Thursday, February 10, 2022

150 मराठी वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ

 नमस्कार मित्रांनो,

 आज आपण शालेय जीवनात उपयोगी पडणारे शंभर महत्त्वाचे मराठी वाक्प्रचार पाहूया. वाक्प्रचार हा मराठी व्याकरणाचा अतिशय महत्त्वाचा असा प्रकार आहे. मराठी विषयाच्या पेपरमध्ये दरवर्षी वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असा प्रश्न हमखास असतोच. हा प्रश्न अचूक सोडवला की पैकीच्या पैकी मार्क मिळतात. पण मराठी भाषेतील असे कित्येक दररोज उपयोगी पडणारे वाक्प्रचार आहेत त्यांचा अर्थ आपल्याला माहीतच नसतो.. चला तर मग आज आपण महत्त्वाचे असे काही वाक्प्रचार पाहूया आणि त्यांचा अर्थ शिकून घेऊया.

खडा टाकून पाहणे - अंदाज घेणे
कावराबावरा होणे  - बावरणे
काखा वर करणे - आपल्याजवळ काहीच नाही असे सांगणे
कपाळ फुटणे - दुर्दैव येणे
डोळे पाणावणे - डोळ्यात पाणी येणे
तडीस नेणे - पूर्ण करणे
घोडे मारणे - नुकसान करणे
थोबाड रंगवणे - तोंडात मारणे
ताळ्यावर आणणे -  योग्य समज देणे
संभ्रमात पडणे -  गोंधळणे
हात चोळणे - चरफडणे
हाता पाया पडणे - खूप विनंती करणे
वठणीवर आणणे -  विनम्र बनवणे
राम नसणे - अर्थ नसणे
मूग गिळणे -  शांत राहणे
साखर पेरणे - गोड गोड बोलून आपले करणे
माश्या मारणे - रिकामटेकडे असणे
वाटाण्याच्या अक्षता लावणे - नकार देणे
हाय खाणे - धास्ती घेणे
हूल देणे - चकवणे
आभाळ कोसळणे - खूप मोठे संकट येणे
उत येणे - अतिरेक होणे
गाशा गुंडाळणे - एकाएकी निघून जाणे

काना डोळा करणे - दुर्लक्ष करणे
कपाळमोक्ष होणे - मरणे
अन्नास जागणे - उपकारांची जाणीव ठेवणे
उचल बांगडी करणे - एखाद्याची जबरदस्तीने हकालपट्टी करणे
आकाश ठेंगणे होणे - खूप आनंद होणे
कणीक तिंबणे - खूप मार देणे
अंगाचा तीळ पापड होणे - खूप राग येणे
घाम गाळणे - खूप कष्ट करणे
चौदावे रत्न दाखवणे - खूप मार देणे
जीव खाली पडणे - काळजीतून मुक्त होणे
डोळ्यात खूपणे - सहन न होणे
तोंडाला पाने पुसणे - फसवणे
तारांबळ उडणे - अतिशय घाई घाई होणे
जीवाची मुंबई करणे - खूप मजा करणे
घोडे पेंड खाणे - अडचण निर्माण होणे
चंग बांधणे - निश्चय करणे
सोन्याचे दिवस येणे - चांगले दिवस येणे
हात ओला होणे - फायदा होणे
विडा उचलणे - निश्चय करणे
मनाने घेणे - निश्चय करणे
वाचा बसणे - बोलता न येणे
हातपाय गळणे - धीर सुटणे
केसाने गळा कापणे - घात करणे
आकाश फाटणे - खूप मोठी संकटे येणे
अटकेपार झेंडा - लावणे खूप पराक्रम करणे
गुजराण करणे - उदरनिर्वाह करणे
खो घालणे - संकट निर्माण करणे

वाट लावणे -  मोडून तोडून टाकणे
राम म्हणणे - शेवट होणे
लौकिक मिळवणे - सर्वत्र मान मिळवणे
मनावर ठसणे - मनावर जोरदारपणे बिंबवणे
मधाचे बोट लावणे - आशा दाखवणे
स्वर्ग दोन बोट उरणे - खूप आनंद होणे
हात देणे - मदत करणे
हाय खाणे - धास्ती घेणे
श्रीगणेशा करणे -  सुरुवात करणे
मात्रा चालणे - योग्य परिणाम होणे
भान नसणे - जाणीव नसणे
जीवाचा धडा करणे - पक्का निश्चय करणे
जीव भांड्यात पडणे - काळजी दूर होणे
डोळे निवणे - समाधान वाटणे
तोंड काळे करणे - नजरेआड होणे
थांग न लागणे - कल्पना न येऊ देणे
थुंकी झेलणे - लाचारी पत्करणे
डोळ्यात धुळ फेकणे -  फसवणे
तिलांजली देणे -  सोडून देणे
अन्नास लावणे - उपजीविकेचे साधन मिळवून देणे
कुत्रा हाल न खाणे - अतिशय वाईट स्थिती येणे
कायापालट होणे - पूर्णपणे बदलणे होणे
उन्हाची लाही फुटणे - अतिशय ऊन पडणे
आच लागणे - झळ लागणे
अत्तराचे दिवे लावणे - भरपूर उधळपट्टी करणे
अडकित्तात सापडणे - संकटात अडकणे
कंठस्नान घालणे - ठार मारणे
खडे चारणे - शरण येण्यास भाग पाडणे
गुण दाखवणे - खरे रूप दाखवणे
गंगेत घोडे न्हाणे - खूप समाधान वाटणे

घडी भरणे - विनाश काळ जवळ येणे
घर धुवून नेणे - सर्वच लुबाडून नेणे
घर डोक्यावर घेणे - खूप गोंधळ घालणे
घोडे मध्येच आडणे - प्रगतीत खंड पडणे
चतुर्भुज होणे - कैद होणे
चव्हाट्यावर आणणे - उघडकीस आणणे
चारी दिशा मोकळ्या होणे - स्वतंत्र होणे
जमीनदोस्त होणे - पूर्णपणे नष्ट होणे
जंग जंग पछाडणे - खूप प्रयत्न करणे
जिभेला हाड नसणे - मनात येईल ते बोलणे
जीवात जीव येणे - हिम्मत येणे
जीव मेटाकुटीस येणे - खूप त्रास होणे
जीव अधीर होणे - उतावीळ होणे
जीव टांगणीला लागणे - चिंताग्रस्त होणे
जीवावर उदार होणे - जीव देण्यास तयार असणे
जीवाचे रान करणे - खूप कष्ट करणे
झळ लागणे - दुष्परिणाम होणे
जीव थोडा थोडा होणे - खूप काळजी वाटणे
टक लावून पाहणे - एकसारखे पाहणे
जीव तीळ तीळ तुटणे - एखाद्यासाठी तळमळणे

दाद न देणे - पूर्णपणे  दुर्लक्ष करणे
दात धरणे - शत्रुत्व करणे
दाढी धरणे - विनंती करणे
धाबे दणाणणे - खूप घाबरणे
पाठ दाखवणे - पळून जाणे
पदरात घालणे - चूक पटवून देणे
बत्तीशी दाखवणे - खूप हसणे
पाणी पडणे - वाया जाणे
नांगी टाकणे - हातपाय गळणे
नजर करणे - भेटवस्तू देणे
पोटाची दामटी वळणे - खायला न मिळणे
पाऊल वाकडे पडणे - वाईट मार्गाने जाणे
बोल लावणे - दोष देणे
बुचकळ्यात पडणे - गोंधळून जाणे
नाक मुरडणे - नापसंती दाखवणे
दुधात साखर पडणे - अधिक चांगले घडणे

पदर मोड करणे - स्वतःचे पैसे दुसऱ्यासाठी खर्च करणे

द्राविडी प्राणायाम करणे - सोपा सोडून कठीण मार्ग धरणे

पाचवीला पुजणे - कायम संकटांची सोबत असणे

मनात मांडे खाणे - मनोराज्य करणे

राईचा पर्वत करणे - शिल्लक गोष्टीला जास्त महत्त्व देणे
पाणी दाखवणे - सामर्थ्य दाखवणे
नाक वर असणे - दिमाख असणे
धरणे धरणे - हट्ट करणे
पोटात शिरणे - मन जिंकणे
पोटात घालणे - क्षमा करणे
पाण्यात पाहणे - खूप तिरस्कार करणे
फाटे फोडणे - अडचणी निर्माण करणे
पोटाला चिमटा घेणे - काटकसर करणे
बत्तीशी रंगवणे - जोराने थोबाडत मारणे
नजरेत भरणे - उठून दिसणे
दातखिळी बसणे - बोलणे अवघड होणे
नाकाने कांदे सोलणे -  बढाया मारणे
नांगी ठेचणे - शिक्षा देणे
राख होणे - पूर्ण नष्ट होणे
डांगोरा पिटणे - सगळीकडे बातमी पसरवणे
तोंडात बोट घालणे - खूप आश्चर्य होणे
दबा धरून बसणे - टपून बसणे
घोडे मध्येच आडणे - प्रगतीत खंड पडणे
कंबर कसणे - तयारी करणे

हातावर तुरी देणे - फसवून निसटून जाणे
रक्ताचे पाणी करणे - खूप मेहनत करणे
मधून विस्तव न जाणे - अतिशय शत्रुत्व असणे
बादरायण संबंध असणे - ओढून काढून संबंध तयार करणे
बोल लावणे - दोष देणे
नाक घासणे - स्वतःचे काम होण्यासाठी दुसऱ्याचे पाय धरणे
जीवाला घोर लागणे - खूप काळजी वाटणे
डोळे दिपवणे - थक्क करणे
डाळ शिजणे - सोय होणे
इकडचा डोंगर तिकडे करणे - फार अवघड काम पूर्ण करणे


No comments:

Post a Comment

Learn to Speak English

Let me play. मला खेळू दे Let me go मला जाऊ दे. Let me eat. मला खाऊ दे. Let me study. मला अभ्यास करू दे. Let me drink milk. मला दूध पिऊ दे. L...