नमस्कार मित्रांनो,
आज आपण इंग्रजी भाषेतील prepositions या महत्त्वपूर्ण शब्दांची माहिती शिकूया . हे असे शब्द आहेत जे आपण नेहमीच वापरतो . वाक्यांतील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांसोबत असणारा संबंध दाखविण्यासाठी हे शब्द वापरले जातात. थोडक्यात सांगायचे म्हणजे हे शब्द मिठासारखे काम करतात . भाजीत जर मीठ टाकले नाही तर भाजी जशी आळणी आणि बेचव होते तसेच वाक्यात जर योग्य ठिकाणी preposition वापरले नाहीत तर वाक्य अर्थहीन होऊन जाते . बरं मग तुम्हाला prepositions बद्दल खालील माहिती आहे का ...?
1)Preposition चे किती प्रकार आहेत ?
2)त्यांचा वाक्यात किती ठिकाणी उपयोग होतो ?
3) इंग्रजी भाषेत किती preposition शब्द आहेत?
4) यांना preposition असे का म्हणतात ?
वरील सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया म्हणजे आपल्याला उदया चालून याविषयीची कोणीही काहीही माहिती विचारली तर बिनधास्तपणे सांगता आली पाहिजे .
======================================
प्रश्न क्रमांक 01) इंग्रजी भाषेत किती प्रकारचे prepositions आहेत?
उत्तर : इंग्रजी भाषेत दोन प्रकारचे prepositions आहेत.
01 ) Simple Prepositions :
In, of, for, by, above, across, up, down, around, to, out, on, in, over, under, from, off.....
आणि
02) Compound Prepositions :
Into, upon, without, within, outside, inside, beside, before, beyond, below, between....
=====================================
प्रश्न क्रमांक 02) Prepositions वाक्यात कोठे वापरले जातात ?
उत्तर : Prepositions वाक्यात खालील तीन ठिकाणी वापरले जातात.
01) वाक्याच्या सुरूवातीला :
With whom has he come?
02) वाक्याच्या मध्यभागात :
There is a book on the table.
03) वाक्याच्या शेवटी :
What are you talking about?
======================================
प्रश्न क्रमांक 03) इंग्रजी भाषेत किती Prepositions आहेत ?
उत्तर: इंग्रजी भाषेत खालील प्रमाणे 100 पेक्षाही जास्त Prepositions वापरले जातात.
1) before (बिफोर) च्या पूर्वी
2) about (अबाऊट) च्या आसपास
3) from (फ्रॉम) च्या पासून
4) for (फाॅर) च्या साठी
5) since (सिन्स ) घटनेचे पहिले टोक
6) over (ओव्हर) च्या वर
7) under (अंडर) च्या खाली
8) towards (टुवार्डस) च्या कडे
9) on (आँन) च्या वर
10) upon ( अपाॅन) च्या वर
11) above (अबोव्ह) च्या वर, च्या पेक्षा अधिक
12) in (इन) च्या आत
13) into ( इनटू) बाहेरून आत
14) among (अमंग) च्या मध्ये
15) between (बिटवीन) च्या मध्ये
16) off ( आँफ) अलग, बंद, तुटणे, उड्डाण करणे
17) across (अक्राॅस) ला ओलांडून
18) through (थ्रू) च्या मधून , च्या द्वारे
19) during (ड्युरिंग) च्या दरम्यान
20) beyond (बियाँड) च्या पलीकडे
21) against (अगेन्स्ट) ला टेकून
22) amidst (अमिड्सट) च्या मध्ये
23) beside (बिसाइड) च्या जवळ
24) after (अफ्टर) च्या नंतर
25) beneath (बिनीथ) च्या तळाशी
26) below (बिलो) च्या खाली
27) down (डाउन) खाली
28) by (बाइ) जवळ, ने, वाजता
29) to (टू) ला, कडे
30) of (आँफ) चा,ची,चे
31) along with (अलाँग विथ)
32) along (अलाँग) च्या कडेकडेने
33) with (विथ) च्या बरोबर
34) ago (अगो) च्या पूर्वी
35) at - च्या कडे, वाजता, च्या आसपास
36) behind (बिहाइंड) च्या पाठीमागे
37) besides (बिसाइड्स) या व्यतिरिक्त
38) within (विदीन) च्या मर्यादेत
39) opposite (आपझिट) समोरचा, समोर
40) out of (आउट ऑफ) च्या बाहेर, पलीकडे
41) outside (आउटसाइड) च्या बाहेर
42) up (अप) वर
43) near (निअर) जवळ
44) without (विदाउट) च्या शिवाय
45) plus (प्लस) अधिक, मिळवून
46) than (दॅन) पेक्षा
47) bar (बार) खेरीज, शिवाय
48) as for (अँज फार) त्याविषयी
49) amid (अमिड) मध्यभागी
50) ahead of (अहेड आफ) च्या समोर
51) past (पास्ट) च्या नंतर
52) until (अंटील) पर्यंत
53) but (बट) शिवाय, खेरीज
54) till (टिल) पर्यंत
55) amongst (अमंग्सट्) मध्ये, आत
56) round (राउंड) भोवती
57) throughout (थ्रुआउट) सुरूवातीपासून शेवटपर्यंत
58) including (इनक्लुडिंग) धरून
59) except (एक्सेप्ट) व्यतिरिक्त, शिवाय
60) despite (डिस्पाइट) ची पर्वा न करता
61) considering (कन्सिडरिंग) विचारात घेतल्यास
62) alongside (अलाँगसाइड) च्या लगत, बाजूने
63) per (पर) प्रति, दर एकास
64) aboard (अबोर्ड) वर, आत
65) via (व्हाया) च्या मार्गाने, द्वारा
66) underneath (अंडरनीथ) खालच्या जागेत, च्या खाली
67) up to (अप टू) पर्यंत
68) unlike (अनलाइक) च्या पेक्षा निराळा
69) concerning (कन्सर्निंग) बद्दल
70) up till (अप टिल) पर्यंत
71) barring (बारिंग) च्या शिवाय
72) pending (पेंडीग) तोवर, पर्यंत
73) save (सेइव) शिवाय, खेरीज
74) excepting (एक्सेप्टिंग) शिवाय, खेरिज
75) instead of (इन्सटीड आफ) च्या ऐवजी
76) following (फोलोविंग)
77) like (लाइक) सारखा, असं
78) near (निअर) जवळ
79) in lieu of (इन लिउ आफ) च्या ऐवजी
80) due to (ड्युटू) च्या मुळे
81) next to (नेक्स्ट टू) च्या शेजारी
82) in spite of (इन स्पाइट आफ) ची पर्वा न करता
83) owing to (ओइंग टू) च्या मुळे
84) in view of (इन व्हयू आफ) चा विचार करता
85) onto (आनटू) वर
86) together with (टुगेदर विथ) जोडीने घेऊन
87) apart from (अपार्ट फ्राॅम) शिवाय
88) because of (बिकाॅझ आफ) च्या मुळे
89) on account of (आन अकाउंट आफ) च्या प्रीत्यर्थ
90) in comparison with (इन कंपेरिजन विथ) च्या सोबत विचार करता
91) away from (अवे फ्राॅम) या व्यतिरिक्त
92) by means of (बाय मिन्स आफ) च्या मदतीने
93) in accordance with (इन अकाॅर्डंस विथ) च्या अनुसार
94) around (अराउंड) च्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत
95) saving (सेव्हिंग) शिवाय, खेरीज
96) astride (अस्टराइड) दोन्ही बाजूंनी एक एक पाय टाकून
97) on top of (आन टॉप आफ) च्या वर
98) close to (क्लोज टू) जवळपास
99) excluding (एक्सक्लुडिंग) सोडून, वगळून
100) minus (माइनस) वजा
101) toward (टुवार्ड) च्या दिशेने
102) versus (वर्सस) विरूद्ध
103) regarding (रिगार्डिंग) बद्दल
104) notwithstanding (नाॅटविथस्टँडिंग) असूनसुद्धा
===================================
प्रश्न क्रमांक 04 : यांना prepositions असे का म्हणतात ?
उत्तर : कारण शब्दयोगी अव्यये ही वाक्यातील कर्माच्या पूर्वी आलेली असतात.
A preposition is a word or group of words used before a noun, pronoun or noun phrase. It is commonly used to show time, direction, place and location.