नमस्कार मित्रांनो,
आज आपण इंग्रजीतील अतिशय महत्त्वाचा पण खूप खूप सोपा असलेला व्याकरणाचा एक भाग शिकूया. मी सोपा ह्याच्यासाठी म्हणतोय कारण की, हा व्याकरणाचा भाग आपण कितीतरी वेळा वापरत असतो पण नक्की या भागाला काय म्हणतात हे आपल्याला ठाऊक नसते. पण बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये नामाच्या विभक्ति बद्दल विविध प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे चला तर मग आपण आता सुरु करूया Noun : case म्हणजेच नामाची विभक्ती....
तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो नामाच्या किती विभक्ती आहेत ते..
साधारणपणे इंग्रजीमध्ये नामाच्या पाच विभक्त्या आहेत ज्याला आपण इंग्रजीमध्ये Noun - The Case असे म्हणतो. पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा...हे सगळं तुम्ही अगोदरच कुठेतरी वाचलेलं, पाहिलेलं किंवा लिहिलेलं आहे बरं का... आता मात्र फक्त आपण त्याची उजळणी करतोय.
1. The Nominative Case:
याला इंग्रजीमध्ये नामाची प्रथमा विभक्ती असे म्हणतात. जेव्हा नामाचा उपयोग वाक्यामध्ये कर्ता म्हणून केला जातो तेव्हा त्या नामाची ती प्रथमा विभक्ती असते. खालील इंग्रजी वाक्ये काळजीपूर्वक वाचा.खालील प्रत्येक वाक्यामध्ये नामाचा उपयोग वाक्याचा कर्ता म्हणून केलेला आहे.
1. Aditya is reading a book.
2. Mohan went to his school.
3. Rajesh has played cricket.
4. Seema came back yesterday.
5. A dog was barking.
6. Bangalore is a clean city.
7. Gold is a precious metal.
8. Farmers work very hard.
9. Dilip sang a song.
10. Monkeys are playing tricks.
वरील दहा वाक्यामध्ये विविध नामे ही वाक्याचा कर्ता म्हणून काम करत आहेत म्हणून ही नामाची प्रथमा विभक्ती आहे.
----------------------------------------------------------------------------------
2.The Possessive Case :
या विभक्तीला मराठीमध्ये षष्टी विभक्ती असे म्हणतात. जेव्हा एखाद्या नामाचा उपयोग मालकी हक्क किंवा अधिकार दाखविण्यासाठी केला जातो तेव्हा नामाची षष्ठी विभक्ती वापरली जाते. खालील इंग्रजीतील दहा वाक्ये जर आपण काळजीपूर्वक वाचली तर हा विभक्तीचा प्रकार आपल्या चटकन आणि सहजपणे लक्षात येतो. येथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. षष्ठी विभक्ती मध्ये नामाची मालकी दाखविण्यासाठी नामानंतर Apostrophe नावाचे एक विरामचिन्ह वापरावे लागते. ते कसे वापरतात ते पुढील वाक्यात बघा....
1. This is Dilip's car.
2. That is Soham's book.
3. This is girls' hostel.
4. It is Rani's garden.
5. Anil Kapoor's film will be released very soon.
6. There is Surekha's farm house.
7. That is Anil's bungalow.
8. Here is Meena's bicycle.
9. I visited Rajesh Shinde's blog.
10. He stole Vivek's pencil.
आता खालील काही शब्द काळजीपूर्वक वाचा.....
Dilip's car - दिलीपची कार
Soham's book-सोहमचे पुस्तक
girl's hostel-एका मुलीचे होस्टेल
girls' hostel-अनेक मुलींचे हॉस्टेल
cow's tail-एका गाईचे शेपूट
cows' tail-अनेक गाईंच्या शेपट्या
Anil's bungalow-अनिलचा बंगला
Vivek's pencil-विवेकची पेन्सिल
Meena's bicycle-मीनाची सायकल
Surekha's farm house-सुरेखाचे शेतातील घर
Ajay and Vijay's car -अजय आणि विजय या दोघांची एक कार
Ajay's and Vijay's car - अजय आणि विजय यांच्या वेगळ्यावेगळ्या कार
---------------------------------------------------------------------------------
3. Vocative Case:
आपण बऱ्याच वेळा आपल्या सभोवती असलेल्या मुलांना, मित्रांना, आई-वडील यांना किंवा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना हाक मारून बोलवत असतो. उदाहरणार्थ खालील वाक्ये वाचा...
आदित्य, इकडे ये.
विजय, खाली बस.
अशाप्रकारे इंग्रजीमध्ये पण हाक मारून नावाचा उल्लेख केल्यानंतर त्याला संबोधन विभक्ती किंवा Vocative Case असे म्हणतात. येथे आपल्याला इंग्रजीत लिहितांना एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची आहे.
ती म्हणजे इंग्रजीत वाक्य लिहीत असताना ज्याच्या नावाचा उल्लेख केला त्या नावानंतर आपल्याला स्वल्पविराम म्हणजे comma वापरावा लागतो. आता खालील इंग्रजीतील काही वाक्ये बघा म्हणजे लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल.
Aditya, come here.
Vijay, sit down.
Friends, help me please.
God, help me.
Follow me, Vishal.
Students, keep silence in the classroom.
Anil , close your eyes.
Surekha, don't open that window.
Sukanya, complete your homework.
Folks, listen my words carefully.
----------------------------+---------+-+++++------------------------------
4. Objective Case:
जेव्हा एखादे नाम हे वाक्यातील क्रियापदाचे कर्म म्हणून काम करते तेव्हा त्या नामाची विभक्ती द्वितीया विभक्ती म्हणजे Objective case असते. खालील दहा वाक्ये काळजीपूर्वक वाचल्यानंतर लगेच सगळी विभक्ती आपल्या लक्षात येईल.
Aditya sings a song.
Mohan writes a letter.
Vijay opens the door.
Rahul plays football.
I help friends.
Farmer cuts a tree.
India win the match.
Refugees visit India.
Govind makes a kite.
Teacher teaches English.
वरील दहा वाक्यांमध्ये a song, a letter, the door, football, friends, a tree, the match, India, a kite आणि English ही दहा नामे द्वितीया विभक्ती मध्ये आहेत. वाक्यातील द्वितीया विभक्ती ओळखण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. वाक्यातील क्रियापदाला काय? हा प्रश्न विचारला की, द्वितीया विभक्ती मधील नाम समजते. खालील दोन उदाहरणे बघा....
Aditya sings song.
What does Aditya sing ? - a song.
Mohan writes a letter.
What does Mohan write? - a letter.
Farmer cuts a tree.
What does a farmer cut? - a tree.
-------------------------------------------------------------------------------
5. The Dative Case:
इंग्रजीमधील वाक्यात कर्म दोन प्रकारचे असतात. एक प्रत्यक्ष कर्म आणि दुसरे अप्रत्यक्ष कर्म. वरील गोष्टी थोड्याशा अवघड जरी वाटत असतील तरी त्या खूप सोप्या आहेत हे तुम्हाला खालील वाक्य वाचल्यानंतर लगेच लक्षात येईल. प्रत्यक्ष कर्म म्हणजे direct object व अप्रत्यक्ष कर्म म्हणजे indirect object होय. वाक्यातील जे नाम प्रत्यक्ष कर्म असते त्याची द्वितीया विभक्ती असते तर जे नाम अप्रत्यक्ष कर्म असते त्याची चतुर्थी विभक्ती असते. वरील चौथ्या प्रकारात आपण प्रत्यक्ष कर्म म्हणजे द्वितीया विभक्ती बद्दल शिकलो आता आपण चतुर्थी विभक्ती बद्दल शिकूया. एका वाक्यात जेव्हा दोन कर्म असतात तेव्हा वस्तू ही प्रत्यक्ष कर्म असते तर व्यक्ती ही अप्रत्यक्ष कर्म असते. खालील वाक्य शांतपणे वाचल्यानंतर आपल्याला सर्व गोष्टी लगेच लक्षात येतात.....
1) I gave Aditya a pencil.
Aditya - Indirect object (Dative Case)
a pencil - Direct object ( Objective case)
2) I told Madhav a story.
Madhav - Indirect object (Dative Case)
a story - Direct object (Objective Case)
3) I taught Dipak Mathematics.
Dipak - Indirect object.(Dative Case)
Mathematics - Direct object (Objective Case)
_--------------------------------------------------------------------------------