The ची खालील माहिती फक्त एकदा वाचा ...पुन्हा कधीच अडचण येणार नाही ...
आपण नेहमी the हे article म्हणजे उपपद वापरतो . The हे definite article आहे. The चा वापर कुठे आणि कसा केला जातो याबद्दल आपण या पोस्टमध्ये जाणून घेऊया . पण त्याअगोदर the चा 'द' आणि 'दी' या दोन प्रकारे उच्चार का आणि केंव्हा केला जातो या विषयी थोडक्यात माहिती घेऊ या.
========================≠======
01) the ( दी) : The ला 'दी' केव्हा म्हणतात ...
The नंतर येणारा शब्द जर स्वर ध्वनी (vowel sound) ने सुरू होत असेल तर अशावेळी 'दी' असा उच्चार करावा .
1) the (दी) ice-cream
2) the (दी) onion
3) the ( दी) organism
4) the (दी) east
5) the (दी) ant
6) the (दी) apple
7) the (दी) umpire
8) the (दी) orange
9) the (दी) eagle
10) the (दी) umbrella
================================
02) The ला 'द' केव्हा म्हणतात .....
The नंतर येणारा शब्द जर व्यंजन ध्वनी (consonant sound) ने सुरू होत असेल तर अशावेळी 'द' असा उच्चार करावा .
1) the (द) building
2) the (द) classroom
3) the (द) door
4) the (द) road
5) the (द) shop
6) the (द) tree
7) the (द) man
8) the (द) car
9) the (द) story
10) the(द) book
================================
चला आता आपण the बद्दल सर्व प्रकारची महत्वपूर्ण माहिती घेऊया म्हणजे पुन्हा पुन्हा अडचण येणार नाही ....खरं सांगायचं म्हणजे the हा शब्द that शब्दापासून तयार झाला आहे .आपल्याला चांगले माहिती आहे की इंग्रजी भाषेत तीन articles म्हणजे उपपदे आहेत. ती तीन उपपदे म्हणजे a, an, आणि the ही आहेत. A आणि an यांना अनिश्चित उपपदे म्हणतात आणि the ला निश्चित उपपद असे म्हणतात ....असे का बरे ? The वेगळे का समजतात...?
याचे कारण बघा ....
The आपण पूर्णपणे ओळख असलेल्या गोष्टीसाठी वापरतो म्हणजे आपण the लावले की समजावे ती वस्तू आपल्या ओळखीची आहे ... म्हणूनच the हे निश्चित उपपद आहे ....
याउलट a आणि an हे नवीन आणि ओळख नसलेल्या एकवचनी नामाबद्दल वापरतात....
चला ही माहिती थोडक्यात आणि इंग्रजी भाषेत खाली दिलेली आहे ..बघा तुम्हाला समजते का ते...पण the चा उपयोग कोठे कोठे केला पाहिजे ते खाली लिहिलेले सर्व नियम मात्र नक्की वाचा बरं का मित्रांनो ...
Now let's talk about 'the' as an article....
In fact 'the' is weak form of 'that'.
We know that there are three articles in English. 'A' and 'An' are called as indefinite articles whereas 'The' is said to be a definite article. 'The' is used to define a particular thing or person so it is called as a definite article.
===========≠===================
The विरूद्ध A, An.....फरक लक्षात ठेवा ...
* एखादे नाम (countable noun) आपण पहिल्यांदाच वापरले की त्यापूर्वी 'A' आणि 'An' यांचा उपयोग करायला पाहिजे पण आपण ज्यावेळी एका विशिष्ट नामाबद्दल( म्हणजे ज्याची आपल्याला माहिती आहे अशा नामाबद्दल) बोलू किंवा लिहू लागलो की मात्र the वापरायला पाहिजे.
खालील दोन वाक्ये पहा.......
1) I saw an old man. ( या वृध्द माणसाला तुम्ही ओळखत नाही .)
2) I saw the old man. (या वृध्द माणसाला तुम्ही अगोदरच ओळखता.)
चला तर मग मनामध्ये दोन्ही प्रकारची दहा दहा वाक्ये बोला.......
=============================
'The ' चा खालील वाक्यांतील उपयोग कायम लक्षात राहू दया .....A to Z नियम.
=============================
'THE' कोठे वापरावे बरं ?
खालील सोपे नियम वाचा .....
A) 'The' द चा उपयोग धर्माच्या नावाच्या अगोदर करतात . खालील वाक्ये बघा..
The is used before the names of religions.
Ex. 1) The Sikhs
2) The Muslims
3) The Hindu
4) The Buddhist
==============================
B) ' The' चा उपयोग धर्मग्रंथांच्या नावाच्या अगोदर करतात...
The is used before the names of scriptures.
1) The Gita
2) The Bible
3) The Kuran
4) The Mahabharata
==============================
C) 'The'चा उपयोग संगीत साधनांच्या नावांच्या अगोदर करतात....
The is used before the names of musical instruments.
1) The piano
2) The flute
3)The guitar
4) The harmonium
==============================
D) 'The'चा उपयोग दिशांच्या नावाच्या अगोदर करतात....
The is used before the names of the directions.
1) The East
2) The West
3) The South
4) The North
==============================
E) 'The' चा उपयोग नामांकित मासिके आणि वर्तमानपत्रे यांच्या नावाच्या अगोदर करतात...
The is used before the names of newspapers and magazines.
1) The Hindu
2) The Indian Express
3) The Times of India
4) The Hindustan Times
===============================
F) 'The' चा उपयोग जगात प्रसिद्ध असलेल्या इमारती किंवा वास्तू यांच्या नावापूर्वी करतात.खालील उदाहरणे बघा...
The is used before the names of world famous and well known structures.
1) The Red Fort
2) The Raigarh Fort
3) The Tajmahal
4) The Eiffel Tower
==============================
G) 'The' चा उपयोग एक्सप्रेस रेल्वे, जहाजे आणि विमाने यांच्या नावा अगोदर करतात ...
The is used before the names of trains, ships and aeroplanes.
1) The Suchkhand Express
2) The Vikrant
3) The Tapovan Express
4) The Titanic
=============================
H) 'The ' चा उपयोग एखाद्या देशातील नागरिकांबद्दल माहिती देताना करतात...
The is used before the names of peoples.
1) The Indians
2) The Americans
3) The South Africans
4) The Egyptians
=================≠============
I) 'The' चा उपयोग राजकीय पक्ष यांची नावे लिहिण्यासाठी करतात...
The is used before the names of political parties.
1)The Republican Party
2) The Democratic Party
2) The Communist Party
4) The Aam Aadami Party
==============================
J) 'The' चा उपयोग भौतिक स्थान सांगतात त्या शब्दांच्या अगोदर करतात ...
The is used before the words that show physical positions.
1) The right
2) The left
3) The bottom
4) The front
==============================
K) 'The' चा उपयोग केल्याशिवाय खालील इंग्रजी शब्द लिहू नका ...
The is used before following words.
1) The office
2) The theatre
3) The museum
4) The station
5) The cinema
==============================
L) 'The' चा उपयोग नदीच्या नावाच्या अगोदर करतात ...
The is used before the names of rivers.
1) The Ganga
2) The Nile
3) The Amazon
4) The Godavari
==============================
M) 'The'चा उपयोग क्रमवाचक संख्या सांगताना करतात...
The is used before ordinals.
1) The first
2) The second
3) The third
4) The ninth
=============================
N) 'The'चा उपयोग पर्वतांच्या नावापूर्वी करतात..
The is used before the names of mountain ranges.
1) The Andes
2) The Alps
3) The Himalayas
4) The Sahyadris
===============================
O) 'The'चा उपयोग महासागर, वाळवंट आणि समुद्र यांच्या नावा अगोदर करतात ...
The is used before the names of oceans, deserts and seas.
1) The Indian ocean
2) The Arabian sea
3) The Pacific ocean
4) The Sahara
==============================
P) 'The'चा उपयोग जगातील एकमेव असणार्या वस्तूचे नाव लिहिताना त्या अगोदर करतात ..
The is used before unique objects in the world.
1) The earth
2) The sun
3) The moon
4) The sky
=============================
Q) 'The'चा उपयोग इंग्रजी भाषेतील degree of comparison मध्ये Superlative degree मधील विशेषणे लिहिताना करतात...
The is used before superlative adjectives.
1) the tallest tower
2) the fattest boy
3) the newest car
4) the fastest train
==========================≠===
R) 'The' चा उपयोग हवामानाशी संबंधित शब्द लिहिताना करतात...
The is used before words related to weather.
1) The storm
2) The wind
3) The rain
4) The air
==============================
S) 'The' चा उपयोग अनेकवचनी अडनाव लिहिताना त्यापूर्वी करतात...
The is used before plural surnames that represent the whole families.
1) The Shindes
2) The Mores
3) The Jadhavs
4) The Kolhes
=============================
T) 'The' वापरून जर आपण खालील शब्द लिहिले तर अर्थ कसा बदलतो ते पहा....
1)Poor (पुअर) गरीब
👉 The poor ( द पुअर) सर्व गरीब माणसे
2) Weak (विक) अशक्त
👉The weak (द विक) सर्व अशक्त माणसे
म्हणजे the वापरून जर विशेषण लिहिले तर त्याचा अर्थ त्या प्रकारची सर्व माणसे असा होतो.खालील मराठी आणि इंग्रजी वाक्ये वाचा बरं एक वेळा ....
1) आदित्यने गरीब लोकांना मदत केली .
Aditya helped the poor.
2) आदित्यने अशक्त लोकांना मदत केली .
Aditya helped the weak.
आता हीच माहिती इंग्रजी भाषेत थोडक्यात ....
Best and easy to know
ReplyDeleteLot of thanks