विद्यार्थी मित्रांनो,
आज आपण चालू भूतकाळ म्हणजे काय याबद्दल सर्व प्रकारची माहिती गोळा करूया. आपल्याला माहिती आहे की, भूतकाळाचे चार प्रकार आहेत .....
1) साधा भूतकाळ
2) चालू भूतकाळ
3) पूर्ण भूतकाळ
4) पूर्ण अपूर्ण भूतकाळ
वरील चारही प्रकारच्या भूतकाळात वेगवेगळ्या प्रकारची वाक्ये असतात . आपण जोपर्यंत प्रत्येक भूतकाळातील वाक्यरचना मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत समजून घेत नाही तोपर्यंत आपणाला आत्मविश्वासाने इंग्रजी बोलता आणि लिहिता येणार नाही बरं का .....खरं सांगायचं म्हणजे इंग्रजी सगळ्यात सोपी भाषा आहे ... थोडासा सराव आणि थोडा अभ्यास केला की जमलेच म्हणून समजा ......म्हणून तर जगात सर्वाधिक इंग्रजी बोलणारे लोक आपल्या भारत देशात सापडतात ......
आपण जर खालील वाक्ये वाचली तर आपणाला कायमचे समजून जाईल की चालू भूतकाळ म्हणजे काय आहे . चला बघा तर खाली दिलेली मराठी वाक्ये ......
1)आदित्य जेवण करत होता .
2) आई भांडी घासत होती.
3) सर वर्गात शिकवत होते.
4) विद्यार्थी मन लावून ऐकत होते .
5) कार वेगाने जात होती .
वरील वाक्यांचे निरीक्षण केले तर आपण अगदी सहजपणे सांगू शकतो की या वाक्यांमध्ये वेगवेगळी कामे चालू होती .....पण ही कामे सध्या चालू आहेत का ? तर नाही मित्रांनो .....ही कामे मागेच चालू होती . आपण ती प्रत्यक्षात घडताना पाहिली आणि आता लोकांना सांगत आहोत.........
म्हणजे मागील काळात म्हणजे भूतकाळात कोणाचे कोणते काम चालू होते हे सांगण्यासाठी चालू भूतकाळ उपयोगी पडतो .....आणि हो, कोण काय करत होता हे सांगण्यासाठी चार प्रकारची वाक्ये लागतात बरं......
चला तर मग वाचूया कोणकोणती चार प्रकारची वाक्ये लागतात चालू भूतकाळ शिकण्यासाठी .......
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
🍎 साधी वाक्ये :
खालील वाक्य रचना बघा.......
1) मी खेळत होतो ..............I was playing.........
2) आम्ही खेळत होतो.......We were playing......
3) तू खेळत होता ...............You were playing.......
4) तुम्ही खेळत होते ..........You were playing.......
5) तो खेळत होता ..............He was playing.......
6) ती खेळत होती ...............She was playing.......
7) ते खेळत होते ................It was playing......
8) ते ( एकापेक्षा जास्त जण) खेळत होते ........They were playing...
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
आता वरील वाक्यांमध्ये क्रियापदाच्या पुढे आपण हवे ते शब्द भरून वाक्ये बोलू शकतो ....
1) मी क्रिकेट खेळत होतो .
👉 I was playing cricket.
2) आम्ही फुटबॉल खेळत होतो .
👉 We were playing football.
3) तू हाँकी खेळत होता.
👉 You were playing hockey.
4) तुम्ही व्हाँलीबाँल खेळत होते .
👉 You were playing volleyball.
5) तो बास्केटबॉल खेळत होता.
👉 He was playing basketball.
6) ती बॅडमिंटन खेळत होती.
👉 She was playing badminton.
7) ते टेनिस खेळत होते .
👉 It was playing tennis.
8) ते ( एकापेक्षा जास्त जण) गोल्फ खेळत होते.
👉 They were playing golf.
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
🍎आपण He, She, It यांच्या जागी नाम वापरून वाक्ये बनवू शकतो .....
1) He ऐवजी मुलांची नावे....
🎯 तो क्रिकेट पाहत होता .
👉 He was watching cricket.
आता खालील वाक्ये बघा .........
1) आदित्य क्रिकेट पाहत होता .
👉 Aditya was watching cricket.
2)दीपक क्रिकेट खेळत होता .
👉 Deepak was playing cricket.
3) अजय कार चालवत होता .
👉Ajay was driving a car.
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
2) She ऐवजी मुलींची नावे .....
🎯 ती टेनिस खेळत होती .
👉She was playing tennis.
आपण she ऐवजी Swati चे नाव वापरले आहे .....
1) स्वाती टेनिस खेळत होती .
👉Swati was playing tennis.
2)सविता पुस्तक वाचत होती.
👉 Savita was reading a book.
3) गीता पत्र लिहित होती.
👉 Geeta was writing a letter.
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
3) It ऐवजी प्राण्यांची नावे.....
🎯 ते पाणी पीत होते .
👉 It was drinking water.
1) कुत्रा रस्त्यावर भूंकत होता.
👉 A dog was barking on the road .
2) मांजर चेंडूसोबत खेळत होती.
👉 A cat was playing with a ball.
3) गाय गवत खात होती .
👉 A cow was eating grass.
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
4) आपण They च्या ऐवजी अनेकवचनी नामे वापरू शकतो.
🎯 ते हाँकी खेळत होते .
👉 They were playing hockey.
1) मुले हाँकी खेळत होती .👉 Boys were playing hockey.
2) मुली गोष्टी सांगत होत्या.
👉 Girls were telling stories.
3) स्त्रिया मैदान स्वच्छ करत होत्या .
👉 Women were cleaning the ground.
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
🎯 प्रश्नार्थक वाक्य ( Interrogative Sentences )
1) मी खेळत होतो का..........? Was I playing..........?
2) आम्ही खेळत होतो का ......? Were we playing.....?
3) तू खेळत होता का ..........? Were you playing........?
4) तुम्ही खेळत होते का ......? Were you playing.......?
5) तो खेळत होता का .........? Was he playing.......... ?
6) ती खेळत होती का .........? Was she playing........?
7) ते खेळत होते का ..........? Was it playing.............?
8) ते (एकापेक्षा जास्त जण) खेळत होते का ........? Were they playing.......?
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
आता वरील वाक्यांमध्ये रिकाम्या जागी आपण हवे ते शब्द भरून कित्येक प्रश्न तयार करू शकतो .......
1) मी खेळ खेळत होतो का ?
👉Was I playing games?
2) आम्ही क्रिकेट खेळत होतो का?
👉 Were we playing cricket?
3) तू टेनिस खेळत होता का ?
👉 Were you playing tennis?
4) तुम्ही बास्केटबॉल खेळत होता का ?
👉 Were you playing basketball?
5) तो हॉकी खेळत होता का ?
👉 Was he playing hockey?
6) ती गोल्फ खेळत होती का ?
👉 Was she playing golf?
7) ते किक बॉल खेळत होते का ?
👉 Was it playing kickball?
8) ते ( एकापेक्षा जास्त जण) फूटबॉल खेळत होते का?
👉 Were they playing football?
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
आपण He, She, It च्या जागी दुसरी नावे वापरून भरपूर प्रश्न तयार करू शकतो ....
1) He ऐवजी मुलांची नावे ...
🍎 तो क्रिकेट खेळत होता का ?
👉 Was he playing cricket?
1)विशाल क्रिकेट खेळत होता का ?
👉Was Vishal playing cricket?
2) रवि शाळेत जात होता का ?
👉 Was Ravi going to school ?
3) राजेश फोनवर बोलत होता का ?
👉 Was Rajesh talking on phone ?
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
2) She ऐवजी मुलींची नावे ......
🍎 ती बुद्धीबळ खेळत होती का ?
👉 Was she playing chess?
1) अश्विनी बुद्धीबळ खेळत होती का ?
👉 Was Ashwini playing chess?
2) रेखा आंबे विकत होती का ?
👉 Was Rekha selling mangoes ?
3) वनिता शेतात काम करत होती का ?
👉 Was Vanita working in farm ?
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
3) They ऐवजी अनेकवचनी नामे .......
🍎 ते फुटबॉल खेळत होते का ?
👉 Were they playing football?
1) विद्यार्थी फुटबॉल खेळत होते का ?
👉 Were students playing football?
2) स्त्रिया दिवाळी साजरी करत होत्या का ?
👉 Were women celebrating Diwali ?
3) शिक्षक विद्यार्थ्यांना भेटत होते का ?
👉Were teachers visiting students ?
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
आपण क्रियापदे बदलून प्रश्न तयार करू शकतो ...
1) मी सुंदर दिसत होतो का ?
👉 Was I looking beautiful?
2) आम्ही किल्यांना भेट देत होतो का ?
👉 Were we visiting forts?
3) तू हत्तीचे चित्र काढत होता का ?
👉 Were you drawing an elephant?
4) तू माझी खरंच थट्टा करत होता का ?
👉 Were you kidding me or it's a serious matter?
5) तो पहिल्यांदा कार चालवत होता का ?
👉 Was he driving a car for the first time?
6) ती गुणपत्रिका दाखवत होती का ?
👉 Was she showing her result card?
7) पुण्यात जोरदार पाऊस पडत होता का ?
👉 Was it raining heavily in Pune?
8) ते कायमचे भारत सोडून जात होते का ?
👉 Were they leaving India for good?
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
आपण प्रश्नाच्या अगोदर What, Where, Why, Which, How many यासारखे शब्द लावून प्रश्न तयार करू शकतो ...
1) तू तेथे काय करत होता ?
👉 What were you doing there?
2) तो कोठे राहत होता ?
👉 Where was he living ?
3) सीमा कोणते पुस्तक वाचत होती?
👉Which book was Seema reading ?
4) तुझी आई का ओरडत होती ?
👉 Why was your mom shouting ?
5) किती पाहुणे येत होते ?
👉 How many guests were coming?
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
🍎 3) नकारात्मक वाक्ये : (Negative Sentences)
1) मी खेळत नव्हतो ...........I was not playing .......
2) आम्ही खेळत नव्हतो .......We were not playing ......
3) तू खेळत नव्हता...........You were not playing ......
4) तुम्ही खेळत नव्हते ........You were not playing .....
5) तो खेळत नव्हता ............He was not playing ......
6) ती खेळत नव्हती .......... She was not playing .......
7) ते खेळत नव्हते .............It was not playing ........
8) ते ( एकापेक्षा जास्त जण) खेळत नव्हते... They were not playing......
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
आता वरील वाक्यांमध्ये आपण क्रियापदानंतर नवीन शब्द भरून नवीन वाक्य तयार करू शकतो.
1) मी मैदानावर खेळत नव्हतो.👉I was not playing on the ground.
2) आम्ही त्यांच्यासोबत खेळत नव्हतो.
👉We were not playing with them.
3) तू या डावात खेळत नव्हता.
👉 You were not playing in this game.
4) तुम्ही त्या सामन्यात खेळत नव्हते .
👉 You were not playing in that match.
5) तो कोठे ही खेळत नव्हता .
👉 He was not playing anywhere.
6) ती सानिया विरूद्ध खेळत नव्हती .
👉 She was not playing against Sania
7) ते जिंकण्यासाठी खेळत नव्हते .
👉They were not playing for a victory.
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
आपण He, She, It च्या जागी नवीन शब्द वापरून नवीन वाक्य तयार करू शकतो.....
1) He ऐवजी मुलांची नावे.........
🍎 तो या स्पर्धेत खेळत नव्हता.
👉 He was not playing in this championship.
1) विराट या स्पर्धेत खेळत नव्हता.
👉 Virat was not playing in this championship.
2) आदित्य वागण्यात सुधारणा करत नव्हता.
👉 Aditya was not mending his ways.
3) गोविंद माझ्या सोबत वाद घालत नव्हता.
👉 Govind was not tangling with me.
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
2) She ऐवजी मुलींची नावे....
🍎 ती आँलिपीक खेळत नव्हती .
👉 She was not playing Olympic games.
1) सेरेना आँलिपीक खेळत नव्हती .
👉 Serena was not playing Olympic games.
2) कविता चूक कबूल करत नव्हती.
👉 Kavita was not accepting her guilt.
3) सविता माझ्याशी बोलत नव्हती .
👉 Savita was not talking with me.
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
3) They ऐवजी अनेकवचनी नामे.......
🍎 ते व्यावसायिक सामने खेळत नव्हते
👉They were not playing professional matches.
1) भारतीय खेळाडू व्यावसायिक सामने खेळत नव्हते .
👉 Indian players were not playing professional matches.
2) शेतकरी पैसै खर्च करत नव्हते.
👉 Peasants were not spending money .
3) त्या दिवशी पक्षी आकाशात उडत नव्हते.
👉 Birds were not flying in the sky that day.
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
आपण क्रियापदात बदल करुन खूप वाक्ये तयार करू शकतो......
1) मी तुला काहीही सांगत नव्हतो.
👉 I was not telling you anything.
2) आम्ही हे पाणी पीत नव्हतो .
👉 We were not drinking this water.
3) तू अजिबात रूचि दाखवत नव्हता .
👉 You were not showing any interest.
4) तू कोणतीही पुस्तके वाचत नव्हता .
👉 You were not reading any books.
5) तो चोरांना पकडत नव्हता .
👉 He was not catching thieves.
6) ती पत्रे लिहित नव्हती .
👉 She was not writing letters.
7) ते बरोबर चमकत नव्हते .
👉 It was not shining properly.
8) ते निर्णय घेत नव्हते.
👉 They were not making any decisions.
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
🍎 4) नकारात्मक प्रश्नार्थक वाक्ये : (Negative Interrogative Sentences)
1) मी खेळत नव्हतो का.......? Was I not playing......?
2) आम्ही खेळत नव्हतो का ..? Were we not playing.?
3) तू खेळत नव्हता का....? Were you not playing......?
4) तुम्ही खेळत नव्हते का ...? Were you not playing..?
5) तो खेळत नव्हता का ......? Was he not playing......?
6) ती खेळत नव्हती का ...? Was she not playing.......?
7) ते खेळत नव्हते का ... ..? Was it not playing..........?
8) ते ( एकापेक्षा जास्त जण) खेळत नव्हते का ......? Were they not playing.........?
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
आता वरील प्रश्नांमध्ये क्रियापदांच्या पुढे आपण विविध शब्द लिहून अनेक प्रश्न विचारू शकतो ....
1) मी खेळ खेळत नव्हतो का ?
👉 Was I not playing games?
2) आम्ही क्रिकेट खेळत नव्हतो का ?
👉 Were we not playing cricket?
3) Were you not playing hockey?
👉 तू हाँकी खेळत नव्हता का ?
4) Were you not playing tennis?
👉 तुम्ही टेनिस खेळत नव्हते का ?
5) Was he not playing football?
👉 तो फुटबॉल खेळत नव्हता का ?
6)Was she not playing golf?
👉 ती गोल्फ खेळत नव्हती का ?
7) Was it not playing basketball?
👉 ते बास्केटबॉल खेळत नव्हते का ?
8) Were they not playing cards?
👉 ते (एकापेक्षा जास्त जण) पत्ते खेळत नव्हते का?
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
आपण He, She, It च्या जागी नाम वापरून वेगवेगळे प्रश्न विचारू शकतो .
1) He ऐवजी मुलांची नावे ...
🍎 तो संपत्तीत लोळत नव्हता का ?
👉 Was he not wallowing in wealth ?
1) आदित्य संपत्ती मध्ये लोळत नव्हता का ?
👉 Was Aditya not wallowing in wealth ?
2) संतोष स्वत:चा स्वार्थ साधून घेत नव्हता का ?
👉 Was Santosh not feathering his nest ?
3) गजू गरिबीतून मोठा होत नव्हता का ?
👉 Was Gaju not rising from the ashes?
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
2) She ऐवजी मुलींची नावे........
1) ती भांडणे लावून देत नव्हती का ?
👉 Was she not fanning the flames?
1) वनिता भांडणे लावून देत नव्हती का ?
👉 Was Vanita not fanning the flames ?
2) अंकिता घोकंपट्टी करत नव्हती का ?
👉 Was Ankita not mugging up ?
3) ललीता स्वत:चे हसे करून घेत नव्हती का ?
👉 Was Lalita not making an ass of herself ?
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
3) They ऐवजी अनेकवचनी नामे ....
🍎ते टेनिस खेळत नव्हते का ?
👉 Were they not playing tennis?
1) विद्यार्थी टेनिस खेळत नव्हते का ?
👉 Were students not playing tennis?
2) मुली टेनिस खेळत नव्हत्या का ?
👉 Were girls not playing tennis ?
3) घोडे चौखूर उधळत नव्हते का ?
👉 Were horses not galloping ?
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
आपण क्रियापदे बदलून हजारो प्रश्न तयार करू शकतो .......
1) मी चांगले शिकवत नव्हतो का?
👉 Was I not teaching well?
2) आम्ही तुला आधार देत नव्हतो का ?
👉 Were we not supporting you?
3) तू या कार्यक्रमात सहभागी होत नव्हता का ?
👉 Were you not participating in this show?
4) तू त्याच्या सोबत बोलत नव्हती का ?
👉 Were you not talking with him?
5) तो माझा वेळ वाया घालवत नव्हता का ?
👉 Was he not wasting my time?
6) ती परीक्षांची तयारी करत नव्हती का ?
👉 Was she not preparing for exams?
7) ते तेथे भूंकत नव्हते का ?
👉 Was it not barking there?
8) ते रस्त्यावर उड्या मारत नव्हते का ?
👉 Were they not jumping on the road?
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
आपण Why जोडून प्रश्न बनवू शकतो.....
1) तू शाळेत का जात नव्हता ?
👉 Why were you not going to class?
2) तो मला मदत का करत नव्हता ?
👉 Why was he not helping me?
3) भारत सामने का जिंकत नव्हता ?
👉 Why India was not winning matches?
No comments:
Post a Comment