Monday, April 5, 2021

दररोज उपयोगी 100 इंग्रजी वाक्ये,Daily used 100 English sentences!

 

 विद्यार्थी मित्रांनो, 
आपण आज इंग्रजी भाषेतील अशी वाक्ये पाहणार आहोत जी तुम्हाला अचानक  बोलायची वेळ येते पण ती इंग्रजीत नक्की कशी म्हणावीत हे समजत नाही . ही दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील अशी महत्त्वाची वाक्ये आहेत. यांना वाचल्यानंतर पक्के लक्षात ठेवा कारण काम कधीही पडू शकते बरं......आणि हो कधीही, कुठेही चालता फिरता जर इंग्रजी भाषेतील नवीन प्रकारचे वाक्य शिकायला भेटले तर ते लगेच एका वहीत लिहून ठेवायचे आणि काम पडले की बिनधास्त इंग्रजी भाषेत बोलायचे .... कशी आहे आयडिया !

एक गोष्ट लक्षात ठेवा कोणीही एका रात्रीत फाडफाड इंग्रजी बोलू शकत नाही . नेहमीचा सराव खूप आवश्यक आहे . त्यामुळे नेहमी इंग्रजी ऐका, बोला, वाचा, लिहा.... 


-----------------------------------------------------------------------------
1)  तुझा  बाप पैशाच्या मागे लागलाय.
Your father is after money. 


2) माझ्या जवळ एक खडकू पण नाही .
 I am quite penniless. 


3)  तू मला बिनकामी अडचणीत टाकू नको बरं.
 Don't drive me into the corner. 


4) तिला जीवनाचा कंटाळा आलाय .
 She is sick of her life. 


5) ती तुझी कोण आहे ?
 What is she to you? 


6) मी त्यांच्या तोंडावर सांगितले हे.
 I said this to his face. 


7) तुझ्यासारखा वेडा शोधून सापडणार नाही .
 You are fool of the first water.

 
8) माझी आई उपवास सोडत आहे .
 My mother is breaking her fast. 


9) पेट्रोलचा भाव खूप वाढला ना.
Petrol is looking up. 


10) तो खूप अडेलतट्टू आहे , कोणाचेही ऐकत नाही .
 He is a very tough customer.

 
11) मी तुला कधीच माफ करू शकत नाही .

I can not spare you. 


12) मला कसंतरी वाटतय

 My heart is sinking.

 
13) माझ्या भावाने खास पार्टी दिली .

 My brother threw a wonderful party. 


14) तुला हे काम लई सोपे वाटले का.....
 It is not a  picnic..... 


15) तुला बरी अद्दल घडली .
 It served you right. 


16) वासरात लंगडी गाय शहाणी .
 In the country of the blind, theone eyed man is king. 


17) मला भयानक स्वप्न पडले .
I had a horrible dream. 


18) विद्यार्थ्यानी परीक्षा दिली.
Students took an exam. 


19) शिक्षकांनी परीक्षा घेतली .
 Teachers gave the exam. 


20) माझी काहीच चूक नाही हो.
 I am not at fault. 


21) तोंड सांभाळून बोल .
 Mind your language. 


22) नीट बोल.
 Hold your tongue. 


23) तुझ्या मनावर आहे .
It is up to you. 


24) तुझे तू पहा ना.
Mind your own business. 


25)  नवीन घराची वास्तूशांती कधी आहे?
 When is house warming party?

 
26) वृद्ध माणसे वृद्धाश्रमात पाठवली जातात.
 The old are sent to an old age home. 


27) काय चाललंय ?
 What's up? 


28) माझा मुलगा खूप चतुर आहे .
 My son is quick of wit. 


29) मी नशीबावर रडत आहे .
 I am bewailing my ill fate. 


30) माझे तर होशच उडाले .
 I am at my wit's end. 


31) आमच्या विहिरीचे पाणी आटलेले आहे.
 Our well has run dry.


32)माझे बाबा म्हशीचे दूध काढत आहेत.
My father is milking our buffalo. 


33) जास्त शहाणपणा दाखवू नको.
 Don't be over smart. 


34) माझे मामा हाँस्टेल चालवतात .
 My uncle runs a hostel. 


35) दिवाळी नोव्हेंबर महिन्यात येते .
 Diwali falls in the month of November. 

36) निघ येथून.
Get lost. 

37) किती वाजले?
What is the time, please? 

38) चल खेळायला जाऊ
Let's go to play. 

39) मला जाऊ दे आता.
Let me go now. 

40)  तू कोठे आहे ?
Where are you? 


41) तू काय करत आहे ?
What are you doing? 


42) तो कोठे आहे ?
Where is he? 


43) थोड्या वेळापूर्वी पाऊस पडला .
It rained before some time. 


44) इकडे ये.
Come here. 


45) माझ्या शेजारी बस .
Sit by me. 


46) थोड्याच वेळात रेल्वे येईल.
Train will arrive shortly. 


47) तुझे वय किती आहे ?
How old are you? 


48) ती माझी मानलेली बहीण आहे .
She is my putative sister. 


49) ती माझी सख्खी बहीण आहे .
She is my full sister. 


50) ती माझी सावत्र बहीण आहे .
She is my step sister. 


51) मला मदत करशील का ?
Could you help me, please? 


52) तो उद्धट आहे .
He is arrogant and mannerless.

 
53) सूर्य उगवत आहे .
The sun is rising. 


54) सूर्य मावळत आहे .
The sun is setting. 


55) तो रेल्वेने आला.
He came by a train. 


56) काय झालंय तुला ?
What's wrong with you? 


57) तो अभ्यासात मागे पडत आहे .
He is slipping behind in studies. 


58) मला पाचशे रूपये उसने दे.
Lend me five hundred rupees. 


59) मी पाचशे रुपये असने घेतले .
I borrowed five hundred rupees. 


60) टाळी द्या.
High five friends. 


61) सोन्याचा भाव खूप वाढत आहे .
Gold prices are touching the sky. 


62)  तुझ्याजवळ किती रूपये आहेत?
How many rupees do you have? 


63)  माझ्या घरासमोर एक विहीर आहे .
There is a well in front of my house. 


64) तुझे घर किती दूर आहे ?
How far is your house? 


65) ते माझे आहे.
It is mine. 


66) हे तुझे आहे .
This is yours. 


67) तू रोज किती वेळ खेळतो?
How long do you play everyday? 


68) तो टी वी पाहत आहे .
He is watching television. 


69) तू किती वेळा जिंकला ?
How many times did you win?



70) मी तुझा धिक्कार करतो.
I really hate you. 


71) दरवाजा बंद कर ना..
Close the door immediately. 


72) मला उचकी लागली.
I have had hiccups. 


73) धुम्रपान करणे धोकादायक आहे .
Smoking is harmful for health. 

74) मी रात्री आठ वाजेपर्यंत पोचेल .
I will reach by 8 tonight. 


75) मला ताप आलेला आहे .
I have got a fever. 


76)  तू भांडे घासशील का ?
Would you do the dishes? 


77) अजून थोडा रस्सा घे.
Have some more broth. 


78)  लवकर केस विंचरून घे.
Do your hair quickly. 



79) काय रे कसं चाललंय तुझं?
How is it going dear? 


80) तुला ताप आहे .
You are running a fever. 


81) तुला माझा नवीन फोन  कसा वाटला?
How do you like my new mobile?

 
82) ती वही नाही रे, दुसरी ती बघ.
Not that notebook, the next one. 



83)होळी दोन आठवडयावर आलेली आहे .
It's only two weeks for Holi. 



84) ही चांगली योजना आहे .
It really sounds a nice plan.


85) तुझी  आई घाईत आहे का ?
Is your mom in a hurry? 


86) तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही .
He is not in a melting mood. 


87) ही अवघड  समस्या आहे .
This is a knotty point. 


88) त्याला आत येऊ देऊ नका .
Don't let him come in.


89) हे घे तुझी पिशवी.
Here is your bag. 


90) त्याला मी अद्दल घडवतो .
I will teach him a lesson. 


91) जरा रस्त्यातून सरका .
Please, move out of the way. 


92)  मला तुझं खरं वाटत नाही .
I disagree with you. 


93) मी  रात्री जेवणानंतर थोडा वेळ फिरतो.
I stroll for some time after dinner.

 
94) मला काही देणे घेणे नाही.
I have nothing to do. 


95)  मी येथे सकाळपासून आहे .
I have been here since morning. 


96) तिने कोणाला मदत केली ?
Whom did she help? 


97) तू कशाचा विचार करत आहेस ?
What are you thinking about? 

98) तू कोणते पुस्तक वाचत आहेस?
Which book are you reading? 

99) कसा आहेस ?
Howdy?

100) पुन्हा भेटूया .
See you again. 

==========================================


No comments:

Post a Comment

Learn to Speak English

Let me play. मला खेळू दे Let me go मला जाऊ दे. Let me eat. मला खाऊ दे. Let me study. मला अभ्यास करू दे. Let me drink milk. मला दूध पिऊ दे. L...