Saturday, May 8, 2021

पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ : Future Continuous Perfect Tense

 नमस्कार मित्रांनो,
आज आपण पूर्ण अपूर्ण भविष्यकाळाविषयी महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. या पोस्टमध्ये आपण पूर्ण अपूर्ण भविष्यकाळाची इंग्रजी भाषेतील वाक्ये कशा पद्धतीने बोलतात आणि या काळातील वाक्यरचना कशी असते याबद्दल पूर्ण माहिती घेऊया. त्यासाठी आपणाला या काळातील मी लिहिलेली चारही प्रकारची वाक्ये वाचावी लागतील म्हणजे या काळाची वाक्यरचना  तुमच्या लगेच लक्षात बसून हा काळ समजून जाईल.
पूर्ण अपूर्ण भविष्यकाळाचा उपयोग हा भविष्यकाळात आपण एखादे काम सुरू केल्यानंतर ते भरपूर दिवस चालू ठेवणार आहोत हे सांगण्यासाठी केला जातो. खालील एक वाक्य आणि त्याचे स्पष्टीकरण वाचल्यानंतर तुम्हाला हे लगेच समजून जाईल.
'मी व्यायाम करत आलेलो असेल.' 
वरील वाक्याचा असा अर्थ होतो की, मी भविष्यात व्यायाम करायला सुरूवात करणार आहे . आणि ही व्यायामाची सवय किंवा कृती मी बरेच दिवस पुढे नियमीतपणे चालू ठेवणार आहे.
म्हणजेच भविष्यातील सवयी सांगण्यासाठी पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ वापरला जातो . आता खालील मराठीतील पाच वाक्ये वाचा आणि त्यानंतर वाक्यरचना वाचा आणि मग सरावाची वाक्ये वाचा आणि बघा चमत्कार .....तुम्ही या काळाचे तज्ञ झालेले असाल....
1) मी क्रिकेट खेळत आलेलो असेल.
2) तो भरपूर पैसे कमावत आलेला असेल.
3) ती घराची स्वच्छता करत आलेली असेल.
4) जून ते सप्टेंबर पर्यंत  पाऊस पडत आलेला असेल.
5) नागरीक लस घेत आलेले असतील.
वरील वाक्यांचा अर्थ असा होतो की, ही कामे भविष्यात सुरू होतील आणि बराच काळ चालू राहतील. आता इंग्रजी वाक्यरचना बघा...


1) I shall have been playing....
2) We shall have been playing....
3) You will have been playing....
4) You will have been playing...
5) He will have been playing.....
6) She will  have been playing....
7) It will have been playing.....
8) They will have been playing.....

================================≠====

(A) साधी वाक्ये :
1) मी पैसे कमावत आलेलो असेल.
I shall have been earning money.


2) आम्ही पाण्यात पोहत आलेलो असेल.
We shall have been swimming in water.


3) तू मला मदत करत आलेला असशील.
You will have been helping me.


4) तुम्ही पुस्तके वाचत आलेलो असाल.
You will have been reading books.


5) तो मैदानावर सराव करत आलेला असेल.
He will have been practising on the ground.


6) ती मासाहार घेत आलेली असेल.
She will have been eating non veg. food.


7) ते वेगाने वाढत आलेले असेल.
It will have been growing fast.


8) ते मला सल्ला देत आलेले असतील.
They will have been advising me.


9) आदित्य वाढदिवस साजरा करत आलेला असेल.
Aditya will have been celebrating birthdays.


10) मी सुट्यांचा आनंद घेत आलेलो असेल.
I shall have been enjoying holidays.


11) आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करत आलेलो असेल.
We shall have been praying for you.


12) सविता कुटुंबाची काळजी घेत आलेली असेल.
Savita will have been looking after her family.


13) दिनेश दररोज दूध पित आलेला असेल.

Dinesh will have been drinking milk.


14) कार्तिक माझ्यासोबत अभ्यास करत आलेला असेल.
Kartik will have been studying with me.


15) शिक्षक इंग्रजी बोलत आलेले असतील .
Teachers will have been speaking English.




Thursday, May 6, 2021

पूर्ण भविष्यकाळ वाक्यरचना : Future Perfect Tense

 नमस्कार मित्रांनो,

आज आपण पूर्ण भविष्यकाळाबद्दल माहिती घेऊया. पूर्ण भविष्यकाळ हा एखादी कृती किंवा काम भविष्यकाळात पूर्ण झालेले असेल हे सांगण्यासाठी वापरला जातो. पूर्ण भविष्यकाळात क्रियापदाचे तिसरे रूप वापरावे लागते. पूर्ण भविष्यकाळाची वाक्यरचना समजून यावी यासाठी मी खाली मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेचा वापर करून काही वाक्ये तयार केलेली आहेत ,ती जर शांतपणे वाचली तर या काळाची वाक्यरचना अगदी सहजपणे समजून येते व लक्षात राहते.

सर्वात प्रथम मराठीतील वाक्ये बघा....
1) मी जेवण केलेले असेल.
2) ती शाळेत पोचलली असेल.
3) तुझी परीक्षा संपलेली असेल.
4) नदीचे पाणी आटलेले असेल.
5) क्रिकेटचा सामना संपलेला असेल.


======================================


पूर्ण भविष्यकाळात खालील प्रकारची वाक्यरचना असते...
1)I shall have reached........मी पोहोचलेलो असेल
2) We shall have reached....आम्ही पोहोचलेलो असेल
3) You will have reached....तू पोहोचलेला असेल
4) You will have reached....तुम्ही पोहोचलेले असेल
5) He will have reached.....तो पोहोचलेला असेल
6) She will have reached...ती पोहोचलेली असेल
7) It will have reached.....ते पोहोचलेले असेल
8) They will have reached.....ते पोहोचलेले असतील


=======================================


(1) साधी वाक्ये :

1) मी रात्रीचे जेवण घेतलेले असेल.
I shall have taken my dinner.

2) आम्ही भारत सोडलेला असेल.
We shall have left India.

3) तू नाशिकला पोहोचलेला असेल.
You will have reached Nashik.

4) त्याने गृहपाठ पूर्ण केलेला असेल.
He will have completed his homework.

5) त्यांनी घर विकलेले असेल.
They will have sold their house.

6) तिने लग्न केलेले असेल.
She will have got married.

7) विशाल पुण्याहून परतलेला असेल.
Vishal will have returned from Pune.

8) भारत सामना जिंकलेला असेल.
India will have won the match.

9) सुनिताने स्वयंपाक केलेला असेल.
Sunita will have cooked food.

10) नेत्याने भाषण दिलेले असेल.
Leader will have delivered a sensational speech.

11) पाऊस सुरू झालेला असेल.
It will have started raining.

12) मी दुकान उघडलेले असेल.
I shall have opened the shop.

13) आम्ही सर्व पैसे खर्च केलेले असेल.
We shall have spent all the money.

14) त्यांनी निकाल जाहीर केलेला असेल.
They will have declared results.

15) आम्ही परीक्षा पास झालेलो असेल.
We shall have passed the exam.

16) तिने प्रमाणपत्र मिळवलेले असेल.
She will have obtained the certificate.

17) जंगली प्राण्यांनी पिके नष्ट केलेली असतील.
Wild animals will have ruined crops.

18) भारतीय सैन्याने शत्रूंची विमाने नष्ट केलेली असतील.
Indian army will have destroyed aeroplanes.

19) आम्ही खूप पैसा गोळा केलेला असेल.
We shall have collected a lot of money.

20) मी पोलिस अधिकारी बनलेलो असेल.
I shall have become a police officer.

21) मान्सून केरळात येऊन पोहोचलेला असेल.
Monsoon will have arrived in Kerala.

22) मी तुझे आव्हान स्वीकारलेले असेल.
I shall have accepted your challenge.

23) आम्ही नवीन कार्यालय सुरू केलेले असेल.
We shall have started a new office.

24) सामना संपलेला असेल.
The match will have come to end.

25) आम्ही सुट्यांचा आनंद घेतलेला असेल.
We shall have enjoyed holidays.

=====================================


(2) प्रश्नार्थक वाक्ये :



1) मी रात्रीचे जेवण घेतलेले असेल का?
Shall I have taken my dinner ?

2) आम्ही भारत सोडलेला असेल का ?
Shall we have left India ?

3) तू नाशिकला पोहोचलेला असेल का  ?
Will you have reached Nashik ?

4) त्याने गृहपाठ पूर्ण केलेला असेल का ?
Will he have completed his homework ?

5) त्यांनी घर विकलेले असेल का ?
 Will they have sold their house ?

6) तिने लग्न केलेले असेल का ?
Will she have got married ?

7) विशाल पुण्याहून परतलेला असेल का ?
Will Vishal have returned from Pune ?

8) भारत सामना जिंकलेला असेल का ?
Will India have won the match ?

9) सुनिताने स्वयंपाक केलेला असेल का ?
Will Sunita have cooked food ?

10) नेत्याने भाषण दिलेले असेल का ?
Will the leader  have delivered a sensational speech ?

11) पाऊस सुरू झालेला असेल का ?
Will it have started raining ?

12) मी दुकान उघडलेले असेल का ?
Shall I have opened the shop ?

13) आम्ही सर्व पैसे खर्च केलेले असेल का ?
Shall we have spent all the money ?

14) त्यांनी निकाल जाहीर केलेला असेल का ?
Will they have declared results ?

15) आम्ही परीक्षा पास झालेलो असेल का ?
Shall we have passed the exam ?

16) तिने प्रमाणपत्र मिळवलेले असेल का ?
Will she have obtained the certificate ?

17) जंगली प्राण्यांनी पिके नष्ट केलेली असतील का ?
Will wild animals  have ruined crops ?

18) भारतीय सैन्याने शत्रूंची विमाने नष्ट केलेली असतील का ?
Will Indian army  have destroyed aeroplanes ?

19) आम्ही खूप पैसा गोळा केलेला असेल का ?
Shall we have collected a lot of money ?

20) मी पोलिस अधिकारी बनलेलो असेल का ?
Shall I have become a police officer?

21) मान्सून केरळात येऊन पोहोचलेला असेल का ?
Will monsoon  have arrived in Kerala ?

22) मी तुझे आव्हान स्वीकारलेले असेल का ?
Shall I have accepted your challenge ?

23) आम्ही नवीन कार्यालय सुरू केलेले असेल का ?
Shall we have started a new office ?

24) सामना संपलेला असेल का ?
Will the match  have come to end ?

25) आम्ही सुट्यांचा आनंद घेतलेला असेल का ?Shall we have enjoyed holidays ?

======================================


(3) नकारात्मक वाक्ये :




1) मी रात्रीचे जेवण घेतलेले नसेल.
I shall not have taken my dinner.

2) आम्ही भारत सोडलेला नसेल.
We shall not have left India.

3) तू नाशिकला पोहोचलेला नसेल.
You will not have reached Nashik.

4) त्याने गृहपाठ पूर्ण केलेला नसेल.
He will not have completed his homework.

5) त्यांनी घर विकलेले नसेल.
They will not have sold their house.

6) तिने लग्न केलेले नसेल.
She will not have got married.

7) विशाल पुण्याहून परतलेला नसेल.
Vishal will not have returned from Pune.

8) भारत सामना जिंकलेला नसेल.
India will not have won the match.

9) सुनिताने स्वयंपाक केलेला नसेल.
Sunita will not have cooked food.

10) नेत्याने भाषण दिलेले नसेल.
Leader will not have delivered a sensational speech.

11) पाऊस सुरू झालेला नसेल.
It will not have started raining.

12) मी दुकान उघडलेले नसेल.
I shall not have opened the shop.

13) आम्ही सर्व पैसे खर्च केलेले नसेल.
We shall not have spent all the money.

14) त्यांनी निकाल जाहीर केलेला नसेल.
They will not have declared results.

15) आम्ही परीक्षा पास झालेलो नसेल.
We shall not have passed the exam.

16) तिने प्रमाणपत्र मिळवलेले नसेल.
She will not have obtained the certificate.

17) जंगली प्राण्यांनी पिके नष्ट केलेली नसतील.
Wild animals will not have ruined crops.

18) भारतीय सैन्याने शत्रूंची विमाने नष्ट केलेली नसतील.
Indian army will not have destroyed aeroplanes.

19) आम्ही खूप पैसा गोळा केलेला नसेल.
We shall not have collected a lot of money.

20) मी पोलिस अधिकारी बनलेलो नसेल.
I shall not have become a police officer.

21) मान्सून केरळात येऊन पोहोचलेला नसेल.
Monsoon will not have arrived in Kerala.

22) मी तुझे आव्हान स्वीकारलेले नसेल.
I shall not have accepted your challenge.

23) आम्ही नवीन कार्यालय सुरू केलेले नसेल.
We shall not have started a new office.

24) सामना संपलेला नसेल.
The match will not have come to end.

25) आम्ही सुट्यांचा आनंद घेतलेला नसेल.
We shall not have enjoyed holidays.

========================!=====!!========


(4) नकारात्मक प्रश्नार्थक वाक्ये :



1) मी रात्रीचे जेवण घेतलेले नसेल का ?
Shall I not have taken my dinner ?

2) आम्ही भारत सोडलेला नसेल का ?
Shall we not have left India ?

3) तू नाशिकला पोहोचलेला नसेल का ?
Will you not have reached Nashik ?

4) त्याने गृहपाठ पूर्ण केलेला नसेल का ?
Will he not have completed his homework ?

5) त्यांनी घर विकलेले नसेल का ?
Will they not have sold their house ?

6) तिने लग्न केलेले नसेल का ?
Will she not have got married ?

7) विशाल पुण्याहून परतलेला नसेल का ?
Will Vishal  not have returned from Pune ?

8) भारत सामना जिंकलेला नसेल का ?
Will India not have won the match ?

9) सुनिताने स्वयंपाक केलेला नसेल का ?
Will Sunita  not have cooked food ?

10) नेत्याने भाषण दिलेले नसेल का ?
Will the leader  not have delivered a sensational speech ?

11) पाऊस सुरू झालेला नसेल का ?
Will it not have started raining ?

12) मी दुकान उघडलेले नसेल ?
Shall I not have opened the shop ?

13) आम्ही सर्व पैसे खर्च केलेले नसेल का ?
Shall we not have spent all the money ?

14) त्यांनी निकाल जाहीर केलेला नसेल का ?
Will they not have declared results?

15) आम्ही परीक्षा पास झालेलो नसेल का ?
Shall we not have passed the exam ?

16) तिने प्रमाणपत्र मिळवलेले नसेल का ?
Will she not have obtained the certificate ?

17) जंगली प्राण्यांनी पिके नष्ट केलेली नसतील का ?
Will wild animals  not have ruined crops ?

18) भारतीय सैन्याने शत्रूंची विमाने नष्ट केलेली नसतील का ?
Will Indian army  not have destroyed aeroplanes ?

19) आम्ही खूप पैसा गोळा केलेला नसेल का ?
Shall we not have collected a lot of money ?

20) मी पोलिस अधिकारी बनलेलो नसेल का ?
Shall I not have become a police officer ?

21) मान्सून केरळात येऊन पोहोचलेला नसेल का?
Will monsoon not have arrived in Kerala ?

22) मी तुझे आव्हान स्वीकारलेले नसेल का  ?

Shall I not have accepted your challenge ?

23) आम्ही नवीन कार्यालय सुरू केलेले नसेल का ?
Shall we not have started a new office ?

24) सामना संपलेला नसेल का ?
Will the match  not have come to end ?

25) आम्ही सुट्यांचा आनंद घेतलेला नसेल का ?
Shall we not have enjoyed holidays?

======================================

आता काही सरावासाठी वेगळे प्रश्न:


1) त्याने काय खालेले असेल?
What will he have eaten ?


2) ती कोठे गेलेली असेल ?
Where will she have gone ?


3) त्यांना कोणी मदत केलेली असेल ?
Who will have helped them?


4) तू घरी केव्हा पोहोचलेला असेल ?
When will you have reached home ?


5) मी कोणते पुस्तक वाचलेले असेल?
Which book shall I have read ?


6) ते येथे का आलेले असेल?
Why will it have come here ?


7) भारत किती सामने जिंकलेला असेल?
How many matches will India have won ?


8) किती पाणी दूषित झालेले असेल ?
How much water will have become contaminated?

======================================


Wednesday, May 5, 2021

चालू भविष्यकाळ शिका : Future Continuous Tense

 नमस्कार मित्रांनो,
आज आपण चालू भविष्यकाळाची वाक्ये बोलायला शिकूया .
चालू भविष्यकाळ म्हणजे काय ? चालू भविष्यकाळाचे वाक्य कसे ओळखावे ? तर बघा....
 एखादे काम भविष्यकाळात चालू असेल हे सांगण्यासाठी वापरला जाणारा काळ म्हणजे चालू भविष्यकाळ  होय . 

======================================

चालू भविष्यकाळात खालील पद्ध्तीने वाक्यरचना असते...
I shall be.....
We shall be....


You will be....
You will be....
He will be....
She will be....
It will be....
They will be....
आता फक्त be च्या पुढील रिकाम्या जागेत ing लावलेले क्रियापद घ्यायचे आणि लागतील तेवढी वाक्ये तयार करायचे...

=====================================

खालील मराठी भाषेतील पाच वाक्ये वाचली आणि मग त्याखालील इंग्रजी भाषेतील सर्व वाक्ये जर वाचली तर तुमचा परफेक्ट सराव होईल आणि नंतर तुम्ही अगदी सहज हा काळ ओळखू आणि वापरू शकता....
सर्वप्रथम मराठी वाक्ये वाचा....
1) मी क्रिकेट खेळत असेल.
2) आईचा स्वयंपाक चालू असेल.
3) पप्पा मुलांना शिकवत असतील.
4) तू  गाडी चालवत असशील.
5) माझा पेपर सुरू असेल.

वरील सर्व कामे थोड्या वेळानंतर, उद्या,परवा किंवा भविष्यात कधीही  चालू असतील असा या वाक्यांचा अर्थ होतो. म्हणजेच भविष्यकाळातील सुरू असलेली काम चालू भविष्यकाळ वापरून सांगतात ....
आता फक्त पाच मिनिटे वेळ काढून खालील मराठी आणि इंग्रजी वाक्ये वाचा ....चालू भविष्यकाळ तोंडपाठ होऊन जाईल..

======================================

चालू भविष्यकाळ साधी वाक्ये:  Affirmative Sentences

1) मी कार चालवत असेल.
I shall be driving a car.


2) आम्ही तुझी वाट पाहत असेल.
We shall be waiting for you.


3) तू चित्रपट पाहत असेल.
You will be watching a movie.


4) तुम्ही  पेपर वाचत असाल.
You will be reading a newspaper.


5) तो रात्री 8 :00  वाजता अभ्यास करत असेल.
He will be studing at 8 :00 pm.


6) ती उद्या सायंकाळी स्वयंपाक करत असेल.
She will be cooking tomorrow evening.


7) ते उद्या  जात असेल.
It will be going tomorrow.


8) ते येथे येत असतील .
They will be arriving here.

9) आदित्य बागेत काम करत असेल.
Aditya will be working in the garden.


10) माझे शिक्षक वर्गात शिकवत असतील.
My teacher will be teaching in the classroom.


11) सुनिल मोबाईल वापरत असेल.
Sunil will be using a smartphone.


12)  पाहुणे जेवणाचा आनंद घेत असतील.
Guests will be enjoying tasty food.


13) मी पैसे कमावत असेल.
I shall be earning money.


14) आम्ही पैसे खर्च करत असू.
We shall be spending money.


15)  उद्या यावेळी तुझे घर जळत असेल .
Your house will be burning tomorrow .


16) पायल पुढच्या रविवारी स्टेजवर नाचत असेल.
Payal will be dancing on stage next Sunday.


17) माझे वडील माझी खरडपट्टी काढत असतील.
My father will be scolding me .


18) ते उद्या खात्रीने घडत असेल.
It will be surely happening tomorrow.


19) यजमान आपले स्वागत करत असतील.
Hosts will be welcoming us.


20) माझा मित्र मला माहिती देत असेल.
My friend will be informing me in detail.


21) अनिल चित्रे काढत असेल.
Anil will be drawing beautiful pictures.


22) सैनिक उद्या आपले रक्षण करत असतील.
Soldiers will be protecting us tomorrow.

23) आपण त्याच्यासाठी टाळ्या वाजवत असू.
We shall be clapping for him.


24) पोलिस तुला ताब्यात घेत असतील.
Cops will be detaining you.


25) आपण उद्या सीमा पार करत असू .
We shall be crossing the frontier.

=====================================

(2) प्रश्नार्थक वाक्ये : Interrogative Sentences 


1) मी कार चालवत असेल का ?
 Shall I be driving a car ?


2) आम्ही तुझी वाट पाहत असाल का ?

 Shall we be waiting for you ?


3) तू चित्रपट पाहत असशील का ?
 Will you be watching a movie ?


4) तुम्ही  पेपर वाचत असाल का ?
Will you be reading a newspaper ?


5) तो रात्री 8 :00  वाजता अभ्यास करत असेल का ?
Will he be studing at 8 :00 pm ?


6) ती उद्या सायंकाळी स्वयंपाक करत असेल का ?
 Will she be cooking tomorrow evening ?


7) ते उद्या  जात असेल का ?
Will it be going tomorrow ?


8) ते येथे येत असतील का ?
Will they be arriving here ?

9) आदित्य बागेत काम करत असेल का ?
Will Aditya  be working in the garden ?


10) माझे शिक्षक वर्गात शिकवत असतील का ?
Will my teacher  be teaching in the classroom ?


11) सुनिल मोबाईल वापरत असेल का ?
Will Sunil  be using a smartphone ?


12)  पाहुणे जेवणाचा आनंद घेत असतील का ?
Will guests be enjoying tasty food ?


13) मी पैसे कमावत असेल का ?
Shall I be earning money ?


14) आम्ही पैसे खर्च करत असू का ?
Shall we be spending money ?


15)  उद्या यावेळी तुझे घर जळत असेल का ?
Will your house  be burning tomorrow by this time?


16) पायल पुढच्या रविवारी स्टेजवर नाचत असेल का ?
Will Payal  be dancing on stage next Sunday ?


17) माझे वडील माझी खरडपट्टी काढत असतील का ?
Will my father be scolding me  ?


18) ते उद्या खात्रीने घडत असेल का ?
 Will it be happening surely tomorrow ?


19) यजमान आपले स्वागत करत असतील का ?
Will hosts be welcoming us ?


20) माझा मित्र मला माहिती देत असेल का ?
Will my friend  be informing me in detail ?


21) अनिल चित्रे काढत असेल का ?
Will Anil be drawing beautiful pictures ?


22) सैनिक उद्या आपले रक्षण करत असतील का ?
Will soldiers  be protecting us tomorrow ?

23)आपण त्याच्यासाठी टाळ्या वाजवत असू का? Shall we be clapping for him ?


24) पोलिस तुला ताब्यात घेत असतील का ?
Will cops  be detaining you ?


25) आपण उद्या सीमा पार करत असू का ?
Shall we be crossing the frontier tomorrow ?

======================================

(3) नकारात्मक वाक्ये : Negative Sentences

1) मी कार चालवत नसेल.
I shall not be driving a car.


2) आम्ही तुझी वाट पाहत नसाल.
We shall not be waiting for you.


3) तू चित्रपट पाहत नसेल.
You will not be watching a movie.


4) तुम्ही  पेपर वाचत नसाल.
You will not be reading a newspaper.


5) तो रात्री 8 :00  वाजता अभ्यास करत नसेल.
He will not be studing at 8 :00 pm.


6) ती उद्या सायंकाळी स्वयंपाक करत नसेल.
She will not be cooking tomorrow evening.


7) ते उद्या  जात नसेल.
It will not be going tomorrow.


8) ते येथे येत नसतील .
They will not be arriving here.

9) आदित्य बागेत काम करत नसेल.
Aditya will not be working in the garden.


10) माझे शिक्षक वर्गात शिकवत नसतील.
My teacher will not be teaching in the classroom.


11) सुनिल मोबाईल वापरत नसेल.
Sunil will not be using a smartphone.


12)  पाहुणे जेवणाचा आनंद घेत नसतील.
Guests will not be enjoying tasty food.


13) मी पैसे कमावत नसेल.
I shall not be earning money.


14) आम्ही पैसे खर्च करत नसू.
We shall not be spending money.


15)  उद्या यावेळी तुझे घर जळत नसेल .
Your house will not be burning tomorrow .


16) पायल पुढच्या रविवारी स्टेजवर नाचत नसेल.
Payal will not be dancing on stage next Sunday.


17) माझे वडील माझी खरडपट्टी काढत नसतील.
My father will not be scolding me .


18) ते उद्या  घडत नसेल.
It will not be happening tomorrow.


19) यजमान आपले स्वागत करत नसतील.
Hosts will not be welcoming us.


20) माझा मित्र मला माहिती देत नसेल.
My friend will not be informing me in detail.


21) अनिल चित्रे काढत नसेल.
Anil will not be drawing beautiful pictures.


22) सैनिक उद्या आपले रक्षण करत नसतील.
Soldiers will not be protecting us tomorrow.

23) आपण त्याच्यासाठी टाळ्या वाजवत नसू.
We shall not be clapping for him.


24) पोलिस तुला ताब्यात घेत नसतील.
Cops will not be detaining you.


25) आपण उद्या सीमा पार करत नसू .
We shall not be crossing the frontier tomorrow.

======================================

4) नकारात्मक प्रश्नार्थक वाक्ये : 


1) मी कार चालवत नसेल का ?
 Shall I not be driving a car ?


2) आम्ही तुझी वाट पाहत नसाल का ?

 Shall we not be waiting for you ?


3) तू चित्रपट पाहत नसशील का ?
 Will you not be watching a movie ?


4) तुम्ही  पेपर वाचत नसाल का ?
Will you not be reading a newspaper ?


5) तो रात्री 8 :00  वाजता अभ्यास करत नसेल का ?
Will he not be studing at 8 :00 pm ?


6) ती उद्या सायंकाळी स्वयंपाक करत नसेल का ?
 Will she not be cooking tomorrow evening ?


7) ते उद्या  जात नसेल का ?
Will it not be going tomorrow ?


8) ते येथे येत नसतील का ?
Will they not be arriving here ?

9) आदित्य बागेत काम करत नसेल का ?
Will Aditya not be working in the garden ?


10) माझे शिक्षक वर्गात शिकवत नसतील का ?
Will my teacher not  be teaching in the classroom ?


11) सुनिल मोबाईल वापरत नसेल का ?
Will Sunil not be using a smartphone ?


12)  पाहुणे जेवणाचा आनंद घेत नसतील का ?
Will guests not be enjoying tasty food ?


13) मी पैसे कमावत नसेल का ?
Shall I not be earning money ?


14) आम्ही पैसे खर्च करत नसू का ?
Shall we not be spending money ?


15)  उद्या यावेळी तुझे घर जळत नसेल का ?
Will your house not be burning tomorrow by this time?


16) पायल पुढच्या रविवारी स्टेजवर नाचत 

नसेल का ?
Will Payal not be dancing on stage next Sunday ?


17) माझे वडील माझी खरडपट्टी काढत नसतील का ?
Will my father not be scolding me  ?


18) ते उद्या खात्रीने घडत नसेल का ?

 Will it not be happening surely tomorrow ?


19) यजमान आपले स्वागत करत नसतील का ?
Will hosts not be welcoming us ?


20) माझा मित्र मला माहिती देत नसेल का ?
Will my friend  not be informing me in detail ?


21) अनिल चित्रे काढत नसेल का ?
Will Anil not be drawing beautiful pictures ?


22)सैनिक उद्या आपले रक्षण करत नसतील का ?
Will soldiers not be protecting us tomorrow ?

23)आपण त्याच्यासाठी टाळ्या वाजवत नसू का? Shall we not be clapping for him ?


24) पोलिस तुला ताब्यात घेत नसतील का ?
Will cops  not be detaining you ?


25) आपण उद्या सीमा पार करत नसू का ?
Shall we not be crossing the frontier tomorrow ?

====================!===!=====!===!=====


सरावासाठी इतर काही महत्वाचे प्रश्न :


1) तू उद्या काय करत असेल ?
What will  you  be doing tomorrow ?


2) तो उद्या काय खात असेल ?
What will he be eating tomorrow?


3) ती उद्या कोठे राहत असेल?
Where will she be living tomorrow?


4) तुला भविष्यात कोण मदत करत असेल?
Who will be helping you in future?


5) तुम्ही कोणते पुस्तक वाचत असेल ?
Which book will you be reading ?


6) ते कोणाला मदत करत असतील ?
Whom will they be helping ?


7) सीमा का हरत असेल ?
Why  will Seema be losing ?


8) तुम्ही किती आंबे खात असाल?
How many mangoes will you be eating?


9) गाय किती पाणी पित असेल ?
How much water will cow be drinking?


10) तो केव्हा येत असेल ?
When will he be coming ?

======================================



Saturday, May 1, 2021

Shall आणि Will मधील फरक काय? Simple Future Tense

 नमस्कार मित्रांनो,
आज आपण shall आणि will या दोन शब्दांबद्दल सर्व माहिती घेऊया. आपण बोलताना नेहमी shall आणि will या शब्दांचा उपयोग करत असतो. या दोन शब्दांतील फरक काय आहे आणि कोणत्या ठिकाणी कोणता  शब्द वापरला पाहिजे ही माहिती जर आपण लक्षात ठेवली तर खूप भारी होईल नाही का ? मग आपल्या सारखे हुशार आपणच ....
खालील काही महत्वाचे नियम जर आपण शिकून घेतले तर खरंच फायदा होईल...

=====================================

1) साधा भविष्यकाळ 

================================
सर्वप्रथम shall आणि will चा उपयोग साध्या भविष्यकाळात कशा पद्धतीने करतात ते पाहूया.


A) साधी वाक्ये :  Affirmative Sentences


साध्या भविष्यकाळात I shall आणि We shall घ्यावे आणि इतर वेळी will वापरावे...खालील वाक्ये वाचा म्हणजे सराव होईल...


1) मी उद्या शाळेत जाईन.
I shall go to school tomorrow.
2) आम्ही उद्या शाळेत जाऊ.
We shall go to school tomorrow.
3) तू शाळेत जाशील.
You will go to school.
4) तुम्ही शाळेत जाल.
You will go to school.
5) तो शाळेत  जाईल .
He will go to school.
6) ती शाळेत जाईल.
She will go to school.
7) ते शाळेत जाईल.
It will go to school.
8) ते शाळेत जातील .
They will go to school.
9) भारत हा सामना जिंकेल.
India will win this match.
10) माझा भाऊ उदया येईल.
My brother will come tomorrow.

11) शितल मला परवा भेटेल.
Shital will meet me the day after tomorrow.
12) तो लगेच परत येईल.
He will come back soon.
13) मी थोड्या वेळानंतर तुला फोन करीन.
I shall call you after some time.
14) आम्ही तुला योग्य मार्गदर्शन करू.
We shall guide you properly.
15) या कारचा अपघात होईल.
This car will meet an accident.
16) सुनिल हे सुंदर घर विकत घेईल.
Sunil will buy this beautiful house.

17) मी तुला एक गोष्ट सांगीन.
I shall tell you a story.
18) आम्ही कार चालवायला शिकू.
We shall learn to drive a car.
19) माझे शिक्षक मला सर्व भाषा शिकवतील.
My teacher will teach me all languages.
20) सूर्य सहा वाजता उगवेल.
The sun will rise at six.

21) मी उद्या हे पुस्तक विकत घेईन.
I shall buy this book tomorrow.
22) आम्ही या उन्हाळ्यात पोहायला शिकू.
We shall learn swimming this summer.

======================================

B) प्रश्नार्थक वाक्ये :  Interrogative Sentences


1) मी उद्या शाळेत जाईन का?
 Shall I go to school tomorrow ?
2) आम्ही उद्या शाळेत जाऊ का ?
 Shall we go to school tomorrow ?
3) तू शाळेत जाशील का ?
 Will you go to school ?
4) तुम्ही शाळेत जाल का ?
 Will you go to school ?
5) तो शाळेत  जाईल का ?
 Will he go to school ?
6) ती शाळेत जाईल का ?
 Will she go to school ?
7) ते शाळेत जाईल का ?
 Will it go to school ?
8) ते शाळेत जातील का ?
 Will they go to school ?
9) भारत हा सामना जिंकेल का ?
 Will India win this match ?
10) माझा भाऊ उदया येईल का ?
Will my brother come tomorrow ?

11) शितल मला परवा भेटेल का ?
Will Shital meet me the day after tomorrow ?
12) तो लगेच परत येईल का ?
 Will he come back soon ?
13) तो थोड्या वेळानंतर तुला फोन करील का ?
Will he call you after some time ?
14) आम्ही तुला योग्य मार्गदर्शन करू का ?
 Shall we guide you properly ?
15) या कारचा अपघात होईल का ?
Will this car  meet an accident ?
16) सुनिल हे सुंदर घर विकत घेईल का ?
Will Sunil  buy this beautiful house?

17) मी तुला एक गोष्ट सांगीन का ?
 Shall I tell you a story ?
18) आम्ही कार चालवायला शिकू का ?
 Shall we learn to drive a car ?
19) माझे शिक्षक मला सर्व भाषा शिकवतील का ?
Will my teacher  teach me all languages ?
20) सूर्य सहा वाजता उगवेल का ?
Will the sun  rise at six ?

21) मी उद्या हे पुस्तक विकत घेईन का ?
 Shall I buy this book tomorrow ?
22) आम्ही या उन्हाळ्यात पोहायला शिकू का ?
Shall we learn swimming this summer ?

======================================
C) नकारात्मक वाक्ये : Negative Sentences



1) मी उद्या शाळेत जाणार नाही .
I shall not go to school tomorrow.
2) आम्ही उद्या शाळेत जाणार नाही.
We shall not go to school tomorrow.
3) तू शाळेत येणार नाही.
You will  not come to school.
4) तुम्ही शाळेत येणार नाही.
You will not come to school.
5) तो या शाळेत शिकणार नाही.
He will not learn in this school.
6) ती शाळेत रडणार नाही.
She will not cry in  school.
7) ते शाळेत थांबणार नाही.
It will not stay at school.
8) ते तुमच्या शाळेत शिकवणार नाहीत .
They will not teach in your school.
9) भारत हा सामना जिंकणार नाही.
India will not win this match.
10) माझा भाऊ उदया येणार नाही.
My brother will not come tomorrow.

11) शितल मला परवा भेटणार नाही.
Shital will not meet me the day after tomorrow.
12) तो लगेच परत येणार नाही.
He will not come back soon.
13) मी थोड्या वेळानंतर तुला फोन करणार नाही.
I shall not call you after some time.
14) आम्ही तुला योग्य मार्गदर्शन करणार नाही.
We shall not guide you properly.
15) या कारचा अपघात होणार नाही.
This car will not meet an accident.
16) सुनिल हे सुंदर घर विकत घेणार नाही.
Sunil will not buy this beautiful house.

17) मी तुला एक गोष्ट सांगणार नाही.
I shall not tell you a story.
18) आम्ही कार चालवायला शिकणार नाही.
We shall not learn to drive a car.
19) माझे शिक्षक मला सर्व भाषा शिकवणार नाहीत.
My teacher will not teach me all languages.
20) सूर्य सहा वाजता उगवणार नाही.
The sun will not rise at six.

21) मी उद्या हे पुस्तक विकत घेणार नाही.
I shall not buy this book tomorrow.
22) आम्ही या उन्हाळ्यात पोहायला शिकणार नाही.
We shall not learn swimming this summer.

=====================================

D) नकारात्मक प्रश्नार्थक वाक्ये : Negative Interrogative Sentences.


1) मी उद्या शाळेत जाणार नाही का ?
Shall I not go to school tomorrow ?
2) आम्ही उद्या शाळेत जाणार नाही का ?
Shall we not go to school tomorrow?
3) तू शाळेत येणार नाही का ?
 Will  you not come to school ?
4) तुम्ही शाळेत येणार नाही का ?
Will you not come to school ?
5) तो या शाळेत शिकणार नाही का ?
Will he not learn in this school?
6) ती शाळेत खेळणार नाही का ?
Will she not play in  school?
7) ते शाळेत थांबणार नाही का ?
Will it not stay at school ?
8) ते तुमच्या शाळेत शिकवणार नाहीत  का ?
Will they not teach in your school?
9) भारत हा सामना जिंकणार नाही का ?
Will India not win this match ?
10) माझा भाऊ उदया येणार नाही का ?
Will my brother not come tomorrow ?

11) शितल मला परवा भेटणार नाही का ?
Will Shital not meet me the day after tomorrow ?
12) तो लगेच परत येणार नाही का ?
Will he not come back soon ?
13) मी थोड्या वेळानंतर तुला फोन करणार नाही का ?
Shall I not call you after some time?
14) आम्ही तुला योग्य मार्गदर्शन करणार नाही का?
Shall we  not guide you properly ?
15) या कारचा अपघात होणार नाही का ?
Will this car  not meet an accident ?
16) सुनिल हे सुंदर घर विकत घेणार नाही का ?
Will Sunil not buy this beautiful house ?

17) मी तुला एक गोष्ट सांगणार नाही का ?
Shall I not tell you a story ?
18) आम्ही कार चालवायला शिकणार नाही का ?
Shall we not learn to drive a car ?
19) माझे शिक्षक मला सर्व भाषा शिकवणार नाहीत का ?
Will my teacher  not teach me all languages ?
20) सूर्य सहा वाजता उगवणार नाही का ?
Will the sun  not rise at six ?

21) मी उद्या हे पुस्तक विकत घेणार नाही का ?
Shall I not buy this book tomorrow?
22) आम्ही या उन्हाळ्यात पोहायला शिकणार नाही का ?
 Shall we not learn swimming this summer ?

======================================
काही wh questions :


1) मी काय विकत घेईन ?
What shall I purchase?
2) आम्ही कोठे रहाल?
Where shall we live ?
3) मी कोणते पुस्तक वाचेन ?
Which book shall I read ?
4) आम्ही केव्हा पोहचणार ?
When shall  we reach ?
5) रहदारीवर कोण नियंत्रण ठेवेल ?
Who will regulate the traffic ?
6) तू कसा येशील ?
How will you come ?

7) तू किती वेळ खेळशील ?

How long will you play ?

8) तू किती दूर जाशील ?

How far will you go ?

9) तो किती वेळा पोहेल ?

How many times will he swim?

10) ती किती पाणी पिईल ?

How much water will she drink ?
=============≠==================

(2) जेव्हा आपल्याला बोलताना खात्री,वचन,तीव्र इच्छा,धमकी द्यायची असते त्यावेळी I आणि we सोबत will घेतात .
A) मी तुला अद्दल घडवीन .( धमकी)
I will teach you a lesson.
B) मी तुला मदत करीन.(वचन)
I will help you.
C) मी ही परीक्षा पास होईन. (खात्री)
I will clear this exam.
D) मी जिल्हाधिकारी बनेन. (तीव्र इच्छा)
I will become a collector.

======================================

3) You,He,She, They सोबत shall घेतले तर त्या वाक्यातून धमकी, आज्ञा, वचन आणि खात्री व्यक्त होते.
A) तुला तुझ्या कर्माची फळे भेटतील. (खात्री)
You shall get your dues.
B) तो  तुला ठार मारील. (धमकी)
He shall kill you.
C) ती आईवडिलांची काळजी घेईल. (वचन)
She shall look after her parents.
D) तू वेळेच्या आत हे काम पूर्ण करशील. ( आज्ञा)
You shall complete this task in time.

======================================
4) Will you चा उपयोग विनंती करण्यासाठी करतात.


A) Will you please open the door ? ( नम्र विनंती)
B) Will you please give me that towel ? (नम्र विनंती)
C) Will you close the window ? (विनंती)
D) Will you help me ? (विनंती)
======================================


Thursday, April 29, 2021

इंग्रजीतील विरामचिन्हे : Punctuation Marks

 मित्रांनो नमस्कार,
आज आपण इंग्रजी भाषेतील वेगवेगळ्या विरामचिन्हांची माहिती घेऊया. इंग्रजीमध्ये कोणती विरामचिन्हे आहेत आणि ती कोठे वापरली जातात हे एकदा शिकून घेतले की, आयुष्यभर त्यांचा आपणाला फायदा होतो. चला तर मग सुरू करूया.

===============================
1) CAPITAL LETTERS : 


आपल्याला माहिती आहे की, इंग्रजीमध्ये Capital letters आणि Small letters असतात . त्यापैकी Capital letters यांचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या उद्देशाने केला जातो. त्यांची पूर्ण माहिती करून घेतली तर आपला खूप फायदा होतो. खालील महत्वाचे नियम क्रमांक 01 ते 15 वाचा.....


A) नियम क्रमांक 01

 इंग्रजी भाषेतील प्रत्येक वाक्याची सुरूवात Capital letter लिहून करतात.


1) Balaji is very kind.
2) We have three kids.
3) She is no more.
4) All of them are happy.
5) When would you come?

===================≠=================

B)नियम क्रमांक 02

 सणांच्या नावाचे पहिले अक्षर Capital letter लिहिले  पाहिजे.
खालील वाक्ये वाचा...


1) I will go to my home on Diwali.
2) He didn't meet me after Holi.
3) Do you like Dasera?
4) Bakri Eid is a holy festival.
5) He gifted me a car on Christmas.
6) Wish you happy Gudi Padwa!

====≠=================================


C) नियम क्रमांक 03

 I (आइ- मी) हा शब्द वाक्यात कोठेही जरी आला तरी तो Capital लिहावा लागतो...


1) He and I are good friends.
2) Vijay,Anil and I started a company.
3) Anil said, "I was very happy".
4) I am with you.
5) Am I your friend ?

=====================================


D) नियम क्रमांक 04 


God हा शब्द इंग्रजीमध्ये सर्रासपणे वाक्यात कोठेही आला तरी Capital letter ने सुरूवात करून लिहितात. आणि God बद्दल आलेले सर्वनामही Capital letter ने सुरूवात करून लिहितात. (He,His,Him) खालील वाक्ये वाचा...


1) May God bless you.
2) Almighty God knows everything.
3) Some believe that we are God's kids.
4) Who has seen the God?
5) God takes care of His children.


=====================!===============


E) नियम क्रमांक 05 

शब्दांचे संक्षिप्त रूप लिहिताना त्यातली इंग्रजी अक्षरे Capital लिहितात.


1)  M.A.  2) M.P. 3) M.B.B.S. 4)M.L.A. 5) I.A.S. 
7) I.P.S. 8) B.A. 9) S.P. 10) I.A.F.


=====================================


F) नियम क्रमांक 06

 ऐतिहासिक घटनांची नावे लिहिताना त्यातील प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर Capital letter असते.


1) World War 1
2) World War 2
3) The Civil War
4) The Glorious Revolution
5) Republic Day
6) Independence Day
7) French Revolution
8) Russian Revolution


======================================

G)नियम क्रमांक 07

 भाषेच्या नावाचे पहिले अक्षर Capital letter लिहिले जाते...खालील शब्द वाचा..


1) Marathi
2) Hindi
3) English
4) French
5) Tamil
6) Urdu

====================================


H) नियम क्रमांक 08

 महिने आणि वार यांची नावे लिहिताना पहिले अक्षर Capital letter असते....


1) January.       1) Sunday
2)February.       2) Monday
3)March            3) Tuesday
4) April.            4) Wednesday
5) May              5) Friday
6) June.            6) Saturday

====================================


I) नियम क्रमांक 09


राजकिय पक्षाच्या नावातील शब्द Capital letter ने सुरूवात करून लिहावेत.


1) The Congress Party
2) The Shiv Sena
3) The Aam Adami Party
4) The B.J.P.
5) The Democratic Party
6) The Republican Party

=====================================

J) नियम क्रमांक 10
इंग्रजी भाषेतील नामांच्या पाच प्रकारापैकी एक प्रकार म्हणजे Proper nouns होय . हे नाम लिहितांना पहिले  अक्षर Capital letters असते.


1) Mumbai
2)Aditya
3) Jalna
4) Shital
5)India
6) Europe


======================================

K) नियम क्रमांक 11
ऐतिहासिक इमारतीचे नाव लिहिताना त्यातील शब्दांचे पहिले अक्षर Capital लिहितात.


1) Taj Mahal
2) Red Fort
3) White House
4) Bibika Makbara
5) Ellora Caves


=====================================


12)नियम क्रमांक 12

 पत्र, संदेश किंवा मेल पाठवताना आपण जे संबोधन वापरतो , त्यातील शब्द Capital letter ने सुरू करावेत.


1) Dear Father,
2) Dear Mother,
3) Dear Sir,
4) Dear Friend,
5) Dear Sister,
6) Dear Madam,


=====================================

13) नियम क्रमांक 13


  पर्वत, नद्या, रेल्वेगाडी, विमान, जहाज,रस्ता,शाळा,महाविद्यालय,दवाखाना,विद्यापीठ,धर्म,वर्तमानपत्र यांची नावे लिहिताना सुरूवातीची अक्षरे Capital letter वापरतात.


1) पर्वत: The Himalaya
2) नदी: The Ganga
3) रेल्वे:The Rajdhani Express
4) विमान: The Makalu
5) जहाज : The Prince of Wales
6) रस्ता : Mahatma Gandhi Road
7) शाळा : New High School
8) महाविद्यालय: Walchand College
9) दवाखाना: Sai Hospital
10) विद्यापीठ: Pune University
11) धर्म: Sikh
12) वर्तमानपत्र: The Indian Express 

=====================================


14) कवितेतील नवीन ओळ लिहिताना पहिले अक्षर Capital letter असते. खालील कविता वाचा....


Golden slumbers kiss your eyes,
Smiles awake you when you rise,
Sleep, pretty wantons,do not cry,
And I will sing a lullaby,
Rock them, rock them,lullaby....





=====================================


15) विविध पुरस्कारांची नावे लिहिताना वापरलेल्या शब्दांचे पहिले अक्षर Capital letter  लिहावे.


1) Bharat Ratna
2) Padma Bhushan
3) Padma Vibhushan
4) Padma Shree


================================

चला आता आपण इतर विरामचिन्हांची इंग्रजी भाषेतील नावे आणि त्यांचे अचूक उपयोग याबद्दल माहिती घेऊया .


1) The Full Stop (.) पूर्ण विराम :


A)पूर्ण विरामचा वापर विधानार्थी वाक्यांच्या शेवटी केला जातो.खालील वाक्ये वाचा.
1) He is at home.
2) Banglore is a clean city.
3) Rani could not survive.
4) Farmers have come together.
5) This is not my pen.


================================

B) पूर्ण विरामचा वापर आज्ञार्थी वाक्यांच्या शेवटी केला जातो.खालील वाक्ये  वाचा..


1) Sunil, come here.
2) Sit down ,Ajay.
3) Don't make noise here.
4) Don't drive so fast.
5) Take this medicine regularly.


================================
C) पूर्ण विराम तास आणि मिनिटे वेगवेगळी दाखवताना वापरले जाते.


1) I will come before 9.15 in the morning.
2) Aditya left home at 10.45 yesterday.
3) Train will  arrive at 7.20 today.
4) I will come at 6.45 am.
5 ) He will be ready aftrer 7.45 am.


================================
D) संक्षिप्त रूप दाखवण्यासाठी पूर्ण विराम वापरतात.
1) B. Sc. 
2) M. Com.
3) L.L.B.
4) B. A.
5) M. Sc.


======================================


E) अपूर्णांकात पूर्ण विराम वापरले जाते.


A) 21.896
B) 96.009
C) 57.88
D) 4.09
E) 93.752

======================================

02)  Question Mark : ? (प्रश्नचिन्ह)


A) Wh- questions प्रश्नार्थक वाक्यांच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात...

1)Where are you ?
2) What is he doing ?
3) When will she go ?
4) How old are you ?
5) Which book do you like most ?


B) Verbal question प्रश्नार्थक वाक्यांच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात...
1) Are you at home ?
2) Has he gone mad ?
3) Did he call you ?
4)Would you help me ?
5) May I help you ?


C) Question -tag च्या वाक्यात प्रश्नचिन्ह वापरतात ...
1) He has lost hope, hasn't he ?
2) Kranti won a medal, didn't Kranti?
3) I have some cows, don't I ?
4) There is a tree, isn't there?
5) This is my pen, isn't it?


=======================================

03) The Sign of Exclamation( !) : 
उद्गारवाचक चिन्ह


उद्गारवाचक चिन्हाचा उपयोग तीव्र भावना, तीव्र इच्छा, तीव्र आश्चर्य, तीवर व्याकुळता, तीव्र उत्तेजना व्यक्त करणार्या शब्दांनंतर किंवा अशा वाक्यांच्या शेवटी वापरतात.  
1) What a huge tree!
2) May God bless you !
3) Wow ! Wonderful catch!
4) O time ! 
5) Well done !

6) Alas ! Everything is finished !


======================================

04) Apostrophe : (')
आपण नेहमी हे चिन्ह वापरतो . याला षष्ठी विभक्ती चिन्ह असे म्हणतात . याचे वापर खाली बघा आणि लक्षात ठेवा.


1) एखादी गोष्ट कोणाच्या मालकीची आहे हे सांगण्यासाठी हे वापरले जाते. आज पूर्णपणे याचा अर्थ समजून घेऊया.
1) Mohan's book - मोहनचे पुस्तक
2)  Mohan and Dilip's book -  मोहन आणि दिलीपचे पुस्तक (दोघात एक पुस्तक आहे असा अर्थ)
3) Mohan's and Dilip's book - मोहन आणि दिलीपचे पुस्तक (दोघांकडेही एक एक पुस्तक आहे असा अर्थ)
4) Girl's hostel- एका मुलीचे हाॅस्टेल
5) Girls' hostel- अनेक मुलींचे हाॅस्टेल


2) संक्षिप्त रूप तयार करताना गाळलेल्या अक्षराच्या जागी apostrophe  वापरतात.
Can - Can't
Does not - Doesn't
Could not - Couldn't
Would not - Wouldn't
Should not - Shouldn't


======================================

05) Inverted Comma : अवतरण चिन्ह


A) एकेरी अवतरण चिन्हाचा उपयोग पुस्तकांची नावे, कथा,कविता,वर्तमानपत्र,मासिके यांची नावे लिहिण्यासाठी केला जातो.
1) 'The Hindu' is my favourite newspaper.
2) I like 'You Can Win' very much.
3) ' The Luncheon' is a wonderful story.


B) दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग हा एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे बोलणे जसेच्या तसे सांगण्यासाठी केला जातो. खालील वाक्ये वाचा...
1) Aditya said, " I am a would be I.P.S. officer."
2) Vikas said, "Shinde sir taught me extreamly well."
3) Savita said, " My new bangles are very beautiful."




======================================

06) Hyphen : संयोगचिन्ह 


A)दोन संयुक्त शब्द जोडण्यासाठी Hyphen म्हणजे संयोगचिन्ह वापरले जाते.


1) Father-in-law
2) Mother-in-law
3) Son-in-law
4) Daughter-in-law
5) Brother-in-law
6) Sister-in-law


B) आपण लिहितांना काही वेळा एखादा शब्द ओळीच्या शेवटी येतो आणि जागा नसल्यामुळे आपण तो अर्धा तेथे लिहितो आणि अर्धा खालच्या ओळीत hyphen वापरून लिहितो.


He came to play with me but actually he was di-
sturbed.

======================================

07 ) The Comma : (,) स्वल्पविराम 


स्वल्पविरामचा वापर अतिशय महत्वाचा आहे . खालील सर्व उपयोग काळजीपूर्वक वाचून लक्षात ठेवायला हवेत...


A) एखाद्या व्यक्तीला हाक मारल्यानंतर comma येतो व नंतर पुढचे वाक्य येते. खालील  वाक्ये बघूया....
1) Aditya, help me.
2) Savita, don't speak.
3) Govind, speak slowly.
4) Mohan, come here.
5) Complete your homework, Gopal.

=============================
B) एकाच जातीचे भरपूर शब्द लिहिताना दोन शब्दांच्या मध्ये comma वापरतात व शेवटचे दोन शब्द and ने जोडतात..

1) Ramesh, Ganesh, Dipak and Aditya are my best students.

2) I bought tomatoes,potatoes, brinjals, chillies and spinach.

3) Sugar, milk, water and tea powder are used for making tasty tea.

=============================
C) As soon as चा वापर करून वाक्ये जोडताना comma वापरतात..

1)As soon as he saw a snake, he screamed and ran away.
2) As soon as teacher entered, students welcomed him.

======================================

D) पत्र पाठवताना आपण जो स्वत:चा पत्ता लिहितो तेथे आणि सुरूवातीला अभिवादन करत असताना आणि त्यानंतर पत्राचा शेवट करताना comma वापरला जातो.
1) Dear Friend,
2) Your lovingly,
                                     3) Rajesh Shinde,
                                      Vithal Mandir area,
                                      Manjaram, 
                                      Naigaon, Nanded.

======================================


E) Direct speech च्या वाक्यात comma वापरतात.
1) He said, " It is very easy."
2) Kajol said, " We are so glad."
3) Mansi said, "Who is he?"


======================================

F) Question tag च्या वाक्यात comma वापरतात.
1) Open the door, will you?
2) Let us go to school, shall we?
3) Nothing  is impossible, is it ?

=====================================

G) एखाद्या प्रश्नाचे उत्तर Yes आणि No या शब्दांनी सुरू झाले तर या शब्दांनंतर comma येतो.
1) Yes, I am at home.
2) Yes, he is happy.
3) No, she will not come.
4) No, they are not here.


======================================

H) संख्या लिहिताना comma वापरतात.
1)3,09,853
2)42,86,999
3)21,98,000
4)12,21,352

====================================

I) इंग्रजीतील चारही प्रकारच्या अटदर्शक वाक्यांत म्हणजे (conditional sentences) मध्ये comma वापरतात. खालील चार वाक्ये वाचा....


1) If you heat water, it boils.
2) If you had studied hard, you would have become a collector.
3) If you tried, you could learn swimming.
4) If you meet him, he may help you.





======================================

08) Semi - Colon : (;) अर्धविराम


Comma पेक्षा जास्त वेळ थांबण्यासाठी अर्धविराम वापरले जाते.
1) She had never seen me; however, she was to see me.
2) Aditya went to play; Vijay stayed at home.
3) She was all right; only she was fatigued.
4) I would come; only that I am tired.


======================================

9) Colon :विसर्ग (:)

Colon चा उपयोग विविध वस्तूंची यादी सुरू करण्यापूर्वी करतात. खालील दोन-तीन उदाहरणे पहा....


1) Top ten Indian states : Rajsthan, Madhya Pradesh, Maharashtra....


2) List of countries : Russia, Germany,India....


3) Wild animals : Tiger, lion, elephant....





======================================

10) Caret : काकपद (^)
 आपणाला भरपूर वेळा याचा उपयोग करावा लागतो .


A) वाक्य लिहिताना एखादा शब्द विसरला की आपण ह्या चिन्हाचा उपयोग करून तो शब्द वर लिहितो .
            best
He is my^ friend.


B) एखादा शब्द लिहिताना एखादे अक्षर विसरले की, आपण हे चिन्ह वापरून ते दाखवतो .
           a
Simult^neously


======================================













Tuesday, April 27, 2021

Antonyms: Important and Useful Examples

 1) Before (पूर्वी) x  After (नंतर)
2) Thick (जाड) x  Thin (पातळ)
3) Swift (चपळ) x  Slow ( मंद)
4) Tame (पाळीव) x  Wild (जंगली)
5) Sin (पाप) x Virtue ( पुण्य, सद्गुण)

6) Rise(उदय) x  Fall (ह्रास)
7) Ripe(पिकलेले) Raw ( कच्चे)
8) Sweet(गोड) x   Bitter (कडू)
9) Sink(बुडणे) x  Float (तरंगणे
10) useful(उपयोगी) x useless (निरूपयोगी)

11)Top(वरचे टोक) x  Bottom ( तळ )
12) Work(काम) x  Rest (विश्रांती)
13) War (युद्ध) x  Peace (शांतता)
14) Sleep (झोपणे)x Wake (झोपेतून उठणे)
15) Whole(संपूर्ण) x Part (काही भाग )
16) Rich(श्रीमंत) x Poor (गरीब )
17) Noise (गोंगाट) x  Quiet ( शांतता)
18) Accept(स्वीकारणे) x  Reject (नाकारणे)
19) Easy(सोपे) x Hard ( कठीण )
20) Sane(शहाणा) x Mad ( वेडा )

21)Even (सम) x Odd ( विषम)
22) Open (उघडणे ) x Shut (बंद करणे)
23) King (राजा) x Subjects (प्रजा)
24) Tight (घट्ट) x Loose (ढिला)
25) Jolly (आनंदी ) x Gloomy (उदास )
26) Senior (वरिष्ठ) x Junior ( कनिष्ठ)
27) Proud (गर्विष्ठ) x Humble (नम्र )
28) Heavy (जड) x Light (हलका) 
29) Hate (तिरस्कार) x Love ( प्रेम )
30) Saint (संत ) x Sinner ( पापी )
31) Clean (निर्मळ) x Dirty (घाणेरडा)

32) Old (म्हातारा) x Young (तरूण )
33) Above (वर ) x Below ( खाली )
34) Cool (थंड) x Warm (गरम)
35) Deep (खोल ) x Shallow (उथळ)
36) Large (मोठा) x Small ( लहान )
37) Dry (कोरडा) x Wet (ओला)
38) Right (बरोबर )  x Wrong (चूक)
39) Rural (ग्रामीण ) x Urban (शहरी)
40) Fresh (ताजा) x Stale (शिळा)
41) Death (मृत्यू ) x Birth (जन्म )

42) Tragic (शोकमय ) x Comic ( हास्यमय)
43) Usual (नेहमीचा) x Unusual (असामान्य )
44) Open (ज्ञात ) x Secret (गुपित )
45)Visible (दृश्य ) x Invisible ( अदृश्य )
46)Common (सामान्य) x Rare (दुर्मिळ)
47)Tutor (गुरू) x Pupil (विद्यार्थी)
48) Original (मूळचा) x Duplicate (बनावट)
49)Offer (देऊ करणे) x Refuse (नकार देणे)
50)Virtue (सद्गुण) x Vice (दुर्गूण)

51) Wise (शहाणा) x Stupid (मूर्ख)
52) Safe (सुरक्षित ) x Unsafe ( असुरक्षित )
53) Debit ( खर्च) x Credit (जमा)
54) Able ( समर्थ) x Unable (असमर्थ )
55) Oral (तोंडी ) x Written (लेखी )
56) Beautiful (सुंदर) x Ugly (कुरूप)
57) Bright (तेजस्वी) x Dull (मंद )
58) Tall (उंच ) x Short (आखुड, बुटका)
59) Wide ( रूंद ) x Narrow ( अरूंद )
60) Dark (गडद ) x Light (फिक्कट)

61) Good (चांगला) x Bad (वाईट )
62) Initial (सुरूवातीचा) x Final (शेवटचा) 
63) True (खरा ) x False ( खोटा )
64) Few (थोडे ) x Many ( पुष्कळ) 
65) Hot (गरम ) x  Cold ( थंड )
66) Cheap (स्वस्त ) x Dear ( महाग )
67) High (उंच) x  Low (खालचा)
68) Busy (मग्न) x Idle (रिकामटेकडा)
69) Happy (आनंदी) x  Sad (दु:खी)
70) Loss (तोटा) x  Gain (फायदा )

71)Empty (रिकामा) x Full (भरलेला)
72) Profit (फायदा) x Loss (तोटा)
73) Praise (स्तुती करणे) x Critisize (अपमान करणे)
74) Joy (आनंद) x Grief (दु:ख)
75) Cover (झाकणे) x Uncover (उघडे करणे)
76) Far (दूर) x Close (जवळ)
77)Naive (भोळा) x Artful (कावेबाज)
78) Strict (कडक) x Lax ( सौम्य)
79)Optimist (आशावादी) x Pessimist (निराशावादी)

80)Push (ढकलणे) x Pull (ओढणे)
81) Belief (विश्वास) x Disbelief (अविश्वास)
82) Borrow (उसने घेणे) x Lend (उसने देणे)
83) Dawn (पहाट) x Dusk (कातरवेळ)
84) Always (नेहमी) x Never (कधीही नाही)
85) Right (उजवा ) x Left (डावा)
86) Kind (दयाळू) x Cruel (दुष्ट)
87)Create (निर्माण करणे) x Destroy (नष्ट करणे)
88)Arrive (येणे) x Depart (जाणे)
89) Attack (हल्ला करणे) x Defend (संरक्षण करणे)

90) Faithful (प्रामाणिक) x Unfaithful (बेइमान)
91)Solid (घनरूप) x Liquid (द्रवरूप)
92)Pure (शुद्ध) x Impure (अशुद्ध)
93) Hero (नायक) x Villain (खलनायक)
94) Dense( घनदाट) x Sparse (विरळ)
95) Hire (भाड्याने घेणे) x Lent ( भाड्याने देणे)
96) Major (प्रमुख) x Minor ( कमी प्रतीचा)
97)Present (उपस्थित ) x Absent ( अनुपस्थित)
98) Outward (बाहेरचा) x Inward (आतला)
99)Question(प्रश्न) x Answer (उत्तर)
100) Permit (परवानगी देणे) x Forbid ( मनाई करणे)

101) Aged(म्हातारा) x Youthful (तरूण)
102) Wax (आकार वाढणे) x Wane (आकार लहान होणे)
103)Sensible (समंजस) x Senseless ( असमंजस)
104) Mild (सौम्य) x Stern (कठोर)
105) Host (यजमान) x Guest (पाहूणा)
106) Eldest (वयाने मोठा) x Youngest (वयाने लहान)
107) Friendship (मैत्री ) x Enmity (दुश्मनी)
108) Confess(कबूली देणे) x Deny (नकार देणे)
109) Diffident ( अविश्वास) x Confident (आत्मविश्वास)
110)Grave (गंभीर) x Gay (आनंदी)

111) Ample (पुरेसे) x Scanty ( तुटपुंजे)
112) Dear (प्रिय) x Hateful (तिरस्करणीय)
113)Ancient (प्राचीन) x Modern (आधुनिक)

114)
115) Brutal (क्रूर) x Kindly (दयाळू)
116) Increase (वाढणे) x Decrease (कमी होणे)
117) Fit (योग्य) x Unfit (अयोग्य)
118) Crude (अशुद्ध) x Refined (शुद्ध)
119) Bliss (आनंद) Misery (दु:ख)

120) Alive (जिवंत) x Dead (मृत)
121) Normal (सामान्य) x Abnormal (असामान्य)
122) Unite (एकत्र आणणे) x Separate (वेगळे करणे)
123) Native (देशी) x Foreign (परदेशी)
124) Voilent (हिंसक) x Gentle (सभ्य)
125) Mighty (शक्तिशाली) x Weak (दुर्बल)

Sunday, April 25, 2021

नामांची महत्वाची उदाहरणे, Nouns : Useful examples

 नमस्कार मित्रांनो,
इंग्रजी भाषेत नामांची हजारो  उदाहरणे आहेत . आपण दररोज त्यांचा कितीतरी वेळा लिहिताना आणि बोलताना उपयोग करत असतो. तुम्हाला हे माहिती आहे का इंग्रजीमधील सर्वात जास्त वेळा उपयोग होणारे कोणते नाम आहे ते ? आठवत नाही का......? तर मित्रांनो इंग्रजी भाषेतील सर्वात जास्त वापरले जाणारे नाम म्हणजे 'time' हा शब्द आहे .
बरं तुम्हाला माहिती आहे का नाम कसे तयार होते ? नाम तयार करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. क्रियापदापासून नाम तयार होते, विशेषणापासून नाम तयार होते, एवढेच काय एका नामापासूनही दुसरे नाम तयार होते ....! 
विशेषण आणि क्रियापदांमध्ये थोडा बदल केला की नाम तयार करता येते . आपण दररोज उपयोगी पडणारी नामांची काही उदाहरणे पाहूया चला...

======================================

A) भाववाचक नामे : Abstract Nouns

1) Joy (जाॅइ) आनंद
2) sorrow (सारो) दु:ख
3) hate (हेट) दवेष
4) grief (ग्रिफ) दु:ख
5) angst (अँग्स्ट) तीव्र चिंता
6) misery (मिजरी) दु:ख
7) anxiety (अँक्सिइटी) चिंता
8) luxury (लक्झरी) ऐश्वर्य
9) energy (एनर्जी) उर्जा
10) unity (युनिटी) एकी
11) culture (कल्चर) संस्कृती
12) charity (चॅरिटी) दया
13) life (लाइफ) जीवन
14) comfort (कंफर्ट)  आराम
15) care (केअर) काळजी
16) crime (क्राइम) गुन्हा
17) gain (गेइन) लाभ
18) fiction (फिक्शन ) कल्पना
19) goal (गोल) ध्येय
20) delay (डिलेइ) उशीर
21) defeat (डिफिट) पराभव
22) chaos (केइआँस)  अंधाधुंदी
23) liberty (लिबर्टी) स्वातंत्र्य
24) luck (लक) सुदैव
25) peace (पीस) शांतता
26) pain (पेइन) वेदना
27) rumour (रूमर)  अफवा
28) opinion (ओपिनिअन) मत , विचार
29) victory (विक्टरी) विजय
30) speed (स्पीड) वेग
31) wealth (वेल्थ) संंपत्ती
32) shock (शाॅक)  आश्चर्याचा धक्का
33) union (युनियन)  एकी
34) talent (टॅलेंट) कौशल्य
35) surprise (सरप्राइज)  आश्चर्य
36) need (नीड) गरज
37) relief (रिलीफ) आराम,सुटका
38) power (पावर) सामर्थ्य
39) patience (पेशंस) संयम
40) enmity (एन्मिटी) दुश्मनी
41) noise (नाॅइज) गोंगाट
42)silence (साइलिंस) शांतता
43) youth (यूथ) तारूण्य
44) honesty (आँनेस्टी) प्रामाणिकपणा
45) friendship (फ्रेंडशीप) मैत्री
46) childhood (चाइलडहूड) बालपण
47) pleasure (प्लेझर)  आनंद
48) guilt (गिल्ट)  अपराध
49) presence (प्रेझेंस)  उपस्थिती
50) confidence (काॅन्फिडन्स)  आत्मविश्वास

51) anger (अँगर) राग
52) poverty (पावर्टि) गरीबी
53) wisdom (विसडम) शहाणपण
54) love (लव) प्रेम
55) danger (डेंजर) धोका
56) sleep (स्लीप) झोप
57) theft (थेफ्ट) चोरी
58) faith (फेथ) श्रद्धा
59) kingdom (किंगडम) राज्य
60) length (लेंथ) लांबी
61) bravery (ब्रेवरी) शौर्य
62) height (हाइट)  उंची
63) truth (ट्रथ) सत्य
64) freedom (फ्रिडम) स्वातंत्र्य
65) slavery (स्लेवरी) गुलामी
66) cruelty (क्रुएल्टि) क्रुरपणा
67) depth (डेप्थ) खोली
68) richness (रिचनिस) श्रीमंती
69) strength (स्ट्रेंथ) सामर्थ्य
70) royalty (राॅयल्टि) मानधन
71) speech (स्पीच) भाषण
72) birth (बर्थ) जन्म
73) death (डेथ) मृत्यू
74) health (हेल्थ)  आरोग्य
75) dirt (डर्ट) घाण
76) choice (चाॅइस) निवड
77) duty (ड्यूटी) कर्तव्य
78) beauty (ब्यूटी) सौंदर्य
79) pride (प्राइड)  अभिमान
80) heat (हीट)  उष्णता
81) courage (करिज) धैर्य
82) belief (बिलीफ) विश्वास
83) justice (जस्टीस) न्याय
84) width (विड्थ) रूंदी
85) payment (पेमंट) पगार
86) practice (प्रॅक्टिस) सराव
87) fear  (फिअर) भिती
88) loss (लाॅस) नुकसान
89) action (अँक्शन) कृती
90) defence (डिफेन्स) संरक्षण
91) marriage (मॅरिज) विवाह
92) failure (फेल्यूर)  अपयश
93) success (सक्सेस) यश
94) departure (डिपार्चर) प्रस्थान
95) growth (ग्रोथ) वाढ
96) arrival (अराइवल)  आगमन
97) advice (अँडवाइस) सल्ला
98) thought (थाॅट) विचार
99) service (सर्विस) सेवा
100) deceit (डिसिट) फसवणूक

101) refusal (रिफ्यूजल ) नकार
102) safety (सेफ्टी) सुरक्षितता
103) reality (रिअलिटि) खरेपणा
104) dream (ड्रीम) स्वप्न
105) delight (डिलाइट)  आनंद
106) crime (क्राइम) गुन्हा
107) clarity (क्लँरिटी) स्पष्टपणा
108) envy (एन्वी) मत्सर
109) laxity (लॅक्सिटी) ढीलेपणा
110) horror (हाॅरर) भय
111) mercy (मर्सि) दया
112) sacrifice (सॅक्रिफिस) त्याग
113) skill (स्किल ) कौशल्य
114) thrill (थ्रील) रोमांच
115) silliness (सिलिनिस) मूर्खपणा
116) ability (अँबिलिटी) क्षमता
117) hope (होप)  आशा
118) worry (वरि) चिंता,काळजी
119) lie (लाइ) खोटी गोष्ट
120) right (राइट) हक्क
121) gossip (गाॅसिप) गप्पा
122) hatred (हॅट्रेड) तिरस्कार
123) idea (आइडिया) कल्पना
124) loneliness (लोन्लिनिस)  एकटेपणा
125) trend (ट्रेंड) कल, फॅशन
126) satisfaction (सॅटिसफॅक्शन) समाधान
127) sacrifice (सॅक्रिफिस) त्याग
128) confusion (कन्फ्यूजन) गोंधळ
129) compassion (कंपँशन) कणव
130) adventure (अँडवेंचर) साहस
131) stress (स्ट्रेस) ताण
132) sympathy (सिंपथी) सहानुभूती
133) empathy (एंपथी) समानुभूती
134) advantage (अँडवेंटेज) फायदा
135) brilliance (ब्रिलियंस) अलौकिक बुद्धिमता
136) calm (काम) शांतता
137) coldness (कोल्डनिस) गारवा
138)curiosity (क्यूरसिटि) चौकसपणा
139) divorce (डाइवर्स) घटस्फोट
140) education (एड्युकेशन) शिक्षण
141) generation (जनरेशन) पिढी
142) hurt (हर्ट)  इजा
143) liberty (लिबर्टि) स्वातंत्र्य
144) maturity (मॅच्युरिटि) परिपक्वता
145) movement (मुव्हमंट) हालचाल
146) opportunity (आँपोरच्युनिटि) संधी
147) riches (रिचिझ) संपत्ती
148) treachery (ट्रेचरि) दगा
149) betrayal (बिट्रेअल) विश्वासघात
150) decency (डिसेन्सि) शालीनता

151) boldness (बोल्डनिस) धीटपणा
152) cleverness (क्लेवरनिस) हुशारी
153) illness (इलनिस)  आजारपण
154) sickness (सिकनिस)  आजारपण
155) darkness (डार्कनिस)  अंधार
156) blindness (ब्लाइंडनिस)  आंधळेपणा
157) kindness (काइंडनिस) दयाळूपणा
158) alertness (अलर्टनिस) सतर्कता
159) likeness (लाइकनिस) सारखेपणा
160) bitterness (बिटरनिस) कडूपणा
161) foolishness (फुलिशनिस) मूर्खपणा
162) dryness (ड्राइनिस) कोरडेपणा
163) goodness (गुडनिस) चांगुलपणा
164) madness (मॅडनिस) वेडेपणा
165) fullness (फूलनिस) पूर्णपणा
166) gladness (ग्लॅडनिस)  आनंद
167) laziness (लेझिनिस)  आळशीपणा
168) mildness (माइल्डनिस) सौम्यपणा
169) ugliness ( अग्लिनिस) घाणेरडेपणा
170) craziness (क्रेझिनिस) वेडेपणा
171) happiness (हॅपिनिस)  आनंद
172) neatness (नीटनिस) नीटनेटकेपणा
173) politeness (पलाइटनिस) विनम्रता
174) sadness (सॅडनिस) दु:ख
175) eagerness (इगरनिस)  उत्सुकता
176) brightness (ब्राइटनिस) तेजस्वीपणा
177) cleanness (क्लिननिस) स्वच्छता
178) tiredness (टाइर्डनिस) थकवा
179)strictness (स्ट्रिक्टनिस) कडकपणा
180) readiness (रेडिनिस) तयारी

181) fitness (फिटनिस) योग्यता
182) newness (न्यूनिस) नवीनपणा
183) hotness (हाॅटनिस)  उष्णता
184) oneness (ओपननिस) मोकळेपणा
185) shyness (शाइनिस) लाजाळूपणा
186) fewness (फ्यूनिस) अल्पपणा
187) effectiveness (इफेक्टिवनिस) परिणामकारकता
188) slimness (स्लिमनिस) बारकेपणा
189) thickness (थिकनिस) जाडी
190) slowness (स्लोनिस) हळूवारपणा
191) coolness (कूलनिस) शांतपणा
192) calmness (कामनिस) शांतपणा
193) weakness (वीकनिस ) अशक्तपणा
194) fatness (फॅटनिस) जाडेपणा
195)correctness (करेक्टनिस) अचूकपणा
196) swiftness (स्विफ्टनिस) जलदपणा
197) stickiness (स्टिकीनिस) चिकटपणा
198) awareness (अवेरनिस) जाणीव
199) curliness (कर्लिनिस) कुरळेपणा
200) fairness (फेअरनिस) गोरेपणा



======================================

B) पदार्थवाचक नामे : Material Nouns 


1) water (वाटर) पाणी
2) salt (साल्ट ) मीठ
3) paper (पेपर) कागद 
4) wood (वुड) लाकूड
5) steel (स्टील) लोखंड
6) soil (साॅइल) माती
7) milk (मिल्क) दूध
8) gas (गॅस) वायू
9) tea (टी) चहा
10) petrol (पेट्रल) पेट्रोल
11) milk (मिल्क) दूध
12) sugar (शुगर) साखर

13) cotton (काॅटन) कापूस
14) food (फूड)  अन्न
15) oil (आँइल) तेल
16) jute (ज्यूट) ताग
17) rubber (रबर) रबर
18) perfume (परफ्यूम)  अत्तर
19) coffee (काॅफी) काॅफी
20) leather (लेदर ) चामडे
21) silk (सिल्क) रेशीम
22) wine (वाइन) मद्य
23) honey (हनि) मध
24) silver (सिल्वर ) चांदी
25) oxygen (आँक्सिजन)  आँक्सिजन
26) copper (काॅपर) तांबे
27) brick (ब्रीक) वीट
28) iron (आयर्न) लोखंड,लोह
29) rain (रेन) पाऊस
30) cement (सिमेंट) सिमेंट
31) glass (ग्लास)  आरसा, काच
32) grass (ग्रास) गवत
33) coal (कोल) कोळसा
34) rock (राॅक) खडक
35) sand (सँड) वाळू
36) diesel (डिजल) डिझेल
37) rice (राइस) भात
38) diamond (डाइमंड) हिरा
39) kerosene (केरोसिन) केरोसिन ,राॅकेल
40) chalk (चाॅक) खडू
41) corn (काॅर्न) मका
42) chemical (केमिकल ) रसायन
43) jewelry (जेवेलरी) दागदागिने
44) hammer (हँमर) हातोडा
45) felt (फेल्ट) बुरणूस
46) air (एअर ) हवा
47) alcohol (अल्कोहोल) मद्य
48) brass (ब्रास) पितळ
49) acid ( अँसिड) आम्ल
50) alkali (अल्कलि) अल्कधर्मी पदार्थ


=====================================


C)  समुहवाचक नामे : Collective Nouns


1) A crowd of people
2) A class of students
3) A family of blood members
4) A bouquet of flowers
5) A team of players
6) A jury of judges
7) A nation of people
8) A web of spiders
9) A mob of rioters
10) A flock of birds
11) A gang of thieves
12) A panel of experts
13) A fleet of ships
14) A troop of soldiers
15) A bunch of keys
16) A set of tools
17) A swarm of bees
18) A pile of books
19) A herd of deer
20) A group of boys
21) A club of members
22) A bench of judges
23) A board of directors
24) A pack of cards 
25) A  heap of stones
26) A crew of sailors
27) A galaxy of stars
28) A range of mountains
29) A pride of lions
30) A gaggle of geese
31) A choir of singers
32) A society of people
33) A haul of fish
34) A nest of mice
35) A pack of wolves
36) A litter of cubs
37) A stud of horses
38) A zoo of wild animals
39) A colony of gulls
40) A shower of rain
41) A school of whales
42) A pod of birds
43) A library of books
44) A line of kings
45) A hail of bullets
46) A basket of fruits
47) A flight of stairs
48) A bevy of quail
49) A chest of drawers
50) A cloud of dust
51) A series of events
52) A stack of locusts
53) A company of actors
54) A band of musicians
55) An audience of listeners
56) An army of soldiers
57) A host of sparrows
58) A clump of trees
59) A clusters of flowers
60) A code of laws

====================================

Thursday, April 22, 2021

Your आणि Yours .. नक्की फरक काय ?

 मित्रांनो नमस्कार, 
आपण   इंग्रजी वाचताना भरपूर वेळा  विविध प्रकारचे गोंधळ घालणारे शब्द येत असतात. बारकाईने लक्ष ठेवून  नवीन गोष्टी शिकून घेतल्या तर ठीक, नाहीतर... तत.. मम.. करायची पाळी आलीच म्हणून समजा.
आता हेच बघा ना ...इंग्रजीचे  पुस्तक वाचताना कधी कधी एखाद्या पानावर  your शब्द दिसतो आणि लगेच पुढच्या पानावर yours शब्द आढळतो ? कुठे our लिहिलेले असते तर कुठे ours लिहिलेले असते .... कुठे her शब्द दिसतो तर कुठे hers शब्द भेटतो... कुठे it... तर कुठे its........कुठे ठळकपणे  their लिहिलेले आढळते   तर पुढेच.... theirs....असा शब्द दिसतो...
नक्की भानगड काय असावी बरं  ही .....? मला सुरुवातीला वाटायचे हा एकवचन आणि अनेकवचनाचा प्रकार असावा  कारण आपण इंग्रजीतील एकवचनी नामाचे अनेकवचनी नामात रूपांतर  करताना शब्दाला 's' लावतो. your-yours असे ..
तुम्हाला काय वाटतं बरं काय समस्या असावी ही...? चला तर आपण आज हे अशा प्रकारे समजून घेऊया की, तुमच्या भविष्यात कधीच तुम्हाला यांच्यामधील फरक काय आहे हे विसरायचे काम पडणार नाही .....

वरील शब्द दोन प्रकारचे आहेत.  एका प्रकारच्या शब्दांना Possessive Adjectives असे म्हणतात तर दुसर्‍या प्रकारच्या शब्दांना Possessive Pronouns असे म्हणतात .चला आपण अगदी बारकाईने यांची माहिती घेऊया म्हणजे आपल्याला दोन्ही प्रकारच्या शब्दांचा पूर्ण अभ्यास होऊन जाईल .

एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा .....दोन्ही प्रकारच्या शब्दांच्या वापरात खूप खूप ......म्हणजे अगदी खूप  खूप फरक आहे. 
====================================


1) Possesive Adjectives : 


इंग्रजी भाषेत  अशा प्रकारचे आठ शब्द आहेत . खाली बघा..


1) My (माइ)  माझा, माझी, माझे
2) Our (अवर) आमचा, आमची, आमचे
3) Your (योर) तुझा, तुझी, तुझे
4) Your (योर) तुमचा, तुमची, तुमचे
5) His (हिज) त्याचा, त्याची, त्याचे
6) Her (हर) तिचा, तिची, तिचे
7) Its (इट्स) तेचा, तेची, तेचे
8) Their (देअर) त्यांचा, त्यांची, त्यांचे



Possessive adjectives चा वापर हा फक्त  नामाच्या अगोदरच करतात . नामाशिवाय हे शब्द वापरले जातच नाहीत .रिकामी जागा नावापूर्वी असेल तर वरील शब्दच वापरावे लागतात. म्हणजे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की, वरील आठपैकी कोणताही शब्द दिसला की या शब्दांनंतर नाम असतेच ......खालील वाक्ये शांतपणे वाचा म्हणजे सर्व लक्षात येईल ...
उदाहरणे.....
my car.                 my mobile 
our house.          our family 
your bike.            your bedroom 
your factory.       your laptops
his dress.            his chair
her pencil            her bag
its tail                  its food 
their college       their village 


चला आता काही वाक्यें बघूया .....


1) ही माझी कार आहे .
This is my car. 


2) ते आमचे शिक्षक आहेत.
He is our teacher. 


3) ती तुझी  बहीण आहे .
She is your sister. 


4) तुमचे गाव खूप छान आहे .
Your village is so nice. 


5) मला त्याचे घड्याळ आवडले.
I liked his wrist watch. 


6) तिचा मोबाईल खराब झाला आहे .
Her mobile is out of use. 


7) ते तेचे शेपूट होते.
That was its tail. 


8) मी त्यांची अडचण दूर केली.
I solved their problem. 


वरील आठही वाक्यांचे शांतपणे वाचन केले तर आपल्या  सहजपणे लक्षात येते की  my, our, your, your, his, her, its आणि their या शब्दांनंतर नाम लिहावेच लागते .
या शब्दांनंतर जर नाम लिहिले नाही तर वाक्याला अर्थच उरत नाही ...खालील दोन अर्धवट वाक्ये बघा....
You are my.......
Aditya lost his....



====================================


2) Possessive Pronouns :


इंग्रजी भाषेत आठ असे शब्द आहेत .  खालील शब्द वाचा ..


1) Mine (माइन) माझा, माझी, माझे
2) Ours (अवर्स) आमचा,आमची,आमचे
3) Yours (योर्स) तुझा, तुझी, तुझे
4) Yours (योर्स) तुमचा, तुमची, तुमचे
5) His (हिज) त्याचा, त्याची, त्याचे 
6) Hers (हर्स) तिचा, तिची, तिचे 
7) Its (इट्स) तेचा, तेची, तेचे
8) Theirs (देअर्स) त्यांचा, त्यांची, त्यांचे


या शब्दांचा वापर मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीने होतो. या शब्दांच्या नंतर कोणताच शब्द लिहिता येत नाही . हा शब्द म्हणजे वाक्याचा शेवटचा शब्द होय . वरील Possessive pronouns वाक्यात जेथे आले तेथेच ते वाक्य संपले म्हणून समजा.... खालील वाक्ये वाचली की, आपल्याला वरील सर्व स्पष्टीकरण समजून जाईल ......


1) ही माझी कार आहे .
This car is mine.


2) हे आमचे घर आहे.
This house is ours.


3) ती  तुझी गाडी आहे.
That bike is yours.


4)  हे तुमचे गाव आहे.
This village is yours.


5) ही त्याची विहीर आहे.
This well is his.


6)  हा तिचा ड्रेस आहे.
This dress is hers.


7)  ती  त्यांची संपत्ती आहे.
That wealth is theirs.

======================================


आपण एकच वाक्य Possessive Adjectives आणि Possessive pronouns वापरून लिहूया म्हणजे लगेच आपल्या लक्षात फरक येईल.....

1) हा माझा भाऊ आहे.
This is my brother.
This brother is mine.

2) ते आमचे महाविद्यालय आहे.
That is our college.
That college is ours.


3) हा तुझा बंगला होता.
This was your bungalow.
This bungalow was yours.

4) तो  तुमचा कुत्रा होता.
That was your dog.
That dog was yours.


5) ह्या तिच्या वह्या होत्या.
These were her notebooks.
These notebooks were hers.

6)  हे त्यांचे स्वप्न होते.
This was their dream.
This dream was theirs.

======================================


खालील दहापैकी दहा रिकाम्या जागी कोणता शब्द भरावा हे जर आपल्याला समजले तर काम फत्ते झाले म्हणून समजा नाहीतर ही माहिती पुन्हा एकदा वाचा.....


1) This is ........book.  (my/mine)

2) That notebook  was.... (her/hers)


3) .......teacher is very kind. (Our/Ours)


4) Here are ..........pencils. (your/yours)


5) There were .........toys. (their/theirs)


6) These shops will be ........(my/mine)


7) That is......... newspaper.  (her/hers)


8) These cards would  be ......(your/yours)


9) That factory was........(our/ours)


10) This bag was ........(their/theirs)


===================================




in progress... 

Tuesday, April 20, 2021

सर्वनामांचे मुख्य प्रकार, Types of Pronouns

 नमस्कार मित्रांनो, 
आज आपण इंग्रजीतील सर्वनामांची माहिती अगदी सहज आणि सोप्या भाषेत शिकूया . ही माहिती वाचून झाल्यावर तुम्हाला इंग्रजी भाषेतील सर्व प्रकारची सर्वनामे आणि त्यांचे सर्व  प्रकार कोणते आहेत हे  अतिशय सहजपणे लक्षात राहील बरं का ...
सर्वनाम हा शब्द आपण शाळेत असताना कितीतरी वेळा ऐकत असतो . आपण दररोज बोलताना सर्वनामांचा वापरही भरपूर वेळा बिनधास्त पणे करत असतो. आपल्याला गरज आहे ती फक्त त्यांचे प्रकार समजून घेण्याची ...मला  खात्री आहे ही पोस्ट वाचून झाली की , तुम्हाला सर्वनामांबद्दल कसलीही शंका राहणार नाही . चला तर मग सुरू करूया ....
====================================
सुरूवातीला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की, नामाच्या ऐवजी त्या जागेवर जो इतर शब्द वापरला जातो, त्याला सर्वनाम असे म्हणतात ....सर्वनामांचे इंग्रजी भाषेत  नऊ प्रकार आहेत आणि ते इतके सोपे आहेत की, आपण दोन तीन वेळा वाचले की, लगेच लक्षात राहतात....खालील प्रकार बघा....


1) Personal pronouns 
2) Reflexive pronouns 
3) Emphatic pronouns
4) Indefinite pronouns 
5) Demonstrative pronouns
6) Reciprocal pronouns
7) Relative pronouns
8) Distributive pronouns
9) Interrogative pronouns


वरील भलीमोठी नावे असलेले सर्वनामांचे मुख्य प्रकार पाहून कृपया घाबरू नका ...हे खूप सोपे आणि आपण दररोज वापरत असलेलेच शब्द आहेत..आपण आता एक गोष्ट करूया ...एक एक सर्वनामाचा प्रकार बघूया आणि त्यातील सर्वनामे वापरून एक एक वाक्य तयार करूया म्हणजे आपल्याला सर्वनामांची पक्की  ओळख होईल .....
===================================
1) PERSONAL PRONOUNS :


इंग्रजी भाषेत  आठ Personal pronouns आहेेत .  खालील शब्द बघा  . 
1) I (आइ)  मी, मला
2) We (वी)  आम्ही ,आम्हाला 
3) You (यू)  तू, तुला
4) You (यू) तुम्ही, तुम्हाला 
5) He (ही)  तो, त्याला
6) She (शी)  ती, तिला
7) It (  इट)  ते, तेला
8) They (दे) ते, त्या, ती, त्यांना 

वरील सर्वनामापैकी I, You, He, She आणि It हे एकवचनी आहेत तर We, You आणि They हे अनेकवचनी आहेत.
चला आपण नामाऐवजी यांचा वापर कसा होतो ते वाचूया ...
1) मुलांनी  पुष्कळ फळे खाल्ली . 
 Boys ate many fruits. 
2) त्यांनी पुष्कळ फळे खाल्ली.
 They ate many fruits. 
येथे आपण Boys ऐवजी They हे अनेकवचनी सर्वनाम वापरले.
================================
2) He belched after a square meal. 
त्याने पोठभर जेऊन ढेकर दिला.
2) Vijay belched after a square meal. 
विजयने पोटभर जेऊन ढेकर दिला.
================================
3) She requested me to stay at home. 
तिने मला घरी थांबायची विनंती केली .
3) Savita requested me to stay at home. 
सविताने मला घरी थांबायची विनंती केली .
=================================
4) It kept crawling .
ते मंदपणे सरकत राहिले.
4) An earthworm kept crawling. 
गांडूळ मंदपणे सरकत राहिले.

येथे एक गोष्ट लक्षात ठेवा ...I चे अनेकवचन We आहे.
You चे अनेकवचन दुसरे You आहे .
He, She, It चे अनेकवचन They आहे.



====================================

2) REFLEXIVE PRONOUNS : आत्मवाचक सर्वनामे


खालील आठ शब्दांचे अर्थ बघा .....यांना Reflexive pronouns असे म्हणतात .


1) Myself (माइसेल्फ)  मी स्वतः ला
2) Ourselves (अवरसेल्वस)  आम्ही स्वतःला
3) Yourself (योरसेल्फ)  तू स्वतःला
4) Yourselves (योरसेल्वस)  तुम्ही स्वतःला
5) Himself (हिमसेल्फ)  त्याने स्वतः ला
6) Herself (हरसेल्फ)  तिने स्वतः ला
7) Itself (इटसेल्फ)  ते स्वतः ला
8) Themselves (देमसेल्वस)  त्यांनी स्वतः ला



दोन उपयोगी गोष्टी बघा बरं आता ....


1) 🤓 self म्हणजे स्वतः एकटा  आणि  selves म्हणजे त्याचे अनेकवचन (जास्त जण स्वत:)
2) घटकाचे नाव पुन्हा वाचा.. ..Reflexive pronouns. 'Reflex' म्हणजे  प्रतिमा . आपण आरशात पाहिले की स्वत: आपणच दिसतो. Reflexive pronouns म्हणजे वाक्यांतील कर्त्याने स्वत:वरच केलेली क्रिया सांगणारे शब्द आहेत .
आता खालील मराठी आणि इंग्रजी वाक्ये वाचा.


1) I will kill myself. 
👉मी मला स्वतःला ठार मारील.


2) We saved ourselves. 
👉 आम्हीच आम्हाला स्वत:ला वाचवले.


3) Shital burnt herself. 
👉 शीतलने तिला स्वत: ला जाळले.


4) He protected himself from enemies. 
👉 त्याने त्याला स्वतःला शत्रू पासून सुरक्षित ठेवले.


5) You hit yourself. 
👉 तू तुला स्वत:ला मारले.


6) You should keep yourselves away from illness. 
👉 तुम्ही तुम्हाला स्वत:ला आजारापासून दूर ठेवले पाहिजे .


7) They hurt themselves. 
👉 त्यांनी त्यांना स्वतःला दुखापत केली.


8) It laughed itself. 
👉 ते (बाळ वैगेरे)  स्वत:च हसले.


वरील वाक्यांचे शांतपणे  निरीक्षण केल्यावर आपल्या सहज लक्षात येते की, वरील प्रत्येक वाक्यामध्ये कर्त्याने स्वत:वरच क्रिया केली आहे . ज्यावेळी वाक्यात कर्त्याने स्वत:बद्दलच क्रिया केलेली असते त्यावेळी reflexive pronouns वापरावे लागतात.
'मी स्वतः ला ठार करीन.'   या अर्थाची खालील दोन वाक्ये पहा ........
1) I will kill me. ( चूक) 
2) I will kill myself. (बरोबर) 
😈😈😈😈👉 Reflexive pronoun आहे म्हणजे क्रिया स्वत : कर्त्यावरच घडलेली आहे .
खालील वाक्यांचा अर्थ कसा बदलतो ते बघा ....
1) Ramesh helped him.
👉 रमेशने त्याला मदत केली . या वाक्यात रमेशने दुसर्‍या कोणत्यातरी  मुलाला मदत केली .
2) Ramesh helped himself. 
👉 रमेशने त्याला स्वतःलाच मदत केली .
अजून दोन वाक्ये पहा ...........
1) Savita blamed her. 
👉 सविताने तिला दोष दिला . या वाक्यात सविताने इतर मुलीला दोष दिला आहे .
2) Savita blamed herself. 
👉 सविताने तिला स्वत:ला दोष दिला.
-----------------------------------------------------------------------------
वरील शब्द myself, ourselves, yourself, yourselves, himself, herself, itself आणि themselves हे वाक्यातील क्रियापदांनंतर लिहावे लागतात . वाक्यांतील कर्त्याने केलेली क्रिया त्याच्या स्वतःवरच घडली हे दाखवण्यासाठी वरील आठ शब्दांचा उपयोग होतो . म्हणूनच यांना  reflexive pronouns म्हणजे स्वतःची प्रतिमा किंवा स्वत:चा आरसा दाखवणारे शब्द म्हणतात



==============================

3) EMPHATIC PRONOUNS :


खालील आठ शब्दांचे अर्थ बघा .....यांना Emphatic pronouns  असे म्हणतात . तुम्हाला या ठिकाणी थोडा गोंधळ झाला आहे असे वाटू शकते कारण हे शब्द तुम्ही पुन्हा वाचत आहात पण मित्रांनो Reflexive pronouns आणि Emphatic pronouns हे एकच शब्द आहेत पण यांचा वाक्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या उद्देशाने वापर होतो . तुम्हाला हे थोड्या वेळाने लक्षात येईलच.....


1) myself (माइसेल्फ)  मी स्वतः ला
2) ourselves (अवरसेल्वस)  आम्ही स्वतःला
3) yourself (योरसेल्फ)  तू स्वतःला
4) yourselves (योरसेल्वस)  तुम्ही स्वतःला
5) himself (हिमसेल्फ)  त्याने स्वतः ला
6) herself (हरसेल्फ)  तिने स्वतः ला
7) itself (इटसेल्फ)  ते स्वतः ला
8) themselves (देमसेल्वस)  त्यांनी स्वतः ला


 वरील आठ शब्द जेव्हा वाक्याच्या  सुरूवातीलाच नाम किंवा सर्वनामानंतर येतात तेव्हा त्यांना Emphatic pronouns म्हणतात . खालील वाक्ये बघा ...

1) I myself cooked dinner. 
2) We ourselves cleaned our room. 
3) You yourself burnt your fingers. 
4) You yourselves invited failures. 
5) He himself lost money. 
6) She herself gathered people. 
7) It itself scaled. 
8) They themselves left positions of power .

===============================
4) INDEFINITE PRONOUNS :

खालील अनिश्चित सर्वनामे आणि त्यांचे मराठीतील अर्थ  बघा...

1) Someone      (समवन)      कोणीतरी 
2) Somebody     (समबडी)   कोणी एक 
3) Something    (समथिंग)   काहीतरी 
4) Everyone      (एवरीवन)   प्रत्येकजण
5) Everybody    (एवरीबडी)  प्रत्येकजण
6) Everything   (एवरीथिंग)  सर्व काही 
7) Anyone         (एनीवन)      कोणीही 
8) Anybody       (एनीबडी)    कोणीही
9) Anything      (एनीथिंग)     काहीही
10) None           (नन)       काहीही नाही 
11) Nobody      (नोबडी)   कोणीही नाही
12) Nothing     (नथिंग)     काही नाही 
13) One          (वन)       एकजण
14) Few          (फीव)     थोडे 
15) Many       (मेनी)      पुष्कळ ,अनेक 
16) All            (आँल)      सर्व 
17) Some       (सम)       काही 
18) Others     (आँदर्स)    इतर
19) Same        (सेईम)     एकसारखे
20) Both         (बोथ)      दोघे
21) Any           (एनी)      काही 
22) Other        (आदर)    इतर 




खालील वाक्ये वाचा म्हणजे अनिश्चित सर्वनामे (Indefinite Pronouns)  सहजपणे लक्षात रहायला मदत होईल .......


1) कोणीतरी येऊन मला काल निमंत्रण दिले .
👉 Someone came and invited me yesterday. 


2)  कोणी एकजण येईल आणि मला मदत करील.
👉 Somebody will come and bolster me. 


3) काहीतरी चुकलय म्हणूनच त्याने माझी निंदा केली .
👉 Something went wrong that's why he slandered me. 


4) प्रत्येकजण पैसा आणि प्रसिद्धी यांच्या मागे  लागलाय .
👉Everyone is running after name and fame. 


5) प्रत्येकजणाला या कार्यक्रमात नाचायचे आणि गायचे आहे .
👉 Everybody has to dance and sing in this function. 


6) सर्व काही ठीक होईल . तू निश्चिंत रहा माझ्या मित्रा.
👉 Everything will be okay.  Be carefree my friend. 


7)  कोणीही या देशाचे नागरिकत्व  प्राप्त करू शकतो .
👉 Anyone can obtain citizenship of this country. 


8) कोणाकडे कुपोषणाविरूद्ध लढायची शक्ती आहे का ?
Does anybody have that willingness to fight against malnutrition? 


9) आपण जीवनात काहीही प्राप्त करू शकतो.
👉Anything can be achieved in life


10)  कोणीही मला सुखदु:खात मदत केली नव्हती 
👉None had helped me during my tough time. 


11) कोणाही तुझे भाषण ऐकण्यासाठी इच्छुक नाही .
👉Nobody is interested in your lecture. 


12) आज दिवसभर काहीही महत्त्वाचे घडू शकले नाही .
👉 Nothing important could happen today. 


13) व्यक्तीने स्वत:चा मोठेपणा सांगू नये.
👉One should not blow one's trumpet. 


14) थोडेजण सुखरूप परतले आहेत.
👉 Few have returned unhurt.


15) अनेकजण फक्त कामापुरते मित्र असतात.
👉 Many are only fair weather friends.


16) सर्वजण तटस्थपणे राहतात जेव्हा खरी गरज असते .
👉 All sit on the fence when they  are really needed. 


17) काहीजणांनी गोष्ट मान्य केली परंतु आदित्यने विरोध केला

 👉 Some jumped together but Aditya raised his voice. 


18) इतरांनी मला नकार दिला परंतु तुम्ही मला काम दिले.
👉 Others turned me down but finally you employed me.  


19) सारखे एकत्र येतात हा माझा अनुभव आहे .
👉Same join their hands and come together.  


20) दोघेही एकसारखे आहेत .
👉Both are identical. 


21) मी त्यांच्यापैकी काहीजणांना स्पष्टपणे पाहू शकलो नाही .
👉I couldn't see any of them clearly. 


22) एखादा किंवा इतर येथे येऊन जाऊ शकतो .
👉One or other can come here and go back. 

==============================


5) DEMONSTRATIVE PRONOUNS :

इंग्रजी भाषेत सहा Demonstrative pronouns आहेत . हे शब्द व्यक्ती आणि वस्तू यांचा निर्देश करण्यासाठी वापरतात . खालील सहा शब्द बघा...

1) This (दिस) हा, ही, हे
2) That (दॅट) तो, ती, ते
3) These (दिज) हे, ह्या, ही
4) Those (दोज) ते, त्या, ती
5) Such (सच) असे, असा, अशी
6) Yonder (याँडर) पलीकडे 

यांचा उपयोग कसा केला जातो बघूया ...

1)This - जवळची एक वस्तू दाखवण्यासाठी This वापरतात.
2)That - दूरची एक वस्तू दाखवण्यासाठी That वापरतात.
3) These - जवळच्या अनेक वस्तू दाखवण्यासाठी These वापरतात.
4) Those - दूरच्या अनेक वस्तू दाखवण्यासाठी Those वापरतात.
5) Such - वस्तूची स्थिती किंवा अवस्था दाखवण्यासाठी वापरतात.
6) Yonder - पलीकडे 


1) हे माझे घर आहे .
This is my house. 

2) ते माझे शेत आहे .
That is my farm. 

3) ह्या माझ्या बहिणी आहेत.
These are my sisters. 

4) ते माझे मित्र आहेत.
Those are my friends. 

5) माझे गाव पलीकडे आहे .
Yonder is my village. 

6) माझी अशी परिस्थिती आहे .
Such is my condition. 



===============================
6) RECIPROCAL PRONOUNS:

जी सर्वनामे परस्पर संबंध दाखवण्यासाठी वापरली जातात त्यांना Reciprocal pronouns म्हणतात . या प्रकारची दोन सर्वनामे आहेत.

1) Each other (इच आँदर)  एकमेकांना 

2) One another (वन अनादर) एकमेकांना 


लक्षात ठेवा : 
1) दोन व्यक्ती किंवा वस्तू यांच्यातील संबंध सांगताना each other वापरावे.
2) दोन पेक्षा जास्त व्यक्तीं किंवा वस्तू यांचा संबंध दाखवण्यासाठी one another वापरावे.

खालील वाक्ये शांतपणे वाचा ....

1) Rajesh and Aditya respected each other. 
2) Violent people killed one another. 


================================

7) RELATIVE PRONOUNS :

दोन वाक्ये जोडण्यासाठी Relative pronouns वापरले जातात . पहिल्या वाक्यातील नामासाठी दुसर्‍या वाक्याच्या सुरूवातीला हे सर्वनाम वापरतात.

1) who (हू) जो, जी, जे
2)whom (हूम) ज्याला, जिला
3)whose (हूज) ज्याचे, जिचे, ज्याचा
4)which (विच) जे
5)that (दॅट) जे, जी, जो
6)what (व्हाट) की जे
7) but (बट)  ज्याला, जिला


चला आपण तयार वाक्ये वाचूया ....

1) Who - जो
1) Aditya is a boy who is always busy.
आदित्य असा मुलगा आहे जो नेहमी व्यस्त असतो. 

2) Whom - जिला
2) She is Shital, whom I often provide food. 
ती शीतल आहे, जिला मी नेहमी अन्न पुरवतो.

3) Whose - ज्याचे
3)  That is my friend, whose name is Aditya. 
तो माझा मित्र आहे ज्याचे नाव आदित्य आहे .


4) Which - जे
4) This is the book, which is very crucial for UPSC. 
हे ते पुस्तक आहे ,जे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी निर्णायक आहे .

5) That - जे
5) This is the farm, that I bought last week. 
हे ते शेत आहे, जे मी मागच्या आठवड्यात खरेदी केले.


6) What - जे
6) I couldn't understand, what he said. 
त्याने जे सांगितले ते मी समजू शकलो नाही .


================================
8) DISTRIBUTIVE PRONOUNS :

या सर्वनामांचा उपयोग अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करण्यासाठी केला जातो .

1) Each (इच) प्रत्येक 
2) Either (इदर) दोन्हीपैकी एक 
3) Neither (नीदर) दोन्हीपैकी एकही नाही 

यांचा उपयोग करून वाक्य कसे तयार करावेत ते पाहूया चला....
 1) त्यांच्यापैकी प्रत्येकजण वेगाने पळतो.
Each of them runs fast. 

2) तुमच्या दोघांपैकी एकाला बक्षीस मिळाले.
Either of you got that prize. 

3) त्यांच्या दोघांनाही बक्षीस भेटू शकले नाही .
Neither of them could get the prize. 



===============================

9) INTERROGATIVE PRONOUNS:

 या सर्वनामांचा उपयोग  वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्यामुळे या सर्वनामांना Interrogative pronouns म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात . खालील शब्द आणि त्यांचा वापर कसा केला आहे ते बघूया....

1) who (हू) कोण 
2) whom (हूम) कोणाला 
3) what (व्हाट) काय 
4) which (विच) कोणता, कोणती, कोणते
5) whose (हूज) कोणाचा, कोणाची, कोणाचे

चला उपयोग शिकुया....

1) तुझे वर्गशिक्षक कोण आहेत ?
Who is your class teacher? 

2) ही कोणाची संपत्ती आहे ?
Whose is this property? 

3)  शाहरूखचा अलिकडील सिनेमा कोणता?
Which is  the latest movieof Shahrukh?

4) तू काय खात आहेस ?
What are you eating? 

5) तू कोणाला मदत केली ?
Whom did you help? 

=================================


Learn to Speak English

Let me play. मला खेळू दे Let me go मला जाऊ दे. Let me eat. मला खाऊ दे. Let me study. मला अभ्यास करू दे. Let me drink milk. मला दूध पिऊ दे. L...