विद्यार्थी मित्रांनो,
आज मी तुम्हाला दररोज इंग्रजी बोलताना उपयोगी पडणारी आणि अतिशय महत्त्वाची अशी पाच प्रकारची वाक्ये कोणती ते सांगणार आहे . आपले दररोज चे बोलणे यांच्या शिवाय पूर्ण होऊच शकत नाही याची मला खात्री आहे . चला तर मग पाहूया कोणती आहेत ही वाक्ये आणि कशी असते यांची रचना .........
1) Feel like...
2) Would like to....
3) had better ....
4) ought to.....
5) should be able to.....
-------------------------------------------------------------
🍎1) SHOULD BE ABLE TO : करता आले पाहिजे ....
आपण भरपूर वेळा आपल्या मुलांना कामे सांगतो . शिक्षकही विद्यार्थ्यांना कामे देतात. आई वडील त्यांचा लेकरांना कामे सांगतात.... आणि कधी कधी मुलांना काम जमले नाही की लगेच आपण त्यांच्यावर रागावतो . आणि आपोआपच मोठया माणसांच्या तोंडून पुढील प्रमाणे शब्द बाहेर पडतात..........एवढा मोठा झाला आणि साधे सोपे कामं जमत नाहीत का रे..... तुला हे करता आले पाहिजे ...तुला ते करता आले पाहिजे .......
खालील प्रकारच्या मोठ्या माणसांनी लहान मुलांना दिलेल्या सूचना आपण नेहमी ऐकतो....
1) बाळा, तुला स्वच्छ अंघोळ करता आली पाहिजे .
2) आदित्य, तुला सायकल चालवता आली पाहिजे .
3) शीतल, तू मोठी झाली . तुला स्वयंपाक करता आला पाहिजे 4) तुला अचूक हिशेब करता आला पाहिजे .
5) तुला पोहता आले पाहिजे .
चला तर मग आपण लगेच पाहूया वरीलप्रमाणे वाक्ये इंग्रजीत कशी बोलावीत ते......
1) मला पोहता आले पाहिजे ..........I should be able to swim.........
2) आम्हाला पोहता आले पाहिजे ....We should be able to swim.......
3) तुला पोहता आले पाहिजे ..........You should be able to swim.......
4) तुम्हाला पोहता आले पाहिजे ......You should be able to swim........
5) त्याला पोहता आले पाहिजे ........He should be able to swim........
6) तिला पोहता आले पाहिजे .........She should be able to swim.......
7) ते ला पोहता आले पाहिजे .........It should be able to swim............
8) त्यांना पोहता आले पाहिजे ........They should be able to swim.......
खालील दहा वाक्ये जर तुम्ही मन लावून वाचली तर तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांना सांगणार की त्यांना काय काय करता आले पाहिजे ......
1) तुला चांगली इंग्रजी बोलता आली पाहिजे .
👉 You should be able to speak pure English.
2) तुला गाडी चालवता आली पाहिजे .
👉 You should be able to ride a bike.
3) तुला कपड्यांना इस्त्री करता आली पाहिजे .
👉You should be able to iron clothes.
4) माझ्या मुलीला चवदार स्वयंपाक करता आला पाहिजे .
👉 My daughter should be able to cook tasty food.
5) माझ्या मुलाला संगणक चालवता आला पाहिजे .
👉 My son should be able to operate a computer.
6) तुला नीट लिहिता आले पाहिजे .
👉 You should be able to write neatly.
7) विद्यार्थ्यांना छान भाषणे करता आली पाहिजे .
👉 Students should be able to deliver impressive speeches.
8) मला लोकांसमोर बोलता आले पाहिजे .
👉I should be able to speak in front of people.
9) तुला तबला वाजवता आला पाहिजे .
👉 You should be able to play on tabla.
10) तुला कविता लिहिता आली पाहिजे .
👉 You should be able to compose a poem.
🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸
🍎2) OUGHT TO : केले पाहिजे
Ought ची वाक्ये कोणत्या वेळी बोलावीत?
Ought to चा उपयोग आपण एखाद्या माणसाची नैतिक जबाबदारी काय आहे हे सांगण्यासाठी , एखाद्या माणसाचे सामाजिक कर्तव्य काय आहे हे सांगण्यासाठी , एखाद्या माणसाला सल्ला देण्यासाठी, एखाद्या गोष्टीची शक्यता व्यक्त करण्यासाठी आणि एखाद्या माणसाचे खरे कर्तव्य कोणते आहे हे इंग्रजीत सांगण्यासाठी ought to चा वापर करून वाक्ये बोलावीत.
Should आणि ought to ची वाक्ये एखाद्या माणसाने एखादे काम 'केले पाहिजे .....' असे सांगण्यासाठी वापरतात पण should पेक्षा ought to ला जास्त वजन आहे हे लक्षात ठेवा .
खालील वाक्ये पाहुया .......
1) तू परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे .
2) आपण प्रामाणिकपणे वागले पाहिजे .
3) तू वेळेवर औषधे घेतली पाहिजे .
4) तो वर्गात असला पाहिजे .
5) शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लावल्या पाहिजे .
-------------------------------------------------------------
Ought to चा वापर करून आपण चारही प्रकारची वाक्ये बोलू शकतो ..... कोणती ते खाली पहा ......
🍎साधे वाक्य
1) मी पिले पाहिजे ........I ought to drink ..........
2)आम्ही पिले पाहिजे ....We ought to drink .....
3)तू पिले पाहिजे ..........You ought to drink.....
4) तुम्ही पिले पाहिजे .....You ought to drink.....
5) त्याने पिले पाहिजे .....He ought to drink.....
6) तिने पिले पाहिजे ......She ought to drink....
7) ते ने पिले पाहिजे ......It ought to drink....... ..
8) त्यांनी पिले पाहिजे ...They ought to drink.......
-------------------------------------------------------------
आपण खालील वाक्ये शांतपणे वाचली की आपल्या लगेच लक्षात येईल एवढी साधी वाक्ये आहेत ही.....
1) मी माझा गृहपाठ दररोज पूर्ण केला पाहिजे .
👉I ought to complete my homework everyday.
2) आपण आपली गाडी काळजीपूर्वक चालवली पाहिजे .
👉We ought to drive our car very carefully.
3) तू आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे .
👉You ought to look after your parents.
4)तुम्ही वाहन चालविताना परवाना सोबत ठेवला पाहिजे .
👉 You ought to carry your driving license.
5) त्याने सायकल रस्त्यावर डाव्या बाजूने चालवली पाहिजे.
👉 He ought to keep left while cycling on the road.
6) तिने रिकाम्या वेळात पुस्तके वाचली पाहिजे .
👉She ought to read useful books in off time.
7) त्यांनी उन्हाळ्यात दिवसातून दोन वेळा सरबत पिले पाहिजे.
👉 They ought to drink lemonade twice a day during summer.
8) आदित्यने दर रविवारी भरपूर खेळले पाहिजे .
👉 Aditya ought to play for a long time on Sundays.
9) श्रीमंत लोकांनी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे .
👉The rich ought to help needy and budding students.
10) आपण सैनिकांना आदराने वागवले पाहिजे .
👉 We ought to treat our soldiers respectfully.
11) तो पुण्यात असायला पाहिजे .
👉 He ought to be in Pune.
--------------------------------------------------------------------
🍎 प्रश्नार्थक वाक्ये
1) मी पिले पाहिजे का..........? Ought I to drink.........?
2) आम्ही पिले पाहिजे का.....? Ought we to drink....?
3) तू पिले पाहिजे का..........? Ought you to drink ....?
4) तुम्ही पिले पाहिजे का......? Ought you to drink ...?
5) त्याने पिले पाहिजे का.....? Ought he to drink.....?
6) तिने पिले पाहिजे का......? Ought she to drink... ..?
7) ते ने पिले पाहिजे का.......? Ought it to drink...... ?
8) त्यांनी पिले पाहिजे का.......? Ought they to drink... ?
---------------------------------------------------------------------
आता प्रश्नार्थक वाक्यांचा सराव करूया......
1)मी आज रात्री परतले पाहिजे का?
👉Ought I to return by tonight?
2) तिने शाळेतील सर्व उपक्रमात भाग घेतला पाहिजे का ?
👉 Ought she to participate in all school activities?
3) नागरिकांनी घरीच थांबले पाहिजे का?
👉 Ought citizens to stay at home?
---------------------------------------------------------------------
🍎नकारात्मक वाक्ये
1) मी पिले नाही पाहिजे ............I ought not to drink......
2) आम्ही पिले नाही पाहिजे ......We ought not to drink..
3) तू पिले नाही पाहिजे ..........You ought not to drink........
4) तुम्ही पिले नाही पाहिजे ........You ought not to drink..........
5) त्याने पिले नाही पाहिजे ........He ought not to drink.........
6) तिने पिले नाही पाहिजे ........She ought not to drink............
7) ते ने पिले नाही पाहिजे ........It ought not to drink..........
8) त्यांनी पिले नाही पाहिजे ......They ought not to drink.........
---------------------------------------------------------------------
नकारात्मक वाक्यांचा सराव........
1) तू पैसै वाया नाही घातले पाहिजेत .
👉 You ought not to waste money.
2) विद्यार्थ्यांनी रस्तयावर कचरा नाही टाकला पाहिजे .
👉 Students ought not to chuk the litter on roads.
3) वाहनचालकांनी दारू पिऊन गाडी नाही चालवली पाहिजे .
👉 Drivers ought not to drink and drive.
---------------------------------------------------------------------
🍎 मी पिले नाही पाहिजे का .......? Ought I not to drink..........?
वाक्ये पाहुया ...
1) मी शीतपेये पिले नाही पाहिजे का?
👉 Ought I not to drink cold drinks?
2) मी तुला धोक्याचा इशारा दिला नाही पाहिजे का?
👉 Ought I not to sound a bell of warning for you?
3) त्याने पुस्तकांसाठी पैसे खर्च केले नाही पाहिजे का?
👉 Ought he not to spend money for books?
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋
nice collection of sentences sirji
ReplyDelete