Monday, November 1, 2021

इंग्रजीतील दोन व तीन अक्षरी शब्द

 नमस्कार मित्रांनो,

आज आपण आपल्या दररोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या सर्व दोन अक्षरी  इंग्रजी शब्दांची यादी पाहूया आणि यानंतर इंग्रजी मधील दररोज उपयोगी पडणारे व अतिशय महत्त्वाच्या अशा तीन अक्षरी शब्दांची यादी पाहूया.चला तर मग वाट कशाची पाहताय......
 वाचा बरं खालील यादी आणि तपासा यातील किती शब्द तुम्हाला पूर्वी पाठ होते आणि किती शब्द तुम्हाला पाठ करण्याची आवश्यकता आहे...... चला तर मग सुरुवात करूया.

1) am (ॲम) आहे
2) is (इज) आहे
3) at (ॲट) च्या ठिकाणी
4) on (ऑन) वर
5) in (इन) आत
6) of (ऑफ) चा, ची, चे
7) by (बाय) ने
8) us (अस) आम्हाला
9) no (नो) नाही
10) up (अप) वर
11) as (ॲज) जसा
12) we (वी) आम्ही, आपण
13) my (माय) माझा, माझी, माझे
14) so (सो) म्हणून
15) bi (बाय) दोन
16) bo (बो) घाबरल्याचा आवाज
17) he (ही) तो
18) me (मी) मला
19) do ( डू) करणे
20) go (गो) जाणे
21) it (ईट) ते
22) ok (ओके) ठीक आहे
23) an (ॲन) एक
24) or  (ऑर) किंवा
25) if (इफ) जर
26) ox (ऑक्स) बैल
27) to (टू) च्याकडे
28) be (बी) असणे
29) lo (लो) पहा
30) hi (हाय) नमस्कार
31) pa (पा) वडील

32) ma (मा) आई


चला आता तीन अक्षरी उपयोगी शब्दांची यादी वाचूया......

1) ant (ॲंट) मुंगी
2) all (ऑल) सर्व
3) and (ॲंड) आणि
4) ape (एप) वानर
5) are (आर) आहेत, आहेस
6) bat (बॅट) चेंडू फळी
7) bag (बॅग) पिशवी
8)  bad (बॅड) वाईट
 9) big (बिग) मोठा
 10) boy (बॉय) मुलगा
 11) but (बट) परंतु
 12) who(हू ) कोण
13) why (व्हाय) का
14) car (कार) कार
 15) cat( कॅट) मांजर

16) cut (कट) कापणे
 17) cup (कप) कप
18)  can (कॅन) शकणे
19) day (डे) दिवस
 20) dog (डॉग) कुत्रा
 21) dig (डिग) खोदणे
22)  dam (डॅम) धरण
 23) don (डॉन) डाकू
 24) dry (ड्राय) कोरडा
25) dip (डीप) बुडवणे
26) den (डेन) गुहा
 27) eat (इट) खाणे
28) ear (इअर) कान
 29) fan (फॅन) पंखा
30) fit (फिट) योग्य
31) fry (फ्राय) तळणे
32) try (ट्राय) प्रयत्न करणे
33) dry (ड्राय) कोरडा करणे
34) cry (क्राय) रडणे
 35) cot (कॉट) पलंग
 36) bat (बॅट) वटवाघुळ
37)  hat (हॅट) टोपी

38) mat( मॅट) चटई
39) man (मॅन) माणूस
 40) fan (फॅन) पंखा
 41) son (सन )पुत्र
42)  sun (सन) सूर्य
43) hen (हेन) कोंबडी
44) six(सिक्स) सहा
45) see (सी) पाहणे
46) say (से) म्हणणे
47)  men (मेन) माणसे
 48) ten (टेन) दहा
 49) joy (जाॅय) आनंद
 50) toy (टॉय) खेळणे
 51) shy (शाय) लाजणे
 52) pen (पेन) पेन
 53) zoo( झू) प्राणीसंग्रहालय
54) too( टू) सुद्धा
55) gun (गन) बंदूक
 56) fun (फन) गंमत
57) nun (नन) साध्वी

58) ray( रे) किरण
59) run( रन) धावणे
60) red (रेड )लाल
 61) net (नेट) जाळी
62) not (नाॅट) नाही
 63) hot (हॉट) गरम
64) sin (सिन) पाप
 65) may (मे) शक्यता
 66) mud (मड) चिखल
 67) God (गाॅड) देव
 68) top (टॉप) भोवरा
 69) wax (वॅक्स) मेण
 70)way (वे) रस्ता
 71) woo (वू) लाडीगोडी लावणे
72)  win (विन) जिंकणे
 73) wet (वेट) ओला
 74) kid (कीड) मुल
 75) lay (ले) मांडणे
 76) lad (लॅड) मुलगा
 77) leg (लेग) पाय
 78) let (लेट) परवानगी देणे
 79) pot (पाॅट) भांडे
 80) put( पुट) ठेवणे

81) new (न्यू )नवीन
82) one (वन) एक
83)  pig (पिग )डुक्कर
 84) sad (सॅड )दुखी
 85) sue( स्यू)फिर्याद देणे
86) now (नाउ) आता
 87) out (आउट) बाहेर
88) rag( रॅग )चिंधी
89) saw( साॅ )करवत
 90) tax (टॅक्स) कर
91) but (बट )परंतु
92) owl (आउल) घुबड
93) raw( राॅ) कच्चा
94) sea( सी) समुद्र
95) tie( टाय )बांधणे

 96) oak (ओक) ओक वृक्ष
 97) own (ओन) च्या मालकीचा असणे
 98) rod( राॅड) गज किंवा दांडा
99) set (सेट) सुरूवात करणे
100) toe( टो) पायाचे बोट
101) old ( ओल्ड) जुना
102) pan (पॅन) तवा
 103) rob( राॅब) लुबाडणे
104) sky (स्काय) आकाश
 105) tow (टो) 
106) off (ऑफ) बंद ,दूर
 107) pad ( पॅड) क्रिकेटच्या खेळात वापरली जाणारी गादी
108)  rot( रॉट) सडणे
109) sly ( स्लाई)  कावेबाज
110) two (टू) दोन
111)odd (ऑड) विषम
112) paw( पाॅ) पंजा
 113) rub (रब) चोळणे
 114) rue (रू) पश्चाताप करणे
 115) sow (सो) पेरणे
116)  use (यूस) वापरणे
117) jar (जार) बरणी
 118) lie (लाय) खोटे बोलणे
119) low (लो) कमी 
 120) jaw(जाॅ) जबडा
 121) add (ॲड) मिसळणे
122) act (ॲक्ट) कृती
123)  age (एज) वय
 124) ago (अगो) पूर्वी
 125) law (लाॅ) कायदा
 126) mix मिक्स)मिसळणे
 127) mug (मग) घोकंपटी करणे
128)  ask (अस्क)विचारणे
 129) ash (ॲश) राख
130)  egg( एग) अंडे


131) ass (ॲस) गाढव
 132) air (एअर) हवा
133)  for (फाॅर) च्या साठी
 134) doe (डो) एक प्रकारची हरीण
 135) any (एनी) कोणतेही
136) tom (टाॅम) बोक्या
137)  arm (आर्म) बाहू
 138) aim (एम) उद्दिष्ट किंवा ध्येय
 139) axe (एक्स) कुर्हाड
140) mad (मॅड) वेडा
141) map (मॅप) नकाशा
142) job (जाॅब) नोकरी
143)  key( की) चावी
144)  jug (जग)
145)  tip( टीप) टोक
 146) the (द) ते
147) gap (गॅप) आंतर
 148) gas (गॅस) वायु
149)  get (गेइट) मिळवणे
 150) gym( जीम) व्यायाम शाळा
151) has (हॅज) जवळ आहे
152)  had (हॅड) जवळ होता
153) her (हर) तिचा, तिची, तिचे
 154) guy (गाय) कोणीही व्यक्ती
155) him (हिम) त्याला
 156) hue (ह्यू) रंग
157) his (हिज) त्याचा, त्याची, त्याचे
158) hut (हट) झोपडी
159) hug( हग) मिठी मारणे
160) hit (हिट) फटका मारणे
161) ice (आइस) बर्फ
162) inn (इन) खानावळ
163) ink (इंक) शाई
164) ill( इल) आजारी
165)  tea( टी) चहा
166) tap (टॅप) नळ
 167) spy (स्पाइ) हेर
 168) sum (सम) रक्कम
 169) sit( सीट) बसणे
 170) sir (सर) साहेब
171) rug( रग) जाड कांबळे
172)  pin (पीन) टाचणी
173) row (रो) रांग
174) pie (पाइ) एक प्रकारचा केक
 175) pea (पी) वाटाणा
 176) our (अवर) आमचा, आमची, आमचे
177) oil (ऑइल) तेल
178) mid( मिड) मध्य
179)  lot (लाॅट) पुष्कळ

 180) lip( लीप) ओठ
 181) jam (जॅम) 
 182) van (व्हॅन) चार चाकी गाडी
183) via( व्हाया) च्या मार्गे
184) vow (वो) प्रतिज्ञा करणे
185) was (वाज) होता किंवा होती
 186) war( वार) युद्ध किंवा लढाई
187) wee (वी) लघवी करणे
188) wit (विट) शहाणपणा
189) yet (येट) अजून पर्यंत
 190) you( यू) तू किंवा तुला
191) bar (बार) गज
192) bus (बस) बस गाडी
 193) bay (बे) उपसागर
194) bye( बाइ) निरोप देणे
 195) bee (बी) मधमाशी
196) buy (बाइ) खरेदी करणे
197) cow( काउ) गाय
 198) bed (बेड) अंथरूण
199) beg (बेग) भीक मागणे
200) cub (कब) छावा
 201) dad (डॅड) पप्पा किंवा वडील
202) die (डाइ) मरणे
 203) dim (डिम) अंधूक
 204) moo (मू) गाईचे हंबरणे
205)  dog( डाॅग) कुत्रा
206) dot (डाॅट) ठिपका
207) bin (बीन) कणगी
208)  box (बाॅक्स) पेटी
 209) cap (कॅप)  टोपी
 210) ego (इगो) अहंकार
211) end (एंड) शेवट
 212) eye (आय) डोळा
213) fat( फॅट) जाड
214) few (फ्यू) थोडे
 215) fig (फिग) अंजीर
216) fix (फिक्स) नेमका
217) fly (फ्लाइ) उडणे
 218) fur (फर) प्राण्यांच्या अंगावरील बारीक केस
219)  foe (फो) शत्रू
220)  fox( फाॅक्स) कोल्हा

221) sip  (सीप) घुटके घेणे
222) ewe(यू) मेंढी
223) ram(रॅम) मेंढा
224) bug(बग) ढेकूण
225) fog (फाॅग) दाट धुके

226) nag (नॅग) सतावणे, छळणे
227) nut (नट) सुपारी
228) win (विन) जिंकणे
229) pat (पॅट)  थोपटणे
230) elf (एल्फ) छोटी परी

231) bud (बड) कळी

__________________________________________________

Friday, October 29, 2021

Good thoughts together

 नमस्कार मित्रांनो,
आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाची अशी शब्दसमूहाबद्दल एक शब्द या प्रकारची माहिती शिकून घेऊया. आपण बऱ्याच वेळा बघतो वेगवेगळे शब्द वापरून एका विशिष्ट शब्दाचे वर्णन केले जाते. चला तर मग कोणते आहेत ते शब्द लगेच शिकून घ्यायला तयार राहा.

-----------------------------------------------------------------------------

शब्दसमूहाबद्दल एक शब्द


1)देव आहे असे मानणारा - अस्तिक
2) देव नाही असे मानणारा- नास्तिक
3) आकाशातील तारे यांचा पट्टा -आकाशगंगा
4) स्वतःचे काम स्वतः करणारा- स्वावलंबी
5) धन्याशी निष्ठेने वागणारा- स्वामीनिष्ठ
6) श्रम करून जीवन जगणारा -श्रमजीवी
7) संकटाचे निवारण करणारा -विघ्नहर्ता
8) मृत्यूवर विजय मिळवणारा- मृत्युंजय
9) दुसऱ्याच्या मनातले जाणणारा -मनकवडा
10) केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा- कृतज्ञ
11) केलेले उपकार विसरणारा- कृतघ्न
12) जिथे जन्म झाला आहे तो देश -जन्मभूमी
13) जिथे आपण काम केले तो भाग -कर्मभूमी
14) ज्याच्या आरपार दिसू शकते असे -पारदर्शक
15) ज्याच्या आरपार दिसत नाही असे- अपारदर्शक
16) हितासाठी असलेली राज्य पद्धती -लोकशाही
17) दगडासारखे कठोर हृदय असणारा -पाषाणहृदयी
18) जाणून घेण्याची इच्छा असणारा -जिज्ञासू
19) हाताने केलेली बाणा खुणांची भाषा - करपल्लवी
20) सर्व गोष्टींची माहिती ठेवणारा - सर्वज्ञानी

21) भरपूर आयुष्य असणारा - दीर्घायुषी
22) दररोज प्रसिद्ध होणारे - दैनिक
23) नारळाच्या झाडाची पाने - झावळ्या
24) पाण्यात राहणारे प्राणी - जलचर
25) घोडे बांधण्याची जागा - तबेला
26) कधीही मरण नसणारे - अमर
27) शरीराला कष्ट न देता काम करणारा - अंगचोर
28) पायापासून डोक्यापर्यंत - आपादमस्तक
29) तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट - दंतकथा
30) हळूहळू घडून येणारा बदल - उत्क्रांती
31) जन्मापासून श्रीमंत असलेला - गर्भश्रीमंत
32) चार पाय असलेला - चतुष्पाद
33) जगाचा स्वामी - जगन्नाथ
34) इच्छित वस्तू देणारी काल्पनिक गाय - कामधेनु
35) इच्छित वस्तू देणारा काल्पनिक वृक्ष - कल्पवृक्ष
36) इच्छिलेले देणारा काल्पनिक मणी - चिंतामणी
37) जाणून घेण्याची इच्छा असणारा - जिज्ञासू
38) हट्टीपणा करणारा - दुराग्रही
39) शत्रूला सामील झालेला - फितूर
40) आई वडील नसलेला - पोरका
41) पंधरा दिवसांचा काळ - पंधरवडा
42) जिचा पती जिवंत आहे अशी - सुवासिनी
43) दोन नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण - संगम
44) लोकांना आवडणारा - लोकप्रिय
45) व्याख्यान देणारा - व्याख्याता
46) वाट दाखवणारा - वाटाड्या
47) वर्षांनी प्रसिद्ध होणारे - वार्षिक
48) दगडावर  केलेले कोरीव काम - शिल्प
49) नेहमी खरे बोलणारा - सत्यवादी
50) शत्रू कडील बातमी काढून आणणारा - हेर
51) बोधपर वचन - सुभाषित


51) भाषण करण्याची कला - वक्तृत्वकला
52) कायम टिकणारे - शाश्वत
53) धन्याशी निष्ठेने वागणारा - स्वामीनिष्ठ
54) स्वतःचा मुळीच अभिमान नसणारा - स्वाभिमानशून्य
55) स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारा - स्वच्छंदी
56) अंतकरणाला पाझर फोडणारे - हृदयाद्रावक
57) आठवड्याने प्रसिद्ध होणारे नियतकालिक - साप्ताहिक
58) मूर्तीची पूजा करणारा - मूर्तिपूजक
59) मोजकाच आहार घेणारा - मिताहारी
60) रत्नांनी मढवलेले - रत्नजडित
61) बारा जणांचा कारभार - बारभाई
62) दुसऱ्याच्या मनातले जाणणारा मनकवडा
63) मोजकेच बोलणारा - मितभाषी
64) कमालीचा मूर्ख - मूर्खशिरोमणी
65) राजाची स्तुती करणारा व्यक्ती - भाट
66) आई वडील नसलेला - पोरका
67) जगाचा नाश होण्याची वेळ - प्रलयकाळ
68) जुन्या मतांना चिकटून राहणारा - सनातनी
69) कसलेही डाग नसलेला - निष्कलंक
70) कोणतेही व्यसन नसलेला - निर्व्यसनी
71) कसलीही लाज नसलेला - निर्लज्ज
72) कोणाचाही आधार नसलेला - निराधार
73) कशाचीही इच्छा नसणारा - निरीच्छ
74) काटकसरीने खर्च करणारा - मितव्ययी
75) अग्नीची पूजा करणारा - अग्निपूजक
76) ज्याला कोणीही शत्रू नाही असा - अजातशत्रू
77) फुकट जेवण मिळण्याचे ठिकाण - अन्नछत्र
78) ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असा - अतुलनीय
79) अगदी पूर्वीपासून राहणारे - आदिवासी
80) कामात गढून गेलेला - कार्यमग्न
81) तीन रस्ते एकत्र येतात ती जागा - तिठा
82) दोन नद्यांमधील प्रदेश - दुआब
83) खूप दानधर्म करणारा - दानशूर
84) तप करण्याची जागा - तपोभूमी
85) म्हातारपणी बुद्धीला झालेला विकार - म्हातारचळ
86) भांडण उकरून काढणारा व्यक्ती - भांडकुदळ
87) एकमेकांवर अवलंबून असणारे - परस्परावलंबी
88) डोंगर पोखरून आरपार नेलेला रस्ता - बोगदा
89) पाण्याखालून चालणारी बोट - पाणबुडी
90) शंकराची उपासना करणारा - शैव
91) दुसऱ्याचे भाषण ऐकणारा - श्रोता
92) स्वतःशी केलेले भाषण - स्वगत
93) आठवड्याने प्रसिद्ध होणारे नियतकालिक - साप्ताहिक
94) एकाच काळातील - समकालीन
95) माकडाचा खेळ करणारा - मदारी
96) कोणालाही कळू न देता - बिनबोभाट
97) ज्याला खूप माहिती आहे असा - बहुश्रुत
98) नाणी पाडण्याचा कारखाना - टाकसाळ
99) श्रम न करता खाणारा - ऐतखाऊ
100) वाटेल तसा पैसा खर्च करणे - उधळपट्टी
101) दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी झोप - वामकुक्षी
102) व्यवहाराविषयी काहीही न कळणारा - व्यवहारशून्य
103) दगडावर केलेले कोरीव काम - शिल्प
104) श्रद्धा ठेवून वागणारा - श्रद्धाळू
105) स्वतःचा अभिमान असणारा - स्वाभिमानी
106) स्वतः श्रम करून मिळवलेले - स्वकष्टार्जित
107) चांदणे असलेला पंधरवडा - शुक्लपक्ष
108) नवऱ्या मुलाची आई - वरमाय
109) फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय - पाणपोयी
110) माशासारखे डोळे असणारी स्त्री - मीनाक्षी
111) निरर्थक गोष्टी - भाकडकथा
112) दर महिन्याला प्रसिद्ध होणारे नियतकालिक - मासिक
113) मृत्यूवर विजय मिळवणारा - मृत्युंजय
114) चांगला असा विचार - सुविचार
115) लिहिता वाचता न येणारा - निरक्षर
116) लिहिता वाचता येते असा - साक्षर
117) जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री - विधवा
118) ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष - विधुर
119) अचूक गुणकारी असे - रामबाण
120) सूर्योदयापूर्वीचा काळ - पहाट
121) आजारी लोकांची शुश्रूशा करणारी - परिचारिका
122) कोणाचीही बाजू न घेता न्याय देणारा - निष्पक्षपाती
123) काळोख्या रात्रीचा पंधरवडा - कृष्णपक्ष
124) आकाशाचा वेध करणारा - गगनभेदी
125) ज्याचा विसर पडणार नाही असे - अविस्मरणीय
126) न टाळता येणारे - अटळ
127) आकाशातील तार्‍यांचा पट्टा - आकाशगंगा
128) पूर्वी कधी घडले नाही असे - अपूर्व
129) जे साध्य होणार नाही असे ते - असाध्य
130) लहान मुलाला झोपवण्यासाठी गायलेले गाणे - अंगाईगीत





Sunday, October 24, 2021

Abbreviation: Short forms

 

नमस्कार मित्रांनो,

आज आपण आपल्या दररोजच्या जीवनात उपयोगी पडणारी अतिशय महत्त्वाची अशी माहिती पाहूया. आपण दररोजच्या जीवनात बोलताना ATM कार्ड, PAN कार्ड,PIN नंबर, LPG गैस, ICU , MRF टायर, SMS असे  कितीतरी इंग्रजी  शब्दांची संक्षिप्त रूपे वापरतो. पण या शब्दांचे पूर्ण नाव किंवा full form आपल्याला माहीत नसते.कधी कधी असे पूर्ण नाव वाचून आपल्याला खूपच आनंद मिळू शकतो. चला तर मग आज आपण आपल्याला खूप वेळा उपयोगी पडणाऱ्या काही महत्त्वांच्या शब्दांचे फुल फॉर्म पाहूया.....

1) FB - Facebook

2) SMS - Short Message Service

2) MBBS- Bachelor of Medicine and Bachelor of Surgery

3) BAMS- Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery.

4) BHMS - Bachelor of Homeopathic Medicine and Surgery

5) BDS - Bachelor of Dental Surgery

6) DHMS - Diploma in Homeopathic Medicine and Surgery

7)BEMS - Bachelor of Eastern Medicine and Surgery

8)MD - Doctor of Medicine

9)DGO - Diploma in Gynecology and Obstetrics

11) MS - Master of Surgery

11) BE - Bachelor of Engineering

10) MA - Master of Arts

11) BA - Bachelor of Arts

12) HSC - Higher Secondary School Certificate

13) SSC- Secondary School Certificate

14) ITI - Industrial Training Institute

15) IIT - Indian Institute of Technology

16) AIIMS- All India Institute of Medical Science

17) B Sc - Bachelor of Science

18) M Sc - Master of Science

19) B Com- Bachelor of Commerce

20) M Com- Master of Commerce

21) KG - Kindergarten

22) PG - Post Graduation

23) NDA - National Defense Academy

24) MPSC- Maharashtra Public Service Commission

25) UPSC- Union Public Service Commission

26) IAS- Indian Administrative Service

27) IPS- Indian Police Service

28)IRS- Indian Revenue Service

29) IFS- Indian Foreign Service

30) ICS- Indian Civil Service

31) Ph D - Doctor of Philosophy
32) MBA - Master of Business Administration
33) B Ed - Bachelor of Education
34) M Ed - Master of Education
35) B Tech- Bachelor of Technology


36) M Tech - Master of Technology

37) DBM- Diploma in Business Management
38) LLB- Bachelor of Laws
39) NCC- National Cadet Corps
40) CA - Chartered Accountant

41) D Pharm - Diploma in Pharmacy

42) B Pharm - Bachelor of Pharmacy
41) LPG - Liquified Petroleum Gas
42) ATM - Automated Teller Machine
43) KYC - Know Your Customer
44) PAN - Permanent Account Number

45) MLA - Member of Legislative Assembly
46) MP - Member of Parliament
47) CBI - Central Bureau of Investigation
48) CID - Criminal Investigation Department
49) CM - Chief Minister
50) PM - Prime Minister

51) SP - Superintendent of Police
52) DCP - Deputy Commissioner of Police
53) ACP - Additional Commissioner of Police
54) IG - Inspector General
55) DIG - Deputy Inspector General
56) Dy SP -  Deputy Superintendent of Police
57) PI - Police Inspector
58) PSI - Police Sub Inspector

58) PC - Police Constable
59) LIC - Life Insurance Corporation

60) SC- Supreme Court
61) HC- High Court
62) ICJ - International Court of Justice
63) CJ - Chief Justice 
64) C/O - care of
65) SBI - State Bank of India


66) HDFC - Housing Development Finance Corporation Limited
67) BOI - Bank of India

68) RBI - Reserve Bank of India
68) ICICI - Industrial Credit and Investment Corporation of India limited

69) NASA - National Aeronautics and Space Administration
70) ISRO - Indian Space Research Organization
71) OK - All correct
72) Mr - Master or Mister
73) Mrs - Mistress
74) NOC - No Objection Certificate
75) IAF - Indian Air Force
76) am - ante meridiem
77) pm - post meridiem
78) RADAR - Radio Detecting and Ranging
79) RIP - requiescat in pace ,rest in peace
80) PIN - Postal Index Number

81) STD - Subscriber Trunk Dialing
82) VIP - Very Important Person
83) RAW - Research and Analysis Wing
84) PWD - Public Work Department
85) PA - Personal Assistant
86) SC - Scheduled Castes
87) ST -  Scheduled Tribes
88) OBC - Other Backward Category

89) SBC - Special Backward Classes
89) NT - Nomadic Tribes
90) VJ - Vimukta Jati 
91) MSEB - Maharashtra State Electricity Board
92) HUDCO - Housing and Urban Development Corporation
93) CIDCO - City and Industrial Development Corporation of Maharashtra
94) ICU - Intensive Care Unit
95)WWW - World Wide Web


96) UP - Uttar Pradesh
97) UNO - United Nations Organization
98) TV - Television
99) UK - United Kingdom
100)TB - Tuberculosis

101) MRF - Madras Rubber Factory
102) BMW - Bavarian Motor Works

103) SUV - Sport Utility Vehicle
104) USA - The United States of America
105) UAE - United Arab Emirates

106) DNA- Deoxyribonucleic Acid
107) PMO - Prime Minister Office
108) MO - Money Order, Medical Officer, Mail Order

Thursday, October 21, 2021

Noun: Case

 नमस्कार मित्रांनो,
आज आपण इंग्रजीतील अतिशय महत्त्वाचा पण खूप खूप सोपा असलेला व्याकरणाचा एक भाग शिकूया. मी सोपा ह्याच्यासाठी म्हणतोय कारण की, हा व्याकरणाचा भाग आपण कितीतरी वेळा वापरत असतो पण नक्की या भागाला काय म्हणतात हे आपल्याला ठाऊक नसते. पण बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये नामाच्या विभक्ति बद्दल विविध प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे चला तर मग आपण आता सुरु करूया  Noun : case म्हणजेच नामाची विभक्ती....
तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो नामाच्या किती विभक्ती आहेत ते..
साधारणपणे इंग्रजीमध्ये नामाच्या पाच विभक्त्या आहेत  ज्याला आपण इंग्रजीमध्ये Noun - The Case असे म्हणतो. पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा...हे सगळं तुम्ही अगोदरच कुठेतरी वाचलेलं, पाहिलेलं किंवा लिहिलेलं आहे बरं का... आता मात्र फक्त आपण त्याची उजळणी करतोय.


1. The Nominative Case:

 याला इंग्रजीमध्ये नामाची प्रथमा विभक्ती असे म्हणतात. जेव्हा नामाचा उपयोग वाक्यामध्ये कर्ता म्हणून केला जातो तेव्हा त्या नामाची ती प्रथमा विभक्ती असते. खालील इंग्रजी वाक्ये काळजीपूर्वक वाचा.खालील प्रत्येक वाक्यामध्ये नामाचा उपयोग वाक्याचा कर्ता म्हणून केलेला आहे.

1. Aditya is reading a book.
2. Mohan went to his school.
3. Rajesh has played cricket.
4. Seema came back yesterday.
5. A dog was barking.
6. Bangalore is a clean city.
7. Gold is a precious metal.
8. Farmers work very hard.
9. Dilip sang a song.
10. Monkeys are playing tricks.

वरील दहा वाक्यामध्ये विविध नामे ही वाक्याचा कर्ता म्हणून काम करत आहेत म्हणून ही नामाची प्रथमा विभक्ती आहे.

----------------------------------------------------------------------------------


2.The Possessive Case : 

या विभक्तीला मराठीमध्ये षष्टी विभक्ती असे म्हणतात. जेव्हा एखाद्या नामाचा उपयोग मालकी हक्क किंवा अधिकार दाखविण्यासाठी केला जातो तेव्हा नामाची षष्ठी विभक्ती वापरली जाते. खालील इंग्रजीतील दहा वाक्ये जर आपण काळजीपूर्वक वाचली तर हा विभक्तीचा प्रकार आपल्या चटकन आणि सहजपणे लक्षात येतो. येथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. षष्ठी विभक्ती मध्ये नामाची मालकी दाखविण्यासाठी  नामानंतर Apostrophe नावाचे एक विरामचिन्ह वापरावे लागते. ते कसे वापरतात ते पुढील वाक्यात बघा....


1. This is Dilip's car.
2. That is Soham's book. 
3. This is girls' hostel.
4. It is Rani's garden. 
5. Anil Kapoor's film will be released very soon.
6. There is  Surekha's farm house. 
7. That is Anil's bungalow.
8. Here is Meena's bicycle.
9. I visited Rajesh Shinde's blog.
10. He stole Vivek's pencil. 

आता खालील काही शब्द काळजीपूर्वक वाचा.....

   Dilip's car - दिलीपची कार
Soham's book-सोहमचे पुस्तक
girl's hostel-एका मुलीचे होस्टेल
girls' hostel-अनेक मुलींचे हॉस्टेल
cow's tail-एका गाईचे शेपूट
cows' tail-अनेक गाईंच्या शेपट्या
Anil's bungalow-अनिलचा बंगला
Vivek's pencil-विवेकची पेन्सिल
Meena's bicycle-मीनाची सायकल
Surekha's farm house-सुरेखाचे शेतातील घर
Ajay and Vijay's car -अजय आणि विजय या दोघांची एक कार
Ajay's and Vijay's car - अजय आणि विजय यांच्या वेगळ्यावेगळ्या कार

---------------------------------------------------------------------------------


3. Vocative Case: 

आपण बऱ्याच वेळा आपल्या सभोवती असलेल्या मुलांना, मित्रांना, आई-वडील यांना किंवा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना हाक मारून बोलवत असतो. उदाहरणार्थ खालील वाक्ये वाचा...
आदित्य, इकडे ये.
विजय, खाली बस.
अशाप्रकारे इंग्रजीमध्ये पण हाक मारून नावाचा उल्लेख केल्यानंतर त्याला संबोधन विभक्ती किंवा Vocative Case असे म्हणतात. येथे आपल्याला इंग्रजीत लिहितांना एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची आहे.
ती म्हणजे इंग्रजीत वाक्य लिहीत असताना ज्याच्या नावाचा उल्लेख केला त्या नावानंतर आपल्याला स्वल्पविराम म्हणजे comma वापरावा लागतो. आता खालील इंग्रजीतील काही वाक्ये बघा म्हणजे लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल.

Aditya, come here.
Vijay, sit down.
Friends, help me please.
God, help me.
Follow me, Vishal.
Students, keep silence in the classroom.
Anil , close your eyes.
Surekha, don't open that window.
Sukanya, complete your homework.
Folks, listen my words carefully.

----------------------------+---------+-+++++------------------------------


4. Objective Case: 

 जेव्हा एखादे नाम हे वाक्यातील क्रियापदाचे कर्म म्हणून काम करते तेव्हा त्या  नामाची विभक्ती द्वितीया विभक्ती म्हणजे Objective case असते. खालील दहा वाक्ये काळजीपूर्वक वाचल्यानंतर  लगेच सगळी विभक्ती आपल्या लक्षात  येईल.

Aditya sings a song.
Mohan writes a letter.
Vijay opens the door.
Rahul plays football.
I  help friends.
Farmer cuts a tree.
India win the match.
Refugees visit India.
Govind makes a kite.
Teacher teaches English.


वरील दहा वाक्यांमध्ये a song, a letter, the door, football, friends, a tree, the match, India, a kite आणि English ही दहा नामे द्वितीया विभक्ती मध्ये आहेत. वाक्यातील द्वितीया विभक्ती ओळखण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. वाक्यातील क्रियापदाला काय? हा प्रश्न विचारला की, द्वितीया विभक्ती मधील नाम समजते. खालील दोन उदाहरणे बघा....


Aditya sings song.
What does Aditya sing ? - a song.
Mohan writes a letter.
What does Mohan write? - a letter.
Farmer cuts a tree.
What does a farmer cut? - a tree.

-------------------------------------------------------------------------------

5. The Dative Case: 

 इंग्रजीमधील वाक्यात कर्म दोन प्रकारचे असतात. एक प्रत्यक्ष कर्म आणि दुसरे अप्रत्यक्ष कर्म. वरील गोष्टी थोड्याशा अवघड जरी वाटत असतील तरी त्या खूप सोप्या आहेत हे तुम्हाला खालील वाक्य वाचल्यानंतर लगेच लक्षात येईल. प्रत्यक्ष कर्म म्हणजे direct object व अप्रत्यक्ष कर्म म्हणजे indirect object होय. वाक्यातील जे नाम प्रत्यक्ष कर्म असते त्याची द्वितीया विभक्ती असते तर जे नाम अप्रत्यक्ष कर्म असते त्याची  चतुर्थी विभक्ती असते. वरील चौथ्या प्रकारात आपण प्रत्यक्ष कर्म म्हणजे द्वितीया विभक्ती बद्दल शिकलो आता आपण चतुर्थी विभक्ती बद्दल शिकूया. एका वाक्यात जेव्हा दोन कर्म असतात तेव्हा वस्तू ही प्रत्यक्ष कर्म असते तर व्यक्ती ही अप्रत्यक्ष कर्म असते. खालील वाक्य शांतपणे वाचल्यानंतर आपल्याला सर्व गोष्टी लगेच लक्षात येतात.....


1) I gave Aditya a pencil.

Aditya - Indirect object (Dative Case)
a pencil - Direct object ( Objective case)


2) I told Madhav a story.

Madhav - Indirect object (Dative Case)
a story - Direct object (Objective Case)


3) I taught Dipak Mathematics.

Dipak - Indirect object.(Dative Case)
Mathematics - Direct object (Objective Case)


_--------------------------------------------------------------------------------






Sunday, August 1, 2021

Types of Verbs

 नमस्कार मित्रांनो,

आज आपण इंग्रजी भाषेत क्रियापदे किती प्रकारची असतात ते पाहूया. आपण इंग्रजी विषयाची भरपूर क्रियापदे पाठ करतो आणि त्यांचा दैनंदिन जीवनात नियमीतपणे वारंवार   वापर करतो. क्रियापदामुळे आपल्याला वाक्याचा  काळ समजतो.आपल्याला माहिती आहे की, क्रियापद हा वाक्याचा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही.चला तर मग आपण क्रियापदाचे कोणकोणते प्रकार आहेत ते  पाहूया आणि कायमचे लक्षात ठेवूया.


1. Strong Verb: ज्या क्रियापदाचे भूतकाळी रूप व तिसरे रूप तयार करत असताना त्यांच्या स्वरांमध्ये बदल होतो त्या क्रियापदांना Strong Verbs असे म्हणतात.
खालील उदाहरणे बघा...
Break - broke - broken
Write -  wrote - written
Do -  did -  done
Swim -  swam  - swum
Fall -  fell - fallen
Sink -  sank - sunk


2. Weak Verb: ज्या क्रियापदाचे भूतकाळी रूप आणि तिसरे रूप तयार करत असताना त्यांच्या स्वरांमध्ये बदल होत नाही अशा क्रियापदांना Weak Verbs असे म्हणतात. 

खालील उदाहरणे बघा....

Hurt- hurt -hurt
Cast- cast -cast
Hit -hit - hit
Cut - cut - cut
Bid - bid - bid


3. Transitive Verbs: जी क्रियापदे वाक्यामध्ये आपल्या सोबत कर्म घेऊन येतात ती क्रियापदे त्या वाक्यामध्ये Transitive Verbs असतात. अशी क्रियापदे असलेले वाक्य ओळखायचे म्हणजे अशा वाक्यांचे Change the voice होते.

Examples.. 1) play, 2)read, 3) tell, 4) catch, 5) sell....etc.

I play cricket.
He reads a book.
She is telling a story.
He caught thieves.
My father will sell our cow.


4.Intransitive Verb: जी क्रियापदे वाक्यामध्ये आपल्यासोबत कर्म घेऊन येत नाहीत ती क्रियापदे त्या वाक्यामध्ये Intransitive Verbs असतात. अशा वाक्यांचे change the voice होत नाही.

Examples....1) go, 2) swim ,3) bark, 4) sleep, 5) cry... etc.

I go to school everyday.
He swims fast.
Dogs bark very loudly.
She is sleeping.
She cried out.


5.Auxiliary Verb: जी क्रियापदे वाक्यामध्ये मूळ क्रियापदासोबत वाक्याचा काळ दाखवण्यासाठी वापरली जातात त्यांना सहाय्यकारी क्रियापदे असे म्हणतात.

खालील सर्व शब्द वाचा....
am,is,are, was, were, do, does, did, has, have, had, will, would, shall, should, can, could, may, might, must, ought to, dare, need, used to.


6. Stative Verb: जी क्रियापदे केवळ अवस्था दाखवण्यासाठी वापरली जातात त्यांना Stative Verbs म्हणतात. लक्षात ठेवा, ही क्रियापदे चालू काळात  वापरली जात नाहीत. यांना चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ किंवा चालू भविष्यकाळ या काळात वापरू नये.

Examples...1) know, 2) remember, 3) forget, 4) forgive, 5) love...etc.

खालील वाक्ये काळजीपूर्वक वाचा....

1) He knows me. (correct)
1) He is knowing me.(incorrect)
2)  I will forgive you.(correct)
2) I am forgiving you. (Incorrect)


7. Dynamic Verb: जी क्रियापदे प्रत्यक्ष वाक्यात घडणाऱ्या कृती दर्शवण्यासाठी वापरली जातात त्यांना Dynamic Verbs असे म्हणतात. ही क्रियापदे आपण कोणत्याही काळात वापरू शकतो. ही क्रियापदे चालू काळातही वापरली जातात.


खालील उदाहरणे बघा....
1) read, 2) play, 3) jump, 4) run, 5) throw... etc.

1) Aditya is reading a book.
2) Students are playing on the ground.
3) Kids are jumping in the mud.
4) She is running very fast.
5) An athlete is throwing his javelin.



8. Defective Verb: ज्या क्रियापदांचे भूतकाळी रूप किंवा तिसरे रूप तयार करून लिहिता येत नाही किंवा त्यांना an infinitive म्हणून वापरता येत नाही त्यांना Defective Verbs असे म्हणतात.

  सर्व सहाय्यकारी क्रियापदे Defective Verbs आहेत....
Examples..... Can, could, will, would, may, might, must, shall, should, dare, need, used to, ought to. 



9. Finite Verb: ज्या क्रियापदाच्या रूपात वाक्याचा कर्ता  आणि काळ यानुसार बदल होतो त्याला  Finite Verb असे म्हणतात. 
खालील  क्रियापद  बघा आणि त्याच्यात कर्त्यानुसार आणि काळानुसार कसा बदल झाला ते बघा...


1) Go (गो) जाणे
I go to school. (go)
She goes to school. (goes)
They have gone to school.(gone)
We are going to school.(going)


10. Non- finite Verb: जे क्रियापद वाक्याचा कर्ता आणि काळ यानुसार बदलत नाही त्याला  Non- finite Verb असे म्हणतात.

Examples....
(play - प्ले- खेळणे)

खालील वेगवेगळ्या काळातील वाक्यात play च्या रूपात कोणताही बदल होत नाही...
I want to play cricket.
He wants to play cricket.
They wanted to play cricket.
They want to play cricket.


11. Regular Verb: जेव्हा क्रियापदाचे भूतकाळी किंवा तिसरे रूप तयार करत असताना d,t,n,ed,en यांचा वापर केला जातो तेव्हा त्यांना Regular Verbs असे म्हणतात.

Examples....

Learn - learnt - learnt
Visit- visited - visited
Provided - provided - provided


12. Irregular Verb: ज्या क्रियापदांचे भूतकाळी रूप आणि तिसरे रूप ed लावून होत नाही अशा क्रियापदांना irregular verbs असे म्हणतात.

खालील उदाहरणे काळजीपूर्वक वाचा...

Make - made- made
Say- said- said
Tell -told -told
Get- got- got
Hear- heard -heard
Think -thought - thought

Saturday, July 10, 2021

Types Of Questions

मित्रांनो नमस्कार, 

आपण इंग्रजी शिकत असताना वेगवेगळ्या प्रकारची माहिती शिकत असतो . जसे की नामांचे प्रकार, क्रियापदे आणि त्यांचे प्रकार, विशेषणांचे प्रकार आणि अजूनही भरपूर प्रकारची माहिती ...आज  आपण इंग्रजीतील प्रश्नांचे प्रकार अतिशय सोप्या पद्धतीने  शिकुया .
मला खात्री आहे तुम्ही जर खाली लिहिलेली माहिती एकवेळ मन लावून शांतपणे वाचली तर तुम्हाला प्रश्नांचे प्रकार अगदी पूर्णपणे समजून जातील . आणि तुम्हाला विचारलेला प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे हे तुम्ही एका क्षणात सांगू शकाल..चला तर मग घ्या शिकून झटपट .....

==============================
इंग्रजी भाषेत प्रश्नांचे दोन प्रकार पडलेले आहेत.
1)  Closed Questions 
2) Wh - type  Questions 

================================

आपण wh-type Questions ने सुरूवात करूया ...


जे प्रश्न What, Where, When, Why, Which, Whom, Whose, Who, How,  How many, How much, How far, How long, How often, How come, How old  या शब्दांनी सुरू होतात त्यांना wh-type Questions असे म्हणतात . 

चला आपण वरील शब्दांचे अर्थ आणि त्यांच्या मदतीने तयार केलेले प्रश्न बघूया ...


1)  What (व्हाट) काय
2)  Where (व्हेर) कोठे
3)  When (व्हेन) केंव्हा 
4)  Who (हू) कोण
5)  Why (व्हाइ) का
6)  Whose (हूज) कोणाचा, कोणाची, कोणाचे
7)  Whom (हूम) कोणाला
8) Which (विच) कोणता, कोणती, कोणते
9) How (हाउ) कसा
10) How many (हाउ मेनी) किती 
11) How much (हाउ मच) किती 
12) How long (हाउ लाँग) किती वेळ 
13) How often (हाउ आँफ्टन) किती वेळा 
14) How far (हाउ फार) किती दूर 

15) How come (हाउ कम) काय कारण

आता खालील प्रश्न वाचा ......
1)तू येथे काय करत आहेस ?
What are you doing here? 
2) तुझी पेन कोठे आहे ?
Where is your pen? 
3) सुनील केंव्हा गेला ?
When did Sunil go? 
4) तू कोण आहेस ?
Who are you? 

5) ती का निघून गेली ?
Why did she leave? 
6) हा कोणाचा चेंडू आहे ?
Whose ball is this? 
7) त्याने कोणाला मदत केली ?
Whom did he help? 
8) तुम्हाला कोणते पेय आवडते ?
Which beverage do you like? 

9) ती आता कशी आहे ?
How is she now? 
10) तुला किती रोपे हवीत ?
How many saplings do you want? 
11) गायीने किती पाणी पिले ?
How much water  did cow drink? 
12) तो दररोज किती वेळ खेळतो ?
How long does he play every day? 

13) तो किती वेळा जिंकला ?
How often did he win? 
14) तो किती दूर आहे ?
How far is he? 

15 ) मी तुला न भेटू शकण्याचे कारण काय ?
How come I can't meet you? 
=================≠=============

चला आता आपण Closed  Questions म्हणजे काय ते वाचूया .....


Closed Questions हा इंग्रजी भाषेतील अतिशय सोपा प्रश्न प्रकार आहे . या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे फक्त Yes किंवा No या दोन शब्दांतही देता येतात म्हणून हे एकदम सोपे प्रश्न असतात .. यांना  Yes/No type Questions असेही म्हणतात .  
खालील इंग्रजी शब्द वापरून आपण Yes/No type  Questions तयार करु शकतो ...

Am, Is, Are, Was, Were, Do, Does, Did, Have, Has, Had, Can, Could, Will, Would, May, Might, Shall, Should, Must...
================================

चला आता आपण सरावासाठी तयार केलेली वाक्ये वाचूया ....


1) Am I a good father? मी चांगला पिता आहे का ?
Ans: Yes/No.
2) Is he sauting fish ?  तो मासे तळत आहे का ?
Ans: Yes/No.
3) Are you at school? तू शाळेत आहे का ?

Ans: Yes/No.
4) Was Aditya tired? आदित्य थकलेला होता का ?
Ans: Yes/No.
5) Were people annoyed ? लोक चिडलेले होते का ?
Ans: Yes/No.

6) Had he won the lottery? त्याने सोडत जिंकलेली होती का ?
Ans: Yes/No
7) Have you seen a ghost? तू भूत पाहिलेले आहे का?
Ans: Yes/No
8) Has she taken her breakfast? तिने न्याहारी केलेली आहे का?
Ans: Yes/No
9) May I come in? मी आत येऊ का?
Ans: Yes/No.
10) Should I start now? मी आता सुरुवात करायला हवी का?
Ans: Yes/No

====================================




Friday, July 2, 2021

Marathi Opposite Words

 1) प्रकाश X काळोख
2) अंधार X उजेड 
3) कृपा X अवकृपा 
4) गुप्त X  उघड 
5) कडक X नरम
6) घट्ट X  सैल
7) विपुल X दुर्मिळ 
8) खुश X नाखूश
9) चवदार X बेचव
10) सत्कर्म X कुकर्म
11) प्रेम X द्वेष 
12) गावंढळ X सुसंस्कृत 
13) चंचल X स्थिर
14)  जमा X खर्च
15) आजी X माजी 
16) निर्माण X विध्वंस 
17) शीतल X तप्त
18) रसाळ X नीरस
19) नागरी X ग्रामीण 
20) आळशी X कामसू
21) दांडगट X दुबळा
22) अभ्यास X अनाभ्यास
23) जीवन X मरण
24) पथ्य X कृपथ्य
25) स्वीकार X धिक्कार 
26) कळस X पायथा
27) सल्ला X  बदसल्ला
28) कुचकामी X फलदायी 
29) टोकदार X बोथट
30) एकटा X दुकटा
31) सबळ X दुर्बळ 
32) उदय X अस्त
33) प्रमुख X गौण
34) टिकाऊ X ठिसूळ 
35) सुरेल X बेसुर
36) गुरूजी X विद्यार्थी 
37) बोलका X मितभाषी 
38) स्वामी X सेवक
39) कल्याण X अकल्याण
40) जड X चेतन
41) उताणा X पालथा
42) उंच X सखल 
43) निरागस X चतूर
44) क्षर X अक्षर
45) वियोग X संयोग
46) आघात X प्रघात 
47) खुळा X शहाणा
48) वैयक्तिक X सामुहिक 
49) अर्वाचीन X प्राचीन 
50) वंशज X पूर्वज

51) लोभी X निर्लोभी
52) मौल्यवान X कवडीमोल 
53) तेजी X मंदी
54) ऊन X सावली
55) थोरला X धाकटा
56) अतिरेकी X विवेकी
57) चवचाळ X सभ्य
58) आघाडी X पिछाडी
59) खंबीर X डळमळीत 
60) चढाई X माघार 
61) काळजी X बेपर्वाई 
62) हानी X लाभ
63) दुभती X भाकड
64)  अंध X डोळस
65) धूर्त X भोळा
66) खेद X हर्ष 
67) चैन X बैचेन 
68) साधार X निराधार 
69) गर्विष्ठ X विनम्र 
70) देव X दानव
71) लठ्ठ X कृश
72) धनवंत X कंगाल 
73) अग्रज X अनुज
74) सुकाळ X दुष्काळ 
75) सहेतुक X निर्हेतूक
76)  विधायक X विघातक
77) खट्याळ X गंभीर 
78) पौर्वात्य X पाश्चिमात्य 
79) उदार X अनुदार
80) कारस्थानी X सरळ
81) कोता X दिलदार 
82) नित्य X अनित्य 
83) धुरीन X अनुयायी 
84) सकाळ X संध्याकाळ 
85) कमाल X किमान 
86) अध्यापन X अध्ययन 
87) आंकुचन X प्रसरण
88) कृष्ण X धवल
89) काळा X गोरा
90) धीर X अधीर 
91) इमानदार X बेइमान 
92) इलाज X नाइलाज 
93) उधार X रोख
94) घनदाट X विरळ
95) इष्ट X अनिष्ट 
96) उगवती X मावळती
97) शहरी X ग्रामीण 
98) स्वामी X सेवक 
99) वृद्ध X तरूण
100) शुद्ध X अशुद्ध 

101) प्रशंसा X कुचाळी
102) पेय X अपेय
103) बंदी X परवानगी 
104) प्रागतिक X परंपरावादी 
105) अग्रज X अनुज
106) अवनती X उन्नती 
107) आचरण X दुराचरण
108) आसक्त X अनासक्त
109) दुर्गम X सुगम
110) दीन X श्रीमंत
111) सज्जन X दुर्जन 
112) अर्थ X अर्थहीन 
113) खिन्न X प्रसन्न 
114) शुष्कता X आद्रता
115) कर्णमधुर X कर्णकटू
116) सनातनी X सुधारक
117) गुळगुळीत X खडबडीत 
118) खंडण X मंडण
119) गमन X आगमन 
120) उदार X अनुदार 
121) कठोर X मऊ
122) अल्लड X पोक्त
123) तीक्ष्ण X बोथट
124) अमावस्या X पौर्णिमा 
125) देशभक्त X देशद्रोही 
126) पायथा X माथा
127) तारक X मारक
128) राजमार्ग X आडमार्ग
129) सदुपयोग X दुरूपयोग 
130) खंबीर X डळमळीत 

131) दिवस X रात्र 
132) वियोग X संयोग 
133) जय X पराजय 
134) श्रेष्ठ X कनिष्ठ 
135) जीवन X मरण
136) असह्य X सुसह्य 
137) राकट X नाजूक 
138) प्रचंड X चिमुकला 
139) भोगी X त्यागी
140) सुबक X बेढब
141) प्रशंसा X खरडपट्टी 
142) ओले X  सुके
143) वंदनीय X निंदनीय 
144) ग्राहक X विक्रेता
145) आवड X नावड
146) इहलोक X परलोक
147) औत्सुक्य X औदासिन्य
148) इत्यंभूत X त्रोटक 
149) अल्प X बहू
150) एकमत X दुमत

=============**=======================

Wednesday, June 23, 2021

List of synonyms, समानार्थी शब्द

 1) laugh (लाॅफ) हसणे
2) smile ( स्माईल) हसणे
3) giggle (गिगल) फिदीफिदी हसणे
4) grin (ग्रिन) दात काढून हसणे
5) simper (सिंपर) गालातल्या गालात हसणे
6) smirk (स्मर्क) कपटाने हसणे
7) cry (क्राइ) ओरडत रडणे
8) weep (वीप) रडणे
9) sob (साॅब)  हुंदके देत रडणे 
10) lament (लॅमेंट)  आक्रोश करत रडणे
11) wail ( वेइल) गळा काढून रडणे

12) hear (हिअर) ऐकणे
13) listen (लिसन)  ऐकणे
14) harken (हार्कन) ऐकणे 
15) see (सी) सहज पाहणे
16) look (लूक) उद्देशाने पाहणे
17) watch (वाॅच) टी व्ही वैगेरे पाहणे
18) behold (बीहोल्ड) निरखून पाहणे
19) gaze (गेझ) टक लावून पाहणे 
20) gawp (गाॅप) एखाद्याकडे मूर्खपणे सारखे पाहणे
21) stare (स्टेअर)  न्याहाळून पाहणे

22) glance (ग्लान्स) तिरप्या नजरेने पाहणे
23) peep (पीप) फटीतून (चोरून) पाहणे

24) cheat (चीट) फसवणे
25) swindle (स्विंडल) फसवणे
26) dupe (ड्यूप) फसवणे
27) delude (डिल्यूड) फसवणे
28) chouse (चाउझ) फसवणे
29) beguile (बिगाइल) फसवणे
30) cozen (कोझन) फसवणे
31) collude (कोल्यूड) फसवणे
32) humbug (हमबग) फसवणे
33) deceive (डिसीव) फसवणे 


34) 
35)
36)
37)
38)
39)
40)
41)
42)
43)
44)
45)
46)
47)
48)
49)
50)

Editing is in progress.... 

Thursday, June 17, 2021

List of Prepositions with Marathi meanings.

 नमस्कार मित्रांनो, 
आज आपण इंग्रजी भाषेतील prepositions  या  महत्त्वपूर्ण शब्दांची  माहिती शिकूया . हे असे शब्द आहेत जे आपण नेहमीच वापरतो .  वाक्यांतील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांसोबत असणारा संबंध दाखविण्यासाठी हे शब्द वापरले जातात. थोडक्यात सांगायचे म्हणजे हे शब्द  मिठासारखे काम करतात . भाजीत जर मीठ टाकले नाही तर भाजी जशी आळणी आणि बेचव होते तसेच वाक्यात जर योग्य ठिकाणी  preposition वापरले नाहीत तर वाक्य अर्थहीन होऊन जाते .  बरं मग तुम्हाला prepositions बद्दल  खालील माहिती आहे का ...? 


1)Preposition चे किती प्रकार आहेत ? 
2)त्यांचा वाक्यात किती ठिकाणी उपयोग होतो ?
3) इंग्रजी भाषेत किती preposition शब्द आहेत?
4) यांना preposition असे का म्हणतात ?


वरील सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया म्हणजे आपल्याला उदया चालून याविषयीची कोणीही काहीही माहिती विचारली तर बिनधास्तपणे सांगता आली पाहिजे .

======================================

प्रश्न क्रमांक 01)  इंग्रजी भाषेत किती प्रकारचे prepositions आहेत?


उत्तर : इंग्रजी भाषेत दोन प्रकारचे prepositions आहेत.


01 )  Simple Prepositions :
In, of, for, by, above, across, up, down, around, to, out, on, in, over, under, from, off..... 
आणि 
02) Compound Prepositions :
Into, upon, without, within, outside, inside, beside, before, beyond, below, between.... 

=====================================

प्रश्न क्रमांक 02) Prepositions वाक्यात कोठे वापरले जातात ?
उत्तर : Prepositions वाक्यात खालील तीन ठिकाणी वापरले जातात.
01) वाक्याच्या सुरूवातीला :

With whom has he come? 
02) वाक्याच्या मध्यभागात :

There is a book on the table. 

03) वाक्याच्या शेवटी : 

What are you talking about? 


======================================

प्रश्न क्रमांक 03)  इंग्रजी भाषेत किती Prepositions आहेत ?


 उत्तर:  इंग्रजी भाषेत  खालील प्रमाणे 100 पेक्षाही जास्त  Prepositions वापरले जातात.


1) before (बिफोर) च्या पूर्वी 
2) about (अबाऊट) च्या आसपास 
3) from (फ्रॉम) च्या पासून
4) for (फाॅर) च्या साठी 
5) since (सिन्स ) घटनेचे पहिले टोक
6) over (ओव्हर) च्या वर 
7) under (अंडर) च्या खाली 
8) towards (टुवार्डस) च्या कडे
9)  on (आँन) च्या वर
10) upon ( अपाॅन) च्या वर
11) above (अबोव्ह) च्या वर, च्या पेक्षा अधिक 
12) in (इन) च्या आत 
13) into ( इनटू) बाहेरून आत 
14) among (अमंग) च्या मध्ये 
15) between (बिटवीन) च्या मध्ये 

16) off ( आँफ) अलग, बंद, तुटणे, उड्डाण करणे
17) across (अक्राॅस) ला ओलांडून 

18) through (थ्रू) च्या मधून , च्या द्वारे
19) during (ड्युरिंग) च्या दरम्यान 
20) beyond (बियाँड) च्या पलीकडे
21) against (अगेन्स्ट) ला टेकून 
22) amidst (अमिड्सट) च्या मध्ये 
23) beside (बिसाइड) च्या जवळ 
24) after (अफ्टर) च्या नंतर 
25) beneath (बिनीथ) च्या तळाशी
26) below (बिलो) च्या खाली 
27) down (डाउन) खाली 
28) by (बाइ) जवळ, ने, वाजता
29) to (टू) ला, कडे
30) of (आँफ) चा,ची,चे
31) along with (अलाँग  विथ) 
32) along  (अलाँग) च्या कडेकडेने 
33) with (विथ) च्या बरोबर 
34) ago (अगो) च्या  पूर्वी
35) at - च्या कडे, वाजता, च्या आसपास 

36) behind (बिहाइंड) च्या पाठीमागे 
37) besides (बिसाइड्स) या व्यतिरिक्त 
38) within (विदीन)  च्या मर्यादेत
39) opposite (आपझिट)  समोरचा, समोर
40) out of (आउट ऑफ) च्या बाहेर, पलीकडे 
41) outside (आउटसाइड)  च्या बाहेर 
42) up (अप) वर
43) near (निअर)  जवळ
44) without (विदाउट) च्या शिवाय 
45) plus (प्लस) अधिक, मिळवून 
46) than (दॅन) पेक्षा 
47) bar (बार) खेरीज, शिवाय 
48) as for (अँज फार) त्याविषयी 
49) amid (अमिड) मध्यभागी 
50) ahead of (अहेड आफ) च्या समोर
51) past (पास्ट) च्या नंतर 
52) until (अंटील) पर्यंत
53) but (बट) शिवाय, खेरीज
54) till (टिल) पर्यंत 
55) amongst (अमंग्सट्) मध्ये, आत
56) round (राउंड) भोवती
57) throughout (थ्रुआउट) सुरूवातीपासून शेवटपर्यंत 
58) including (इनक्लुडिंग) धरून 
59) except (एक्सेप्ट) व्यतिरिक्त, शिवाय 
60) despite (डिस्पाइट) ची पर्वा न करता 
61) considering (कन्सिडरिंग) विचारात घेतल्यास
62) alongside (अलाँगसाइड) च्या लगत, बाजूने
63) per (पर) प्रति, दर एकास
64) aboard (अबोर्ड)  वर, आत
65) via (व्हाया) च्या मार्गाने, द्वारा
66) underneath (अंडरनीथ) खालच्या जागेत, च्या खाली 
67) up to (अप टू) पर्यंत
68) unlike (अनलाइक) च्या पेक्षा निराळा
69) concerning (कन्सर्निंग)  बद्दल 
70) up till (अप टिल) पर्यंत 
71) barring (बारिंग) च्या शिवाय 
72) pending (पेंडीग) तोवर, पर्यंत 
73) save (सेइव) शिवाय, खेरीज
74) excepting (एक्सेप्टिंग) शिवाय, खेरिज
75) instead of (इन्सटीड आफ) च्या ऐवजी 
76) following (फोलोविंग) 
77) like (लाइक) सारखा, असं
78) near (निअर) जवळ
79) in lieu of (इन लिउ आफ)  च्या ऐवजी 
80) due to (ड्युटू) च्या मुळे
81) next to (नेक्स्ट टू) च्या शेजारी 
82) in spite of (इन स्पाइट आफ) ची पर्वा न करता 
83) owing to (ओइंग टू) च्या मुळे 
84) in view of (इन व्हयू आफ)  चा विचार करता 
85) onto (आनटू) वर
86) together with (टुगेदर विथ) जोडीने घेऊन 
87) apart from (अपार्ट फ्राॅम) शिवाय 
88) because of (बिकाॅझ आफ)  च्या मुळे 
89) on account of (आन अकाउंट आफ) च्या प्रीत्यर्थ
90) in comparison with (इन कंपेरिजन विथ) च्या सोबत विचार करता 
91) away from (अवे फ्राॅम) या व्यतिरिक्त 
92) by means of (बाय मिन्स आफ) च्या मदतीने 
93) in accordance with (इन अकाॅर्डंस विथ) च्या अनुसार 
94) around (अराउंड) च्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत 
95) saving (सेव्हिंग) शिवाय, खेरीज
96) astride (अस्टराइड) दोन्ही बाजूंनी एक एक पाय टाकून 

97) on top of (आन टॉप आफ) च्या वर 
98) close to (क्लोज टू) जवळपास 
99) excluding (एक्सक्लुडिंग) सोडून, वगळून 
100) minus (माइनस) वजा
101) toward (टुवार्ड)  च्या दिशेने 
102) versus (वर्सस) विरूद्ध 

103) regarding (रिगार्डिंग) बद्दल 

104) notwithstanding (नाॅटविथस्टँडिंग)  असूनसुद्धा 

===================================
प्रश्न क्रमांक 04 : यांना prepositions असे का म्हणतात ?
उत्तर :  कारण  शब्दयोगी अव्यये ही वाक्यातील कर्माच्या पूर्वी आलेली असतात.
A preposition is a word or group of words used before a noun, pronoun or noun phrase. It is commonly used to show time, direction, place and location. 


Tuesday, June 15, 2021

Names of Flowers, फुलांची इंग्रजी नावे

 नमस्कार मित्रांनो, 
तुमचे आवडते फूल कोणते ?
 तुम्हाला कोणते फूल आवडते ?
फुले सर्वांना आवडतात ...पण फुलांची नावे सांगा म्हंटले तर आपल्याला फार फार तर पाच दहा फुलांची नावे सांगता येतात.
तेही मराठीत बरं का ....आणि इंग्रजी भाषेत दहा फुलांची नावे सांगायची वेळ आली तर मग विचारूच नका ...!
त्यासाठीच चला शिकूया महत्वाच्या  फुलांची इंग्रजी भाषेत नावे....!


1) Rose (रोझ्)  गुलाब
2) Tube rose (ट्यूब रोझ) निशिगंध 
3) Lotus (लोटस) कमळ
4) Jasmine (जस्मिन)  जाई
5) Champa (चंपा)  चाफा
6) Marigold (मेरीगोल्ड) झेंडू
7) Hibiscus (हिबीस्कस) जास्वंद 
8) Dhotra (धोतरा)  धोतरा
9) Mogra (मोगरा) मोगरा
10) Lily (लिली)  लिली
11) Night queen (नाईट क्वीन)  रातराणी
12) Pink rose (पिंक रोझ) कण्हेर 
13) Magnolia (मॅग्नोलिअ)  चाफा
14) Sunflower (सनफ्लावर) सूर्यफूल
15) Pandanus (पँडेनस) केवडा
16) Camomile (कॅममाइल) शेवंती
17) Bluebell (ब्लूबेल) निळ्या रंगाचे एक फूल 
18) Crossandra - अबोली
19) Frangiapani - सोनचाफा
20) Periwinkle -  सदाफुली 
21) Peacock flower - गुलमोहर 
22) Lantana Camera - घाणेरी

=============!!!!========================




Learn to Speak English

Let me play. मला खेळू दे Let me go मला जाऊ दे. Let me eat. मला खाऊ दे. Let me study. मला अभ्यास करू दे. Let me drink milk. मला दूध पिऊ दे. L...