Saturday, April 3, 2021

साधा वर्तमानकाळ वाक्यरचना, Simple Present Tense

 

 इंग्रजी शिकण्याची पहिली पायरी म्हणजे काळ शिकणे होय. आपल्या समोर एखादा माणूस आला आणि फाडफाड इंग्रजी बोलू लागला की त्याचे जे आपल्याला कौतुक वाटते ते शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य .......तो माणूस डोळ्यांच्या आड गेल्यानंतर ही निदान दोन चार दिवस तरी त्याची इंग्रजी भाषा आपल्या मनात घुटमळत राहते हे मात्र नक्की ........
मी लहानपणापासून पाहत आलोय की, शाळेतील जो मुलगा इंग्रजीत हुशार, त्याला सगळयात जास्त मान आणि महत्त्व .......
माझ्या बालपणी कधी कधी खेडे गावातही कपडे वैगेरे विकायला एखादा तामिळनाडू ,केरळ किंवा दुसऱ्याच राज्यातला माणूस यायचा आणि त्याची ती मोडकी तोकडी इंग्रजी भाषा, त्याचे हातवारे, त्याची माल विकण्यासाठी चाललेली धडपड, भाषेचा उडणारा गोंधळ आणि त्याच्या तोंडाकडे पाहून वेडयागत माना हालवणार्या आपल्या बाया बापड्या यांची आठवण आली की आजही हसून हसून पुरेवाट होते.......
हो,  आज मात्र इंग्रजी चा सुळसुळाट झालाय......
रस्त्याने जाताना कुठे ही दोन चार किलोमीटर गेले आणि एखादे चौरस्ता असलेले गाव लागले  की दिसलाच ..."*******ENGLISH SCHOOL " नावाचा इंग्रजी शाळेचा फलक........
कोणत्याही गावात बुट -साँक्स, टाय, इनशर्ट, रंगीबेरंगी युनिफॉर्म, पाठीवर बँग आणि पाण्याची बाटली असलेला आणि पिवळ्या व्हॅन ची वाट पाहणारा  मुलगा दिसला .......की समजायचे इंग्रजी आपल्या पासून दूर नाही ........पण आपण जे काही इंग्रजी शिकतो आणि  शिकवतो ते उत्तम आणि दर्जेदार असायला हवे ......
=======================================
 आणि म्हणून माझा  आग्रह असतो तो परिपूर्ण आणि अचूक इंग्रजी भाषा शिकण्याचा आणि बोलण्याचा .......त्यामुळे मला वाटते इंग्रजी भाषा शिकवताना जे काही आपण बोलतो आणि लिहितो ते अचूकच असायला पाहिजे ...... कारण अचूक आणि परिपूर्ण भाषा बोलणाऱ्या व्यक्तीचा प्रभाव हा आजीवन टिकणारा असतोच....
=======================================
माझे म्हणणे तुम्हाला समजावून देण्यासाठी चला दोन तीन  प्रसंग पाहू या .....
1) तुमच्या घरचे कोणीतरी आजारी आहे, तुम्हाला त्या व्यक्तीला डाँक्टरला दाखवायचे आहे . तुम्ही कशा प्रकारच्या दवाखान्यात जाल .....
2) तुम्हाला लांबच्या प्रवासाला निघायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक वाहन भाड्याने घ्यायचे आहे . तुम्ही कोणता चालक निवडणार...... 
3) तुमची निवड एका चांगल्या कंपनीत नोकरीसाठी होणार आहे . तुमची मुलाखत इंग्रजी भाषेत होणार आहे .तुम्हाला  कोणत्या इंग्रजी  भाषेत बोलायला आवडेल.....मोडक्या तोडक्या का अचूक आणि परिपूर्ण ....
वरील प्रत्येक उदाहरणात आपण best गोष्टींनाच पसंती देणार हे सांगायची गरज नाही  .....म्हणजे Best Doctor,  Best Driver आणि Best English .....
आणि मग जर आपल्याला सर्वोत्तम इंग्रजी भाषा शिकायची असेल तर आपल्याला इंग्रजी भाषेचे काळ शिकून घ्यावे लागतील . खरंच सांगतो संपूर्ण इंग्रजी भाषेचा अभ्यास केवळ इंग्रजीतील बारा प्रकारच्या काळावरच  अवलंबून आहे . ज्याला इंग्रजी भाषेतील बारा प्रकारचे काळ आणि त्यांची वाक्यरचना समजली त्याला संपूर्ण इंग्रजी भाषाच समजली ......
=======================================
चला तर मग टप्प्या - टप्प्याने सुरुवात करूया ....
पहिल्यांदा वाचून घेऊया इंग्रजी भाषेसाठी लागणार्या बारा काळांची यादी आणि सुरूवात करूया इंग्रजी भाषेचे काळ शिकायला .मला खात्री आहे एकदा का तुम्ही हे बारा काळ लक्षात ठेवले रे ठेवले .....झाले तुम्ही इंग्रजीचे मालक......
=======================================
1)  👉🎯 वर्तमानकाळ  ( Present Tense) 
वर्तमानकाळाचे चार उपप्रकार आहेत . खालील यादी पहा आणि नावे लक्षात राहू दया .....
1) साधा वर्तमानकाळ 
2) चालू वर्तमानकाळ 
3) पूर्ण वर्तमानकाळ 
4) पूर्ण अपूर्ण वर्तमानकाळ 
=======================================
2)👉🎯 भूतकाळ ( Past Tense) 
भूतकाळाचे चार उपप्रकार आहेत . नावे वाचा आणि कायम लक्षात ठेवा ....
1) साधा भूतकाळ 
2) चालू भूतकाळ 
3) पूर्ण भूतकाळ 
4) पूर्ण अपूर्ण भूतकाळ 
=======================================
3)👉🎯 भविष्यकाळ ( Future Tense) 
भविष्यकाळाचे चार उपप्रकार आहेत. त्यांची नावे वाचा आणि ध्यानात ठेवा .
1) साधा भविष्यकाळ
2) चालू भविष्यकाळ
3) पूर्ण भविष्यकाळ
4) पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ
========≠========================≠=====👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
बारा काळांची नावे लक्षात राहिली म्हणजे तुमचा इंग्रजी अभ्यासाचा प्रवास सुरू झाला म्हणून समजा ......
=======================================
तर आपण आज सर्वात पहिला काळ शिकायला सुरुवात करत आहोत ....काळाचे नाव 1) साधा वर्तमानकाळ 
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
          🌲🌲🌲साधा वर्तमानकाळ 🌲🌲🌲
आपण दररोज वेगवेगळी कामे करतो आणि इतरही  कोणी दररोज काय काय करत असतो ते पण आपण सांगत असतो......जरा खालील वाक्ये बघा.....
1) मी  शाळेत जातो.
2) आई  स्वयंपाक करते.
3) दुकानदार सामान मोजून देतो.
4) भाजीवाला पालेभाज्या विकतो.
5) बैल शेतात चारा खातो.
6) बसचालक बसगाडी चालवतो.
7)  टेलर कपडे शिलतो.
8) डॉक्टर रूग्णांना तपासून औषधे देतो.
9) सूर्य आकाशात चमकतो.
10) सायकल दुकानदार पंक्चर काढून देतो.
=======================================
वरील वाक्यांचे निरीक्षण केले की, एक गोष्ट चटकन समजून जाते ...ती ही की वरील वाक्यें तर आपण दररोज बोलतो आणि  या गोष्टी तर रोज रोज घडणाऱ्या आहेत...म्हणजेच दररोज घडणाऱ्या गोष्टी सांगताना आपण साधा वर्तमानकाळ बोलत असतो....म्हणजेच रोजच्या सवयी सांगण्यासाठी साधा वर्तमानकाळ वापरला जातो .
=======================================
आता खालील क्रियापदांची यादी  वाचा ...
जातो, येतो, आणतो, नेतो, रडतो, हसतो, नाचतो, खेळतो, बोलतो, पाहतो, सांगतो, शिकतो, शिकवतो, बसतो, उठतो, लिहितो, ऐकतो, वाचतो, भाजतो, तळतो, शिजवितो, फेकतो, उचलतो, सांगतो, सांडतो, देतो, घेतो, विकतो, पाठवतो, पाठ करतो,  पोहतो, वाचवतो, मारतो, पितो, खातो, भेटतो, वाढतो, भांडतो, बनवतो, मोडतो, उकळतो, जन्मतो, मरतो.......
वरील  क्रिया जर मुलीने किंवा स्त्रीने  केल्या तर ....
जाते, येते, आणते, नेते, रडते, हसते, नाचते, खेळते.......
वरील क्रिया जर एका पेक्षा जास्त व्यक्तींनी एकाच वेळी केल्या तर....
जातात, येतात, आणतात, नेतात, रडतात, हसतात, नाचतात, खेळतात......
=======================================
आता फक्त एकच गोष्ट ध्यानात ठेवायची ....
ज्या वाक्याचा शेवटी तो, ते, तात ही अक्षरे असतात ते वाक्य साधा वर्तमानकाळाचे....
चला तर मग आता शिकुया साधा वर्तमानकाळ इंग्रजीत...
=======================================
आता फक्त दोनच गोष्टी ध्यानात ठेवा 
1) साधा वर्तमानकाळ मधील वाक्यात  क्रियापदाच्या शेवटी तो, ते, तात यापैकीच एक अक्षर येते.
2) हेच वाक्य इंग्रजी भाषेत लिहिताना क्रियापदाचे पहिले रूप येते.
=============================≠=========
साध्या  वर्तमानकाळाची वाक्यरचना पहा............
🎯 1) साधी  वाक्ये ( Affirmative Sentences) 
A)  PLAY
1) मी खेळतो....... .....I play.... ....
2)आम्ही खेळतो........ We play..... 
3) तू खेळतो............. You play..... 
4) तुम्ही खेळता..........You play..... 
5) तो खेळतो...............He plays...... 
6) ती खेळते...............She plays.... 
7) ते खेळते ................It plays.... 
8) ते ( एकापेक्षा जास्त जण)  खेळतात.....They play...... 
=============================≠=========
B) READ
1) मी वाचतो ...............I read..... 
2) आम्ही वाचतो..........We read....... 
3) तू वाचतो ..............You read....... 
4) तुम्ही वाचता .........You read.......
5) तो वाचतो..............He reads........... 
6) ती वाचते...............She reads.......... 
7) ते वाचते .................It reads.......... 
8) ते ( एकापेक्षा जास्त जण)  वाचतात ......They read.......
 ======================================
3) SWIM 
1) मी पोहतो.................I swim...... 
2) आम्ही पोहतो............We swim....... 
3) तू पोहतो ..................You swim........ 
4) तुम्ही पोहता ............. You swim....... 
5) तो पोहतो..................He swims......... 
6) ती  पोहते................ .She swims........ 
7) ते पोहते.....................It swims........ 
8) ते ( एकापेक्षा जास्त जण)  पोहतात.... They swim...
=======================================
 🎯🎯 2) प्रश्नार्थक वाक्ये  ( Interrogative sentences)
प्रश्नार्थक वाक्यांची वाक्यरचना खालीलप्रमाणे असते..... 
A) PLAY
1) मी खेळतो का ..............? Do I play............ ?
2) आम्ही खेळतो का...........? Do we play......... ?
3) तू खेळतो का .................? Do you play.......... ?
4) तुम्ही खेळता  का ............? Do you play........ ?
5) तो खेळतो का................? Does he play........ ?
6) ती खेळते का .................? Does she play...... ?
7) ते खेळते का .................? Does it play.......... ?
8) ते ( एकापेक्षा जास्त जण)  खेळतात का......? Do they play ........?
=======================================
2) READ
1) मी वाचतो का...............? Do I read..........? 
2) आम्ही वाचतो का...........? Do we read........? 
3) तू वाचतो का..................? Do you read.......? 
4) तुम्ही वाचता का.............? Do you read.......? 
5) तो वाचतो का..................? Does he read.......? 
6) ती वाचते का ................? Does she read.......? 
7) ते वाचते का ..................? Does it read.........? 
8) ते ( एकापेक्षा जास्त जण)  वाचतात का...........? Do they read..........? 
=======================================
C)  SWIM
1) मी पोहतो का..........? Do I swim........? 
2) आम्ही पोहतो का.........? Do we swim.......? 
3) तू पोहतो का..............? Do you swim.......? 
4) तुम्ही पोहता का...........? Do you swim..........? 
5) तो पोहतो का............?  Does he swim.........? 
6) ती पोहते का............?  Does she swim.........? 
7) ते पोहते का............? Does it swim.........? 
8) ते ( एकापेक्षा जास्त जण)  पोहतात का .........? Do they swim.........? 
=======================================
🎯🎯🎯 3) नकारात्मक वाक्ये ( Negative Sentences)
नकारात्मक वाक्यांतील रचना खालीलप्रमाणे असते.....
A)  PLAY 
1) मी खेळत नाही ............... I don't play.............. 
2) आम्ही खेळत नाही ............ We don't play......... 
3) तू खेळत नाही ................. You don't play............. 
4) तुम्ही खेळत नाही ............... You don't play......... 
5) तो खेळत नाही ................... He doesn't play......... 
6) ती खेळत नाही .................. She doesn't play......... 
7) ते खेळत नाही .................... It doesn't play............. 
8) ते ( एकापेक्षा जास्त जण)  खेळत नाहीत....... They don't play.......... 
=======================================
B)  READ 
1) मी वाचत नाही .............. I don't read......... 
2) आम्ही वाचत नाही .......... We don't read........ 
3) तू वाचत नाही ............... You don't read............. 
4) तुम्ही वाचत नाही ........... You don't read........... 
5) तो वाचत नाही ............... He doesn't read........... 
6) ती वाचत नाही .............. She doesn't read......... 
7) ते वाचत नाही .................It doesn't read.............. 
8) ते ( एकापेक्षा जास्त जण)  वाचत नाहीत .......... They don't read........... 
=======================================
C)  SWIM
1) मी पोहत नाही ............ I don't swim........... 
2) आम्ही पोहत नाही .........We don't swim.......... 
3) तू पोहत नाही ..............You don't swim......... 
4) तुम्ही पोहत नाही ........... You don't swim......... 
5) तो पोहत नाही ............. He doesn't swim........... 
6) ती पोहत नाही ............She doesn't swim........ 
7) ते पोहत नाही ............. It doesn't swim.......... 
8) ते ( एकापेक्षा जास्त जण)  पोहत नाहीत........... They don't swim........... 
=======================================
🎯🎯🎯🎯 4) नकारात्मक प्रश्नार्थक वाक्ये  ( Negative interrogative sentences) 
नकारात्मक प्रश्नार्थक वाक्ये खालील वाक्यरचना वापरून लिहा........
A) PLAY 
1) मी खेळत नाही का ..........? Don't I play...........? 
2) आम्ही खेळत नाही का .......? Don't we play.........? 
3) तू खेळत नाही का ...........? Don't you play.........? 
4) तुम्ही खेळत नाही का .......? Don't you play.........? 
5) तो खेळत नाही का ...........? Doesn't he play.......? 
6) ती खेळत नाही का .........? Doesn't she play........?
7) ते खेळत नाही का ............? Doesn't it play...........? 
8) ते ( एकापेक्षा जास्त जण)  खेळत नाहीत का..........? Don't they play...........? 
=======================================
B)  READ
1) मी वाचत नाही का .......?  Don't I read......? 
2) आम्ही वाचत नाही का ......? Don't we read.....? 
3) तू वाचत नाही का...........? Don't you read........? 
4) तुम्ही वाचत नाही का........? Don't you read......? 
5) तो वाचत नाही का .........? Doesn't he read........? 
6) ती वाचत नाही का..........? Doesn't she read......? 
7) ते वाचत नाही का...........? Doesn't it read........? 
8) ते ( एकापेक्षा जास्त जण) वाचत नाहीत का ..........? Don't they read......? 
=======================================
C)  SWIM 
1) मी पोहत नाही का .............? Don't I swim...........? 
2) आम्ही पोहत नाही का........? Don't we swim...........? 
3) तू पोहत नाही का..............? Don't you swim........? 
4) तुम्ही पोहत नाही का...........? Don't you swim........? 
5) तो पोहत नाही का...........? Doesn't he swim.......? 
6) ती पोहत नाही का ..........? Doesn't she swim.......? 
7) ते पोहत नाही का ...........? Doesn't it swim.......? 
8) ते ( एकापेक्षा जास्त जण)  पोहत नाहीत का ............? Don't they swim............? 
=======================================
आता फक्त खालील गोष्टी समजून घ्या.............
👉 वरील play, read आणि  swim यांच्या जागी इंग्रजीतील इतर क्रियापदे वापरून आपण सहज इंग्रजी बोलू शकतो . त्यासाठी फक्त आपल्याला क्रियापदासमोर आपल्याला पाहिजे तो शब्द लिहावा लागेल..... खालील वाक्ये बघा ........
1)  I play..... 
👉 I play cricket.  I play tennis. He plays football. She plays hockey. 
2) I read...... 
👉 I read books.  I read a story.  I read newspapers. He reads a story book. She reads a novel. 
3) I swim......
👉 I swim in water.  He swims in a river. You swim in a pool. They swim in a pond. 
=======================================
👉 आपण He च्या ऐवजी माणसांची,  She ऐवजी  स्त्रियांची आणि It ऐवजी प्राणी आणि वस्तू यांची नावे वापरू शकतो ...
1) He plays cricket everyday.
🎯 Aditya plays cricket everyday. 
2) He reads a story book. 
🎯  Rajesh reads a story book. 
3) She swims in the river. 
🎯 Geeta swims in the river. 
4) She likes fruits and vegetables. 
🎯 Manisha likes fruits and vegetables. 
5) It drinks water. 
🎯 A dog drinks water. 
=======================================
🌚🌚🌚🌚🌚🌚🌚🌚🌚🌚🌚🌚🌚🌚🌚🌚🌚
साध्या वर्तमानकाळात बोलताना एक चूक जास्तीत जास्त लोक करतात ती खालीलप्रमाणे ...... 
He, She आणि  It ने सुरू होणार्‍या वाक्यांतील क्रियापदांना s किंवा es लावावेच लागते. पण लोक हे विसरून जातात. खालील वाक्ये बघा .....
❌ He read a book. ( चूक)  
🤗 He reads a book.  ( बरोबर)  
❌ She go to school everyday. ( चूक)  
🤗 She goes to school everyday. (बरोबर) 
❌ Anil don't  complete his homework. (चूक) 
🤗 Anil doesn't complete his homework. (बरोबर) 
❌ Don't see like ice-creams ? ( चूक) 
🤗 Doesn't she like ice-creams ? (बरोबर) 
❌ Do he take tea? ( चूक) 
🤗 Does he take tea? (बरोबर)  
=======================================
👉जेव्हा प्रश्न विचारायचा असेल तेव्हा प्रश्नार्थक आणि नकारात्मक प्रश्नार्थक वाक्ये वापरा......फक्त  वरील क्रियापदे बदलून घ्या आणि रिकाम्या जागी गरजेचे शब्द भरा.
उदाहरणे
1) Do I play cricket?
2) Do you read books? 
3) Does he swim in river? 
4) Do they help you? 
5) Does she like a mango? 
=======================================
👉 इंग्रजी भाषेत  what, when, where, why, who, which, how many, how much, whom   ........यासारखे शब्द प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात . ते मात्र वाक्यांच्या सुरुवातीला येतात.
उदाहरणे
1) What do you play? 
2) Where does he go? 
3) Why does she shout? 
4) When does school open? 
5) Why don't you go to gym? 
=======================================

No comments:

Post a Comment

Learn to Speak English

Let me play. मला खेळू दे Let me go मला जाऊ दे. Let me eat. मला खाऊ दे. Let me study. मला अभ्यास करू दे. Let me drink milk. मला दूध पिऊ दे. L...