नमस्कार मित्रांनो,
आज आपण पूर्ण अपूर्ण भूतकाळ म्हणजे Past Perfect Continuous Tense बद्दल माहिती घेणार आहोत . या काळाचा उपयोग करता येणे म्हणजे इंग्रजी भाषेत खूप खूप हुशार असल्याचे लक्षण आहे . या काळातील वाक्ये सरावाने सहज लक्षात राहतात. आजकाल आपण पाहतो की आजूबाजूला भरपूर लोक छोटी मोठी इंग्रजी वाक्ये बोलताना दिसतात पण इंग्रजीत परिपूर्ण होण्यासाठी आपल्याला सर्व बारा प्रकारचे काळ आणि सहाय्यकारी क्रियापदे यांचा वापर करून तयार होणारी वाक्यें बोलता आली पाहिजे बरं का ....म्हणून मी माझ्या या ब्लॉगमध्ये सर्व काळ आणि सहाय्यकारी क्रियापदे वापरून तयार होणारी वाक्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे....
चला तर मग आपण सुरू करूया ...
खालील मराठीतील वाक्ये शांतपणे वाचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा....
1) मी क्रिकेट खेळत आलेलो होतो .
2) सुनील दररोज पाच तास अभ्यास करत आलेला होता .
3) शितल मला वारंवार सल्ला देत आलेली होती .
4) आदित्य खूप व्यायाम करत आलेला होता .
5) भारत सामने हरत आलेला होता .
वरील सर्व वाक्यांचे निरीक्षण केले तर एक आणि फक्त एकच गोष्ट स्पष्ट होते मित्रांनो...! वरील सर्व वाक्ये एकच गोष्ट स्पष्ट करतात की, मी, सुनील, शीतल, आदित्य आणि भारत यांनी खूप दिवसापूर्वी एक काम सुरू केले . ते भरपूर दिवस चालू राहिले आणि शेवटी ते संपले. म्हणजे भरपूर मागच्या काळात सुरू झालेले आणि खूप दिवस सुरू राहून शेवटी संपलेले काम किंवा क्रिया सांगण्यासाठी पूर्ण अपूर्ण भूतकाळाची वाक्यरचना वापरतात.
चला सर्व गोष्टी पूर्णपणे समजून घेण्यासाठी आपण इंग्रजीतील एक क्रियापद घेऊया आणि त्याच्या मदतीने वाक्यरचना तयार करून पाहूया म्हणजे आपल्या मनात कसलीही शंका राहणार नाही ....
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
1) साधी वाक्ये ....
1) मी वाचत आलेलो होतो.......... I had been reading......
2)आम्ही वाचत आलेलो होतो ......We had been reading...
3) तू वाचत आलेला होता............You had been reading......
4)तुम्ही वाचत आलेले होते.........You had been reading......
5) तो वाचत आलेलो होता...........He had been reading......
6) ती वाचत आलेली होती ..........She had been reading......
7) ते वाचत आलेले होते ............ It had been reading.......
8) ते (एकापेक्षा जास्त जण) वाचत आलेले होते ....They had been reading......
वरील वाक्यें वाचून आपल्या लक्षात आले आहे की, मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते आणि त्यांनी खूप दिवसापूर्वी काहीतरी वाचायला सुरुवात केली आणि हे वाचायचे काम बराच काळ सुरू राहिले आणि नंतर मात्र ते संपले ...त्याची माहिती मी तुम्हाला आता म्हणजे खूप दिवसांनी सांगत आहे ..
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
📺 चला आपण पूर्ण अपूर्ण भूतकाळाची वाक्ये पाहुया म्हणजे आपल्याला या काळाची चांगली ओळख होईल .
1) मी गोष्टींची पुस्तके वाचत आलेलो होतो .
I had been reading story books.
2) आम्ही गोष्टींची पुस्तके वाचत आलेलो होतो .
We had been reading story books.
3) तू गोष्टींची पुस्तके वाचत आलेला होता.
You had been reading story books.
4) तुम्ही गोष्टींची पुस्तके वाचत आलेले होते .
You had been reading story books.
5) तो गोष्टींची पुस्तके वाचत आलेला होता.
He had been reading story books.
6)ती गोष्टींची पुस्तके वाचत आलेली होती.
She had been reading story books.
7) ते गोष्टींची पुस्तके वाचत आलेले होते .
It had been reading story books.
8) ते ( एकापेक्षा जास्त जण) गोष्टींची पुस्तके वाचत आलेले होते .
They had been reading story books.
वरील सर्व वाक्यांचे वाचन केले की आपल्या सहजच लक्षात येते की, पूर्ण अपूर्ण भूतकाळात इंग्रजी वाक्ये बोलताना प्रत्येक वाक्यात had been हे दोन शब्द ठरलेलेच असतात....
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
इतर क्रियापदे वापरून तयार केलेली वाक्ये वाचूया ....
1) ती अनाथ मुलांना मदत करत आलेली होती .
She had been helping orphans.
2) मी गरीबांना आधार देत आलेलो होतो .
I had been supporting the poor.
3) आम्ही नियमित सायकली वापरत आलेलो होतो .
We had been using cycles regularly.
4) तो पैशांची उधळपट्टी करत आलेला होता .
He had been misspending money.
5) ते काटकसर करत आलेले होते .
They had been practising frugality.
6) तू वारंवार नियम मोडत आलेला होता .
You had been violating rules unendingly.
7) तुम्ही मला खोटे वचन देत आलेले होते .
You had been promising me a moon.
8) ते हलगर्जीपणा करत आलेले होते .
It had been cutting the corners.
बघा प्रत्येक वाक्यात had been हे दोन शब्द वापरावे लागतातच.....म्हणजे हे दोन शब्द पूर्ण अपूर्ण भूतकाळाची निशाणी आहेत म्हणा हवं तर ......
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
🍎 He ऐवजी मुलांची नावे येतात.
1) तो वर्षानुवर्षे जुनी कार वापरत आलेला होता .
He had been using an old car for years.
आदित्य वर्षानुवर्षे जुनी कार वापरत आलेला होता .
Aditya had been using an old car for years.
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
🍎 She ऐवजी मुलींची नावे वापरू शकतो ......
1) ती माझ्या सोबत भांडत आलेली होती .
She had been quarreling with me.
सविता माझ्या सोबत भांडत आलेली होती .
Savita had been quarreling with me.
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
🍎 They ऐवजी अनेकवचनी नामांचा वापर करावा ...
1) ते कादंबर्या वाचत आलेले होते .
They had been reading novels.
विद्यार्थी कादंबर्या वाचत आलेले होते .
Students had been reading novels.
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
चला आपण आता पूर्ण अपूर्ण भूतकाळात प्रश्न कशा प्रकारे विचारतात ते पाहूया म्हणजे आपला पुन्हा एकदा सराव होईल ..
2) प्रश्नार्थक वाक्ये
1)मी वाचत आलेलो होतो का..........? Had I been reading...... ?
2)आम्ही वाचत आलेलो होतो का ......? Had we been reading......?
3) तू वाचत आलेला होता का ...........? Had you been reading...... ?
4)तुम्ही वाचत आलेले होते का.........? Had you been reading......?
5) तो वाचत आलेलो होता का ...........? Had he been reading...... ?
6) ती वाचत आलेली होती का ..........? Had she been reading...... ?
7) ते वाचत आलेले होते का ............? Had it been reading.......?
8) ते (एकापेक्षा जास्त जण) वाचत आलेले होते का ....? Had they been reading...... .?
काही वाक्ये वाचूया आणि प्रश्नांचा सराव करूया .....
1) तू टेनिस खेळत आलेला होता का?
Had you been playing tennis?
2) ती संगीत शिकत आलेली होती का?
Had she been learning music?
3) शिवा शेतीमध्ये कष्ट करत आलेला होता का?
Had Shiva been toiling in his farms?
4) अंकिता वर्गात पहिला क्रमांक मिळवत आलेली होती का ?
Had Ankita been standing first in her class?
5) तो नदीत पोहत आलेला होता का?
Had he been swimming in the river?
6) नेहा पैसे दान करत आली होती का ?
Had Neha been donating money consistently?
7) भारत विश्वकरंडक स्पर्धेत सामने जिंकत आलेला होता का?
Had India been winning matches in the World Cup?
8) तो माझी काळजी घेत आलेला होता का?
Had he been caring for me?
आपण वरील प्रश्नांमध्ये सुद्धा पाहिले आहे की, had been शिवाय एकही वाक्य नाही म्हणून लक्षात ठेवा पूर्ण अपूर्ण भूतकाळात had been हे दोन शब्द प्रत्येक वाक्यात येतातच...
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
3) नकारात्मक वाक्ये :
नकारात्मक वाक्यांमध्ये सुद्धा had been हे शब्द दिसून येतातच फक्त येथे यांच्या सोबत not हा शब्द दिसून येतो . चला तर मग खालील वाक्यरचना बघा आणि लक्षात ठेवा अशा वाक्यात had been सोबत not हा शब्द कोठे वापरला जातो ....
1) मी वाचत आलेलो नव्हतो.......... I had not been reading......
2)आम्ही वाचत आलेलो नव्हतो ......We had not been reading...
3) तू वाचत आलेला नव्हता............You had not been reading......
4) तुम्ही वाचत आलेले नव्हते.........You had not been reading......
5) तो वाचत आलेलो नव्हता...........He had not been reading......
6) ती वाचत आलेली नव्हती ..........She had not been reading......
7) ते वाचत आलेले नव्हते ............ It had not been reading.......
8) ते (एकापेक्षा जास्त जण) वाचत आलेले नव्हते..........They had not been reading.........
खालील वाक्ये शांतपणे वाचा आणि वाक्यरचना लक्षात ठेवायचा प्रयत्न सुरू ठेवा......
1) मी तब्येतीसाठी वेळ देत आलेलो नव्हतो .
I had not been giving time for my health.
2) ती सभ्यतेने वागत आलेली नव्हती .
She had not been practising decency.
3) माझा मुलगा अध्यात्मात रूची दाखवत आलेला नव्हता .
My son had not been showing interest in metaphysics.
4) तू माझ्या अटी मान्य करत आलेला नव्हता .
You had not been accepting my conditions.
5) रूग्ण उपचाराला प्रतिसाद देत आलेला नव्हता .
The patient had not been responding to treatment.
6) मी तुझ्यासोबत माझ्या इच्छेने राहत आलेलो नव्हता .
I had not been living with you willingly.
7) तो चुकांपासून शिकत आलेला नव्हता .
He had not been learning from his blunders.
8) मी झपाट्याने प्रगती करत आलेलो नव्हतो .
I had not been progressing by leaps and bounds.
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
4) नकारात्मक प्रश्नार्थक वाक्ये :
खालील प्रकारची वाक्ये आणि वाक्यरचना बघा आणि लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला इंग्रजी बोलताना कसलीही अडचण येणार नाही .....
1)मी वाचत आलेलो नव्हतो का..........? Had I not been reading........ ?
2) आम्ही वाचत आलेलो नव्हतो का ......? Had we not been reading.....?
3) तू वाचत आलेला नव्हता का...........? Had you not been reading......?
4) तुम्ही वाचत आलेले नव्हते का .........? Had you not been reading.....?
5) तो वाचत आलेला नव्हता का...........? Had he not been reading......?
6) ती वाचत आलेली नव्हती का ..........? Had she not been reading...... ?
7) ते वाचत आलेले नव्हते का ............ ? Had it not been reading.......?
8) ते (एकापेक्षा जास्त जण) वाचत आलेले नव्हते का...........? Had they not been reading.........?
1) तू वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करत आलेला नव्हता का ?
Had you not been trying to control your weight?
2) ती तुझ्यासोबतचा वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करत आलेली नव्हती का ?
Had she not been trying to burry arguments with you?
3) तुम्ही मला धमकी देत आलेले नव्हते का ?
Had you not been blackmailing me?
4) अनिल लोकांना त्याच्या भल्यासाठी वापरत आलेला नव्हता का ?
Had Anil not been using people for his personal benefits?
5) आदित्य फुगीरपणाने वागत आलेला नव्हता का ?
Had Aditya not been flaunting ?
6) तो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आलेला नव्हता का ?
Had he not been firing his employees?
7) सविता माझ्याशी दयेने वागत आलेली नव्हती का ?
Had Savita not been showing kindness for me?
8) मी तुला वेळोवेळी सल्ला देत आलेलो नव्हतो का ?
Had I not been advising you time to time?
वरील प्रकारची वाक्ये सरावासाठी गरजेची आहेत.....
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
No comments:
Post a Comment