकलेलेच असले पाहिजे.....
They must have learnt........ 
-----------------------------------------------------------------------------
आता सरावासाठी काही वाक्ये पाहुया .......
1) या गाईला वाघानेच ठार मारले असले पाहिजे .
👉 A tiger must have killed this cow. 
2) अजयने गृहपाठ पूर्ण केलेला असणारच .
👉 Ajay must have completed his homework. 
3) सैनिकांनी मरण्यापूर्वी खूप विरोध केलेला  असणार.
👉 Soldiers must have fought back before martyrdom. 
4) तुम्ही माझी वाट पाहिलेली असणार.
👉 You must have waited for me. 
5) ती कारनेच आलेली असली पाहिजे.
👉 She must have come by car. 
6) तो उपाशीच झोपलेला असला पाहिजे .
👉 He must have slept underfed. 
7) त्याने घाईने रस्ता पार करण्याचा प्रयत्न केला असणार.
👉 He must have tried to cross the road hastily. 
8)  तू त्याला तुझे खरे रूप दाखविले असलेच पाहिजे .
👉 You must have shown him your true colours.
9) तो केंद्रीय लोकसेवा आयोगात निवडला गेला असणार.
👉 He must have qualified for civil services.
10) त्याने लहानपणीच पोहायला शिकले असले पाहिजे .
👉 He must have learnt swimming during childhood. 

😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈
                               Thanks! 


No comments:

Post a Comment

Learn to Speak English

Let me play. मला खेळू दे Let me go मला जाऊ दे. Let me eat. मला खाऊ दे. Let me study. मला अभ्यास करू दे. Let me drink milk. मला दूध पिऊ दे. L...