नमस्कार मित्रांनो,
आज आपण पूर्ण अपूर्ण भविष्यकाळाविषयी महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. या पोस्टमध्ये आपण पूर्ण अपूर्ण भविष्यकाळाची इंग्रजी भाषेतील वाक्ये कशा पद्धतीने बोलतात आणि या काळातील वाक्यरचना कशी असते याबद्दल पूर्ण माहिती घेऊया. त्यासाठी आपणाला या काळातील मी लिहिलेली चारही प्रकारची वाक्ये वाचावी लागतील म्हणजे या काळाची वाक्यरचना तुमच्या लगेच लक्षात बसून हा काळ समजून जाईल.
पूर्ण अपूर्ण भविष्यकाळाचा उपयोग हा भविष्यकाळात आपण एखादे काम सुरू केल्यानंतर ते भरपूर दिवस चालू ठेवणार आहोत हे सांगण्यासाठी केला जातो. खालील एक वाक्य आणि त्याचे स्पष्टीकरण वाचल्यानंतर तुम्हाला हे लगेच समजून जाईल.
'मी व्यायाम करत आलेलो असेल.'
वरील वाक्याचा असा अर्थ होतो की, मी भविष्यात व्यायाम करायला सुरूवात करणार आहे . आणि ही व्यायामाची सवय किंवा कृती मी बरेच दिवस पुढे नियमीतपणे चालू ठेवणार आहे.
म्हणजेच भविष्यातील सवयी सांगण्यासाठी पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ वापरला जातो . आता खालील मराठीतील पाच वाक्ये वाचा आणि त्यानंतर वाक्यरचना वाचा आणि मग सरावाची वाक्ये वाचा आणि बघा चमत्कार .....तुम्ही या काळाचे तज्ञ झालेले असाल....
1) मी क्रिकेट खेळत आलेलो असेल.
2) तो भरपूर पैसे कमावत आलेला असेल.
3) ती घराची स्वच्छता करत आलेली असेल.
4) जून ते सप्टेंबर पर्यंत पाऊस पडत आलेला असेल.
5) नागरीक लस घेत आलेले असतील.
वरील वाक्यांचा अर्थ असा होतो की, ही कामे भविष्यात सुरू होतील आणि बराच काळ चालू राहतील. आता इंग्रजी वाक्यरचना बघा...
1) I shall have been playing....
2) We shall have been playing....
3) You will have been playing....
4) You will have been playing...
5) He will have been playing.....
6) She will have been playing....
7) It will have been playing.....
8) They will have been playing.....
================================≠====
No comments:
Post a Comment