Thursday, November 25, 2021

भारतीय पुरस्कार, Indian Awards

 नमस्कार मित्रांनो,
आज आपण अतिशय मनोरंजक आणि आपणा सर्वांचे कुतूहल वाढवणारी आणि त्याच वेळी आपली मान अभिमानाने उंचावणारी अशी अतिशय प्रेरणादायी माहिती वाचूया. वरील मथळा वाचून एका क्षणातच तुमच्या लक्षात आले असेल की, आज आपण आपल्या भारत सरकार तर्फे विविध क्षेत्रात मौल्यवान असे काम करणाऱ्या भारत मातेच्या सुपुत्रांना दिले जाणारे विविध पुरस्कार कोणते आहेत आणि ते कोण कोणत्या क्षेत्रात काम केल्यानंतर दिले जातात आणि त्यांची सुरुवात कधी नेमकी कधी झाली याबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, जो कोणीही व्यक्ती आपल्या तनमनाने आपल्या भारत मातेची सेवा करतो आणि जगाच्या पाठीवर आपल्या भारत मातेचे नावलौकिक करतो अशा महान वीरपुत्रांचा जयजयकार करणे हे, त्यांचे मनोधैर्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्यावश्यकच बनते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भारतीय संघराज्यात, समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात, मग ते कोणतेही क्षेत्र असो... कला, क्रीडा, समाजसेवा, आरोग्य, विज्ञान आणि इतरही अनेक क्षेत्रात अतिशय भरीव आणि अर्थपूर्ण योगदान देऊन समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या महान सुपुत्रांना वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरविले जाते. तर आज आपण अशाच वेगवेगळ्या क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे प्रकार आणि त्यांचे स्वरूप याबद्दल अतिशय उपयोगी अशी  माहिती पाहूया....

सर्वप्रथम आपण भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराबद्दल माहिती घेऊया.....


1) भारतरत्न : भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. आपल्या देशासाठी सर्वोच्च योगदान देणाऱ्या व्यक्तीस भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी देशासाठी सर्व आयुष्य वाहून घेतलेले असते. या पुरस्काराची स्थापना 2 जानेवारी 1954 रोजी झाली. सेवा ,कला, साहित्य, विज्ञान ,क्रीडा,मानव विकास, विश्वशांती इत्यादी क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. सुरुवातीला हा पुरस्कार जिवंत व्यक्तींना बहाल करण्याचे नियोजन होते पण 1955 साली त्यात सुधारणा करून मृत्यूनंतरही मरणोत्तर हा पुरस्कार देण्याची सोय करण्यात आली. आतापर्यंत 45 पेक्षा जास्त लोकांना भारतरत्न देऊन गौरविण्यात आलेले आहे. यातील तीन व्यक्ती ह्या परदेशी आहेत. लाल बहादूर शास्त्री, के. कामराज, आचार्य विनोबा भावे, एम. जी. रामचंद्रन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजीव गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, अरुणा असफ अली, जयप्रकाश नारायण, गोपीनाथ बोरदोलोई, मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. सर्वप्रथम 1954 साली डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालचारी व डॉ. चंद्रशेखर वेंकटरमन यांना भारतरत्न पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती डॉ.  राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते देण्यात आला. मदर टेरेसा, अब्दुल गफार खान आणि नेल्सन मंडेला या तीन परदेशी व्यक्तींना भारत रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. सर्वात कमी वयात भारतरत्न पुरस्कार सचिन तेंडुलकरने मिळवलेला आहे. आता या पुरस्काराचे स्वरूप कसे आहे आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तींना कोणकोणत्या सुविधा मिळतात ते शोधून काढायची जबाबदारी मात्र तुमची बर का....

--------------------------------------------------------------------------------

2) पद्म पुरस्कार....
या पुरस्कारांचीही स्थापना 1954 साली करण्यात आली. प्रामुख्याने कला, शिक्षण, साहित्य, विज्ञान, अभिनय, समाजसेवा, आरोग्य, कारखानदारी इत्यादी क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी प्रदान केले जातात.
पद्म पुरस्कार तीन प्रकारचे आहेत...1) पद्मविभूषण, 2) पद्मभूषण आणि 3) पद्मश्री
(1) पद्मविभूषण : हा भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
याचे स्वरूप म्हणजे एक पदक आणि एक प्रशस्तीपत्र असे आहे. भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत 230 पेक्षा जास्त लोकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळविण्यात महाराष्ट्रातील व्यक्तींची संख्या उल्लेखनीय आहे. कोणत्याही क्षेत्रात देशाचे नाव मोठे करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो.
(2) पद्मभूषण - हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. याचीही स्थापना 1954 साली झाली.
(3) पद्मश्री - हा भारत सरकार तर्फे दिला जाणारा चौथा सर्वात मोठा पुरस्कार आहे. दर वर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी या पुरस्कारांचे वितरण केले जाते. आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी हे पुरस्कार नाकारलेले आहेत.

-------------------------------------------------------------------------------

शौर्य पुरस्कार.....


भारतीय सैनिकांना, त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल, त्यांच्या साहसाचे कौतुक आणि सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार बहाल केले जातात... या पुरस्कारांची स्थापना 26 जानेवारी 1950 या दिवशी करण्यात आली. शौर्य पुरस्कारांचे दोन विभाग पडले जातात. एक प्रत्यक्ष युद्धावेळी दाखवलेल्या शौर्याबद्दल देण्यात येणारे शौर्य पुरस्कार पुरस्कार आणि दुसरे शांततेच्या काळातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी केलेल्या बहुमोल कामगिरीबद्दल देण्यात येणारे शौर्य पुरस्कार... चला तर मग आपण सर्वप्रथम युद्धकाळात दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारांची माहिती घेऊया....
(1) परमवीर चक्र- हे भारतातील सर्वोच्च "Highest Military Award"  आहे. भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत 21 जणांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मेजर सोमनाथ शर्मा हे परमवीर चक्र मिळविणारे पहिले भारतीय होते. 14 वेळा हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला . भारतीय सैन्यातील वीस जणांनी आणि भारतीय वायुसेनेतील एका अधिकाऱ्याला हा पुरस्कार मिळाला आहे.


(2) महावीर चक्र - हा युद्ध काळात दिला जाणार
 दुसरा सर्वात मोठा पुरस्कार आहे. जमिनीवरील युद्धात, आकाशातील युद्धात किंवा समुद्रातील युद्धात , या तिन्ही प्रकारच्या लढाईत दाखवलेल्या शौर्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. जिवंत असताना आणि मरणोत्तर हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत 219 जणांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्यात 74 जणांना मरणोत्तर हा पुरस्कार दिला गेला.
(3) वीर चक्र : हा भारतीय सैनिकांना प्रत्यक्ष युद्ध काळात दाखवलेल्या अतुलनीय सहसा बद्दल दिला जाणारा परमवीर चक्र आणि महावीर चक्र यानंतरचा तिसरा सर्वात मोठा सन्मान आहे. सर्वप्रथम 1947 साली हा पुरस्कार देण्यात आला. चला तर मग आत्तापर्यंत किती भारतीय वीर योद्ध्यांना हा पुरस्कार मिळाला याची माहिती सांगा पाहू.... यानंतर तुम्ही  शांतता काळात दिल्या जाणाऱ्या खालील शौर्य पुरस्कारांची माहिती गोळा करा आणि लक्षात ठेवा.....
1 अशोक चक्र
2 कीर्ती चक्र
3 शौर्य चक्र

-------------------------------------------------------------------------------

साहित्य क्षेत्रात दिले जाणारे पुरस्कार...
आता आपण भारतीय साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिले जाणारे पुरस्कार पाहूया. भारतात एकापेक्षा एक सरस अशी लेखकांची परंपरा आहे. भारतीय साहित्य क्षेत्र अतिशय समृद्ध आणि विविधांगी आहे. भारतात वेगवेगळ्या भाषातून अतिशय वाचनीय असे लेखन झालेले आहे. चला तर मग आज आपण भारतीय साहित्य क्षेत्रासाठी चे कोणते पुरस्कार आहेत ते माहिती करून घेऊया....
(1) ज्ञानपीठ पुरस्कार  : हा आपल्या देशातील साहित्यक्षेत्रात दिला जाणारा सर्वात मोठा आणि सर्वात जुना पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरुवात 1961 साली झाली. हा पुरस्कार केवळ भारतीय लेखकांना दिला जातो. हा पुरस्कार मिळविण्यासाठी लेखन हे केवळ प्रमाणीत भारतीय भाषा आणि इंग्रजी मध्येच असले पाहिजे अशी अट आहे. हा पुरस्कार केवळ जिवंत लेखकांना दिला जातो. हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. सर्वप्रथम 1965 साली मलयाळम साहित्यिक
श्री गोविंद शंकर कुरूप यांना त्यांच्या "ओडोक्वुघल" या कवितासंग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

Saturday, November 20, 2021

इंग्रजीतील चार अक्षरी शब्द

 नमस्कार मित्रांनो,
आज आपण इंग्रजी भाषेतील चार अक्षरे असलेले आणि आपल्याला दररोज उपयोगी पडणारे जास्तीत जास्त इंग्रजी शब्द पाहूया. पण त्यापूर्वी मला सांगा  तुम्हाला माहिती आहे का, की इंग्रजी भाषेत चार अक्षरे असलेले एकूण किती शब्द आहेत... नाही ना ...इंग्रजी भाषेत चार अक्षर असलेले 3996 म्हणजे जवळपास चार हजार शब्द आहेत. बरं अजून एक गोष्ट ... तुम्हाला माहिती आहे का इंग्रजीमध्ये किती अक्षरे असलेले सर्वात जास्त शब्द आहेत.. तर मित्रांनो इंग्रजी भाषेत पाच अक्षरे असलेले सर्वात जास्त शब्द आहेत असे समजले जाते आणि इंग्रजी भाषेत  S  (10.6 %) या अक्षराने सुरू होणारे सर्वात जास्त शब्द आहेत तर  X  (0.16% )या अक्षराने सुरू होणारे  सर्वात कमी शब्द आहेत. इंग्रजीतील कोणता शब्द सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द आहे ते शोधा बरं....कशी वाटली  ही गमतीदार माहिती ...चला तर मग आज आपण आपल्याला उपयोगी पडणारे आणि वारंवार वापरले जाणारे जास्तीत जास्त चार अक्षरी शब्द पाहू या.....

1) acid (ॲसिड) आम्ल (A)
2) open (ओपन) उघडा
3) read (रीड) वाचणे
4) tell (टेल) सांगणे
5) four (फोर) चार
6) blue (ब्लू) निळा
7) hall (हॉल) दिवाणखाना
8) just (जस्ट) लगेच, सहज
9) fair (हेअर) जत्रा
10) pull (पुल) ओढणे
11) sale (सेल) विक्री
12) weak (विक) अशक्त
13) dull (डल) ढ
14) huge (ह्युज) प्रचंड
15) monk (मंक) साधू
16) bull (बुल) बैल
17) date (डेट) तारीख, खजूर
18) nude (न्यूड) नागवा
19) gate (गेट) फाटक

20) hair (हेअर) केस
21) tube (ट्यूब) नळी
22) dung (डंग) शेण
23) rude (रुड) उद्धट
24) full (फुल) पूर्ण भरलेला
25) push (पुश )ढकलणे
26) book (बुक) पुस्तक
27) dupe (ड्युप) फसवणे
28) fish (फिश) मासा
29) mute( म्यूट) मुका
30) bush (बुश )झुडूप
31) hate (हेट )तिरस्कार करणे
32) jump (जम्प) उडी
33) mind (माईंड) मन
34) door (डोर) दरवाजा
35) take (टेक) घेणे
36) nose (नोज) नाक
37) name (नेम) नाव
38) game (गेम) खेळ
39) same (सेम) सारखा
40) rain (रेन) पाऊस
41) West (वेस्ट) पश्चिम
42) East (ईस्ट) पूर्व
43) Next (नेक्स्ट) पुढचा
44) tale (टेल) कथा
45) wash (वॉश) धुणे
46) well (वेल) विहीर
47) Kill (किल) ठार मारणे
48) burn (बर्न )जळणे
49) teak (टिक) साग
50) time (टाईम) वेळ

51) name (नेम) नाव
52) tame (टेम) पाळीव
53) game (गेम) खेळ
54) poor (पुअर) गरीब
55) rich (रिच) श्रीमंत
56) look (लुक) पाहणे
57) wise (वाईज) शहाणा
58) baby( बेबी) मुल 
59) play (प्ले) खेळणे
60) stay (स्टे) थांबणे

61) wife (वाइफ) बायको
62) grow (ग्रो) वाढणे
63) sell (सेल) विकणे
64) tail (टेल) शेपूट
65) deny (दिनाई) नकार देणे
66) blow (ब्लो) वाहणे
67) tank( टँक) टाकी
68) pond (पॉंड) तळे
69) duck (डक) मादी बदक
70) chin (चीन) हनुवटी
71) horn (हॉर्न) भोंगा
72) earn (अर्न) कमावणे
73) care (केअर) काळजी घेणे
74) folk (फोक) लोक
75) goat (गोट) शेळी
76) king (किंग) राजा
77) mane (मेन) आयाळ
78) over (ओव्हर) वर
79) pink (पिंक) गुलाबी
80) rise (राईज) उदय
81) pour (पुअर) ओतणे
82) fool (फुल) मूर्ख
83) moon (मून) चंद्र
84) soon (सून) लगेच
85) ring ( रिंग) अंगठी
86) rain (रेन) पाऊस
87) vast (वास्ट) प्रचंड
88) fist (फिस्ट) मूठ
89) warm (वार्म) गरम
90) ship (शिप) जहाज
91) vote (वोट) मत
92) tour (टूर) दौरा
93) true (ट्रू) खरा
94) tree (ट्री) झाड
95) tiny (टिनी) चिमुकला
96) girl (गर्ल) मुलगी
97) whom (हूम) कोणाला
98) bark (बार्क) भुंकणे
99) pray ( प्रे) प्रार्थना करणे
100) down (डाउन) खाली

1) your (योर) तुझा, तुमचा (B)
2) army (आर्मी) सैन्य
3) bell (बेल) घंटा
4) bomb (बॉंब) बॉंब गोळा
5) dark  (डार्क( गडद
6) calm (काम) शांत
7) when (व्हेन) केव्हा
8) week (वीक) आठवडा
9) wave (वेव) लाट
10) bath (बाथ) आंघोळ
 11) Bank (बँक) बँक
12) beat (बीट) मारणे
13) belt (बेल्ट)  पट्टा
 14) what (व्हॉट) काय
15) wine (वाईन) मद्य
 16) wire (वायर)
17) back (बॅक) पाठ

 18) away (अवे) दूर

19) area (एरिया) क्षेत्र
 20) also (अल्सो) सुद्धा
 21) best (बेस्ट) सर्वोत्तम
 22) bird (बर्ड) पक्षी
23) body (बॉडी) शरीर
24) good (गूड) चांगला
 25) burn (बर्न) जळणे
26) blue (ब्लू) निळा
 27) wild (वाइल्ड) जंगली
28) wind (विंड) वारा
 29) wing (विंग) पंख
30) whom (हूम) कोणाला
31) will (विल) इच्छा
32) Male (मेल) पुरुष
33) word (वर्ड) शब्द
34) wear (वेअर) अंगात घालणे
35) well (वेल) विहीर
36) here (हिअ) येथे
37) work (वर्क) काम
38) with (विथ) सोबत
 39) near (नियर) जवळ
 40) zero (झिरो) शून्य
41) year (इअर) वर्ष
42) food (फूड) अन्न

43) wish (विश) शुभेच्छा देणे
 44) yard (यार्ड) अंगण
 45) wood (वूड) जंगल
46) able (एबल) सक्षम
47) bone (बोन) हाड
48) busy (बीजी) व्यस्त
 49) born (बोर्न) जन्म घेणे
50) Bush (बुश) झुडूप
 151) wide (वाईड) रुंद
52) boss (बॉस) मालक
53) camp (कॅम्प) तळ
 54) boat (बोट) होडी
55) band (बँड) फीत
 56) Bond (बॉंड) बंधन
 57)bowl (बाउल) वाटी

58) boil (बोईल) उकळणे
59) bolt (बोल्ट) खीळ
60) bold (बोल्ड) धीट
61) boar (बोर) डुक्कर
62) bite (बाईट) चावणे
63) bend (बेंड) वाकवणे
64) bean (बिन) द्विदल धान्य
65) beam (बीम) प्रकाश किरण
66) beak (बिक) चोच
67) bead (बीड) मनी
68) bake (बेक) भाजणे
69) base (बेस) पाया
70) bask (बास्क) ऊन खाणे

71) pick (पीक) निवडणे
72) rust (रस्ट) गंजणे
73) real (रियल) खरा
74) sack (सॅक) पोते
75) veil (व्हेइल)  ओढणी
76) chat (चॅट) गप्पा
77) fall (फॉल) पडणे
78) slay (स्ले) कत्तल करणे
79) jeep (जीप) जीपगाडी
80) moan (मोन)  कण्हणे
81) jelly (जेली) मुरंबा
82) defy (डीफाइ) विरोध करणे
83) road (रोड) रस्ता
84) claw (क्ला) नखे
85) root (रूट) मूळ
86) vein (व्हेइन) रक्तवाहिनी
87) hell (हेल) नरक
88) very (व्हेरी) खूप
89) dock (डॉक) गोदी
90) soil (सॉईल) माती
91) sofa (सोफा) सोफा
92) fast (फास्ट) वेगाने
93) team (टीम) संघ
94) slow (स्लो) हळूवार
95) join (जॉईन) सहभागी होणे
96) slip (स्लीप )निसटणे
97) city (सिटी) शहर
98) cook (कूक) स्वयंपाकी
99) card (कार्ड) पत्ता
200) plan (प्लॅन) योजना

Thursday, November 18, 2021

Question tag : A to Z माहिती

 नमस्कार मित्रांनो,
आज आपण इंग्रजीतील एक अतिशय महत्त्वाचा असा व्याकरणाचा प्रकार पाहूया. तो म्हणजे Question tag. 
Question tag हा इंग्रजीतील एक अतिशय महत्त्वाचा पण तेवढाच सोपा व्याकरणाचा  प्रकार आहे. मी शाळेत शिकत असतांना मला Question tag ची वाक्ये अगदी मनापासून आवडायची. कारण Question tag ची वाक्ये सोडवताना मनात एक वेगळेच कुतुहल आणि उत्सुकता भरलेली असायची. खरं सांगायचं म्हणजे हा परीक्षेमध्ये हमखास मार्क मिळवून देणारा अतिशय सोपा घटक आहे. यासोबतच Question tag चा सराव केला तर आपली इंग्रजी भाषा पक्की व्हायला खूप खूप मदत होते. Question tag ची वाक्ये सोडवत असताना दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपली एकही चूक होत नाही म्हणून समजा. म्हणजे आपण सोडवलेले प्रत्येक वाक्य एकदम बरोबरच येणार. बरं कोणते आहेत या दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी.... चला तर मग सुरू करूया....

-------------------------------------------------------------------------------

ही वाक्ये सोडवत असताना आपल्याला वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद लक्षात आले की काम झाले. आपल्याला साह्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद यांच्यामुळे वाक्याचा काळ लगेच लक्षात येतो आणि कोणता tag लावायचा हे फक्त खालील दोन गोष्टी लक्षात ठेवल्या की झाले...आपले उत्तर बरोबर आलेच म्हणून समजा....
1) Question tag जर होकारार्थी असेल तर उत्तर नकारारथी लिहा.
2) Question tag जर नकारार्थी असेल तर उत्तर होकारार्थी लिहा.
3 Question tag लावताना मूळ वाक्य संपल्यानंतर comma वापरावा.
4) Question tag लावल्यानंतर प्रश्नचिन्ह वापरावे.
उदाहरणासाठी आपण खालील एक वाक्य पाहूया....

He is my friend.
He is my friend, isn't he?
He is not my friend.
He is not my friend, is he ?


आता दुसरे एक वाक्य सरावासाठी पहा...
She likes mangoes.
She likes mangoes, doesn't she?
She does not like mangoes.
She does not like mangoes, does she?


 वरील दोन्ही होकारार्थी वाक्यांमध्ये नकारात्मक tag लावलेला आहे तर नकारात्मक वाक्यामध्ये होकारार्थी tag लावला आहे. आपल्याला Question tag पूर्णपणे समजण्यासाठी आपल्याला इंग्रजीतील बारा काळ व्यवस्थितपणे समजलेले असले पाहिजेत बरं का मित्रांनो.....

आता आपण Question tag शी संबंधित सर्व प्रकारचे नियम एकदा शिकून घेऊ या म्हणजे भविष्यात आपल्याला कधीही Question tag चे वाक्य सोडवण्याची वेळ आली तर अगदी बिनधास्त पणे न घाबरता आपल्याला सहजपणे ते वाक्य सोडवता येईल... .. चला तर मग अगदी मनमोकळेपणे खालील सर्व नियम एकदा पटापट वाचून घ्या आणि व्हा तयार Question tag चा मुकाबला करण्यासाठी......

नियम क्रमांक 1 
 जर वाक्याचा कर्ता नाम असेल तर  नामा ऐवजी सर्वनाम वापरले पाहिजे. 
1) Aditya is my son.
Aditya is my son, isn't he?
2) Sheetal was not at home.
Sheetal was not at home, was she?
3) Rajesh helps many people.
Rajesh helps many people, doesn't he?
4) Dilip did not return yesterday.
Dilip did not return yesterday, did he?
वरील वाक्यांमध्ये आदित्य ,शितल, राजेश आणि दिलीप यांच्या ऐवजी सर्वनामे वापरली गेली आहेत.


नियम क्रमांक 2
जर वाक्याचा कर्ता This किंवा That असेल तर It हा कर्ता वापरावा.
1) This is my new bike.
This is my new bike, isn't it?
2) That was our old house.
That was our old house, wasn't it?
3) This is not your pen.
This is not your pen, is it?
4) That was not fair.
That was not fair, was it?
वरील चारही वाक्ये सोडविताना This व That ऐवजी It चा वापर केलेला आहे.

नियम क्रमांक 3 
जर वाक्याचा कर्ता These किंवा Thoseअसेल तर Question tag करताना They  हा कर्ता  घ्यावा.
1) These are my sisters.
These are my sisters, aren't they?
2) Those are my horses.
Those are my horses, aren't they?
3) These are not good girls.
These are not good girls, are they?
4) Those are not good boys.
Those are not good boys, are they?
वरील चारही वाक्यामध्ये These आणि Those च्या जागी Question tag करताना They हा कर्ता वापरलेला आहे.

नियम क्रमांक 4 
जर वाक्याची सुरुवात Let us या शब्दांनी होत असेल तर Question tag चे वाक्य तयार करत असताना shall we हेच शब्द घेतात.
1) Let us go to Pune.
Let us go to Pune, shall we?
2) Let us play cricket.
Let us play cricket, shall we?
3) Let us read stories.
Let us read stories, shall we?
4) Let us join Indian army.
Let us join Indian army, shall we?
वरील चारही Let us ने सुरू झालेल्या वाक्यांचे  Question tag करताना shall we हे शब्द घेऊन वाक्याचे Question tag केलेले आहे


नियम क्रमांक 5 
आज्ञार्थी वाक्याचे Question tag करत असताना नेहमी Will you हेच शब्द  घेतात.
1) Close the door.
Close the door, will you? 
2) Don't close the door.
Don't close the door, will you?
3) Save the girl child.
Save the girl child, will you? 
4) Don't waste water.
Don't waste water, will you?
वरील चारही होकारार्थी आणि नकारार्थी आज्ञार्थी वाक्यांचे Question tag करत असताना Will you हे शब्द घेतलेले आहेत

नियम क्रमांक 6 
जर वाक्याची सुरुवात There या शब्दाने होत असेल तर Question tag चे वाक्य लिहीत असताना There हाच शब्द घेऊन वाक्य लिहावे.
1) There are five students.
There are five students, aren't there ? 
2) There was a great king.
There was a great king, wasn't there? 
3) There is a tall tree.
There is a tall tree, isn't there? 
4) There isn't anything.
There isn't anything, is there? 
वरील There ने सुरु झालेल्या चारही वाक्यांचे Question tag करत असताना हा There हाच  शब्द वापरलेला आहे.

नियम क्रमांक 7 
ज्या वाक्यात Modal Auxiliary Verbs म्हणजेच can, could, shall, should, may, might, must, need, dare या सारखे शब्द असतात अशा वाक्याचे Question tag करत असताना वरील शब्दांनाच tag म्हणून वापरले जाते.
1) He can help me.
He can help me, can't he? 
2) He can't help me.
He can't help me, can he? 
3) You should study everyday.
You should study everyday, shouldn't you?
4) You shouldn't waste time.
You shouldn't waste time, should you? 
5) They could not reach here.
They could not reach here, could they?
6) You must not raise voice.
You must not raise voice, must you?
7) He may not fail.
He may not fail, may he?
8) We shall eat food.
We shall eat food, shan't we?
 वरील सर्व वाक्य काळजीपूर्वक वाचा म्हणजे तुमच्या लक्षात खूप लवकर येईल ....


नियम क्रमांक 8 
I (मी) ने सुरू होणारे वर्तमानकाळातील होकारार्थी वाक्य असेल तर अशा वेळी या वाक्यात Question tag पुढीलप्रमाणे  aren't I लिहावे.
1) I am a student.
I am a student, aren't I?
2) I am your friend.
I am your friend, aren't I ?
3) I am playing tennis.
I am playing tennis, aren't I ?
4) I am watching a Hollywood movie.
I am watching a Hollywood movie, aren't I ?
वरील प्रमाणे I  ने सुरू झालेल्या वाक्यात aren't I हा Question tag लावतात.

नियम क्रमांक 9 
जे वाक्य everyone, no one, someone, anyone, everybody, somebody, nobody व anybody या शब्दांनी सुरू होते त्या वाक्याचे question tag करत असताना They हा tag घेतात.
1) Everyone has a privilege.
Everyone has a privilege, haven't they ? 
2) Someone has stolen my pen.
Someone has stolen my pen, haven't they? 
3) Nobody has come.
Nobody has come, have they ? 
4) Somebody will help me.
Somebody will help me, won't they?
वरील चार वाक्यामध्ये नियम क्रमांक 9 मध्ये सांगितल्याप्रमाणे They हा Question tag लावून तयार केलेल्या वाक्यांचा सराव करा.


नियम क्रमांक 10 
जे वाक्य something, everything, nothing व anything या  चार शब्दांनी सुरू होते त्यांचे Question tag करत असताना it हा शब्द घ्यावा.
1) Something can happen.
Something can happen, can't it ? 
2) Everything is possible.
Everything is possible, isn't it ? 
3) Nothing is impossible.
Nothing is impossible, is it ? 
4) Anything had happened.
Anything had happened, hadn't it ? 
वरील चार वाक्यांमध्ये it हा शब्द वापरून तयार केलेले question tag ची वाक्ये पहा आणि अशाच प्रकारची अजून भरपूर वाक्ये तयार करा.


नियम क्रमांक 11
इंग्रजीतील खालील काही शब्द नकारात्मक अर्थ असलेली आहेत..
Few, seldom, rarely, barely, scarcely, hardly व little यांचा वापर करून तयार केलेले वाक्य नकारात्मक समजले जाते त्यामुळे अशा वाक्यात होकारार्थी question tag वापरायला हवे.
1) He seldom comes here.
He seldom comes here, does he ? 
2) Few students attended this class.
Few students attended this class, did they ? 
3) She rarely speaks aloud.
She rarely speaks aloud, does she ?
4) Ashok scarcely talked with me.
Ashok scarcely talked with me, did he ?
वरील प्रमाणे question tag च्या वाक्यांचा आपण जर लेखन आणि वाचण्याचा सराव केला तर अगदी कमी काळात आपण सहजपणे हा व्याकरणाचा प्रकार शिकू शकतो.
धन्यवाद! 

Wednesday, November 17, 2021

भारतीय रेल्वेची उपयोगी माहिती

 नमस्कार मित्रांनो,
आपणा सर्वांना रेल्वे खूप खूप आवडते.रेल्वेत बसून प्रवास करायला आवडणार नाही असा एकही माणूस शोधूनही सापडणार नाही. आपण नेहमी बघतो कितीतरी चित्रपटांमध्ये रेल्वे दाखवलेली असते. एवढेच काय तर मामाच्या गावाला जाण्यासाठी रेल्वे गाडी चे गाणे आपणा सर्वांना परिचित आहे... झुक झुक झुक झुक आगीनगाडी... धुरांच्या रेषा हवेत काढी.. पळती झाडे पाहूया.. मामाच्या गावाला जाऊया.. हे गाणे ऐकले नसेल असा माणूस शोधूनही सापडणार नाही. लहान मुलांना तर रेल्वेचे भारी आकर्षण असते. आपल्या देशात रेल्वे हे दळणवळणाचे सर्वात प्रमुख साधन मानले जाते. मुंबईतील लोकल रेल्वेगाड्या तर मुंबईतील प्रत्येक व्यक्तीच्या जीव की प्राण... आजकाल कितीतरी मोठ्या शहरांमध्ये लोकल आणि मेट्रो रेल्वे गाड्या हया प्रवासी वाहतुकीचा कणा बनलेल्या आहेत. रेल्वे गाडया कितीतरी प्रकारच्या असतात. पॅसेंजर गाडी, एक्सप्रेस गाडी असे शब्द आपण कितीतरी वेळा ऐकतो. शताब्दी एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस अशी  नावेही आपण ऐकलेले असतात व पेपरात वाचलेली असतात. रेल्वेचे डबे हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात.जनरल कोच, स्लीपर कोच, एसी कोच हे त्यातलेच काही प्रकार.. हे आपल्याला माहिती आहेच. भारतासारख्या खंडप्राय उत्तर दक्षिण व पूर्व पश्चिम लांबी असलेल्या या देशात रेल्वेचे खूप मोठे जाळे पसरलेले आहे हे मला काही पुन्हा सांगण्याची गरज नाही.  भारतीय रेल्वेचे वेगवेगळे झोन आणि त्यातही डिव्हिजन पाडलेले आहेत याची आपणाला पुरेशी माहिती असणे गरजेचे आहे त्यामुळे मी या पोस्ट मध्ये रेल्वे बद्दल मनोरंजक आणि उपयोगी अशी वेगळ्या प्रकारची माहिती लिहिण्याचा प्रयत्न केला आहे . चला तर मग सर्वप्रथम आपण भारतीय रेल्वेचे किती आणि कोणकोणते झोन आहेत व त्यांचे मुख्यालय कोठे आहे हे सर्वप्रथम समजून घेऊया व लक्षात ठेवूया .

1) Central Railway - मुंबई CSTM
2) West Central Railway -जबलपूर
3) Western Railway-चर्चगेट, मुंबई
4) Konkan Railway- नवी मुंबई
5) Northern Railway- दिल्ली
6) North Eastern Railway- गोरखपुर
7) North Central Railway- प्रयागराज
8) North Western Railway- जयपुर
9) North East Frontier Railway- गुवाहाटी
10) Southern Railway- चेन्नई
11) South Western railway- हुबळी
12) South Eastern Railway- गार्डन रीच, कोलकत्ता
13) South Coast Railway- विशाखापटनम
14) South Central Railway- सिकंदराबाद
15) South East Central Railway- विलासपूर
16) Eastern Railway- फिरली पॅलेस कोलकत्ता
15) East Coast Railway- भुवनेश्वर
18) East Central Railway- हजीपुर

आता रेल्वेच्या वरील प्रत्येक झोनमध्ये काही डिव्हिजन असतात. भारतीय रेल्वेचे एकूण सत्तर डिव्हिजन्स आहेत. त्यांची नावे कोण कोणती आहेत आणि कोणत्या झोन मध्ये कोणते डिव्हिजन आहे हे शोधायचा प्रयत्न करा....
आपण उदाहरणादाखल दक्षिण मध्य रेल्वे (South Central Railway) मध्ये कोणकोणती डिव्हिजन्स (Divisions) आहेत ते पाहूया...
दक्षिण मध्य रेल्वे मध्ये एकूण सहा Divisions आहेत...
1) गुंटकल डिव्हिजन
2) गुंटूर डिव्हिजन
3) नांदेड डिव्हिजन
4) सिकंदराबाद डिव्हिजन
5) हैदराबाद डिव्हिजन
6) विजयवाडा डिव्हिजन

चला आता आपण रेल्वे विषयी इतर काही मनोरंजक आणि महत्वपूर्ण माहिती पाहूया...
1. भारतीय रेल्वे मार्गाची एकूण लांबी 67368  किलोमीटर आहे.
2. भारतीय रेल्वे हे आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे तर जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.
3. भारतात एकूण 7325 रेल्वे स्थानके आहेत.
4. हावडा- अमृतसर ही एक्सप्रेस गाडी सर्वात जास्त स्थानकांवर थांबणारी एक्सप्रेस गाडी आहे ती हावडा वरून अमृतसर ला जाताना  115 ठिकाणी थांबते.

5. हावडा हे भारतातील सर्वात व्यस्त  रेल्वे जंक्शन आहे. दररोज येथे 974 ट्रेन थांबतात.
6. विवेक एक्सप्रेस ही भारतातील सर्वात जास्त अंतर कापणारी रेल्वे गाडी आहे ती 4 273 किलोमीटरचे अंतर कापते.

7. दररोज साधारणपणे 25 लाख भारतीय लोक रेल्वेने प्रवास करतात. 
8. 16 एप्रिल 1853 रोजी पहिली भारतीय प्रवासी रेल्वे धावली व ती मुंबई आणि ठाणे या दोन रेल्वे स्थानकादरम्यान धावली.

9. हावडा-  धनबाद ही भारतातील पहिली डबल-डेकर ट्रेन आहे. ती 1 ऑक्टोबर 2011 रोजी सुरू झाली.


10. अमेरिका आणि इंग्लंड नंतर डबल डेकर ट्रेन वापरणारा भारत हा जगातील तिसरा देश आहे.


11. वंदे भारत एक्सप्रेस ही भारताची सर्वात वेगाने धावलेली ट्रेन आहे. चाचणी दरम्यान तिने 180 किलोमीटर प्रति तास या  हा वेग पकडला.


12. गतिमान एक्सप्रेस ही भारताची सर्वात वेगवान ट्रेन आहे. ती प्रति तास 160 किलोमीटर या वेगाने धावते.

13. ब्रॉडगेज, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज आणि मीटर गेज हे चार प्रकारचे गेज भारतीय रेल्वेत वापरले जातात.


14. Ib हे भारतातील सर्वात लहान नाव असलेले रेल्वे स्टेशन आहे.
15. Venkatanarasimharajuvaripeta हे भारतातील सर्वात मोठे नाव असलेले रेल्वे स्टेशन आहे.

16. बोगिबिल हा भारतीय रेल्वे ट्रॅक वरील सर्वात लांब पूल आहे त्याची लांबी4.9 किलोमीटर आहे.
17. घूम रेल्वे स्टेशन हे भारतीय रेल्वेचे सर्वात उंचीवरील रेल्वे स्थानक आहे. याची उंची समुद्रसपाटीपासून 2258 मीटर आहे.
18. WAG12B हे भारतीय रेल्वेचे सर्वात जास्त  शक्तिशाली रेल्वे इंजिन आहे. त्याची क्षमता 12 हजार हॉर्सपॉवर एवढी आहे.
19. महाराजा एक्सप्रेस ही भारतातील सर्वात महागडी रेल्वे आहे.
20. The Grand Trunk Express ही भारतातील सर्वात जुनी रेल्वे गाडी आहे. ती 1929 साली  सुरू झाली आणि आजतागायत ती नियमितपणे दिल्ली आणि चेन्नई या दोन स्थानका दरम्यान धावते.

धन्यवाद! 
-----------------------------------------------------------------------------

Thursday, November 11, 2021

इंग्रजीतील जोडीने येणारे शब्द,Word Pairs

 नमस्कार मित्रांनो,



आपण इंग्रजी शिकत असताना वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन इंग्रजी शब्द शिकत असतो. आपण जेवढे नवीन नवीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे इंग्रजी शब्द पाठ करतो तेवढेच आपण हुशार होत जातो. आणि मग इंग्रजी बोलणे, लिहिणे, वाचणे आणि समजणे हे आपल्यासाठी अगदी डाव्या हाताचा खेळ होऊन जाते. आपण जेवढे इंग्रजीत हुशार बनतो तेवढा आपला आपल्या मित्रांमध्ये रुबाब वाढत जातो. चला तर मग आज आपण एका वेगळ्या प्रकारचे इंग्रजी शब्द शिकुया. कोणते आहेत बर  हे इंग्रजी शब्द... मित्रांनो हे आहेत इंग्रजी मध्ये जोडीने येणारे शब्द आणि त्यांच्या समोर त्यांचे मराठी अर्थ...! यांचा लिहिताना व बोलताना वापर करा आणि तुमच्या इंग्रजीला अतिशय परिणामकारक आणि महत्त्वपूर्ण बनवा.
 Bread and butter- उपजीविकेचे साधन
Do or die - करा अथवा मरा
Law and order- कायदा आणि सुव्यवस्था
Ladies and gentlemen - सभ्य स्त्री आणि पुरुष
By and large - पूर्णपणे
Face to face - समोरा समोर
To and fro - इकडून तिकडे
Ups and downs - जीवनातील चढ-उतार
Time and tide - वेळ काळ
Heart and soul - सर्व ताकदीनिशी
Now and then - आता आणि नंतर
Short and sweet - थोडक्यात आणि गोड
Off and on - अधून मधून
Heaven and earth - आकाश पाताळ
Pros and cons - साधक पादक मुद्दे
Kith and kin - जवळचे नातेवाईक
Far and wide - सर्वदूर
Fast and loose - धरसोड
All and sundry - एकूण एक
Hue and cry - आरडाओरड
Hustle and bustle - घाई गर्दी
High and low - उच्च नीच
Hard and fast - कठोर
Good and bad - चांगले आणि वाईट
Bag and baggage - चंबु गबाळे सहित
All in all - सर्व काही
Hale and hearty - उत्तम तब्येत
Bit by bit - थोडे थोडे करून
Again and again - पुन्हा पुन्हा
Fair and square - योग्य
Little by little - थोडे थोडे करून
Rough and smooth - खडबडीत आणि मऊ
Rich and poor - गरीब आणि श्रीमंत
Pure and simple - साधे आणि शुद्ध
Bright and dark - संधिप्रकाश
Sixes and sevens - गोंधळ
Safe and sound - सुखरूप
Alpha and Omega - सुरुवात आणि शेवट
Men and women - पुरुष आणि स्त्री
Might and main - सर्व ताकदीनिशी
Over and above - जास्तीचे
Once for all - कायमचे
Ways and means - उपाय
Pots and pans - भांडीकुंडी
NOOK and corner - कानाकोपरा
More or less - कमी-जास्त
Out and out - उघडउघड
Part and parcel - अविभाज्य भाग
Husband and wife - पती-पत्नी
Null and void - रद्दबातल
Young and old - आबालवृद्ध
Wear and tear - झीज
Rhyme and reason - सुसंगतता
Round and round - गोल गोल
Toil and moil - कठीण परिश्रम
Heads and ears - नखशिखांत
Sum and substance - सारांश
Spick and span - नीटनेटके
Hands and feet - हात पाय
Through and through - आरपार
On the face of it - वरवर पाहता
Mother and child - आई आणि मूल
On and on over - पुन्हा पुन्हा
Open and above board - निसंशय
Ancient and modern - प्राचीन आणि अर्वाचीन
Academic career - शैक्षणिक कारकीर्द
Flesh and blood - मानवी स्वभाव
Give and take- देवाण-घेवाण
Hand in hand - हातात हात घालून
For love and money - प्रेमासाठी आणि पैशासाठी
Aches and pains - वेदना
Above all - सर्वात महत्त्वाचे म्हणजे
Friend and foe - दोस्त आणि दुश्मन
Great and Small - सर्व लहान मोठे
Helter skelter - सैरावैरा
King and queen - राजा आणि राणी
By leaps and bounds - खूप झपाट्याने
Knife and fork - सूरी आणि काटा
Every now and then - क्षणोक्षणी
Live and let live - जगा आणि जगू द्या
By hook or crook - भल्याबुऱ्या मार्गाने
Forgive and forget - झाले गेले विसरून जा
God and goddesses - देवी देवता
First and foremost - सर्वात महत्वाचा
Arts and crafts - हस्तव्यवसाय
Virtue and vice - सद्गुण आणि दुर्गुण
Rank and file - गोर आणि गरीब
One and the same - एक सारखेच
The haves and have nots - श्रीमंत आणि गरीब
Hearth and home - सुखाचा निवारा
Aid and abet - वाईट कामात मदत करणे



x

Monday, November 1, 2021

इंग्रजीतील दोन व तीन अक्षरी शब्द

 नमस्कार मित्रांनो,

आज आपण आपल्या दररोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या सर्व दोन अक्षरी  इंग्रजी शब्दांची यादी पाहूया आणि यानंतर इंग्रजी मधील दररोज उपयोगी पडणारे व अतिशय महत्त्वाच्या अशा तीन अक्षरी शब्दांची यादी पाहूया.चला तर मग वाट कशाची पाहताय......
 वाचा बरं खालील यादी आणि तपासा यातील किती शब्द तुम्हाला पूर्वी पाठ होते आणि किती शब्द तुम्हाला पाठ करण्याची आवश्यकता आहे...... चला तर मग सुरुवात करूया.

1) am (ॲम) आहे
2) is (इज) आहे
3) at (ॲट) च्या ठिकाणी
4) on (ऑन) वर
5) in (इन) आत
6) of (ऑफ) चा, ची, चे
7) by (बाय) ने
8) us (अस) आम्हाला
9) no (नो) नाही
10) up (अप) वर
11) as (ॲज) जसा
12) we (वी) आम्ही, आपण
13) my (माय) माझा, माझी, माझे
14) so (सो) म्हणून
15) bi (बाय) दोन
16) bo (बो) घाबरल्याचा आवाज
17) he (ही) तो
18) me (मी) मला
19) do ( डू) करणे
20) go (गो) जाणे
21) it (ईट) ते
22) ok (ओके) ठीक आहे
23) an (ॲन) एक
24) or  (ऑर) किंवा
25) if (इफ) जर
26) ox (ऑक्स) बैल
27) to (टू) च्याकडे
28) be (बी) असणे
29) lo (लो) पहा
30) hi (हाय) नमस्कार
31) pa (पा) वडील

32) ma (मा) आई


चला आता तीन अक्षरी उपयोगी शब्दांची यादी वाचूया......

1) ant (ॲंट) मुंगी
2) all (ऑल) सर्व
3) and (ॲंड) आणि
4) ape (एप) वानर
5) are (आर) आहेत, आहेस
6) bat (बॅट) चेंडू फळी
7) bag (बॅग) पिशवी
8)  bad (बॅड) वाईट
 9) big (बिग) मोठा
 10) boy (बॉय) मुलगा
 11) but (बट) परंतु
 12) who(हू ) कोण
13) why (व्हाय) का
14) car (कार) कार
 15) cat( कॅट) मांजर

16) cut (कट) कापणे
 17) cup (कप) कप
18)  can (कॅन) शकणे
19) day (डे) दिवस
 20) dog (डॉग) कुत्रा
 21) dig (डिग) खोदणे
22)  dam (डॅम) धरण
 23) don (डॉन) डाकू
 24) dry (ड्राय) कोरडा
25) dip (डीप) बुडवणे
26) den (डेन) गुहा
 27) eat (इट) खाणे
28) ear (इअर) कान
 29) fan (फॅन) पंखा
30) fit (फिट) योग्य
31) fry (फ्राय) तळणे
32) try (ट्राय) प्रयत्न करणे
33) dry (ड्राय) कोरडा करणे
34) cry (क्राय) रडणे
 35) cot (कॉट) पलंग
 36) bat (बॅट) वटवाघुळ
37)  hat (हॅट) टोपी

38) mat( मॅट) चटई
39) man (मॅन) माणूस
 40) fan (फॅन) पंखा
 41) son (सन )पुत्र
42)  sun (सन) सूर्य
43) hen (हेन) कोंबडी
44) six(सिक्स) सहा
45) see (सी) पाहणे
46) say (से) म्हणणे
47)  men (मेन) माणसे
 48) ten (टेन) दहा
 49) joy (जाॅय) आनंद
 50) toy (टॉय) खेळणे
 51) shy (शाय) लाजणे
 52) pen (पेन) पेन
 53) zoo( झू) प्राणीसंग्रहालय
54) too( टू) सुद्धा
55) gun (गन) बंदूक
 56) fun (फन) गंमत
57) nun (नन) साध्वी

58) ray( रे) किरण
59) run( रन) धावणे
60) red (रेड )लाल
 61) net (नेट) जाळी
62) not (नाॅट) नाही
 63) hot (हॉट) गरम
64) sin (सिन) पाप
 65) may (मे) शक्यता
 66) mud (मड) चिखल
 67) God (गाॅड) देव
 68) top (टॉप) भोवरा
 69) wax (वॅक्स) मेण
 70)way (वे) रस्ता
 71) woo (वू) लाडीगोडी लावणे
72)  win (विन) जिंकणे
 73) wet (वेट) ओला
 74) kid (कीड) मुल
 75) lay (ले) मांडणे
 76) lad (लॅड) मुलगा
 77) leg (लेग) पाय
 78) let (लेट) परवानगी देणे
 79) pot (पाॅट) भांडे
 80) put( पुट) ठेवणे

81) new (न्यू )नवीन
82) one (वन) एक
83)  pig (पिग )डुक्कर
 84) sad (सॅड )दुखी
 85) sue( स्यू)फिर्याद देणे
86) now (नाउ) आता
 87) out (आउट) बाहेर
88) rag( रॅग )चिंधी
89) saw( साॅ )करवत
 90) tax (टॅक्स) कर
91) but (बट )परंतु
92) owl (आउल) घुबड
93) raw( राॅ) कच्चा
94) sea( सी) समुद्र
95) tie( टाय )बांधणे

 96) oak (ओक) ओक वृक्ष
 97) own (ओन) च्या मालकीचा असणे
 98) rod( राॅड) गज किंवा दांडा
99) set (सेट) सुरूवात करणे
100) toe( टो) पायाचे बोट
101) old ( ओल्ड) जुना
102) pan (पॅन) तवा
 103) rob( राॅब) लुबाडणे
104) sky (स्काय) आकाश
 105) tow (टो) 
106) off (ऑफ) बंद ,दूर
 107) pad ( पॅड) क्रिकेटच्या खेळात वापरली जाणारी गादी
108)  rot( रॉट) सडणे
109) sly ( स्लाई)  कावेबाज
110) two (टू) दोन
111)odd (ऑड) विषम
112) paw( पाॅ) पंजा
 113) rub (रब) चोळणे
 114) rue (रू) पश्चाताप करणे
 115) sow (सो) पेरणे
116)  use (यूस) वापरणे
117) jar (जार) बरणी
 118) lie (लाय) खोटे बोलणे
119) low (लो) कमी 
 120) jaw(जाॅ) जबडा
 121) add (ॲड) मिसळणे
122) act (ॲक्ट) कृती
123)  age (एज) वय
 124) ago (अगो) पूर्वी
 125) law (लाॅ) कायदा
 126) mix मिक्स)मिसळणे
 127) mug (मग) घोकंपटी करणे
128)  ask (अस्क)विचारणे
 129) ash (ॲश) राख
130)  egg( एग) अंडे


131) ass (ॲस) गाढव
 132) air (एअर) हवा
133)  for (फाॅर) च्या साठी
 134) doe (डो) एक प्रकारची हरीण
 135) any (एनी) कोणतेही
136) tom (टाॅम) बोक्या
137)  arm (आर्म) बाहू
 138) aim (एम) उद्दिष्ट किंवा ध्येय
 139) axe (एक्स) कुर्हाड
140) mad (मॅड) वेडा
141) map (मॅप) नकाशा
142) job (जाॅब) नोकरी
143)  key( की) चावी
144)  jug (जग)
145)  tip( टीप) टोक
 146) the (द) ते
147) gap (गॅप) आंतर
 148) gas (गॅस) वायु
149)  get (गेइट) मिळवणे
 150) gym( जीम) व्यायाम शाळा
151) has (हॅज) जवळ आहे
152)  had (हॅड) जवळ होता
153) her (हर) तिचा, तिची, तिचे
 154) guy (गाय) कोणीही व्यक्ती
155) him (हिम) त्याला
 156) hue (ह्यू) रंग
157) his (हिज) त्याचा, त्याची, त्याचे
158) hut (हट) झोपडी
159) hug( हग) मिठी मारणे
160) hit (हिट) फटका मारणे
161) ice (आइस) बर्फ
162) inn (इन) खानावळ
163) ink (इंक) शाई
164) ill( इल) आजारी
165)  tea( टी) चहा
166) tap (टॅप) नळ
 167) spy (स्पाइ) हेर
 168) sum (सम) रक्कम
 169) sit( सीट) बसणे
 170) sir (सर) साहेब
171) rug( रग) जाड कांबळे
172)  pin (पीन) टाचणी
173) row (रो) रांग
174) pie (पाइ) एक प्रकारचा केक
 175) pea (पी) वाटाणा
 176) our (अवर) आमचा, आमची, आमचे
177) oil (ऑइल) तेल
178) mid( मिड) मध्य
179)  lot (लाॅट) पुष्कळ

 180) lip( लीप) ओठ
 181) jam (जॅम) 
 182) van (व्हॅन) चार चाकी गाडी
183) via( व्हाया) च्या मार्गे
184) vow (वो) प्रतिज्ञा करणे
185) was (वाज) होता किंवा होती
 186) war( वार) युद्ध किंवा लढाई
187) wee (वी) लघवी करणे
188) wit (विट) शहाणपणा
189) yet (येट) अजून पर्यंत
 190) you( यू) तू किंवा तुला
191) bar (बार) गज
192) bus (बस) बस गाडी
 193) bay (बे) उपसागर
194) bye( बाइ) निरोप देणे
 195) bee (बी) मधमाशी
196) buy (बाइ) खरेदी करणे
197) cow( काउ) गाय
 198) bed (बेड) अंथरूण
199) beg (बेग) भीक मागणे
200) cub (कब) छावा
 201) dad (डॅड) पप्पा किंवा वडील
202) die (डाइ) मरणे
 203) dim (डिम) अंधूक
 204) moo (मू) गाईचे हंबरणे
205)  dog( डाॅग) कुत्रा
206) dot (डाॅट) ठिपका
207) bin (बीन) कणगी
208)  box (बाॅक्स) पेटी
 209) cap (कॅप)  टोपी
 210) ego (इगो) अहंकार
211) end (एंड) शेवट
 212) eye (आय) डोळा
213) fat( फॅट) जाड
214) few (फ्यू) थोडे
 215) fig (फिग) अंजीर
216) fix (फिक्स) नेमका
217) fly (फ्लाइ) उडणे
 218) fur (फर) प्राण्यांच्या अंगावरील बारीक केस
219)  foe (फो) शत्रू
220)  fox( फाॅक्स) कोल्हा

221) sip  (सीप) घुटके घेणे
222) ewe(यू) मेंढी
223) ram(रॅम) मेंढा
224) bug(बग) ढेकूण
225) fog (फाॅग) दाट धुके

226) nag (नॅग) सतावणे, छळणे
227) nut (नट) सुपारी
228) win (विन) जिंकणे
229) pat (पॅट)  थोपटणे
230) elf (एल्फ) छोटी परी

231) bud (बड) कळी

__________________________________________________

Friday, October 29, 2021

Good thoughts together

 नमस्कार मित्रांनो,
आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाची अशी शब्दसमूहाबद्दल एक शब्द या प्रकारची माहिती शिकून घेऊया. आपण बऱ्याच वेळा बघतो वेगवेगळे शब्द वापरून एका विशिष्ट शब्दाचे वर्णन केले जाते. चला तर मग कोणते आहेत ते शब्द लगेच शिकून घ्यायला तयार राहा.

-----------------------------------------------------------------------------

शब्दसमूहाबद्दल एक शब्द


1)देव आहे असे मानणारा - अस्तिक
2) देव नाही असे मानणारा- नास्तिक
3) आकाशातील तारे यांचा पट्टा -आकाशगंगा
4) स्वतःचे काम स्वतः करणारा- स्वावलंबी
5) धन्याशी निष्ठेने वागणारा- स्वामीनिष्ठ
6) श्रम करून जीवन जगणारा -श्रमजीवी
7) संकटाचे निवारण करणारा -विघ्नहर्ता
8) मृत्यूवर विजय मिळवणारा- मृत्युंजय
9) दुसऱ्याच्या मनातले जाणणारा -मनकवडा
10) केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा- कृतज्ञ
11) केलेले उपकार विसरणारा- कृतघ्न
12) जिथे जन्म झाला आहे तो देश -जन्मभूमी
13) जिथे आपण काम केले तो भाग -कर्मभूमी
14) ज्याच्या आरपार दिसू शकते असे -पारदर्शक
15) ज्याच्या आरपार दिसत नाही असे- अपारदर्शक
16) हितासाठी असलेली राज्य पद्धती -लोकशाही
17) दगडासारखे कठोर हृदय असणारा -पाषाणहृदयी
18) जाणून घेण्याची इच्छा असणारा -जिज्ञासू
19) हाताने केलेली बाणा खुणांची भाषा - करपल्लवी
20) सर्व गोष्टींची माहिती ठेवणारा - सर्वज्ञानी

21) भरपूर आयुष्य असणारा - दीर्घायुषी
22) दररोज प्रसिद्ध होणारे - दैनिक
23) नारळाच्या झाडाची पाने - झावळ्या
24) पाण्यात राहणारे प्राणी - जलचर
25) घोडे बांधण्याची जागा - तबेला
26) कधीही मरण नसणारे - अमर
27) शरीराला कष्ट न देता काम करणारा - अंगचोर
28) पायापासून डोक्यापर्यंत - आपादमस्तक
29) तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट - दंतकथा
30) हळूहळू घडून येणारा बदल - उत्क्रांती
31) जन्मापासून श्रीमंत असलेला - गर्भश्रीमंत
32) चार पाय असलेला - चतुष्पाद
33) जगाचा स्वामी - जगन्नाथ
34) इच्छित वस्तू देणारी काल्पनिक गाय - कामधेनु
35) इच्छित वस्तू देणारा काल्पनिक वृक्ष - कल्पवृक्ष
36) इच्छिलेले देणारा काल्पनिक मणी - चिंतामणी
37) जाणून घेण्याची इच्छा असणारा - जिज्ञासू
38) हट्टीपणा करणारा - दुराग्रही
39) शत्रूला सामील झालेला - फितूर
40) आई वडील नसलेला - पोरका
41) पंधरा दिवसांचा काळ - पंधरवडा
42) जिचा पती जिवंत आहे अशी - सुवासिनी
43) दोन नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण - संगम
44) लोकांना आवडणारा - लोकप्रिय
45) व्याख्यान देणारा - व्याख्याता
46) वाट दाखवणारा - वाटाड्या
47) वर्षांनी प्रसिद्ध होणारे - वार्षिक
48) दगडावर  केलेले कोरीव काम - शिल्प
49) नेहमी खरे बोलणारा - सत्यवादी
50) शत्रू कडील बातमी काढून आणणारा - हेर
51) बोधपर वचन - सुभाषित


51) भाषण करण्याची कला - वक्तृत्वकला
52) कायम टिकणारे - शाश्वत
53) धन्याशी निष्ठेने वागणारा - स्वामीनिष्ठ
54) स्वतःचा मुळीच अभिमान नसणारा - स्वाभिमानशून्य
55) स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारा - स्वच्छंदी
56) अंतकरणाला पाझर फोडणारे - हृदयाद्रावक
57) आठवड्याने प्रसिद्ध होणारे नियतकालिक - साप्ताहिक
58) मूर्तीची पूजा करणारा - मूर्तिपूजक
59) मोजकाच आहार घेणारा - मिताहारी
60) रत्नांनी मढवलेले - रत्नजडित
61) बारा जणांचा कारभार - बारभाई
62) दुसऱ्याच्या मनातले जाणणारा मनकवडा
63) मोजकेच बोलणारा - मितभाषी
64) कमालीचा मूर्ख - मूर्खशिरोमणी
65) राजाची स्तुती करणारा व्यक्ती - भाट
66) आई वडील नसलेला - पोरका
67) जगाचा नाश होण्याची वेळ - प्रलयकाळ
68) जुन्या मतांना चिकटून राहणारा - सनातनी
69) कसलेही डाग नसलेला - निष्कलंक
70) कोणतेही व्यसन नसलेला - निर्व्यसनी
71) कसलीही लाज नसलेला - निर्लज्ज
72) कोणाचाही आधार नसलेला - निराधार
73) कशाचीही इच्छा नसणारा - निरीच्छ
74) काटकसरीने खर्च करणारा - मितव्ययी
75) अग्नीची पूजा करणारा - अग्निपूजक
76) ज्याला कोणीही शत्रू नाही असा - अजातशत्रू
77) फुकट जेवण मिळण्याचे ठिकाण - अन्नछत्र
78) ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असा - अतुलनीय
79) अगदी पूर्वीपासून राहणारे - आदिवासी
80) कामात गढून गेलेला - कार्यमग्न
81) तीन रस्ते एकत्र येतात ती जागा - तिठा
82) दोन नद्यांमधील प्रदेश - दुआब
83) खूप दानधर्म करणारा - दानशूर
84) तप करण्याची जागा - तपोभूमी
85) म्हातारपणी बुद्धीला झालेला विकार - म्हातारचळ
86) भांडण उकरून काढणारा व्यक्ती - भांडकुदळ
87) एकमेकांवर अवलंबून असणारे - परस्परावलंबी
88) डोंगर पोखरून आरपार नेलेला रस्ता - बोगदा
89) पाण्याखालून चालणारी बोट - पाणबुडी
90) शंकराची उपासना करणारा - शैव
91) दुसऱ्याचे भाषण ऐकणारा - श्रोता
92) स्वतःशी केलेले भाषण - स्वगत
93) आठवड्याने प्रसिद्ध होणारे नियतकालिक - साप्ताहिक
94) एकाच काळातील - समकालीन
95) माकडाचा खेळ करणारा - मदारी
96) कोणालाही कळू न देता - बिनबोभाट
97) ज्याला खूप माहिती आहे असा - बहुश्रुत
98) नाणी पाडण्याचा कारखाना - टाकसाळ
99) श्रम न करता खाणारा - ऐतखाऊ
100) वाटेल तसा पैसा खर्च करणे - उधळपट्टी
101) दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी झोप - वामकुक्षी
102) व्यवहाराविषयी काहीही न कळणारा - व्यवहारशून्य
103) दगडावर केलेले कोरीव काम - शिल्प
104) श्रद्धा ठेवून वागणारा - श्रद्धाळू
105) स्वतःचा अभिमान असणारा - स्वाभिमानी
106) स्वतः श्रम करून मिळवलेले - स्वकष्टार्जित
107) चांदणे असलेला पंधरवडा - शुक्लपक्ष
108) नवऱ्या मुलाची आई - वरमाय
109) फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय - पाणपोयी
110) माशासारखे डोळे असणारी स्त्री - मीनाक्षी
111) निरर्थक गोष्टी - भाकडकथा
112) दर महिन्याला प्रसिद्ध होणारे नियतकालिक - मासिक
113) मृत्यूवर विजय मिळवणारा - मृत्युंजय
114) चांगला असा विचार - सुविचार
115) लिहिता वाचता न येणारा - निरक्षर
116) लिहिता वाचता येते असा - साक्षर
117) जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री - विधवा
118) ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष - विधुर
119) अचूक गुणकारी असे - रामबाण
120) सूर्योदयापूर्वीचा काळ - पहाट
121) आजारी लोकांची शुश्रूशा करणारी - परिचारिका
122) कोणाचीही बाजू न घेता न्याय देणारा - निष्पक्षपाती
123) काळोख्या रात्रीचा पंधरवडा - कृष्णपक्ष
124) आकाशाचा वेध करणारा - गगनभेदी
125) ज्याचा विसर पडणार नाही असे - अविस्मरणीय
126) न टाळता येणारे - अटळ
127) आकाशातील तार्‍यांचा पट्टा - आकाशगंगा
128) पूर्वी कधी घडले नाही असे - अपूर्व
129) जे साध्य होणार नाही असे ते - असाध्य
130) लहान मुलाला झोपवण्यासाठी गायलेले गाणे - अंगाईगीत





Sunday, October 24, 2021

Abbreviation: Short forms

 

नमस्कार मित्रांनो,

आज आपण आपल्या दररोजच्या जीवनात उपयोगी पडणारी अतिशय महत्त्वाची अशी माहिती पाहूया. आपण दररोजच्या जीवनात बोलताना ATM कार्ड, PAN कार्ड,PIN नंबर, LPG गैस, ICU , MRF टायर, SMS असे  कितीतरी इंग्रजी  शब्दांची संक्षिप्त रूपे वापरतो. पण या शब्दांचे पूर्ण नाव किंवा full form आपल्याला माहीत नसते.कधी कधी असे पूर्ण नाव वाचून आपल्याला खूपच आनंद मिळू शकतो. चला तर मग आज आपण आपल्याला खूप वेळा उपयोगी पडणाऱ्या काही महत्त्वांच्या शब्दांचे फुल फॉर्म पाहूया.....

1) FB - Facebook

2) SMS - Short Message Service

2) MBBS- Bachelor of Medicine and Bachelor of Surgery

3) BAMS- Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery.

4) BHMS - Bachelor of Homeopathic Medicine and Surgery

5) BDS - Bachelor of Dental Surgery

6) DHMS - Diploma in Homeopathic Medicine and Surgery

7)BEMS - Bachelor of Eastern Medicine and Surgery

8)MD - Doctor of Medicine

9)DGO - Diploma in Gynecology and Obstetrics

11) MS - Master of Surgery

11) BE - Bachelor of Engineering

10) MA - Master of Arts

11) BA - Bachelor of Arts

12) HSC - Higher Secondary School Certificate

13) SSC- Secondary School Certificate

14) ITI - Industrial Training Institute

15) IIT - Indian Institute of Technology

16) AIIMS- All India Institute of Medical Science

17) B Sc - Bachelor of Science

18) M Sc - Master of Science

19) B Com- Bachelor of Commerce

20) M Com- Master of Commerce

21) KG - Kindergarten

22) PG - Post Graduation

23) NDA - National Defense Academy

24) MPSC- Maharashtra Public Service Commission

25) UPSC- Union Public Service Commission

26) IAS- Indian Administrative Service

27) IPS- Indian Police Service

28)IRS- Indian Revenue Service

29) IFS- Indian Foreign Service

30) ICS- Indian Civil Service

31) Ph D - Doctor of Philosophy
32) MBA - Master of Business Administration
33) B Ed - Bachelor of Education
34) M Ed - Master of Education
35) B Tech- Bachelor of Technology


36) M Tech - Master of Technology

37) DBM- Diploma in Business Management
38) LLB- Bachelor of Laws
39) NCC- National Cadet Corps
40) CA - Chartered Accountant

41) D Pharm - Diploma in Pharmacy

42) B Pharm - Bachelor of Pharmacy
41) LPG - Liquified Petroleum Gas
42) ATM - Automated Teller Machine
43) KYC - Know Your Customer
44) PAN - Permanent Account Number

45) MLA - Member of Legislative Assembly
46) MP - Member of Parliament
47) CBI - Central Bureau of Investigation
48) CID - Criminal Investigation Department
49) CM - Chief Minister
50) PM - Prime Minister

51) SP - Superintendent of Police
52) DCP - Deputy Commissioner of Police
53) ACP - Additional Commissioner of Police
54) IG - Inspector General
55) DIG - Deputy Inspector General
56) Dy SP -  Deputy Superintendent of Police
57) PI - Police Inspector
58) PSI - Police Sub Inspector

58) PC - Police Constable
59) LIC - Life Insurance Corporation

60) SC- Supreme Court
61) HC- High Court
62) ICJ - International Court of Justice
63) CJ - Chief Justice 
64) C/O - care of
65) SBI - State Bank of India


66) HDFC - Housing Development Finance Corporation Limited
67) BOI - Bank of India

68) RBI - Reserve Bank of India
68) ICICI - Industrial Credit and Investment Corporation of India limited

69) NASA - National Aeronautics and Space Administration
70) ISRO - Indian Space Research Organization
71) OK - All correct
72) Mr - Master or Mister
73) Mrs - Mistress
74) NOC - No Objection Certificate
75) IAF - Indian Air Force
76) am - ante meridiem
77) pm - post meridiem
78) RADAR - Radio Detecting and Ranging
79) RIP - requiescat in pace ,rest in peace
80) PIN - Postal Index Number

81) STD - Subscriber Trunk Dialing
82) VIP - Very Important Person
83) RAW - Research and Analysis Wing
84) PWD - Public Work Department
85) PA - Personal Assistant
86) SC - Scheduled Castes
87) ST -  Scheduled Tribes
88) OBC - Other Backward Category

89) SBC - Special Backward Classes
89) NT - Nomadic Tribes
90) VJ - Vimukta Jati 
91) MSEB - Maharashtra State Electricity Board
92) HUDCO - Housing and Urban Development Corporation
93) CIDCO - City and Industrial Development Corporation of Maharashtra
94) ICU - Intensive Care Unit
95)WWW - World Wide Web


96) UP - Uttar Pradesh
97) UNO - United Nations Organization
98) TV - Television
99) UK - United Kingdom
100)TB - Tuberculosis

101) MRF - Madras Rubber Factory
102) BMW - Bavarian Motor Works

103) SUV - Sport Utility Vehicle
104) USA - The United States of America
105) UAE - United Arab Emirates

106) DNA- Deoxyribonucleic Acid
107) PMO - Prime Minister Office
108) MO - Money Order, Medical Officer, Mail Order

Thursday, October 21, 2021

Noun: Case

 नमस्कार मित्रांनो,
आज आपण इंग्रजीतील अतिशय महत्त्वाचा पण खूप खूप सोपा असलेला व्याकरणाचा एक भाग शिकूया. मी सोपा ह्याच्यासाठी म्हणतोय कारण की, हा व्याकरणाचा भाग आपण कितीतरी वेळा वापरत असतो पण नक्की या भागाला काय म्हणतात हे आपल्याला ठाऊक नसते. पण बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये नामाच्या विभक्ति बद्दल विविध प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे चला तर मग आपण आता सुरु करूया  Noun : case म्हणजेच नामाची विभक्ती....
तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो नामाच्या किती विभक्ती आहेत ते..
साधारणपणे इंग्रजीमध्ये नामाच्या पाच विभक्त्या आहेत  ज्याला आपण इंग्रजीमध्ये Noun - The Case असे म्हणतो. पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा...हे सगळं तुम्ही अगोदरच कुठेतरी वाचलेलं, पाहिलेलं किंवा लिहिलेलं आहे बरं का... आता मात्र फक्त आपण त्याची उजळणी करतोय.


1. The Nominative Case:

 याला इंग्रजीमध्ये नामाची प्रथमा विभक्ती असे म्हणतात. जेव्हा नामाचा उपयोग वाक्यामध्ये कर्ता म्हणून केला जातो तेव्हा त्या नामाची ती प्रथमा विभक्ती असते. खालील इंग्रजी वाक्ये काळजीपूर्वक वाचा.खालील प्रत्येक वाक्यामध्ये नामाचा उपयोग वाक्याचा कर्ता म्हणून केलेला आहे.

1. Aditya is reading a book.
2. Mohan went to his school.
3. Rajesh has played cricket.
4. Seema came back yesterday.
5. A dog was barking.
6. Bangalore is a clean city.
7. Gold is a precious metal.
8. Farmers work very hard.
9. Dilip sang a song.
10. Monkeys are playing tricks.

वरील दहा वाक्यामध्ये विविध नामे ही वाक्याचा कर्ता म्हणून काम करत आहेत म्हणून ही नामाची प्रथमा विभक्ती आहे.

----------------------------------------------------------------------------------


2.The Possessive Case : 

या विभक्तीला मराठीमध्ये षष्टी विभक्ती असे म्हणतात. जेव्हा एखाद्या नामाचा उपयोग मालकी हक्क किंवा अधिकार दाखविण्यासाठी केला जातो तेव्हा नामाची षष्ठी विभक्ती वापरली जाते. खालील इंग्रजीतील दहा वाक्ये जर आपण काळजीपूर्वक वाचली तर हा विभक्तीचा प्रकार आपल्या चटकन आणि सहजपणे लक्षात येतो. येथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. षष्ठी विभक्ती मध्ये नामाची मालकी दाखविण्यासाठी  नामानंतर Apostrophe नावाचे एक विरामचिन्ह वापरावे लागते. ते कसे वापरतात ते पुढील वाक्यात बघा....


1. This is Dilip's car.
2. That is Soham's book. 
3. This is girls' hostel.
4. It is Rani's garden. 
5. Anil Kapoor's film will be released very soon.
6. There is  Surekha's farm house. 
7. That is Anil's bungalow.
8. Here is Meena's bicycle.
9. I visited Rajesh Shinde's blog.
10. He stole Vivek's pencil. 

आता खालील काही शब्द काळजीपूर्वक वाचा.....

   Dilip's car - दिलीपची कार
Soham's book-सोहमचे पुस्तक
girl's hostel-एका मुलीचे होस्टेल
girls' hostel-अनेक मुलींचे हॉस्टेल
cow's tail-एका गाईचे शेपूट
cows' tail-अनेक गाईंच्या शेपट्या
Anil's bungalow-अनिलचा बंगला
Vivek's pencil-विवेकची पेन्सिल
Meena's bicycle-मीनाची सायकल
Surekha's farm house-सुरेखाचे शेतातील घर
Ajay and Vijay's car -अजय आणि विजय या दोघांची एक कार
Ajay's and Vijay's car - अजय आणि विजय यांच्या वेगळ्यावेगळ्या कार

---------------------------------------------------------------------------------


3. Vocative Case: 

आपण बऱ्याच वेळा आपल्या सभोवती असलेल्या मुलांना, मित्रांना, आई-वडील यांना किंवा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना हाक मारून बोलवत असतो. उदाहरणार्थ खालील वाक्ये वाचा...
आदित्य, इकडे ये.
विजय, खाली बस.
अशाप्रकारे इंग्रजीमध्ये पण हाक मारून नावाचा उल्लेख केल्यानंतर त्याला संबोधन विभक्ती किंवा Vocative Case असे म्हणतात. येथे आपल्याला इंग्रजीत लिहितांना एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची आहे.
ती म्हणजे इंग्रजीत वाक्य लिहीत असताना ज्याच्या नावाचा उल्लेख केला त्या नावानंतर आपल्याला स्वल्पविराम म्हणजे comma वापरावा लागतो. आता खालील इंग्रजीतील काही वाक्ये बघा म्हणजे लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल.

Aditya, come here.
Vijay, sit down.
Friends, help me please.
God, help me.
Follow me, Vishal.
Students, keep silence in the classroom.
Anil , close your eyes.
Surekha, don't open that window.
Sukanya, complete your homework.
Folks, listen my words carefully.

----------------------------+---------+-+++++------------------------------


4. Objective Case: 

 जेव्हा एखादे नाम हे वाक्यातील क्रियापदाचे कर्म म्हणून काम करते तेव्हा त्या  नामाची विभक्ती द्वितीया विभक्ती म्हणजे Objective case असते. खालील दहा वाक्ये काळजीपूर्वक वाचल्यानंतर  लगेच सगळी विभक्ती आपल्या लक्षात  येईल.

Aditya sings a song.
Mohan writes a letter.
Vijay opens the door.
Rahul plays football.
I  help friends.
Farmer cuts a tree.
India win the match.
Refugees visit India.
Govind makes a kite.
Teacher teaches English.


वरील दहा वाक्यांमध्ये a song, a letter, the door, football, friends, a tree, the match, India, a kite आणि English ही दहा नामे द्वितीया विभक्ती मध्ये आहेत. वाक्यातील द्वितीया विभक्ती ओळखण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. वाक्यातील क्रियापदाला काय? हा प्रश्न विचारला की, द्वितीया विभक्ती मधील नाम समजते. खालील दोन उदाहरणे बघा....


Aditya sings song.
What does Aditya sing ? - a song.
Mohan writes a letter.
What does Mohan write? - a letter.
Farmer cuts a tree.
What does a farmer cut? - a tree.

-------------------------------------------------------------------------------

5. The Dative Case: 

 इंग्रजीमधील वाक्यात कर्म दोन प्रकारचे असतात. एक प्रत्यक्ष कर्म आणि दुसरे अप्रत्यक्ष कर्म. वरील गोष्टी थोड्याशा अवघड जरी वाटत असतील तरी त्या खूप सोप्या आहेत हे तुम्हाला खालील वाक्य वाचल्यानंतर लगेच लक्षात येईल. प्रत्यक्ष कर्म म्हणजे direct object व अप्रत्यक्ष कर्म म्हणजे indirect object होय. वाक्यातील जे नाम प्रत्यक्ष कर्म असते त्याची द्वितीया विभक्ती असते तर जे नाम अप्रत्यक्ष कर्म असते त्याची  चतुर्थी विभक्ती असते. वरील चौथ्या प्रकारात आपण प्रत्यक्ष कर्म म्हणजे द्वितीया विभक्ती बद्दल शिकलो आता आपण चतुर्थी विभक्ती बद्दल शिकूया. एका वाक्यात जेव्हा दोन कर्म असतात तेव्हा वस्तू ही प्रत्यक्ष कर्म असते तर व्यक्ती ही अप्रत्यक्ष कर्म असते. खालील वाक्य शांतपणे वाचल्यानंतर आपल्याला सर्व गोष्टी लगेच लक्षात येतात.....


1) I gave Aditya a pencil.

Aditya - Indirect object (Dative Case)
a pencil - Direct object ( Objective case)


2) I told Madhav a story.

Madhav - Indirect object (Dative Case)
a story - Direct object (Objective Case)


3) I taught Dipak Mathematics.

Dipak - Indirect object.(Dative Case)
Mathematics - Direct object (Objective Case)


_--------------------------------------------------------------------------------






Sunday, August 1, 2021

Types of Verbs

 नमस्कार मित्रांनो,

आज आपण इंग्रजी भाषेत क्रियापदे किती प्रकारची असतात ते पाहूया. आपण इंग्रजी विषयाची भरपूर क्रियापदे पाठ करतो आणि त्यांचा दैनंदिन जीवनात नियमीतपणे वारंवार   वापर करतो. क्रियापदामुळे आपल्याला वाक्याचा  काळ समजतो.आपल्याला माहिती आहे की, क्रियापद हा वाक्याचा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही.चला तर मग आपण क्रियापदाचे कोणकोणते प्रकार आहेत ते  पाहूया आणि कायमचे लक्षात ठेवूया.


1. Strong Verb: ज्या क्रियापदाचे भूतकाळी रूप व तिसरे रूप तयार करत असताना त्यांच्या स्वरांमध्ये बदल होतो त्या क्रियापदांना Strong Verbs असे म्हणतात.
खालील उदाहरणे बघा...
Break - broke - broken
Write -  wrote - written
Do -  did -  done
Swim -  swam  - swum
Fall -  fell - fallen
Sink -  sank - sunk


2. Weak Verb: ज्या क्रियापदाचे भूतकाळी रूप आणि तिसरे रूप तयार करत असताना त्यांच्या स्वरांमध्ये बदल होत नाही अशा क्रियापदांना Weak Verbs असे म्हणतात. 

खालील उदाहरणे बघा....

Hurt- hurt -hurt
Cast- cast -cast
Hit -hit - hit
Cut - cut - cut
Bid - bid - bid


3. Transitive Verbs: जी क्रियापदे वाक्यामध्ये आपल्या सोबत कर्म घेऊन येतात ती क्रियापदे त्या वाक्यामध्ये Transitive Verbs असतात. अशी क्रियापदे असलेले वाक्य ओळखायचे म्हणजे अशा वाक्यांचे Change the voice होते.

Examples.. 1) play, 2)read, 3) tell, 4) catch, 5) sell....etc.

I play cricket.
He reads a book.
She is telling a story.
He caught thieves.
My father will sell our cow.


4.Intransitive Verb: जी क्रियापदे वाक्यामध्ये आपल्यासोबत कर्म घेऊन येत नाहीत ती क्रियापदे त्या वाक्यामध्ये Intransitive Verbs असतात. अशा वाक्यांचे change the voice होत नाही.

Examples....1) go, 2) swim ,3) bark, 4) sleep, 5) cry... etc.

I go to school everyday.
He swims fast.
Dogs bark very loudly.
She is sleeping.
She cried out.


5.Auxiliary Verb: जी क्रियापदे वाक्यामध्ये मूळ क्रियापदासोबत वाक्याचा काळ दाखवण्यासाठी वापरली जातात त्यांना सहाय्यकारी क्रियापदे असे म्हणतात.

खालील सर्व शब्द वाचा....
am,is,are, was, were, do, does, did, has, have, had, will, would, shall, should, can, could, may, might, must, ought to, dare, need, used to.


6. Stative Verb: जी क्रियापदे केवळ अवस्था दाखवण्यासाठी वापरली जातात त्यांना Stative Verbs म्हणतात. लक्षात ठेवा, ही क्रियापदे चालू काळात  वापरली जात नाहीत. यांना चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ किंवा चालू भविष्यकाळ या काळात वापरू नये.

Examples...1) know, 2) remember, 3) forget, 4) forgive, 5) love...etc.

खालील वाक्ये काळजीपूर्वक वाचा....

1) He knows me. (correct)
1) He is knowing me.(incorrect)
2)  I will forgive you.(correct)
2) I am forgiving you. (Incorrect)


7. Dynamic Verb: जी क्रियापदे प्रत्यक्ष वाक्यात घडणाऱ्या कृती दर्शवण्यासाठी वापरली जातात त्यांना Dynamic Verbs असे म्हणतात. ही क्रियापदे आपण कोणत्याही काळात वापरू शकतो. ही क्रियापदे चालू काळातही वापरली जातात.


खालील उदाहरणे बघा....
1) read, 2) play, 3) jump, 4) run, 5) throw... etc.

1) Aditya is reading a book.
2) Students are playing on the ground.
3) Kids are jumping in the mud.
4) She is running very fast.
5) An athlete is throwing his javelin.



8. Defective Verb: ज्या क्रियापदांचे भूतकाळी रूप किंवा तिसरे रूप तयार करून लिहिता येत नाही किंवा त्यांना an infinitive म्हणून वापरता येत नाही त्यांना Defective Verbs असे म्हणतात.

  सर्व सहाय्यकारी क्रियापदे Defective Verbs आहेत....
Examples..... Can, could, will, would, may, might, must, shall, should, dare, need, used to, ought to. 



9. Finite Verb: ज्या क्रियापदाच्या रूपात वाक्याचा कर्ता  आणि काळ यानुसार बदल होतो त्याला  Finite Verb असे म्हणतात. 
खालील  क्रियापद  बघा आणि त्याच्यात कर्त्यानुसार आणि काळानुसार कसा बदल झाला ते बघा...


1) Go (गो) जाणे
I go to school. (go)
She goes to school. (goes)
They have gone to school.(gone)
We are going to school.(going)


10. Non- finite Verb: जे क्रियापद वाक्याचा कर्ता आणि काळ यानुसार बदलत नाही त्याला  Non- finite Verb असे म्हणतात.

Examples....
(play - प्ले- खेळणे)

खालील वेगवेगळ्या काळातील वाक्यात play च्या रूपात कोणताही बदल होत नाही...
I want to play cricket.
He wants to play cricket.
They wanted to play cricket.
They want to play cricket.


11. Regular Verb: जेव्हा क्रियापदाचे भूतकाळी किंवा तिसरे रूप तयार करत असताना d,t,n,ed,en यांचा वापर केला जातो तेव्हा त्यांना Regular Verbs असे म्हणतात.

Examples....

Learn - learnt - learnt
Visit- visited - visited
Provided - provided - provided


12. Irregular Verb: ज्या क्रियापदांचे भूतकाळी रूप आणि तिसरे रूप ed लावून होत नाही अशा क्रियापदांना irregular verbs असे म्हणतात.

खालील उदाहरणे काळजीपूर्वक वाचा...

Make - made- made
Say- said- said
Tell -told -told
Get- got- got
Hear- heard -heard
Think -thought - thought

Learn to Speak English

Let me play. मला खेळू दे Let me go मला जाऊ दे. Let me eat. मला खाऊ दे. Let me study. मला अभ्यास करू दे. Let me drink milk. मला दूध पिऊ दे. L...